Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03
'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्यामते गायकांनाही कळलं
माझ्यामते गायकांनाही कळलं नसणार.. की हा आपल्या गाण्यामुळे असा झालाय की इतर काही कारणाने.. >>>> अगदी अगदी..
कुठून हे गाणं निवडलं असंही वाटलं असल्याची शक्यता आहे!
पण स्वरूपाला मानलं. नभं उतरू आलं.. मधला तिचा आवाज, आणि दिस जातील दिस येतील मधला आवाज..किती वेरिअशन असावं आवाजात! नभ..मधे खुला, थोडा रफ वाटेल असा. आणि द्वंद्वगीतात अतिशय गोड, नाजूक. शिवाय अजून तरी ती "थँक्यू" म्हणताना अभिनिवेश नसतो त्यात. नाहीतर "उपकार झाले साहेब तुमचे" या चालीवर बाकीचे अनेक जण "थँक्यू सो मच सर" वगैरे म्हणतायत.
तुमच्याच चांगल्या गुणांसाठी जर कोणी कौतुकाने शाबासकी देत असेल तर तो गूण आणि शाबासकी, दोन्ही ओझं न होता वागवता आलं पाहिजे.
माझ्यामते गायकांनाही कळलं
माझ्यामते गायकांनाही कळलं नसणार.. की हा आपल्या गाण्यामुळे असा झालाय की इतर काही कारणाने.. >>>> पराग स्वरूपा खरंच बावचळल्यासारखी वाटत होती.
शिवाय अजून तरी ती "थँक्यू" म्हणताना अभिनिवेश नसतो त्यात.>> करेक्ट. तसा अभिनिवेश असलेला मला जितेन्द्र तुपे वाटतो. तो कधीकधी ओव्हरकॉन्फिडन्ट वाटतो. गातो चांगला, पण काहीतरी गडबड वाटते. प्रसेनजीत कोसंबी मात्र एकदम पाय जमिनीवर असलेला वाटतो. बिनधास्त गातो, आणि गायल्यावर 'आता हे काय म्हणणार कोणास ठाऊक' नजरेने उभा राहतो श्रीरंग भावे कमालीचा तटस्थ आहे बुवा! त्याने 'कांदेपोहे' कसं गायलं असतं कोणास ठाऊक!
दर भागाला एक एलिमिनेशन आहे, फटाफट लोक कमी करत आहेत हे भारीच. आत्तापर्यंतची सर्व एलिमिनेशन्स अपेक्षित होती. ते सगळे लोक त्या त्या भागात बाकीच्यांपेक्षा कमीच होते. तो मराठी रणबीर कपूर (अजून एक अभिषेकच वाटतं, आडनाव विसरले) तर अगदीच सुमार होता.
या आणि कोणत्याही रिएलिटी शोमध्ये- परफॉरमन्सव्यतिरिक्त रडारड आणि इतर ड्रामे चालतात ना, त्याने खरा कंटाळा येतो.
प्रिबाला पाचपोच नाहीये! सिरियसली!
पूनम, प्रत्येक शब्दाला
पूनम, प्रत्येक शब्दाला अनुमोदन!!
अजून एक अभिषेक>> अभिषेक पाळंदे. पण तू त्याला रणबीर कपूर का म्हणतेयस?
तो अभिषेक पाळंदे टोपी, स्टोल
तो अभिषेक पाळंदे टोपी, स्टोल आणि चष्मा घातल्यावर रणबीर कपूरसारखा नाही दिसत? मला वाटला तसा
रणबीर कपूर गोड आहे गं... हा
रणबीर कपूर गोड आहे गं... हा इतका मख्ख होता की कुठल्याही प्रतिक्रियेचा त्याच्यावर काहीही परीणाम व्हायचा नाही. गाताना सुद्धा तो इतका भावनाहीन असायचा की तो टॉप २४ मधे तरी कसा आला प्रश्न पडावा.. असो.
अभिषेक पाळंदे एलिमिनेट झाला ?
अभिषेक पाळंदे एलिमिनेट झाला ?
* अभिषेक पाळंदे आणि अभिषेक
*
अभिषेक पाळंदे आणि अभिषेक मारोटकर दोघेही गेले बाहेर.
प्राजक्ता, तुझा क्लासमेट कोणता ह्यातला?
मन्जू, 'तूही रे..' गायलेला कोणता अभिषेक?
प्राजक्ता, तुझ्या वरच्या
प्राजक्ता, तुझ्या वरच्या माझ्या पोस्टमधल्या 'असो' वर जरा माऊस ने
'तूही रे..' गायलेला कोणता
'तूही रे..' गायलेला कोणता अभिषेक?>>> मारोटकर. उगाच घालवला त्याला... तो तुपे जायला हवा होता त्यापेक्षा
@ मंजूडी, मी पाहीलं ते, कसं
@ मंजूडी, मी पाहीलं ते, कसं केलसं ते विचारणार होते
तुपे ओव्हरकॉन्फिडंट दिसतोच.
तुपे ओव्हरकॉन्फिडंट दिसतोच. पण त्याला घालवलं तर टीआरपी घसरेल असं काहीतरी गणित आहे बहुतेक.
प्रिबा वाट्टेल ते बोलतेय! धवलची मस्करी करताना "एकच बायको.." वगैरे.. आणि मग "एकच असते" म्हटल्यावर "असं काही नाही.."
तिच्या डोळ्यात *डाची झाक नाही ना बघून घेतलं एकदा.
पल्लवी खूप चांगलं करायची अँकरिंग. टाळ्यांचा डायलॉग सोडला तर ती शो लाईव्ह ठेवायची. आणि अवधूत पण. त्याच्या कॉमेंट्स/ खास शब्द गाण्याचा गंभीरपणा घालवतायत असं वाटलं असेल, म्हणून मी पुन्हा जुने भाग बघितले. पण तो कधीच कुठल्याच गाण्याला अतिभावविवश झाला नाही. आणि जिथे चुकलं असेल तिथे त्या स्पर्धकाला टेन्शन न देता, पण व्यवस्थितपणे सांगायचा. शिवाय कितीही मान्यवर आले असले तरी त्याच्या तिथे असण्याने स्पर्धकांना धीर यत असावा.
पूर्वी मला ते फार आवडायचं नाही एकूणच, पण हे पर्व बघून जुनं चांगलं होतं अशी खात्री झाली.
असो.
सगळ्या पोस्ट्स वाचल्या आणि
सगळ्या पोस्ट्स वाचल्या आणि सिलेक्टेड गाणी ऐकली. त्यामुळे बराचसा मनस्ताप वाचला असं म्हणायला हरकत नसावी.
आणि लोकहो, कॉलबॅक नावाचा ताप यायचाय की अजून. तो विसरून कसा चालेल.
अर्थात, प्रत्येकवेळी तो तापच असेल असं नाही. पण मला कॉलबॅकला येऊन पुन्हा हात हलवत घरी जावं लागणार्या स्पर्धकांची दया येते.
ह्या वाक्यावर माऊस न्या!
ह्या वाक्यावर माऊस न्या!
सारेगमप हा एक अत्यंत दर्जेदार
सारेगमप हा एक अत्यंत दर्जेदार कार्यक्रम आहे!!!
अरे त्या बापटबाईला बसवा रे
अरे त्या बापटबाईला बसवा रे कोणीतरी! फार पांचट बाई आहे ती. काय बोलते त्याचा काही पाचपोच नसतो. ह्यापेक्षा पल्लवी परवडली म्हणायची गत आहे.
पल्लवीच्या टाळ्या आता अजय मागतो, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊदे. कंटाळा येतो त्या वेळी.
पौर्णिमा - तो रणबीर? तो खरा रनबिर्या रडत बसला असेल आता.
सानी, >> या वाक्यावर माऊस
सानी,
>> या वाक्यावर माऊस न्या!
अगं पण माऊ तयार नाही झाली त्या वाक्यावर यायला तर?
सोमवारी सर्व लावण्या होत्या.
सोमवारी सर्व लावण्या होत्या. सगळ्यांना 'नी' त्यामुळे नो एलिमिनेशन. पण दिपिका जोगचं मला इतकं नाही आवडलं. कोमल कनाकियाला श्वास पुरला प्रसेनजीत बेस्ट!
मंगळवारी जयदीपचं एकट्याचं गाणं दाखवलंच नाही तो ग्रूप आणि ड्युएटमध्येच दिसला थेट. एलिमिनेशनही त्याचंच झालं! काय गडबड होती काय माहित! 'मन शुद्ध तुझं' गाणारा मला आधी काही खास नव्हता वाटला, पण त्याने सर्व गाणी मस्त गायली. विश्वजीतही चांगला आहे. (तोही लातूरच्या सुप्रसिद्ध बोरगावगरांकडचा आहे का?)
केदार, मराठी रणबीर रे!
केदार, मराठी रणबीर रे!
लावण्यांचा भाग चांगला झाला..
लावण्यांचा भाग चांगला झाला.. आणि जरा वेगळ्या लावण्या होत्या नेहमीच्या यशस्वी सोडून.. !
नटरंग मधल्या घेतल्या नाहीत ते ही बरं झालं..
पूनम.. दिपिका जोगचं गाणं मला पहिल्यांदाच आवडलं ! नाहितर तिला बळच जास्त मार्क देतात...
मंगळवारची गाणी पाहीली नाहीत अजून..
सोमवारच्या भागात 'नटरंग' ने
सोमवारच्या भागात 'नटरंग' ने जोरदार अपेक्षाभंग केला. मी बंदच करणार होते, पण तरी बघितला पुढचा भाग आणि चक्क लोक चांगलं गायले! आणि बोल अमृताचेही फार नव्हते.
नाहीतर एकाशी दुसर्याचा सूर नाही अशा पद्धतीने नटरंगचं शीर्षकगीत गायलेलं ऐकून आणि खास लावणी विषय आहे म्हणून मी बघणारच नव्हते! बरं झालं पण बघितला ते.
मलाही काल दीपिकाचं गाणं आवडलं. काल सगळेच चांगलं गायले. कोणी बाहेर नाही गेलं ते बरं झालं.
मंगळवारचा बघायचाय अजून.
आमच्याकडे झी मराठी सुरु होउन
आमच्याकडे झी मराठी सुरु होउन एकच आठ्वडा झाला. सारेगामापा कार्यक्रमात आम्ही दोन तीन आठवडे मागे आहोत त्यामुळे तुमच्या कॉमेंट्स मजेशीर वाटतात आणि 'time traveller's' च्या वाटताहेत. अजून एलिमिनेशन नाही सुरु झाली पण बापट बाई आत्ताच नकोश्या झाल्यात. का एवढ ओरडून बोलते देव जाणे. नवरा तर जाम बोअर झालाय. त्याच्या मते गायक सो सो, कोरस तर बेक्कार, अजय्-अतुल बरे. अजय गायला की बरा वाटतो. त्याला म्युझिशियन्स मात्र खूप्----च आवडतात. बाप माणस आहेत अस म्हणतो.
हा बाफ वर काढल्याबद्दल
हा बाफ वर काढल्याबद्दल धन्यवाद कल्पु
सारेगामापा >>>> ते हिंदी.. हे "सारेगमप"
स्वातंत्र्यदिनाचे भाग पाहिले.
पूजा गोपालनच्या भावनाशून्य "ए मेरे वतन के लोगो" ला २ नी :| लता बाईंसारखं गावं ही अपेक्षाच नाहीये पण गेला बाजार चेल्लम इतपत तरी गायचं २ नी मिळवण्यासाठी.. ! उच्चारांमध्ये हे गाणंही जरा जरा गंडत होतं.
"हिंदुस्तानी" पण बर्यापैकी फ्लॅट झालं.. कोरसमध्ये काही जोषच नव्हता...
रोजा मधलं गाणं सही झालं एकदम !
सावनी रविंद्रने "गुणी बाळ असा" ला चोरटा आवाज लावला..
स्वरूपा बर्वेने म्हंटलेलं गाण कुठलं होतं ते माहितच नव्हतं.. पण तिला (आणि दिपिका जोगला) फारच घालून पाडून बोलले अजय अतूल.
दोन्ही भागातले ग्रुप परफॉर्मन्स आवडले.
परवाच्या सोमवारचा भाग दादा कोंडके स्पेशल होता.
ढगाला लागली कळं मध्ये पण जोष कमी वाटला... सावनी रविंद्रच्या आवाजात ठेकाच नव्हता...
काय गं सखू आणि माळ्याच्या मळ्यामंदी आवडली... स्वरूपाचा आवाज मस्त लागला एकदम. तिचा आवाज प्रत्येक गाण्यात गरजेप्रमाणे वेगळा लागतो... ! पण तिला परत ठिक ठिकच कमेंट्स दिल्या... काय करतात काय माहित.. ! त्या पांढरा चष्मे वाल्याला (बोरगांवकर ??) जरा जास्तच चांगल्या कमेंट्स देतायत असं वाटलं.. !
प्रसन्नजित कोसंबी मस्तच गायला...
बाकीची गाणी आणि मंगळवारची पाहिली नाहीत अजून.
(तोही लातूरच्या सुप्रसिद्ध
(तोही लातूरच्या सुप्रसिद्ध बोरगावगरांकडचा आहे का?)>>>>
त्या पांढरा चष्मे वाल्याला (बोरगांवकर ??)>>>
तो विश्वजीत 'बोरवणकर' आहे.
ओके, मन्जू नावांबाबत एकदम
ओके, मन्जू नावांबाबत एकदम पर्फेक्ट आहे!
स्वरूपा मस्त गात आहे. तिला उगाच जास्तच बोलतात जरा. मुलांमध्ये विश्वजीत, प्रसेनजीत.
जितेन्द्र तुपे बाहेर पडला.
पल्लवी खूप चांगलं करायची
पल्लवी खूप चांगलं करायची अँकरिंग. टाळ्यांचा डायलॉग सोडला तर ती शो लाईव्ह ठेवायची. आणि अवधूत पण. त्याच्या कॉमेंट्स/ खास शब्द गाण्याचा गंभीरपणा घालवतायत असं वाटलं असे
पण तो कधीच कुठल्याच गाण्याला अतिभावविवश झाला नाही. आणि जिथे चुकलं असेल तिथे त्या स्पर्धकाला टेन्शन न देता, पण व्यवस्थितपणे सांगायचा. शिवाय कितीही मान्यवर आले असले तरी त्याच्या तिथे असण्याने स्पर्धकांना धीर यत असावा.
पूर्वी मला ते फार आवडायचं नाही एकूणच, पण हे पर्व बघून जुनं चांगलं होतं अशी खात्री झाली.
>>>>> पूर्ण सहमती
बघतच नाही वाटतं आज प्यारेलाल
बघतच नाही वाटतं
आज प्यारेलाल एपिसोड मधली काही गाणी ऐकली...मराठी सिंगर्सना अजिबात ही स्टाईल झेपली नाही, ऐकवलं नाही अजिबात.
सारेगम चा हाही सिझन फ्लॉप गेलेला दिसतोय.
सावनी रविंद्रला उगाचच हाईप
सावनी रविंद्रला उगाचच हाईप करताहेत हे जाणवत होत काल. प्यारेलालजींची गाणी एकदम मस्त पण त्यांना कुणी न्याय दिला अस वाटल नाही. प्रसन्नजीतच, 'मेरे उमर के नौजवानों' त्यातल्या त्यात बरं.
नेहा वर्माने गाण्यापेक्षा कॉस्च्युमवर जास्त भर दिल्यासारखा जानवला.
सावनी रविंद्रने, एक दोन तीन ची वाट लावली.
काल ती. 'मन क्युं बहका, रे बहका' गाणारी एलिमिनेट झाली. तिने कांदेपोहे अगदी टाळ्यामागु गायल होत.
एक निरिक्षण ' लताबाई आणि आशाबाईंची गाणी गाताना कस लागतो हे खरय पण ही मंडळी अगदीच कीस पाडतात गाण्यांचा.'
मला आता कंटू येतो सारेगमप
मला आता कंटू येतो सारेगमप बघायाचा/ ऐकायचा. आताच्या पर्वातले श्रीरंग भावे, मयूर सुकाळे, प्रसेनजीत आणि विश्वजीत आवडत आहेत. येताजाता कधी त्यांची गाणी असतील तर थांबून ऐकते फक्त..
विश्वजीत बोरवणकर आणि धवल
विश्वजीत बोरवणकर आणि धवल चांदवडकर सोडता सगळे " Disasters " आहेत , मुलीं मध्ये सर्वात वाईट कोण गाईल हीच स्पर्धा असते . पूजा गोपालन , दीपिका जोग आणि सर्वात डोक्यात जाणारी म्हणजे सावनी रविंद्र .... एक से एक हॉरिबल गातात .... त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं नेहा वर्मा फार अपेक्षाभंग करते . स्वरूपाला का एलिमिनेट केलं ????? अशक्य....
स्वरुपाला काल एलिमिनेट
स्वरुपाला काल एलिमिनेट केल्याच खरच वाईट वाटल. तिच्यापेक्षा कितीतरी बेकार गाणारे होते काल.
मी पण कधीतरीच वेळेत हातात रिमोट मिळाला की बघते नाहीतर अॅनिमल प्लॅनेट जिंदाबाद
Pages