Submitted by गजानन on 13 September, 2011 - 02:47
सध्या कोणकोणते टर्म इंश्युअरन्स बाजारात आहेत आणि त्यातल्या त्यात कोणता टर्म इंश्युअरन्स सर्वांत चांगले फायदे देणारा आहे, यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
कृपया लिहा. धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टर्म इंश्युअरन्सच घ्यायची
टर्म इंश्युअरन्सच घ्यायची असेल तर... एल.आय.सी. ची जीवन अमॄत घ्या... ह्यात तुम्ही ३ ते ५ वर्षे प्रिमियम भरायचे (पहिला वर्षाचा प्रिमियम जास्त असतो)... आणि इंश्युअरन्स मात्र २५ वर्षाचा असतो... आणि हे रूपयेपण २५ वर्षानंतर मिळतात... इंश्युअरन्स टर्म संपल्यावर...
कमी वेळा भरा आणि परत मिळवा! एजंट रिकेमंड करत नाही... कदाचित कमिशन कमी असेल... मी २००८ मध्ये काही टर्म इंश्युअरन्स बघितले होते... पण जे रिलायबल होते त्यांचा प्रिमियम जास्त होता...
राजू, धन्यवाद. रिलायबल कोणते?
राजू, धन्यवाद. रिलायबल कोणते? प्रिमिअम जास्त म्हणजे साधारण किती होता?
ह्या टर्म प्लॅन प्रमाणे सध्या
ह्या टर्म प्लॅन प्रमाणे सध्या इन्श्युरन्स इनव्हेस्टमेंट प्लॅन्स उपलब्ध आहेत काय?
टेर्म इंशुरंस महणजे ज्यात
टेर्म इंशुरंस महणजे ज्यात प्रिमियम भरायचा असतो पण रिटर्न्स फक्त पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला मीळतात. गजानन, तू त्या स्कीमबद्दलच बोलत आहेस का?
अमि, हो मला त्याच योजनांबद्दल
अमि, हो मला त्याच योजनांबद्दल जाणून घ्यायचे आहे. ज्यात पॉलिसीधारकास परतावा अपेक्षित नाही.
गजानन, अतुल हार्डीकर(मीन्वाचा
गजानन, अतुल हार्डीकर(मीन्वाचा नवरा)ला संपर्क कर.. तो तुला बरोबर माहिती देईल...
मी एल आय सी घेतलिये....
मी एल आय सी घेतलिये.... प्रतिवर्षी ९००० प्रिमियम, आणि १० लाखाचा मृत्युपश्चात परतावा.
मेटलाईफची देखिल चांगली आहे.
@ गजानन, प्रिमिअम जास्त
@ गजानन, प्रिमिअम जास्त म्हणजे साधारण किती होता? >> प्रिमियम टर्म : ५ वर्षे, ए़कूण प्रिमियम ५ वर्षात : २,००,००० रूपये, इंश्युअरन्स टर्म : ३० वर्षे, इंश्युअरन्स : २३ लाख
मी एक पॉलिसी घेतली आहे
मी एक पॉलिसी घेतली आहे एलाअयसीची... प्रिमियम २-३००० च्या दरम्यान आहे आणि मृत्युपश्चात परतावा १५ लाख आहे. पण हे तुमच्या वयावर अवलंबून असते.
LIC च्या साईट वर तुम्हाला
LIC च्या साईट वर तुम्हाला तक्ता मिळेल. तिथे तुम्हाला sum assured, term, age ई. माहिती टाकली कि premium ची रक्कम समजेल. त्यातल्या त्यात LIC च्या policies जरा महाग आहेत पण त्यांचा claim settlement ratio सर्वात जास्त आहे असे ऐकले आहे. रितसर medical test etc. होते. १-२ महिन्यात पॉलिसी मिळते कारण ह्या पॉलिसीज मुंबईमधे प्रोसेस होतात म्हणे.
इथे Term Insurance म्हणजे गजानन तुम्हाला जो अर्थ अपेक्षीत आहे तोच घेतला आहे.
LIC च्या policies जरा महाग
LIC च्या policies जरा महाग आहेत.. अनुमोदन, पण त्यांची विश्वासार्हता पाहता LIC च्या policies डोळे झाकून घ्याव्या हे माझे वैयक्तिक मत आहे.
मी सुद्धा २५ लाखाची वार्षिक ९००० चा हप्ता असलेली Term Insurance घेतली आहे,
पण रिटर्न्स फक्त पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला मीळतात.. अनुमोदन
www.policybazaar.com इथे
www.policybazaar.com इथे तुलनात्मक माहिती आहे.
मी ४ ते ५ वर्षा पूर्वी L .I
मी ४ ते ५ वर्षा पूर्वी L .I .C ची MONEY PLUS POLICY घेतली आहे.आणि १०००० चे ३ हफ्ते भरले आहेत.त्यानंतर हफ्ते बंद केले आहेत.मी पुढे पोलिसी चालु ठेवावी की काढून घ्यावी.
गजानन माझ्या माहीतीप्रमाणे
गजानन माझ्या माहीतीप्रमाणे सध्या मार्केटमधे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या टर्म प्लान्च्या तुलनेत मला आयसीआयसीआयचा टर्म प्लान सर्वात उजवा वाटला. मी ही पॉलीसी घेतलेली आहे. ह्येचा प्रिमिय्म वर्षाला ९००० रु. आहे नि इन्सुरन्स ५० लाखाचा आहे. वयानुसार प्रिमियम बदलेल.
सर्वांना धन्यवाद. साकेत,
सर्वांना धन्यवाद.
साकेत, त्यात काय काय कव्हर केलं जातं?
फक्त अपघाती कव्हरेज आहे यात.
फक्त अपघाती कव्हरेज आहे यात.
ह्याच टॅक्स सेवींगसाठी उपयोग
ह्याच टॅक्स सेवींगसाठी उपयोग होतो का?
गजानन... बहुतेक सर्व
गजानन... बहुतेक सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे टर्म इन्शुरन्स प्लॅन्स असतात. माझ्या मते प्रत्येकाने एक चांगला कव्हरेज असलेला टर्म प्लॅन घ्यावाच. एक चांगला टर्म प्लॅन आणि मग बाकिचे प्लॅन्स इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट. जेव्हढ्या लवकर (कमी वयात) टर्म प्लॅन घ्याल तेव्हढा कमी प्रिमियम. टर्म इन्शुरन्स बरोबर काही रायडर्स पण घेता येतात ज्यातून काही ठरावीक परिस्थितीमध्ये जास्त परतावा मिळतो.
मी कोटक महिंद्राचा टर्म प्लॅन घेतला आहे (माझ्या माहितीप्रमाणे तो सगळ्यात स्वस्त आणि बर्यापैकी चांगला आहे)
टर्म इन्शुरन्सचा टॅक्स सेव्हिंगसाठी उपयोग होतो (८० सी, १०(१०) डी).
टर्म इन्शुरन्स म्हणजे शुध्द
टर्म इन्शुरन्स म्हणजे शुध्द विमा
टर्म इन्शुरन्स घेताना खालील मुद्दे विचारात घ्यावेतः
१. कंपनीची विश्वासार्हता: कारण अतिशय कमी प्रिमियममधे मोठ्या रकमेचा विमा उतरवला जातो. त्यामुळे जर लवकर क्लेम आला तर फार स्क्रुटिनी केल्याशिवाय क्लेम दिला जात नाही. क्लेम रिजेक्शनचे खाजगी कंपन्यांचे प्रमाण एलआयसीच्या तुलनेत फारच जास्त आहे.
http://www.bimadeals.com/insurance/insurance-info/lic-scores-best-in-cla...
गुगल वर सर्च केल्यास अधिक माहिती मिळु शकेल.
२. ज्या कम्पन्या ऑनलाइन विमा पॉलीसी विकतात त्या बरेचदा मेडिकल चेकअप व्यवस्थित करत नाहीत व क्लेम देताना टाळाटाळ करतात.
३. मनीष :एक चांगला टर्म प्लॅन आणि मग बाकिचे प्लॅन्स इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट यापेक्षा एक चांगला टर्म प्लॅन आणि मग बाकिचे म्युच्युअल फन्ड एसायपी हा पर्याय जास्त उत्तम.
इन्शुरन्स हा आपल्यासाठि नसुन आपल्या वारसासाठी आहे त्यामुळे त्यांना कोणताही त्रास न होता क्लेम मिळाला पाहिजे हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
मेडिकल इन्शुरन्स घेणारे इथे
मेडिकल इन्शुरन्स घेणारे इथे बरेच असतील. त्यांचे मेडिकल इन्शुरन्स कंपनी बद्दलचे अनुभव कसे आहे? कोणत्या इन्शुरन्स कंपनी कडून तुम्ही सध्या प्लॅन घेतले आहेत? आणि कंपनी निवडताना काय निकष लावलेत ?
टर्म इ न्शुरन्स घेताना तो एम
टर्म इ न्शुरन्स घेताना तो एम.डब्लू.पी. (Married Women's Property Act ) कायद्याखाली अ सणाराच घ्या. हा पैसा इतर बँक वाले किंवा इतर उधारी वसूली करणारे घेऊ शकत नाहित. फक्त तुमच्या कुटुंबाला च वापरता येईल.
..
..