मायबोली गणेशोत्सव २०११ - सांगता आणि कानोसा

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 08:21

नमस्कार मंडळी,

यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांना निरोप देऊन आता पुढल्या वर्षीपर्यंत वाट बघायची.

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण सर्वांनी समरसून भाग घेतलात याबद्दल आपले सर्वांचे आभार. स्पर्धांचे निकाल लवकरच जाहीर करू. त्याकरता पुन्हा एकदा आपल्याकडून भरभरून मतदानाची अपेक्षा आहे.

यंदा, काही उपक्रमांत खूप भरघोस प्रतिसाद मिळाला तर काहींना अपेक्षेपेक्षा फारच कमी (मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, आमंत्रण लेखन स्पर्धा). कलाकुसरीसारख्या विषयाकरता तर एकही प्रवेशिका आली नाही.

यंदाच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया, सुचना, निरीक्षणे आम्हाला ऐकायला आवडतील. कमी प्रतिसाद अथवा एकही प्रतिसाद न मिळणे याचीही कारणे जाणून घ्यायला आवडेल. शेवटी हा आपल्या सगळ्यांचाच उत्सव आहे त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याकरता आपले अभिप्राय आमच्या उपयोगी पडतील.

१. प्रवासवर्णन विषय वगळता लेखनस्पर्धेसाठी जास्त प्रवेशिका न येण्याचे कारण काय असेल?
२. कायापालट स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका न येण्याचे कारण हे त्यासाठी द्यावा लागणारा वेळ नसणे, स्पर्धा असल्यामुळे सहभाग नसणे इत्यादी असू शकेल असे आपणांस वाटते काय? अन्य कोणती कारणे असू शकतात?
३. प्रकाशचित्र, झब्बूला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यामधील नाविन्य, विषयातली विविधता / व्यापकता याबद्दल आपलं मत.
४. करमणुकीचे खेळ, जसे 'तुझ्या गळा माझ्या गळा', 'चारोळ्यांच्या आरोळ्या', 'शेवटचं वळण' इत्यादीबद्दल आपले मत. यात अजून काय नवीन भर घालता येईल यासंबंधी आपल्या सूचना.
५. सुप्रसिद्ध / अप्रसिद्ध मंदिरे, सार्वजनिक गणपती या उपक्रमांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात अजून सहभाग वाढला असता असे आपणांस वाटते काय?

या किंवा इतर कोणत्याही मुद्द्यांवर आपले अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

शाबास. प्रामाणिक धागा काढलात आणि लेखाजोखा मांडायचा टोन आवडला.
यालाच पहिले दाद. माझ्याकडुन जोरदार टाळ्या.

माझा रुमाल. लिहीते नंतर सविस्तर.

खूप छान उपक्रम! मी वेळेअभावी अजून फार काही वाचन केले नाही पण तुम्ही जे काही करता त्याबद्दल मला रास्त अभिमान वाटतो. जर कमी प्रतिसाद मिळाले असतील तर एखाद्या साहित्यकृतीला तर त्याबद्दल वाईट मुळीच वाटून घेऊ नका. इथे कुणीच पुर्ण वेळ देऊ शकत नाही मायबोलिला त्यामुळे इच्छा असूनही वाचायचे आणि तसेचं खूप काही लिहायचेही राहून जाते. अभिनदंन सर्वांचे.

प्रामाणिक धागा काढलात आणि लेखाजोखा मांडायचा टोन आवडला.
>> प्रचंड अनुमोदन!

सर्व संयोजक टीमचे मनापासून अभिनंदन! Happy
एवढा मोठा सोहळा, तोही नवनवीन कल्पना लढवून, तोही सलग इतके दिवस करायचा - हे काम सोपं नाही!
खूप सार्‍यांची मनापासून साथ असल्याशिवाय हे शक्य होत नाही! ते तुम्ही केलंत, त्याबद्दल माझ्या छोट्या हातांकडून शाबासकीची थाप आणि टा़ळ्या ! Happy

मी स्वतः फक्त छायाचित्र स्पर्धेमध्येच भाग घेतला होता. इतर ठिकाणी भाग न घेऊ शकण्याचे कारण - "वेगळं सुचलं नाही आणि जे सुचत होतं ते मला स्वतःलाच आवडलं नाही म्हणून पोस्टलं नाही"...

१. प्रवासवर्णन विषय वगळता लेखनस्पर्धेसाठी जास्त प्रवेशिका न येण्याचे कारण काय असेल?
विषय. थोडक्यात जीव असला पाहिजे आणि कॅची असले पाहिजे. झब्बुची आयड्या हीट व्हायचे कारण काय?कोणीही, कोणीही खेळु शकतो. सोप्या गोष्टी निवडायला हव्या, सहभाग हवा असेल तर.

२. प्रकाशचित्र, झब्बूला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यामधील नाविन्य, विषयातली विविधता / व्यापकता याबद्दल आपलं मत.
अप्रतिम होते हे. पर्यावरणफ्रेंडलीविषय आणि गाणी. फार छान होते.

३. कायापालट बाबत आणि गणेशमंदिरांबाबत मागच्याच वर्षी झाले होते म्हणुन असावे कदाचित.

४. चारोळ्या मस्त होत्या. विषयही.

५. बालगोपाळांची चित्रे ही फार हिट होती. झब्बु, भाऊंचे कार्टुन्स, चारोळ्या, लिहवून घेतलेले लेख, गाणी हे सर्वच फार आवडले. दुर्गगणेश हे फारच अप्रतिम होते.

असे वाटले की यावर्षी खूप जास्त गोष्टी ठेवायचा प्रयत्न झाला. थोडी स्ट्रॅटेजी वापरून खेळ/स्पर्धा मोजके असते तर जास्त प्रभावी ठरले असते सहभागाच्या दृष्टीने. त्याशिवाय अजून लिहुन घेतलेले लेख होते.
सगळ्यांना तेच ५० प्रतिसाद येणार ते गृहित धरून प्लॅन करा पुढच्या वेळी.
(कृपया गैरसमज नको. ठेवल्याच नाही तर कळणार तरी कसे की काय चालते काय नाही ते. त्यामुळे तुमचे कौतुक आहेच.)
कविता आणि गीते स्पर्धा याबद्दल काय बोलणार हो. जे मातब्बर कवी/कवयित्री आहेत ते लिहीतच नाहीत. करणार काय.

ही पूर्णत: संयोजकांची जवाबदारी नाहीये, पण एकुणातच उपक्रम जास्त होतायेत का? हे पहा
म.भा.दिवस, महिला दिन, रसग्रहण स्पर्धा, गणेशोत्सव, दिवाळी अंक, मध्येच वर्ल्डकप विशेषांक या सर्वांत भाग घेणे केवळ अशक्य आहे.
उदाहरणार्थ एखाद्या वर्षी गणपतीत, वार्षिक मोजके चांगले असे गुलमोहरातलेच का निवडक काढत नाही.
किती एनर्जी वाचेल?
किंवा रसग्रहणस्पर्धाच गणपतीत ठेवायची. बुद्धीदाता गणेशासाठी योग्य उपक्रम.

(कृपया गैरसमज नसावा. काही खटकल्यास माफ करावे. उपक्रम अतिशय उत्तम होता. कुठलाही उपक्रम चालवायचा म्हणजे अजिबात सोपी गोष्ट नाही. संयोजक मंडळाचे आभार मानावे तितके थोडेच आहे. मी ही पूर्ण पोस्ट उडवायला तयार आहे हवे असल्यास.)

लेखाजोखा धागा काढल्याबद्दल अभिनंदन!

ह्यावेळी (माझा अनुभव उणापुरा दुसर्‍या वर्षाचा व त्यातील हे दुसरे वर्ष!) वैविध्यता, खेळांमधील कल्पकता खूप आवडली. स्पर्धा, खेळ, उपक्रम.... भ र पू र खाद्य होते!!

मला वाटतंय की इच्छा असली तरी अनेकांना वेळेअभावी किंवा ऑफिसातून अपलोड वगैरे करता येणे कित्येकदा शक्य नसते त्यामुळे भाग घ्यायला प्रॉब्लेम आला असू शकेल. मी मात्र खूप एन्जॉय केले. आरोळ्या, झब्बू खासच.

आणखी आठवेल तसे लिहिते. सर्व टीमचे अभिनंदन इतक्या छान समन्वयाने हा उपक्रम राबविल्याबद्दल! Happy

गणराया समोर सेवा सादर करायची मला संधी मिळाली आणि अशीच मिळत राहो अशी आशा..
परत एकदा सर्वांना आवाहन की 'गान वीर-काव्याचे' या उपक्रमाविषयीची माहिती आणि त्यातील इतर गाण्यांची झलक (ज्यात पद्मजा फेणाणी, माधुरी करमरकर, वैशाली माडे, मृदुला तांबे (लावणी!..) आणि आपण सर्व मायबोलीकरांनी जिला आशिर्वाद आणि प्रोत्साहन दिले आहे ती प्रीति ताम्हनकर यांनी गायले आहे) http://www.jayheramb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.. उपक्रमामागची भूमिका आणि गाण्यांची झलक आवडली तर जरूर सहाय्य करा...
प्रकाशना प्रसंगीचे डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि श्री. शरद पोंक्षे यांचे भाषण इथे उपलब्ध आहे.. जरूर ऐका..
http://www.youtube.com/watch?v=6Tjn7WFj9BM

मोरया...

उपासक...

संयोजकांचे अभिनंदन! Happy

१.व २. हे नेहमीचेच आहे, लोक घरच्या, सार्वजनिक गणपतीत बिझी असतात. फार विचार करुन लिहीत बसायला वेळ मिळत नसेल. त्यामुळे 'चारोळ्या', 'झब्बू' इ. झटपट गोष्टींना जास्त प्रतिसाद मिळतो. प्रवेशिका जरी कमी आल्या सगळ्याच स्पर्धांसाठी आलेले लेखन चांगले होते हे महत्त्वाचे. 'कायापालट' विषय खूप छान होता. प्रवेशिका पहायला आवडले असते.

३. माझ्यामते प्रतिसाद अजून मिळायला हवा होता. झब्बूतला बदल मस्त होता, फोटो आणि गाणे! पण विषय नीट निवडले गेले नाहीत हे माझे मत. खूप प्रतिसाद हवा असेल तर जे फोटो लोकांकडे सहसा असतात असे विषय हवेत (प्रसिद्ध इमारती, स्मारके) किंवा नसले तर सहज काढता येतील असे (मागची उदाहरणे - नाणी, भांडी. काही नवीन - टोप्या, ) हवेत. म्हणजे सहज उपलब्ध पण व्हरायटी हवी. फोटो बघायलाही उत्सुकता वाटली पाहिजे. पहिला विषय चांगला होता. 'जिने' बघून बघून किती बघणार? यात लोकांनी पायर्‍यांचेही फोटो टाकले. (जिन्याला पायर्‍या असतात, पण पायर्‍या असल्या म्हणजे जिना असेलच असे नाही Wink ) तिसरा विषय एक नव्हता, तीन होते. Happy एकाच प्रकारातला पण वेगळा (उदा. पांढर्‍या पक्षांत काळा पक्षी), बाकी एकाच प्रकारातले पण एक वेगळा (उदा. बकर्‍यांमधे एकटा कुत्रा) आणि 'एकटा' (उदा. समुद्रकिनार्‍यावर उभी एकटी स्त्री). यातला कुठलातरी एकच असता तर बरं झालं असतं. झब्बू विषय एक दिवसाआड दिला त्याऐवजी रोजही चालला असता.

४. (शेवटचं वळण चे लेखक/लेखिका कोण ते आधी सांगा बरं!) चारोळ्यांचे विषय आवडले. लोकांनी लिहिलेही चांगले.

५. सुप्रसिद्ध / अप्रसिद्ध मंदिरे - यालाही वेळाचे कारण असावे. सार्वजनिक गणपतींचे बरेच फोटो आले की.ते स्वतंत्र धाग्यांवर आहेत बहुतेक. गणेशोत्सवातच घेता येतील पुढच्या वर्षी.

लहानमोठ्यांचे सगळे श्रवणीय कार्यक्रम सुंदर झाले. छोट्या कलाकारांचे इतर कार्यक्रमही मस्त होते.

नेहमीप्रमाणेच याही वर्षी मायबोली गणेशोत्सव चांगलाच पार पडला असणार त्याबद्दल संयोजकांचं, भाग घेणार्‍यांचं अभिनंदन.
एक झब्बू सोडल्यास कुठल्याही गणेशोत्सव बीबीवर डोकावायला जमलेलं नाही त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.

रैनाला प्रचंड अनुमोदन व संयोजकांचे मनापासुन आभार. त्यांनी स्वतःची कामे, वेळ बाजुला ठेउन गणेशोत्सवासाठी त्यांचा वेळ दिला.

कायापालट मध्ये भाग घ्यायचा होता पण वेळ अपुरा पडला. माझ्या मते नाविन्यपुर्ण पाककृतींवरही स्पर्धा किंवा खेळ हवा होता. त्यालाही भरगोस प्रतिसाद मिळाला असता.

सालाबादप्रमाणे यन्दाही गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात उत्साहात पार पडला Happy
गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल सन्योजक आणि माबोप्रशासनाचे मनःपूर्वक आभार!

वरील सर्वच प्रश्न विचारात घेता, माझ्या मते
१) एखाद्या स्पर्धा/उपक्रमाला प्रतिसाद मिळालाच नाही तर नाऊमेद होण्याची गरज नाही वा त्यात काही चूकलेच असेल असेही वाटायची गरज नाही. याचे कारण, नेट वरील या स्पर्धात सहभागी होणारा सभासद वर्ग, निरनिराळ्या देश/प्रदेशात निरनिराळ्ञा अनुकुल्/प्रतिकुल परिस्थितीत असतो. अन बहुतेक वेळा इच्छा असुनही स्पर्धा/उपक्रम यात भाग घेता येत नाही.

२) मी तर म्हणेन की यन्दाही उपक्रमाचे विषय सर्वसमावेशकच होते. सगळ्यान्नाच सगळेच आवडणारे/भावणारे असेल असे नाही, पण जे आवडते, ते उपलब्ध होते. आणि म्हणूनच, एखाद्या उपक्रमाला यन्दा जरी प्रतिसाद नसेल्/अल्प असेल, तरीही तो तशा प्रकारचा उपक्रम भविष्यात करूच नये असे मला अजिबात वाटत नाही. कायापालट हा खर तर माझ्या आवडीचा/नित्याचा विषय, इतकेच नव्हे तर लहानान्करता असलेल्या घर बनविण्याच्या हस्तकलेच्या बाबतीत तर किती करुन घेऊ अन किती नको असे होते, प्रत्यक्षात, अपरिहार्य अडचणीन्मुळे शेवटच्या दिवसापर्यन्त त्याबाबत काहीच करता आले नाही. इतकेच नव्हे, तर यावर्षी अगदीच काहीच कुठेच सहभाग नाही हे फारच डाचल्याने आधी आठ दिवसान्पासूनच धनश्रीच्या चित्राचे फोटो मिळविण्याकरता मला किती सायास आयास पडले, प्रयत्न करावे लागले होते, ते शेवटी आता एन्ट्री शक्यच नाही या नि:ष्कर्षापर्यन्त येऊन पोचल्यावर तरीही रविवारी मात्र कसे तरी जमवले, व श्रींच्या चरणी हजेरी लावली Happy ते बघता, या ना त्या स्वरुपात बर्‍याच जणान्चे हे असेच काहीसे होत असेल. अन म्हणूनच, प्रतिसादच आला नाही म्हणून, कायापालट किन्वा हस्तकला वगैरे सारखे विषय हाताळण्याचे बन्द तर करूच नये, उलट, केवळ बालान्च्या व्यतिरिक्त, मोठ्यान्ना देखिल "लहानपण देगा देवा" म्हणत अजुनही काही करता येते का ते बघण्यास सन्धी/प्रोत्साहन द्यावे.

३) माझ्या स्वतःच्याच अनुभवावरुन मला हे जाणवते आहे की अनेकान्ना केवळ इच्छाच नव्हे तर क्रियाशक्ति असुनही, केवळ अन केवळ तत्कालिक प्राप्त परिस्थितीच्या रेट्यामुळे आपापल्या प्रवेशिका सादर करता आल्या नसतील. तसेच, काही स्पर्धात, आपली कलाकृती माण्डणे योग्य ठरेल वा नाही याची धास्ती असेल. पण प्रत्येक जात्या वर्षागणिक निदान नियमित हजर सभासदान्ची तरी, अशी काही धास्ती/भीड म्हणा हव तर, गळून जाईलच जाईल यात मला तरी शन्का नाही. मूळात, सध्या माझ्याकडे क्यामेरा नाही, त्यातुन यन्दाच्या फोटो स्पर्धेत तुलनेत कस लावणारे, अपेक्षा वाढविणारे विषय, माबोवरील एकसे एक दिग्गजान्चा सहभाग, वगैरे बघता मला देखिल प्रश्न पडला होता की आपली जी काय "किमान हजेरीची" एण्ट्री आहे ती द्यावी की नाही.

४) एकीकडे, दैनन्दिन जीवनातील नित्याच्या घडामोडी/जबाबदार्‍यातून, वेळ काढून, इथे सादर केलेल्या स्पर्धा/उपक्रमात साधा भाग देखिल मला घेता आला नाही याचे वैषम्य मला वाटतेच वाटते, पण त्याचबरोबर, अशाच दैनन्दिन घडामोडि/जबाबदार्‍या साम्भाळत साम्भाळत अशा उपक्रमान्चे सन्योजन करणारे कार्यकर्ते सभासद मायबोलीवर आहेत, त्यान्च्या कौतुकाबरोबरच, या बाबीचा "आधारही" वाटतो. अन मनाला समजावतो की, ठीके, यावर्षी नै जमले लिम्ब्या, पुढच्या वर्षी तरी तयारीने सहभागी हो! आत्तापासुन तयारीला लाग! Happy
[अन हो ना, माझा बाकीच्यान्ना काय उपयोग, आता मी जगुन काय करु वगैरे नकारार्थी विचारान्बरोबच त्याच्या नेमके उलट मला हे ही पक्क ठाऊक अस्त की "माझ्याच उपयोगा करता व माझ्याच निमित्ते सगळ्या सृष्टीची/जगाची निर्मिती आहे" Proud ]

५) रैना आणि लालुला अनुमोदन Happy

(अहो इथे येताजाता, कोणी वाचो वा पूर्वग्रहदुषित अनुल्लेख करो, कोणत्याही विषयावर हातभर स्वगते लिहू शकणार्‍या मला यन्दा मात्र अक्षरषः एक ओळही खरडता आली नाही. पुस्तक परिक्षणाच्या उपक्रमा करता तर नुस्ती खुमखुमी होती पण प्रत्यक्षात काहीही जमले नाही Sad पण ती तृटी माझी आहे, उपक्रमाची नव्हे. अन केवळ सन्ख्यात्मक मोजणीवरून उपक्रमाचे मूल्यमापन होऊ नये असे मला वाटते.)

प्रचंड मेहनती संयोजकांचं पुन्हा एकदा कौतुक.
अपेक्षेइतका प्रतिसाद काही ठिकाणी मिळाला नाही, म्हणजे तिथे मायबोलीकरांची एनर्जी/उपलब्ध वेळ आणि कल्पनाशक्ती संयोजकांशी मॅच झाली नाही.
सगळे धागे पूर्ण वाचून काढायलाच मला वेळ मिळालेला नाही. म्हणजे प्रतिसाद तर प्रचंड संख्येने मिळालेत. कुठे कमी कुठे जास्त असतील.
कायापालटला एकही एंट्री न येण्याचे कारण गेल्यावर्षीच्या टाकाऊतून टिकाऊमध्ये असू शकेल (विषयाचे साधर्म्य आणि निकालावर अजून उडत असलेला धुरळा).

प्रवासवर्णनालाही तशा कमीच प्रवेशिका आल्या आहेत. जास्त शब्दसंख्येचे गद्य लिहिण्याइतका विचार करणे आणि ते लिहून काढणे ही गोष्ट जमली नसावी.

बाकी गेल्या वर्षी 'मी स्पर्धेत भाग घेत नाही, मला त्याबद्दल सांगू नका' असं म्हणणार्‍या बेफिकीर यांना यावर्षी स्पर्धेत भाग घेण्यास उद्युक्त केल्याबद्दल आयोजकांचे खास अभिनंदन.

मनोरंजन आणि सृजनाबरोबरच थोडासा प्रबोधनाचाही विचार करता येईल का?

http://www.maayboli.com/node/28975

माझी विषय हाताळणी चुकली की वेळ?

संयोजकांनी आधीच वेळ द्यायला हवी होती, मला वाटलं ११ तारखेच्या रात्री १२ पर्यंत स्विकारतील, पण ९:३० लाच बंद केलं....

बाकी खूप छान उपक्रम...संयोजकांचे..अभिनंदन!

५. सुप्रसिद्ध / अप्रसिद्ध मंदिरे, सार्वजनिक गणपती या उपक्रमांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात अजून सहभाग वाढला असता असे आपणांस वाटते काय?

या स्पर्धेकरिता मी,गणेश घोळ मंदिर या शिळफाट्यानजीकच्या मंदिरात जाण्याचे निश्चित केले होते,मत्र येथे जाणे व येणे या करिता ४/५ तासांचा अवधी लागतो....या मुळे खूप इच्छा असूनही जाता आले नाही... मात्र स्पर्धेकरि ता नव्हे तर या अप्रसिद्ध गणपतीची माहिती माबोकरांना व्हावी म्हणून जाणारच आहे. असो. Happy

संयोजकांचे अभिनंदन !

नेहमीच्या लोकप्रिय कार्यक्रमासोबत काही नविन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल विशेष अभिनंदन !!

नविन समावेश केलेल्या स्पर्धा/ कार्यक्रमांचे विषय आवडले. अपेक्षापेक्षा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी काही हरकत नाही. पण पुढिल वर्षी अशाप्रकारच्या स्पर्धांना नक्की प्रतिसाद मिळेल. कायापालट / अप्रसिद्ध मंदिरे ह्या स्पर्धा महिनाभर अगोदर जाहिर केल्यास मायबोलीकरांना तयारीसाठी भरपुर वेळ मिळेल असे वाटते.

संयोजकाचे खुप खुप अभिनंदन... Happy
गणपत्ती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या...
मायबोली गणेशोत्सव २०११ चा एक चांगला अंक छापुन येऊ शकतो.
खुप जणांनी छान लिव्हलय.अजुन वाचतोच आहे... Happy

@शाम,
आपण आपला लेख 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपमध्ये उधडला नाहीत. नियमात सर्व लिहिले होते. शीर्षकही कसे द्यायचे ते लिहिले होते. त्यामुळे आपली प्रवेशिका या लेखनस्पर्धेकरता आली आहे हे समजले नाही.

मायबोली गणेशोत्सव उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल संयोजक मंडळाचे अभिनंदन Happy

यंदाचं मंडळ अतिशय उत्साही होतं. स्पर्धा - कार्यक्रमांच्या घोषणा, जाहिराती यातील कल्पकता आणि नाविन्य वाखाणण्याजोगं होतं. कायापलट स्पर्धेला न मिळालेला प्रतिसाद यामागचं कारण असं असू शकेल की मायबोलीकर घरच्या गणपतीच्या तयारीत मग्न होते, त्यामुळे या स्पर्धेसाठी वेळ देऊ शकले नसतील. लेखन स्पर्धेचे सर्व विषय सोपे, सुटसुटीत आणि सहज लिहिता येण्यासारखेच होते. झब्बू, चारोळ्या यांसारख्या उत्स्फुर्त स्पर्धांना छान प्रतिसाद मिळाला.

सांस्कृतिक कार्यक्रम नियमित प्रकाशित करायला हवे होते. तसेच कुठल्या दिवशी कोणाचा लेख प्रकाशित होणार आहे हे संबंधित लेखकाला कळवणे आवश्यक आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे, कृपया गैरसमज नसावा.

गणेशोत्सव, दिवाळी अंक किंवा मायबोलीवरील कुठलाही उपक्रम हे सांघिक उपक्रम आहेत. प्रत्येक उपक्रमामागे एक संघ कार्यरत असतो. तेव्हा त्या त्या उपक्रमाच्या जाहिराती, घोषणा प्रकाशित झाल्यावर मंडळातील कुठल्या कार्यकर्त्याने हे लिहिले असेल/ किंवा तो विशिष्ट कार्यक्रमामागची कल्पना कोणाची ह्याचे तर्क/ चर्चा इतर मायबोलीकरांनी करू नये असे मला वाटते. त्याचे श्रेय/ शाबासकीची थाप संपूर्ण संघाला मिळाली पाहिजे हे माझे मत आहे.

http://www.maayboli.com/node/29003#new
हे लेखन मी सुप्रसिद्ध आणि अप्रसिद्ध गणेश मंदीरे साठी लिहिले होते. पण माझ्या पिकासामध्ये ऐन वेळीच एरर आला होता. त्यामुळे मी वेळेत टाकु शकले नाही. काल संपादीत केले. जर कोणाची हरकत नसेल तर संयोजकांना मी विनंती करते की ही माहीती गणेशोत्सवात सुप्रसिद्ध आणि अप्रसिद्ध गणेश मंदीरे ह्या लेखना खाली हलवावी. त्यामुळे एक माहीती तिथे राहील.

सर्वात आधी संयोजकांचे हार्दिक अभिनंदन, खूप छान उपक्रम आणि तोही योग्य रीत्या राबवल्याबद्दल माझ्यातर्फे सलाम.

यंदाच्या गणेशोत्सवाला मला भरपूर वेळ देऊन वाचता आले. त्यामुळे जे आवडले आणि जे अजून आवडायला हवे होते असे काही मुद्दे:

१. शेवट सुचवा- या खेळासाठी कथा नविन धाग्यावर पेस्ट न करता तिथेच शेवट लिहिला असता तर ते सोपे पडले असते असे मला वाटते. कथा कॉपी करा-नविन धागा उघडा-त्याला शीर्षक द्या-शेवट लिहा-सेव्ह करा इतके करण्यापेक्षा तिथेच प्रतिसादामधे शेवट टाईप केला असता तर ऑफिसमधून काम करत करत मायबोली वाचणार्‍या अनेकाना लिहिता आले असते (असे माझे वैयक्तिक आळशी मत), Proud

२. झब्बूचे विषय छान होते. मात्र बहुतेकानी गाणी लिहिताना नियमाचे फार पालन केले नाही. Happy "गाणे विषयाशी सुसंगत असावे, प्रचिशी नाही" असा नियम असून देखील बहुतेकानी (त्यात मी आहेच आहे) प्रचिशीच सुसंगत ठरेल असे गाणे लिहिले. मुझे जिने दो मधे तर "जीना" या शब्दावरची गाणी आली. जो शब्द कळीच्या शब्दामधे नव्हताच Proud

मुळात हा मनोरंजनात्मक खेळ असल्याने नियम मोड्ला तरी काय बिघडत नाही तरीपण नियम बनवताना याचा विचार जरूर व्हावा. अजून एक: झब्बूचे सर्वच विषय हिंदीतून होते. असं का? उदा. करिष्मा कुदरत का ऐवजी "निसर्गाची करणी" असा विषय दिला असता तर बरे झाले असते. (मुझे जिने दो हा श्लेष असल्याने खटकत नाही. ते शीर्षक मनापासून आवडले)

३. आरोळ्या, सुश्राव्य संगीत आणि हास्य दालन हे तीनही उपक्रम भयंकर आवडले.

४. प्रकाशचित्र स्पर्धेचे विषय छान होते. माझी प्रवेशिका घमेल्यानं तीनदा परत पाठवून दिल्याने सहभागी होता आले नाही Sad

५. हस्तकलेमधे-कविता लेखनामधे मला स्वत:ला शून्य गति असल्याने याबद्दल मी काहीच म्हणत नाही. पण उपकम छान होते.

६. काही उपक्रमाची माहिती गणेशोत्सव चालू व्हायच्या आधी दिली तर त्या दृष्टीने फोटो/माहिती जमवून ठेवता येइल. (उदा. गणपती मंदिरे) यामधे थोडा बदल करून गणपतीच्या विविध रूपातील मूर्ती असा देखील विषयदेखील देता येइल

७. नैवेद्याच्या कार्यक्रमाला माझी एक सूचना: गणेश चतुर्थीच्या दिवशी दहा पदार्थाची यादी प्रसिद्ध करावी. या दहा दिवसामधे सभासद त्या पदार्थाचे फोटो काढून प्रसिद्ध करू शकतील. Happy हे दहा पदार्थ म्हणजे मोदक्/पुरणपोळी असे स्पेसिफिक ठेवता येतील किंवा पोह्यापासून बनवलेला पदार्थ असे जनरल ठेवता येइल.

८. एस टी वाय ठेवाच प्लीज Proud

वरील सर्व मुद्दे हे माझी वैयक्तिक मते आहेत. संयोजक मंडळाच्या उत्साहाचं आणि कल्पकतेचे कौतुक करावं तितकं थोडं आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवामधे फार मजा आली. दर वर्षी असाच आनंद सर्व मायबोली कराना मिळावा हीच गणरायाचरणी प्रार्थना.

गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन !
<< खूप छान उपक्रम! मी वेळेअभावी अजून फार काही वाचन केले नाही पण तुम्ही जे काही करता त्याबद्दल मला रास्त अभिमान वाटतो. जर कमी प्रतिसाद मिळाले असतील तर एखाद्या साहित्यकृतीला तर त्याबद्दल वाईट मुळीच वाटून घेऊ नका. इथे कुणीच पुर्ण वेळ देऊ शकत नाही मायबोलिला त्यामुळे इच्छा असूनही वाचायचे आणि तसेचं खूप काही लिहायचेही राहून जाते. >>
बी ह्यांच्या पोस्टला प्रचंड अनुमोदन.
तसेच रैनाने मांडलेले मुद्देही मनापासून पटले.
सगळ्या कार्यक्रमांच्या घोषणा वाचल्यावर माझ्या डोक्यात बर्‍याच योजना आल्या होत्या. यँव करू नि तँव करू Proud पण प्रत्यक्षात मला झब्बू , प्रचि स्पर्धा सोडले तर कशातच भाग घेणे वेळेअभावी शक्य झाले नाही.
लेकासाठी तिन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचं ठरवलं होतं. कारण तिन्ही गोष्टी त्याच्या अगदी रोजच्या वापरातल्या होत्या. तो रोज भरपूर चित्रे काढतो. गाण्यांसाठी तोंड अखंड चालू असतं. पण नेमकं त्याला घराचं चित्र काढायचं नव्हतं ह्यावेळी. कारण तोच जाणे. ( निव्वळ आडमुठेपणा, दुसरं काय :हाहा:)
कसाबसा शेवटच्या दिवशी तयार झाला. रांगोळीचं घर काढलं त्याने. पण मग तो कॅमेर्‍यातला फोटो लॅपटॉपमध्ये घेऊन माबोवर पोस्टायला मला वेळ नव्हता. काल त्याने विचारलं, " माझं घर दाखव ना तुझ्या मायबोलीवरचं." तेव्हा मग शाब्दिक युद्ध झालं.
" १० दिवस सांगत होते तेव्हा तुला काढायचं नव्हतं. शेवटच्या दिवशी तुला मुहुर्त लागला. मग मी काय करू ?"
लगेच प्रत्युत्तर " पण शेवटी दिलं होतं ना काढून. तू का नाही पाठवलंस त्यांना ?"
काय बोलणार ? Sad
त्याचं स्तोत्रही अगदी शेवटच्या दिवशी पोस्टलं.
अजूनही कितीतरी लिखाण वाचायचं राहून गेलंय.
त्यामुळे संयोजकानू, अज्जिबात वाईट वाटून घेऊ नका. उपक्रम छानच होते. पण प्रत्येकाच्या काहीनाकाही अडचणी आल्या असणार. सो, लगे रहो ! Happy

मी या लेखाआधी शिर्षक गीताची प्रवेशिका दिली होती. त्यामुळे नियमाप्रमानेच पोस्ट केले होते. काल रात्रीपर्यंत यादीत नाव न दिसल्यामुळे मी तसे संपादन केले आहे.
आपली वेळ मर्यादा वाचल्याने संपर्क केला नाही.

माझे बहुतेक मुद्दे नंदीनीप्रमाणेच.
विषय आधी द्यायला हवे होते. म्हणजे तयारीला वेळ मिळाला असता. त्या विषयासंदर्भात काही सूचना असत्या तर त्याही वेळेआधी मागवता आल्या असत्या.

दूसरे म्हणजे स्पर्धेंच्या बीबी वर प्रतिक्रियांची सोय नको होती. प्रतिक्रिया मतदानातूनच दिसायला हव्या होत्या. मी मतदान केले नाही, कारण या सर्व प्रवेशिकांतून एकच निवडणे मला कठीण होते.

मी संयोजकांचे आधीच कौतूक केले आहे. यावर्षी छानच वातावरण राहिले. आणि त्यामुळेच अपेक्षाही वाढल्यात.

मायबोलीवर हा आमचा पहिलाच गणेशोत्सव आहे तरी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन खूप मजा आली..
संयोजकांना धन्यवाद Happy

मला सगळ्याच स्पर्धा/कल्पना आवडल्या. वेळे अभावी काही ठिकाणी भाग घेणे शक्य झाले नाही. जाहीरातीही कल्पक होत्या Happy

धन्यवाद संयोजक Happy

Pages