Submitted by मीसाक्षी on 27 August, 2011 - 04:24
डॉ. बालाजी तांबे यांचे संतुलन आयुर्वेद केंद्रांविषयी कोणाला माहीती स्वानुभव आहेत का? कोणी रेग्युलर फॉलोअर आहे का त्यांचा? त्यांची औषधे खरोखरच परिणामकारक आहेत का? त्या केंद्रांवर डॉ. तांबे स्वतः असतात का कधी ? त्यांचे असिस्टंट डॉ. तांबे यांच्याइतकेच अनुभवी, हुशार असतात का? डॉ. तांबेंना प्रत्यक्ष भेटुन ट्रीट्मेंट घेतलेले कोणी आहे का इथे? असल्यास अनुभव शेअर करावा प्लिज?
साम टिव्हीवरील त्यांच्या मुलाखती मी हल्ली पाहते, ते खुपच विश्वासपुर्वक त्यांच्या औषंधाबद्द्ल बोल्तात.
खरंच इतकी प्रभावी औषधे आहेत का त्यांची? खासकरुन गर्भारपणासाठी. योग्य मार्गदर्शन, माहिती, बरे-वाईट स्वानुभव अपेक्षीत आहेत.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणीच नाहि का वापरत बालाजी
कोणीच नाहि का वापरत बालाजी तांबेंची उत्पादनं????? कोणालाच नाहीत का अनुभव???
साक्षी, मी ऐकुन आहे त्यांच्या
साक्षी, मी ऐकुन आहे त्यांच्या बद्दल पण ट्रिटमेंट नाही घेतली कोणतीही..
खि खि
खि खि
मी एकदा गेले होते त्यांच्या
मी एकदा गेले होते त्यांच्या केंद्रात. स्वतःसाठी व आईसाठी. तिथे आयुर्वेदिक डॉक्टर्स होते जे इतर डॉक्टरसारखेच भरपुर प्रश्न विचारुन मग औषधे देतात. डॉक्टर हुशार किंवा काय ते सांगता येणार नाही. तांबे सगळ्यांना भेटत नाहीत. आईला काही दिवस औषध घ्या आणि मग तांब्यांची अपॉइंटमेंट घ्या असे सांगितले. आईला लगेच फरक पडला नाही त्यामुळे तिचा इंटरेस्ट संपला.
औषधे खुप महाग वाटली, पथ्यही खुप सांगितले होते. काय खाऊ नये याची यादी एवढी मोठी की काय खावे हा प्रश्न पडला. पण सगळे आयु. डॉक्टर पथ्यासाठी असेच करतात असा माझा अनुभव आहे. केंद्रात गर्दी खुप होती. नंबर यायला वेळ लागतो. तिथले खाद्यपदार्थ महाग आहेत. ते आयु. आहेत असे तिथले लोक सांगतात. अर्थात तसे ते आहेत. उदा. चहात गवतीचहा, आले, वेलची व्.व. घातले होते. चवीला एकदम झक्कास होता. पण म्हणुन तो चहा इतका महाग असावा हे पटत नाही. गवती चहा/आले इ. गोष्टी आयुर्वेदिक किंवा नॉन-आयुर्वेदिक पद्धतीने पिकवायला इतका काही खर्च येणार नाही हेमाप्राम.
एकुण तांब्यांचे केंद्र हे इतर आयु. केंद्रासारखेच आहे. त्यांनी आम्ही आयु. पद्धतीने सगळी औषधलागवड करतो असे म्हणत सगळ्या किंमती महाग केल्यात. तिथे परदेशी लोकांची वर्दळ जास्त असल्याने गि-हाइकेही आहेत भरपुर त्यामुळे त्यांना परवडते. एकुण माझ्यासारख्या सामान्याचे हे काम नाही ही खुणगाठ मनाशी बांधुन मी परत काही तिकडे गेले नाही.
साक्षी, माझ्या कलिगनेपण चौकशी
साक्षी, माझ्या कलिगनेपण चौकशी केली होती, त्याच्या आई-वडिलांसाठी, पण रेट्स खुपच अवाच्या सव्वा आहेत असं कळलं. कारणं सगळी साधनानी दिलेलीच. I dare to say, खरं तर वैद्यकिय सेवापेक्षा पैसे कमावण्याचं काम वाटलं. Foreignersना आयु.चं खुप आकर्षण असतं त्यामुळे त्यांची वर्दळ खुप असते असं ऐकलं. त्यांना परवडतं पण एकुणात देशी मध्यमवर्गीयांसाठी नाहीच बहुतेक ते. तो तर एकुणच सगळं बघुन आणि तिथल्या लोकांशी बोलुन इतका वैतागला कि त्याने ठरवलं बालाजीबुवा जे सांगतात ते ऐकुनच खुष व्हायचं प्रत्यक्ष त्यांच्या वाटेला जायचं नाही.
साधना, मनिमाऊ >>> १००%
साधना, मनिमाऊ >>> १००% अनुमोदन. आयुर्वेदाच्या नावाखाली लूट आहे.
मुळात बालाजी तांबे रजिस्टर्ड
मुळात बालाजी तांबे रजिस्टर्ड डॉक्टर आहेत का? मला वाटते शिक्षणाने ते इंजिनियर आहेत्/असावेत.
साक्षी , टिव्हीवरचा कार्यक्रम
साक्षी , टिव्हीवरचा कार्यक्रम बघूनच माझी सासू, सासरे आणि चुलत सासू सासरे आणि आत्या सगळे मुंबईहून डॉ. तांबेंच्या क्लिनिकमध्ये गेलेले.
तिथे त्यांचे असिस्टंटच प्रश्न विचारून औषधे देतात. डॉ. तांबेंशी प्रत्यक्ष भेट होतच नाही. औषधे तर फारच महाग आहेत. फक्त महिन्यांची औषधे चार पाच हजारांपर्यंत होती. बरेच पथ्यपाणी असतात. आत्यांना काही महिने फरक पडला. पण बाकीच्यांना नाही. परत काही ते पुण्याला गेले नाहीत.
<< एकुणच सगळं बघुन आणि तिथल्या लोकांशी बोलुन इतका वैतागला कि त्याने ठरवलं बालाजीबुवा जे सांगतात ते ऐकुनच खुष व्हायचं प्रत्यक्ष त्यांच्या वाटेला जायचं नाही. >> खरय , आमच्या घरातही तेच करतात सगळे आता
http://www.misalpav.com/node/
http://www.misalpav.com/node/19030
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना प्रतिसादाबद्द्ल....
तुम्हा सगळ्यांसारखाच अनुभव मलाही आला, पण मला वाटला कदाचित हे सगळ माझ्याच बाबतित घडल असेल म्हणुन इथे सर्वांच मत जाणुन घ्यावस वाटल. मी आधी त्यांचे कॉमन टॉनिक (आसव) आहे ते आणुन घेत होते त्याने थोडा चांगला फरक वाटला म्हणुन मग म्ह्टल तिथल्या डॉ.शी बोलुन आणखी काही फायदा होतो का पाहु. आम्ही त्या केंद्रात गेलो तर तिथे बर्यापैकी गर्दी होती, वाटल एवढी माणस येतात म्हणजे नक्कीच काहीतरी चांगला होईल. म्हणुन थांबलो आम्ही, गर्दी पाहुन नं लागायला वेळ लागेल असे वाटले पण कन्सल्टींग साठी कोणीच नव्हत. आणि कन्सल्टींग व्हायच्या आधीच पैसे घेतले गेले (२००/-). मग डॉ च्या केबीन मध्ये गेलो तर तिथल्या लेडी डॉ. ने प्रश्नांचा (एक २-३ पानी फॉर्मच होता तिच्याकडे प्रश्नांचा) भडिमारच सुरु केला. आमचा प्रश्न ऐकायच्या आधीच. आधी मला सगळी तुमची माहीती कळु देत मग मी तुमच्या प्रश्नावर बोलते. बर सगळ बोलण झाल्यावर कळत की तिची स्वतःची वेगळी औषध (आयुर्वेदीकच)आहेत नी संतुलन ची वेगळी आणि ती दोन्ही घ्यावी लागतील तेही ती सांगतील तेवढीच. तिचा अॅटिट्युड औषध विक्ण्याकडेच अधिक दिसत होता. एवढी तिरसट बाई होती ती सरळ काही उत्तर देतच नव्हती. शेवटी म्हणते मी औषध लिहुन पाठ्वते काउंटवर घ्यायची कि नाही ते तोपर्यंत तुम्ही ठरवा. बाहेर आल्यावर त्या काउंटवरच्या मुलीने विचारले औषधं घेणार आहात का? तर आम्ही म्ह्टल किती नी कोणती आहेत ते सांगा तर म्हणते की घेणार असाल तरच प्रिस्क्रिप्शन(नावं) दाखवणार. मग काय सरळ बाहेर प़डलो आम्ही. माझा नवरा आधीच यायला तयार नव्हता कारण तो फार्मा कं. वाला त्याचा या आयुर्वेदीक औषधांवर जरा विश्वास कमीच त्यात या बाईच्या वागण्याने भर घातली. मग मलाच गप्प रहाव लागल सगळ त्याच ऐकुन घ्याव लागल.
<<< एकुणच सगळं बघुन आणि तिथल्या लोकांशी बोलुन इतका वैतागला कि त्याने ठरवलं बालाजीबुवा जे सांगतात ते ऐकुनच खुष व्हायचं प्रत्यक्ष त्यांच्या वाटेला जायचं नाही. >>> हे आता आम्हीही ठरवल आहे.
फक्त त्यांची गर्भसंस्काराची सीङी नी पुस्तक तेवढ फायदेशीर वाटतय....
साक्षी, त्या केंद्रात अनुभव
साक्षी, त्या केंद्रात अनुभव वाईट आला म्हणजे सगळेच आयुर्वेद तज्ञ असेच असतात किंवा आयुर्वेदालाच अर्थ नाही असे नव्हे एवढं मात्र लक्षात असूद्या.
१००% सच बोला नी तुने
१००% सच बोला नी तुने
बालाजी तांबे मला तरी पटत
बालाजी तांबे मला तरी पटत नाहीत. का ते नाही सांगता येत, पण 'विविध रोग टाळण्यासाठीची पथ्ये' असे त्यांचे सदर आत्मसात करायचे झाले तर माणूस काहीही खाऊ शकणार नाही.
तांबे म्हणजे "होक्स"
तांबे म्हणजे "होक्स" आहेत
गावातील वैद्याकडे जा-फॉलो अपला ही बरे असते.
तांब्ब्यांना नुसता फोन केला,रेट ऐकून डोळे पांढरे!!
पथ्य मात्र सगळे आयुर्वेद वाले सांगतात्/अलोपथ वाले आधी सांगायचे-आता नाही
नाशिक व नगर मधील चांगले वैद्य मी सांगू शकतो.
बाकी बरेच वैद्य हल्ली सोना बाथ सारखी बस्ती करवतात्--"तिथले" काय अॅट्रॅक्शन त्यांना कुणास ठाव्ऊक?
मी माझ्या आईसाठी संतुलन
मी माझ्या आईसाठी संतुलन केंद्रात (नळस्टॉपजवळच्या) जात होतो. तिथले वैद्य तज्ञ अजिबात वाटले नाहीत. वातावरण सरकारी कार्यालयाला लाजवेल असं. कुठल्याही आजाराला शिरोधारा, मसाज आणि इतर ट्रीटमेम्त सुचवायचे. त्यांची फी पण लूट वाटावी अशीच होती. औषधाम्ची नावं सांगत नसत. खरंतर कायद्याने ते बंधनकारक आहे. त्याऐवजी कोड नंबर दिलेले असत. औषधंही वेळेवर येत नसत. फे-या मारायला लागत. फोनवर नीट माहिती न देणे, सुट्ट्या पैशांवरून बौद्धिक घेणे आणि वर भरमसाट पैसे उकळणे असे उद्योग चालत. एक दिवस पेपरला जंगली महाराज रस्त्याला दुसरं केंद्र चालू झाल्याची बातमी वाचली. तिथं गेलो तर नळस्टॉप जवळचं केंद्र बालाजी तांबे यांनी मान्यता काढून घेतल्याने अनधिकृत आहे असं सांगण्यात आलं. पण इथलाही व्यवहार फारसा आश्वासक वाटला नाही.
व्यक्तिश: बालाजी तांबे यांच्याविषयी आदरच आहे. त्यांच्याकडे वैद्यकशास्तृआची पदवी नसल्याने कायदेशीर दृष्ट्या काही चुकलय असं वाटत नाही. बिल्डर्सपैकी ९० टक्के सिव्हील इंजिनियर नसतात. सगळे कापडाचे किंवा तेलाचे व्यापारीच असतात. पण त्यांच्यापैकी कुणी बांधकामशास्त्रावर वर्तमानपत्रात पुरवणी काढून लिहीत नाही किंवा त्या विषयावर आपली पुस्तके छापत नाहीत.
फॅमिली डॉक्टर या पुरवणीमुळे बालाजी तांबे डोक्टर असल्याचा ग्रह झाला. ही एक प्रकारे फसवणूक आहे असं वाटतं. अर्थात युक्तिवादांचं स्तोम इतकं माजलंय कि चूक असलेल्या गोष्टीला चूक म्हणायचीही चोरी झालीये.
सकाळमध्ये पवारांबरोबर
सकाळमध्ये पवारांबरोबर तांब्यांचेही पैसे गुंतलेले असावेत बहुतेक.. आपल्याला आतल्या गोष्टी माहित नाहीत.
ते पण सकाळचे विश्वस्त आहेत
ते पण सकाळचे विश्वस्त आहेत असं ऐकलं..
@अनिल सोनवणे: >>>औषधाम्ची
@अनिल सोनवणे:
>>>औषधाम्ची नावं सांगत नसत. खरंतर कायद्याने ते बंधनकारक आहे
>>>त्यांच्याकडे वैद्यकशास्तृआची पदवी नसल्याने कायदेशीर दृष्ट्या काही चुकलय असं वाटत नाही.
पैकी क्र. २ हा दखलपात्र गुन्हा आहे हे आपणास माहित आहे काय? नोंदणीकृत पदविधारकाव्यतिरिक्त इतर 'बोगस' डॉ. होऊन सरकारी पाहुणचार घेऊ शकतात. आपला कायदा स्वतः दखल घेत नाही म्हणून दुकान चालू रहाते. असो.
नोंदणीकृत पदविधारकाव्यतिरिक्त
नोंदणीकृत पदविधारकाव्यतिरिक्त इतर 'बोगस' डॉ. होऊन सरकारी पाहुणचार घेऊ शकतात.
दुसर्याच्या सर्टिफिकेटवर ते करु शकतात.. तसेच कागदोपत्री निसर्गोपचार/ नॅचरोपथी असले काही तरी केंद्र दाखवले असनार.. त्याला तर कसले बंधन नाही.
जागोमोहनप्यारे लेका डाग्दर
जागोमोहनप्यारे
लेका डाग्दर हैस ना? बी.जे. चा? मंग ह्ये अस्लं काय बोलाया लाग्ला? त्येस्नी काय क्येला त्याशी म्हप्ल काय घेन देन नाय. त्या प्रतिक्रियेत काय्द्याचं बोल्नं व्हतं त्या मुळे लिव्लं म्या.
संतुलन आयुर्वेद ही संस्था
संतुलन आयुर्वेद ही संस्था बालाजी तांबे यांची आहे. पण सर्व केंद्रांमधे वैद्य असतात म्हणून त्यात काही चूक नाहि असं वाटलं. फक्त लोक बालाजी तांबे यांची संस्था म्हणून तिथे जातात. अर्थात तिथं जे काही उपचार केले जातात ते कुठलाही बीएएमएस पदवीधारक वैद्य करू शकतो. बालाजी तांबे हे वैद्य नाहीत हे माहीत नसल्याने संतुलनमधे लोक जातात. यात फॅमिली डॉक्टरचा सहभाग जास्त.
बालाजी तांबेंचे क्वालिफिकेशन
बालाजी तांबेंचे क्वालिफिकेशन काय आहे ? ते जर बी ए एम एस / एम बी बी एस नसतील तर नावापुढे डॉ. लावणे कायदेशीर आहे का?
माफ करा. इथे शंका निघाली
माफ करा. इथे शंका निघाली त्याला अनुसरून मी लिहीलंय. बालाजी तांबे यांच्या शैक्षणिक अर्हतेबद्दल नक्की माहिती नाही. ब-याच संकेतस्थळांवर ते वैद्य नाहीत असं वाचनात येतंय. माझा मुद्दा असा होता कि हा गुन्हा ठरत नाही. पण असं भासवणं ही फसवणूक आहे. अर्थात ते वैद्य असतील तर अर्हतेचा प्रश्न निकालात निघतो.
http://www.medwonders.com/member/katariyapb/view-photo/1065
प्रश्न उरतो तो संतुलन मधल्या उपचारांचा. बालाजी तांबे हे वैद्य असोत अथवा नसोत, त्यांच्या नावाचा ब्रॅण्ड तयार झाल्याने अवाजवी दराने औषधे विकणे, आपण कुठलं औषध घेतोय हे रूग्णाला कळू न देणे याबद्दल तक्रार आहे.
बालाजी तांबे हे वैद्य असोत
बालाजी तांबे हे वैद्य असोत अथवा नसोत, त्यांच्या नावाचा ब्रॅण्ड तयार झाल्याने अवाजवी दराने औषधे विकणे, आपण कुठलं औषध घेतोय हे रूग्णाला कळू न देणे याबद्दल तक्रार आहे.>>>>> अनुमोदन.
तांब्यांच्या सखोल ज्ञानाबद्द्ल काहीच शंका नाही, ते पदवीयुक्त वैद्य असले-नसले तरी त्यांनी खुप मेहनत घेऊन वर्षानुवर्षे अभ्यास करुन जी विविध आजारांवरची नी त्यावरच्या उपचारांची माहीती मिळवलेली आहे ती कौतुकास्पद आहे. ते सगळ वाचताना-ऐकताना त्यात काहीच चुकीच वाटत नाही. प्रत्येक मुद्दयावर त्यांच्याकडे संबंधीत उदा, प्राचीन काळापासुन चालत आलेले सांस्कुतिक संदर्भ असतात.
मला फक्त त्यांच्या केंद्रातील वातावरण आणि औषधे विकण्याची गळ्यात मारण्याची पद्धत म्हणजे केवळ मार्केटिंग फंडा वाटला. किंमती तर अवास्तव आहेतच पण त्यांचा आग्रह ही महिनाभराची औषधे घेण्यासाठीच असतो. त्यामागचे कारण ही तसेच ही औषधे आयुर्वेदिक असल्याने १-२ महिने घेतल्याशिवाय तुम्हाला परिणाम दिसणार नाही अस असतं. टिव्हीवर ही सांगताना आजाराच्या उपचारापेक्षा औषधांची जाहिरातबाजीच जास्त वाटते. त्यांच्या केंद्रांशिवाय इतर आयु. कें. तुन करुन घेतलेले पंचकर्म कस नी किती चुकीच असु शकत असच सांगतात म्हणजे त्यांच्या केंद्रातुन केलेले पंचकर्म किती शास्त्रोक्त असत (असेलही, मला अनुभव नाही) आणि ते ही तिथे अॅडमिट होऊन केले तरच, हेच ते प्रेक्षकांच्या मनावर ठासवत असतात.
त्यांच्या गर्भसंस्कार या पुस्तकातील त्यांच्या परिचयात त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर वडिलांच्या(वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेव तांबेशास्त्री) आग्रहावरुन 'आयुर्वेद विशारद' ही पदवी घेतली आहे असे नमुद आहे. हि माहीती केवळ संदर्भासाठी दिली आहे याबद्द्ल(पदवीबद्द्ल) मला तरी सविस्तर माहीती नाही.
http://www.lifepositive.com/body/ayurveda/tambe.asp
आयुर्वेद विशारद ही कुठली
आयुर्वेद विशारद ही कुठली पदावी? कधी ऐकली नव्हती.... लोकाना याची माहिती मिळाली तर बरे होइल.. ६ वर्षे शिकून डोक्टर होण्यापेक्षा लोकाना शॉर्टकट मिळेल.
जामोप्या, ए.व्ही.व्ही. ही ती
जामोप्या, ए.व्ही.व्ही. ही ती पदवी असावी बहुधा.
आयुर्वेदिक वैद्य विशारद.
खेड्यापाड्यांत अशी पदवी असलेले बरेच डागदर पाहिले आहेत मी.
कशी मिळते,कशी मिळवतात्,कुठे याची महाविद्यालये आहेत्,याबाबत काही माहिती नाही.
कशी मिळते,कशी मिळवतात्,कुठे
कशी मिळते,कशी मिळवतात्,कुठे याची महाविद्यालये आहेत्,याबाबत काही माहिती नाही.
पोस्टल कोर्स असेल ! महाविद्यालय कशाला??
साक्षी, वरील सर्व
साक्षी, वरील सर्व अनुभवांपेक्षा मला आलेला अनुभव वेगळा आहे.
मला अनियमित पाळी, पी. सी. ओ. डी, हार्मोनल प्रॉब्लेम होते, तसेच माझी प्रकृती कफ प्रकारात मोडते, मला कफ आणि पित्तचाही त्रास होता..
मी २००४ मधे पुण्यात रुबी हॉल क्लिनीक डॉ. शिशीर बुधकर, २००६ पुना हॉस्पीटल डॉ. नीला देसाई,
२००८ मधे यवतमाळ मधे डॉ. ठाकरे, डॉ. श्रोत्री, डॉ. पाचकवडे (यांच्याकडील उपचारांनन्तरही काहीही फरक न पडल्याने)
२००९ कोल्हापूर मधे, डॉ. जिरगे, डॉ. नागावकर, डॉ. पत्की (उपचारासाठी एवढ्या दूर जाणे शक्य नव्हते, तरीही वरील सर्वांकडे मी किमान ८ ते १० वेळा गेले आहे..)
२०१० नोव्हेंबर पासून तांबे यांची औषधे घेत आहे, , मी आधी यवतमाळ मधे स्थानिक डॉक्टरांकडुन पंचकर्म केले होते, मग मी तांबेंकडे उपचार सुरू केले, माझेही सुरूवातीला असेच मत होते, पण मी स्वतः पंचकर्म करवून घेतले, ४ वेळा उत्तरबस्ती केली, आज मला मिळालेला रिझल्ट खुप चांगला आहे, संधीवाताने जर्जर झालेले पेशंट बर्यापैकी बरे होऊन चालत जाताना मी पाहीले आहेत, माझ्या सासूबाईंचे एल ५ डिस्कचे ऑपरेशन झाले आहे, त्यांनापण तांबेंच्या औषधाने त्यांच्या हाडांची होणारी झीज कमी होऊन दुखण्यावरही खुप फरक पडला आहे, सासर्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना पण खुप आराम वाटत आहे, तांबेंच्या औषधाबरोबरच पथ्य पाळणेही खुप गरजेचे आहे, आयुर्वेदीक, होमीओपॅथीकचे उपचार दिर्घकाळ चालणारे असतात, त्यामुळे रिझल्टही उशीरा मिळतात..
१ वर्षानंतर आज आम्हाला तो फरक जाणवत आहे..
तांबेंची औषधं महाग आहेत पण त्याची क्वालीटी पण तशीच आहे, तु स्वतः प्रयोग करुन बघ.. बाजारात मिळणारे अशोकारीष्ट व तांबेंकडे मिळणारे संतुलन फेमिनाईन बॅलन्स तु वापरुन बघ.. तुला नक्कीच फरक जाणवेल.. श्री. बालाजी तांबे आता अध्यात्मीक क्षेत्रात कार्यरत आहेत, ते पेशंट पहात नाहीत पण सिरीयस पेशंट असेल तर त्यांचा सल्ला घेतलाच जातो, तांबे स्वतः रोज संध्याकळी सर्व पेशंट्च्या फाईल्स चेक करतात, त्यांची सून देखील खुप चांगले मार्गदर्शन करेल, अथवा डॉ. गोडबोलेही चांगले आहेत. मुख्य औषधांसोबत अजुन औषधांचा मारा केला जातो असे वाटते, पण ती औषधे ही तितकीच गरजेची असतात, जसे कुठल्याही अॅलोपॅथी औषधाबरोबर अॅन्टी अॅसीड, पेन्कीलर देतात त्याच प्रमाणे सॅन्कुल, सॅनरोझ पित्तशांती, ही औषधे काम करतात. क्वालीटी मेंटेन करत असल्याने औषधांच्या किमती जास्त आहेत.. आपण अॅलोपॅथीसाठी वाट्टेल ती किंमत मोजतो मग इथेच असा विचार का करतो आपण?
माझ्या या लेखनामुळे मी तांबे भक्त आहे असेही वाटेल पण खरच साक्षी हा माझा वैयक्तीक अनुभव आहे..
त्यांच्या सीडीज पुस्तके खुप महाग आहेत हे मात्र कबुल, त्यातले म्युझिक खुप अप्रतिम आहे, खास करुन हार्मनी, दत्त भजन, स्त्री संतुलन म्युझिक..
चु. भु. माफ करणे..
सारीका, मी वर म्ह्टल तस
सारीका, मी वर म्ह्टल तस त्यांच्या ज्ञानाबद्द्ल मला काहीच शंका नाही. त्यांची औषध ही वाईट नाहीत. मला थोडा चांगला अनुभव आला म्हणुनच तर मी पुढे कन्सल्टिंगचा विचार करुन गेले होते. पण तिथला अनुभव, त्या डॉ. नी इतर स्टाफच वागण मला खटकल. लोक इतक्या अपेक्षेने, विश्वासाने तुमच्याकडे येतात तर तुम्हीही तितक्याच आपुलकीने, विश्वासपुर्ण वागणुक देणे अपेक्षित असते. तुमच्या औषधांमध्ये खरच इतकी गुणवत्ता असेल तर तुम्हाला त्यासाठी लोकांवर जबरदस्ती करणं गरजेच नाही. लोंकाना स्वतःला चांगले अनुभव आले की ते पुन्हा येणारच ना तुमच्याकडे. जस मी गेले. माझ्याकडे त्यांचे गर्भसंस्कार पुस्तक नी सीडी आधी होतीच. ते वाचुन नी ऐकुन( ते चांगल वाटले म्हणुनच) मी त्यांची औषधे वापरुन पाहायची ठरवले. तस मी त्यांच फे.बॅ. आसव घेतले ते चांगले वाटले म्हणुन मग आणखीन्च अपेक्षा वाढ्ल्या पण प्र्त्यक्ष कन्सल्टिंग घेतल्यावर सगळा अपेक्षाभंगच झाला माझा. शेवटी मी आणखी औषधे माझ्या विचारानुसार मला योग्य होतील अशी घेतलीच की. पण याचबरोबर जर त्या डॉ. ने ही सहकार्य केले असते तर माझी खात्री आणखीन्च वाढ्लीच असती. मग इथे मी चर्चा सुद्धा केली नसती. माझ्या जवळ पासच ते एकच केंद्र आहे. आणखीन ठिकाणी असेच असते का ते मला पडताळायच होत.
साक्षी, तुझे बरोबरच आहे..
साक्षी, तुझे बरोबरच आहे.. स्वतः डॉ. बालाजी सोडून तिथला चपराशी देखील स्वतःला बालाजी तांबेच समजतो..
पण तु डॉ. मालविकांकडे जा.. तुला चांगला प्रतिसाद मिळेल..
गुणवत्ता आहे हे मात्र खरं.. म्हणून इतर बाबींकडे दुर्लक्ष केलेले बरे..
डॉ. मालविका कुठे भेटतात???
डॉ. मालविका कुठे भेटतात???
डॉ. मालविका कार्ल्यामधेच
डॉ. मालविका कार्ल्यामधेच भेटतील.. सोम, मंगळ विषेश गर्दी नसते.. फोन करून डॉ. माल्विका आहेत का ते आधी माहीती करुन घेऊन मगच जाणे.. फोन लवकर लागत नाही..
धन्यवाद सारीका..
धन्यवाद सारीका..
मला या माणसाबद्दल/संस्थेबद्दल
मला या माणसाबद्दल/संस्थेबद्दल बरेच दिवसांपासून माहिती हवी होती. इसकाळ मधे ते सल्ला जेव्हा देतात तेव्हा कायम स्वताच्या औषधांचेच उपचार देतात. Fruad माणूस वाटतो मला.
Fruad माणूस वाटतो मला.
Fruad माणूस वाटतो मला. <<
फक्त 'वाटतो'??
खी:
साक्षी …HI …… माझा अनुभवही
साक्षी …HI …… माझा अनुभवही तुम्हा सर्वापेक्षा वेगळा ……… इब्लीस एखाद्याच्या ज्ञानाबद्दल असे बोलू नये …… froud तरी म्हणू नका plz ……साक्षी माझी एवढी capacity नाही कि मी कर्ल्याला जाऊन उपचार घेईन पण गर्भसंस्कार पुस्तकाचा
अनुभव अतिशय चांगला आहे त्यांची medicines आहेत महाग पण परिणामही चांगला देतात …माझे २ वेळा miscarrage झाले होते ३ रया वेळी मस्त उपचार घेतले गर्भसंस्कार पुस्तकाप्रमाणे आणि आज माझी मुलगी १४ महिन्यांची आहे अगदी हुशार आणि निरोगी …माझी मुलगी जन्मल्यापासून कोणताही त्रास देत नाही नाही कधीही विनाकारण रडत नाही उत्तम आकलन शक्ती आहे तिला तेराव्या महिन्यात ती उत्तम बोलू लागली …. मी त्यांची कोणती medicines वापरली ते सांगते काही उपयोगि पडतील …. बालामृत . san अंजन c खोबरेल तेल … सन्तुलन अभ्यंग तेल फेमीसन तेल ई .
हे असेच (वाईट) अनुभव बत्रा
हे असेच (वाईट) अनुभव बत्रा क्लिनिक मध्ये आले आहेत. एकदम चकाचक क्लिनिक, पानभर जाहिराती पाहुन लोक भुलतात.
दिलेल्या अपॉईंट्मेंट न पाळणे, अपॉईंट्मेंट घेऊन बसलेल्या पेशंटच्या ऐवजी भलत्यालाच आत केबिन मध्ये बोलवणे आणि पेशंटला ताटकळत ठेवणे हे तर मला दर वेळेला अनुभवास येत होते.
औषधाचे नाव सांगत नाहीत त्यामुळे पेशंटला कळतच नाही काय उपचार घेतोय ते.
हे सगळे दुकानदार आहेत, डॉक्टर नाहीत.
तांबेंची औषधं महाग आहेत पण
तांबेंची औषधं महाग आहेत पण त्याची क्वालीटी पण तशीच आहे >>> LOL
श्री. बालाजी तांबे आता अध्यात्मीक क्षेत्रात कार्यरत आहेत >>> महा LOL
बाजाराचा नियम म्हणजे ज्यात
बाजाराचा नियम म्हणजे ज्यात कमीत कमी गुंतवणूक व नफा जास्त त्या मालाचे उत्पादन वाढते. आयुर्वेदाविषयी जागरुकता वाढली नि सरकारने देखील आयुर्वेद महाविद्यालये मान्यता देऊन वाढवली. आता शहरांमध्ये गल्लीबोळातून पंचकर्म उपचार केंद्र तयार झाली आहेत. अत्यंत कमी खर्चात उत्तम सेवा देणारी सेवाभावी संस्था आहेत. नाशिक मध्ये एक आहे नाव आठवत नाही. पण जनता जाहीरातीवरच विश्वास ठेवते. जाहीरात भारी असेल तर कितीही किंमत मोजतात. अजूनही काही वैद्य आहेत की जे खरेच रुग्णसेवेसाठी झटतात.
तांबेबाबा मेकॅनिकल इंजिनियर
तांबेबाबा मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांची एक फॅक्टरीबी होती. पुढे त्यांचे गुरु श्री. गुळवणी महाराज यांनी त्यांना धंदा बंद करून वैद्यकी करायला सांगितलं. मग यांनी तो आदेश तंतोतंत पाळून कसला तरी डिप्लोमा मिळवला आणि आज ते इथंपर्यंत आलेत. आता यांचे वैद्यकीचे ज्ञान आणि औषधांचा दर्जा यावर वेगळा धागा तयार होईल. मागे त्यांच्यावर मुलगाच होईल का काय असं काहीतरी त्यांच्या पुस्तकात टाकल्याने गुन्हा दाखल झाला होता. सकाळ च्या जवळ असल्याने लोकसत्ताने चांगलंच लावून धरलं होत. पुढं काय झालं कायनु ? बारामती आली असेल मदतीला धावून.
अलिकडे बरेच जण निसर्गोपचार
अलिकडे बरेच जण निसर्गोपचार वगैरे जाहिरात करुन धनाढ्य लोकांना गळाला लावत असतात. एलीट दर्जा वगैरे जाहिरात करुन धनाढ्य लोकांच्या इगो ला सांभाळत खिसा कापतात. सामान्य माणूस अशा ठिकाणी गेला तर त्याला हडतूड करून हाकलतात.
बारामती आली असेल मदतीला धावून
बारामती आली असेल मदतीला धावून.>>>
बारामती आलीपैसा आला असेल मदतीला धावून.त्यांची वेब साइट पाहता सर्व
त्यांची वेब साइट पाहता सर्व दर डोलर्स मध्ये आहेत
त्यांची वेब साइट पाहता सर्व
त्यांची वेब साइट पाहता सर्व दर डोलर्स मध्ये आहेत>>
तिच 'गिर्हाइकं' आहेत त्यांची.
मला आम्लपित्ताचा त्रास होता
मला आम्लपित्ताचा त्रास होता मी खूप दवाखाने केले खूप उपचार घेतले आयुर्वेदिक सुध्दा घेतले आणि एलोपॅथी पण घेतले साधारण दहा ते बारा दवाखाने केले पण माझी समस्या दूर झाली नाही मग डॉक्टर बालाजी तांबे यांच्या लोणावळा येथील दवाखान्यात दाखविले तेथील डॉक्टरांना आयुर्वेदाचे पूर्ण ज्ञान आहे आतापर्यंत मी आयुर्वेदाचे थोडेसेच ज्ञान असणाऱ्यांना दाखविले होते म्हणून माझी समस्या दूर झाली नाही त्यांची औषधे उत्कृष्ठ गुणवत्तेची आहेत म्हणून ती महाग आहेत पण त्याच्या शिवाय पर्याय नाही आपल्याला चांगले व्हायचे असेल त्यांचा सारख्याच तज्ञ डॉक्टरांनाच दाखवावे लागेल पण तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे तिथपर्यंत तुमचा खूप पैसे आणि वेळ वाया जाईल म्हणून मी डॉक्टर बालाजी तांबे यांची शिफारस करतो मला बर व्हायला दोन वर्ष लागली आणि साधारण ६० ते ७०००० रुपये खर्च आला तो जर खर्च मी केला नसता तर माझ्या व्यवसायावर आणि नोकरीवर परिणाम होऊन साधारण ५ ते ६ लाख रुपये एवढे माझे नुकसान होत होते कारण महिन्यातून ८ ते १० दिवस आजारी पडल्या मुळे माझा पगार कापल्या जात होता आणि माझा व्यवसाय पण आहे त्याच्यावर पण मी व्यवस्थित लक्ष पुरवू शकत नव्हतो आणि वेदना सहन कराव्या लागत होत्या त्या वेगळ्या ५ ते ६ लाख नुकसान होऊ दिल्या पेक्षा ७०००० गेले ते परवडले .डॉक्टर बालाजी तांबे यांचे लोणावळा येथील डॉक्टर नाडी परीक्षेत तज्ञ आहेत विशेषकरून डॉक्टर मालविका तांबे आणि डॉक्टर गोडबोले . तुम्हाला दोन किंवा तीन वर्ष पण लागू शकतात कोणी सहा महिन्यात पण चांगला होऊ शकतो पण सहा महिन्यात तुम्हाला फरक दिसायला लागेल फरक दिसायला लागण्यासाठी सहा महिने लागतात . आता मी पूर्णपणे बरा झालो