आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?
मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!
कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!
काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???
श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?
चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......
******************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
हे खाऊ का ते खाऊ उपाशी राहु
हे खाऊ का ते खाऊ
उपाशी राहु की तुपाशी खाऊ
पोट पाहु का दात पाहु
हे पाहु के ते पाहु
एक तो योगी साबरमतीचा त्याने
एक तो योगी साबरमतीचा
त्याने केला सत्याग्रह मीठाचा
एक मी भोगी महिकावतीची
रसनेला माझ्या मोह थालिपीठाचा
(खरंच थालिपीठ खात खात टाईप केलंय
)
(रोहनच्या (पक्का भटक्या) महिकावतीची बखरवरुन मुंबईला पर्यायी शब्द घातला आहे.)
मामीच्या हातचा चविष्ट चाखलाय
मामीच्या हातचा चविष्ट चाखलाय शिरा
साधनाच्या केकचा मना अजुन खमंगपणा
दिनेशदांच्या काजूउसळीचा स्वादच निराळा
अश्विनीच्या थालिपिठाला रिकामी अजुन जागा.
पाकातल्या पुर्या माझ्या
पाकातल्या पुर्या
माझ्या नावडीच्या
रबडी, रसमलाई
माझ्या आवडीच्या
रबडीवरुन आठवली
रबडीवरुन आठवली मायावती
हलवायाकडे नासलेली थप्पी माव्याची
आठवून सगळ काल दुधाची आणली पिशवी
आजच केला दुधीहवा शुद्ध शाकाहारी
अस्से जावे बाजारात आणि आणावा
अस्से जावे बाजारात
आणि आणावा खवा
गुलाबजाम, साटोरी,
पेढे किंवा बर्फी
हव्वा तो ऑप्शन घ्यावा!
खवा नको बाई माला हवा
खवा नको बाई
माला हवा रवा
रव्या सोबत तुप
मग बनवेन तुपातला शिरा
कसे हे आमचे वंगबंधू दिसले दूध
कसे हे आमचे वंगबंधू
दिसले दूध की मागती लिंबू
रोशोगुल्ला , शोंदेश,मलई सँडविच
यांची मौज मग काय सांगू
कारल्याचा शिरा पेढ्याचे
कारल्याचा शिरा
पेढ्याचे लोणचे
खातांना आम्ही तुमच्या
तोंडाला पाणी सुटायचे.
रोशोगुल्लाचे आम्हीही फॅन फॅन
रोशोगुल्लाचे आम्हीही फॅन
फॅन खाली गरम दुधाला मान
मान राखण्यासाठी खावा गुलाबजाम
करावे कसे बरे माश्यांना बॅन ?
रवा अन् खव्याचे तर होतात लाडू
रवा अन् खव्याचे तर
होतात लाडू फर्मास
नॉनव्हेजच्या ताटातही
उठून दिसतील खास!
पौष्टिक असतो म्हणे लाडू
पौष्टिक असतो म्हणे लाडू मुगाचा वा डिंकाचा
हलावायाकडून आणावा मोतीचूर वा बुंदीचा
रंग रूप रस गंध अशा सगळ्या गुणांचा
बेसनाचा लाडू माझ्या आवडीचा
गर्र...रम दुध नको मजला पाणी
गर्र...रम दुध नको मजला
पाणी आणी त्यात फरक कसला
दुधात रसायन आणी रंग घातला
पाणी त्यापरी आवडे मजला
छे छे कमालच केली
छे छे कमालच केली सगळ्यांनी
रैनाची ती तर्हा निराळी
अनुमोदना ही माझी तिनोळी
(सॉरी , अजिबातच जमल नाहीय्ये, पण अनुमोदनाप्रित्यर्थ स्विकारा म्हणे)
दुध आणि नॉनव्हेज कट्टर
दुध आणि नॉनव्हेज कट्टर दुश्मन
बेसनचा लागतो कच्चट खमण
रसायनांच त्यात असत मिश्रण
म्हणुनच मला आवडत मटण .
मयेकर, आणि त्याला पाकही लागत
मयेकर, आणि त्याला पाकही लागत नाही
पाक करू बाई पाक करू
एकतारी करू की दोनतारी करू?
लाडू करू की साखरांबा करू?
अगदीच नाही जमले तर
लिंबू पिळून सुधारस करू!
आवडते आता दाल आणी
आवडते आता दाल आणी बाटी
कुस्कुरुन वरणाची वाटी वर वाटी
डोळ्यावर माझ्या झोपेचा दट्ट्या
पोटात झाल्या बाटीच्या बिट्ट्या
दलबाटी नी राजस्थानी
दलबाटी नी राजस्थानी केरसांगरी
मला बाई लागते महाराष्ट्रियान थाली
महाराष्ट्रीयन थाळी चवीची भारी
त्याच असावी पापलेटची करी.
परातीत घेतले पोहे पोह्यांना
परातीत घेतले पोहे
पोह्यांना दाखवलं ऊन
कढीपत्ता, दाणे, खोबरं, डाळं
ठेवलं एकत्र करून
चढवली कढई, केली फोडणी
परतले पोहे झटपट
खमंग चिवड्यासाठी
फार नाही खटपट!
थाली मध्ये वाद नाही गुजराती
थाली मध्ये वाद नाही
गुजराती काय महाराष्ट्रीयन काय
भुक लागली की पोटोबाची
तक्रार अजिबात नाही.
पूनम पाचोळा आणि आठळ्या उडवतेय
पूनम पाचोळा आणि आठळ्या उडवतेय
पोह्यांना दाखवायला इथे नाही
पोह्यांना दाखवायला इथे नाही उन
उनाच्या भरवश्यावर मिटून जाईल भुक
थाळी नी परातीत आता निवडे मोडाचे मुग
बिरड्याची भाजी झाली की खाऊन टाकेन गुपचुप.
पोह्या वर पोहे सात
पोह्या वर पोहे सात पोहे
मुरमुर्यावर मुरमुरे सात मुरमुरे
चिवड्यावर चिवडा सात चिवडा
म्हणा आता हे "आठच"वेळा
जागू, पदार्थांचे वर्णन करणारे
जागू, पदार्थांचे वर्णन करणारे काहीतरी तोंपासु असे लिही. (म्हणजे, असे अभिप्रेत आहे असे वाटतेय मला)
वक्के पौर्णिमा. नियम न बघता
वक्के पौर्णिमा. नियम न बघता आधास्यासारख्या मी टाकल्या इथे पोस्टी.
ताटात घेतली कोथिंबीर
त्यावर पेरल बेसन
कांद्याचा होता वांदा
मग आल्-लसूण नी भाजून वाटला धणा
चविला टाकले मिरची आणि मिठ
तळून काढली कोथिंबीरवडी चटपटीत.
लिहा. वाचतेय.
लिहा. वाचतेय.
घरच्या दुधाचे दही
घरच्या दुधाचे दही विरजले
शुभ्र मऊसूत लोण्याचे तूप कढत ठेवले
पातेल्याला लागलेली करडी रवाळ बेरी
साखर घालून खाणार कोणी काही म्हटले तरी!
फोडणीच्या वरणाला लसनाची
फोडणीच्या वरणाला
लसनाची साथ
कुस्करा करुन
आडवा मारा हात.
चारोळ्या खाऊन भरले पोट आता
चारोळ्या खाऊन
भरले पोट
आता विडा खावा
रंगवा ओठ
आईग्ग... खादाडखाऊ सगळेच..
आईग्ग... खादाडखाऊ सगळेच.. लिहीणारे - वाचणारे
Pages