आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?
मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!
कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!
काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???
श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?
चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......
******************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
*
*
शेव बटाटा पुरी, लागते
शेव बटाटा पुरी, लागते बरी
इडली त्यापरी नाही दुसरी
आवड बहु मला, पिझ्झ्याची असे
भूक लागता पावभाजी दिसे
हे मी आधी अन्यत्र लिहिले
हे मी आधी अन्यत्र लिहिले होते.
समोसे आते हैं
कचोरी आती है
यह पूछे जाती है
हमें कब खाओगे
हमें कब खाओगे
दोन मिनिटांत होई, अन पोट भरून
दोन मिनिटांत होई, अन पोट भरून जाई
गरमागरम खाताना... सुर्रसुर्र आवाज होई
हाय राम ये कैसे लगन लगी
छोट्यां-मोठ्यांना सारखीच आवडते मॅगी
खुशखुशीत चवदार मी चकली बरं
खुशखुशीत चवदार
मी चकली बरं का
उचला मला कुणीतरी
पटकन तोंडात टाका
हे जागुतर्फे : अहोंच्या
हे जागुतर्फे :
अहोंच्या सदर्याला लावते बटण
सगळ्यांना खिलवते मी चिकन-मटण
मित्रमैत्रिणींना जेवायचे केले मी बोलवण
बेत होता मस्त तळलेले मासे आणि कालवण!
वरचं जागुतर्फे होतं म्हणजे मी
वरचं जागुतर्फे होतं म्हणजे मी नियम मोडला नाहीये.
बिस्किटे खावी बिस्किटांसारखी
कधी चहाशी कधी दुधाशी
कधी खा आतले क्रीम चाटूनी
पण राहू नका मात्र उपाशी .....
सगळे खाण्यात इतके मग्न आहेत
सगळे खाण्यात इतके मग्न आहेत की आरोळ्या ठोकायला तोंडं रिकामी नाहीयेत????
इतका वेळ दिला पण कोणी काही लिहिले नाही.
झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु
परंतु यासम हा
दुसरेतिसरे काही नाही
तो माझा लाडका चहा
दोडकी, भोपळा, दुधी,
दोडकी, भोपळा, दुधी, कारली
ऐकून सगळ्यांनी तोंडे फिरवली
मी म्हणेन गागुच्का गागुच्का
मला या भाज्यांची चव कळली!
जोरदार बरसत असावा बाहेर
जोरदार बरसत असावा बाहेर पाऊस
कांदा, बटाटा, मिरची, वांगी घ्यावी ताजी
ओल्या कंच त्या अदभुत वातावरणात
खावी तुडुंब गरमागरम भजी
त.टी. :
१. इथे फोकस भज्यांवर आहे. कांदा, बटाटा, मिरची, वांगी हे निमित्तमात्र.
२. वातावरणातल्या 'वरण' या शब्दाकडे अजिबात लक्ष देऊ नये.
शाबासकी देताना सगळे
शाबासकी देताना सगळे म्हणती
'भले शाब्बास, यंव रे गब्रु!'
पण तो गब्रु, गब्रु नाही
जोवर पीत नाही गरम ब्रू !
मामी. मस्त. सुटलीयस एकदम.
मामी. मस्त.
सुटलीयस एकदम.
संध्याकाळच्या वेळी
संध्याकाळच्या वेळी ,
माझ्यासाठी पाणीपुरी मस्ट.
कारण पावभा़जी, डोसे साठी
लागतात करावे फार कष्ट
.. हे उगीचच आपले यमक जुळवायला.
सकाळी दुपारी अन्
सकाळी दुपारी अन् सायंकाळी
चहाची तल्लफही येते अवेळी
मसाला, हर्ब, मश्रूम, लेमन वा ग्रीन
अमृततुल्य पेय जागवी चैतन्य धून!!
स्क्रॅम्बल्ड, पोच्ड अन एग
स्क्रॅम्बल्ड, पोच्ड अन एग बेनेडिक्ट
सगळ्यांनी एकदम बसा गप
पॅनमध्ये टाकलं, मीठ्-मिरं भुरभुरवलं
अन बनलं मस्त सनी-साईड्-अप
सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा
सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर
आडवा डोंगर
अन आवडते
पोह्याचे डांगर
पांढरीशुभ्र उकड, तूप घातलं
पांढरीशुभ्र उकड, तूप घातलं फक्कड त्यावर
कोथिंबिरीची चार पानं, कढीपत्त्याचा खुशाल वावर
लाल मिरचीचा खमंग तडका, लसूण जिर्याचा गंधित दरवळ
वाफ निवेस्तो धीर ना धरे, आठवणीने होते व्याकुळ!
किती आवडते मज मनापासूनी
किती आवडते मज मनापासूनी भेळ
लाविते लळा ही नाही काळ अन् वेळ
पाणीपुरी खाऊन मन होई आनंदी
त्यावर स्वीटडिश म्हणूनी खाऊ नये बासुंदी
किती वेटोळी वेटोळी अशी करावी
किती वेटोळी वेटोळी
अशी करावी चकली
तांदळाची, भाजणीची कधी नुसत्या ज्वारीची
करून, खाऊन पहावी ती चकली
उकडले बटाटे, सोलले
उकडले बटाटे, सोलले कुस्करण्यासाठी
आले, मिरची अन् लसूण घेतली वाटणासाठी
मीठ मिसळले, तेल तापवले फोडणीसाठी
चटणीसोबत वडे हाणा, जन्म आपुला खाण्यासाठी
होळी येईल तेंव्हा खुशाल ओरडा
होळी येईल तेंव्हा
खुशाल ओरडा बोंबला
संक्रांतीला मात्र
तिळगूळ घ्या गोड बोला
रात्री भिजले तांदूळ अन्
रात्री भिजले तांदूळ अन् उडदाची डाळ
वाटून आंबण्यां ठेविले झाकून फडके पातळ
आता वाफविते शुभ्र, गोलाकार इडली
उकळत्या सांबारासवे कित्ती खायला चांगली!!
संक्रांतीला गोड बोलुनी मिळती
संक्रांतीला गोड बोलुनी
मिळती तिळ्गूळ दोनचार
होळीला ठो ठो करुनी
पुरणपोळ्या भारंभार...
मायबोलीवर असती माझे कित्येक
मायबोलीवर असती माझे
कित्येक डु आय डी..
मिटक्या मारत खातो मी
शुभ्र खरवसाची वडी..

बाSSSरीक चिरला कांदा, त्यात
बाSSSरीक चिरला कांदा, त्यात घातले मीठ
सुटलेल्या पाण्यात पोहे भिजवले नीट
ताजं ओलं खोबरं, फोडणी, कोथिंबीरीचा थाट
लिंबु पिळून दडपे पोहे पाहतायत तुमची वाट
चणाडाळ अन गुळाचं बनवलं
चणाडाळ अन गुळाचं बनवलं पुरण
मैद्याच्या पारीत भरलं हे सारण
तेलावर लाटली, तव्यावर भाजली
तेलपोळी ती तोंडात विरघळली
नको भाजी चटणी नको मेजवानी मला
नको भाजी चटणी
नको मेजवानी
मला आवडते भारी
वन डिश बिर्यानी
हरीला आवडते हरीला आवडते आवडते
हरीला आवडते हरीला आवडते
आवडते तुळशीचे पान
हॅरी हर्मायनी रॉनला मात्र
लागे बटर बिअर छान
कम्माल करताहेत सगळे..
कम्माल करताहेत सगळे..
पावाला मारला मस्का अन् भाजला
पावाला मारला मस्का
अन् भाजला छान खरपूस
भुरभुरली वरून साखर जराशी
आता उरलाही नाही मागमूस!!
Pages