Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:31
गिरीजासुता गौरिगणेशा
नमन तव चरणी हे प्रथमेशा ||धृ||
करुणा तुझ्या विलसते नयनी
खुलतसे हास्य मधुर गजवदनी
भवसागरी तारिसी विघ्नेशा ||१||
प्रभु मोरया मंगलमूर्ती
तव दर्शनाने जागत स्फूर्ती
मज ज्ञान दे, वरदा, गुणेशा ||२||
कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच.. गीत, चाल, गायन सगळेच
मस्तच.. गीत, चाल, गायन सगळेच एकदम मस्त.
सुंदर. आवाज, चाल, काव्य सर्व.
सुंदर. आवाज, चाल, काव्य सर्व.
अगो, खूप छान वाटलं तुझा आवाज
अगो, खूप छान वाटलं तुझा आवाज ऐकून. मस्त
कवयित्री: क्रांति साडेकर चाल:
कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो
सुरेख त्रिवेणी संगम.
सुरेख! आवाजाबद्दल पौर्णिमा +१
सुरेख!
आवाजाबद्दल पौर्णिमा +१
सु रे ख ! शब्द, चाल, सुर
सु रे ख !
शब्द, चाल, सुर सगळेच मस्त !
मस्त म्हटलंयस अगो. शब्द अन
मस्त म्हटलंयस अगो.
शब्द अन चाल सुद्धा सुरेख
अ प्र ति म सुं द र ! सगळेच
अ प्र ति म सुं द र !
सगळेच फार फार सुरेख जमून आलय ... तिघांनाही धन्यवाद !
अरे !! मा.बो. वरती गाणी टाकता
अरे !! मा.बो. वरती गाणी टाकता येतात हे मला ठाउकच नव्हते !! खूप छान !! एखादे गाणे बनवलेले असेल तर ते कसे पोस्टवायचे कुणी सांगेल का?
पुन्हा पुन्हा ऐकते आहे.
पुन्हा पुन्हा ऐकते आहे.
prashant_the_one, तुम्ही
prashant_the_one,
तुम्ही तुमच्या गाण्याची ऑडिओ फाईल sanyojak@maayboli.com इथे इमेल करून पाठवू शकता. कवी/ कवयित्री, संगीतकार आणि गायक/ गायिका यांच्या नावाचा इमेलमधे उल्लेख असावा.
अगो, किती मस्त म्हंटलं आहेस
अगो, किती मस्त म्हंटलं आहेस गाणं/स्तवन .. छान, मनमोकळा आणि गोड आवाज लागलाय!
सुंदरच म्हंटलय, आवाज छान आहे
सुंदरच म्हंटलय, आवाज छान आहे एकदम स्पष्ट,
चाल ही सुंदर
उत्तम काव्य, उत्तम चाल आणि
उत्तम काव्य, उत्तम चाल आणि सुरेल,भक्तीभावपूर्ण पेशकारी! खूपच छान वाटलं ऐकताना.
कोणताही वाद्यमेळ साथीला नसताना फक्त तानपु-यावर ''बैरागी''चे सूर स्वच्छ लावलेस अगो. सुरांवर अशीच भक्ती राहु दे म्हणजे ''सकल कलांचा तो अधिनायक'' तुझ्यावर कृपाछत्र नक्कीच धरेल!
अग्गोबाई, मस्तच !
अग्गोबाई, मस्तच !
व्वाव काय सुंदर गायलीस अगो
व्वाव काय सुंदर गायलीस अगो !
क्रांति, देवकाका आणि अगो खुपच छान काम केलतं.
( इतरांसारखं शाब्बास अगो म्हणावसं वाटलं होत :P)
अगो, जियो! काय अफाट गायली
अगो, जियो! काय अफाट गायली आहेस! शब्द-सूर सगळंच सुंदर!!
गीत ,संगीत,स्वर सर्व छान
गीत ,संगीत,स्वर सर्व छान जुळून आल आहे.सर्वांच अभिनंदन.
>> कवयित्री: क्रांति
>> कवयित्री: क्रांति साडेकर
चाल: प्रमोद देव
गायन: अगो >>
वा वाअ! कसलं भारी मस्तच आवाज आहे.
श्रवणीय रचना. क्रांति, देव,
श्रवणीय रचना. क्रांति, देव, अगो धन्यवाद.
सुरेख गीत... केवळ अप्रतिम
सुरेख गीत... केवळ अप्रतिम चाल, प्रमोद काका...
अग्गो बाई. काय आवाज लागलाय... झगझगित सूर...
मजा आया
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!
माझ्या शब्दाला मान दिला म्हणून अगोचेही मनःपूर्वक आभार ! विपरीत परिस्थिती आणि हाताशी अतिशय कमी वेळ असतांना गाणं अतिशय उत्तम रितीने गायल्याबद्दल तिचं कौतुकही वाटतं.
मागणी करताच इतकं सुंदर गीत त्वरित लिहून दिल्याबद्दल क्रांतिचेही कौतुक वाटतं.
मायबोलीने संधी दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचेही मनःपूर्वक आभार!
सुंदर.
सुंदर.
केवळ अप्रतिम.. अगो, तू खूप
केवळ अप्रतिम.. अगो, तू खूप छान गायलीयस गं.. अशीच गात रहा... प्रमोदजी क्रांतीजी, खूपच छान संगीत आणि काव्य. मी हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं.
इतकं सुंदर गाणं दिल्याबद्दल तुम्हा तिघांचेही खूप आभार.
ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात
ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात सहभागी व्हायची खूप इच्छा होती पण नवीन ठिकाणी होणारी सुरुवातीची धावपळ, घरात इंटरनेट कनेक्शन नाही आणि लॅपटॉपनेही असहकार पुकारलेला ह्यांतून हे शक्य होईल असं बिलकूल वाटत नव्हतं. देवकाकांनी इतकं सुरेख गाणं गायची संधी दिली आणि ह्या सगळ्या अडचणींत सांभाळून घेतलं त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक धन्यवाद !
क्रांति ह्यांच्या कविता मला अतिशय आवडतात. त्यांनी रचलेलं गाणं गायला मिळालं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे
मायबोलीकरांनी केलेलं कौतुक नेहेमीच उमेद वाढवतं. ह्या प्रोत्साहनाबद्दल सगळ्यांची फार फार आभारी आहे
मायबोली प्रशासन आणि संयोजक ह्यांनाही खास धन्यवाद
Pages