काही दिवसांपूर्वी सिंहगड पायथ्याशी एका कामानिमीत्त गेलो असता एका प्रचंड केशरी झाडाने माझे लक्ष वेधुन घेतले. एकही पान नसलेले हे झाड म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसुन आपले 'पळसाला पाने तिन' वाले पळसाचे झाड होते. झाडावर तिन सोडाच एकही पान नव्हते. संपूर्ण झाड फुलांनी डवरलेले होते. नेमका कॅमेरा जवळ नव्हता. तो नसण्याचा एक फायदा झाला की डोळे भरुन झाडाकडे बघता आले. अजयने म्हणल्याप्रमाणे लांबुन पळसाचे झाड व पांगारा सारखेच दिसते. हे बघा.
www.flickr.com/photos/dinesh_valke/454227254/
दुधाची तहान ताकावर या हिशोबाने मी एक फांदी तोडुन आणली व फोटो काढलेच.
या दिवसात काटेसावर पण फुलते पण त्याची फुले खूप मोठी, लांब लांब व गुलाबी असतात.
कॅमेरा नेता आला नाही म्हणुन हळहळ व्यक्त करत मी परत आलो पण पुढच्या आठवड्यात कॅमेरा घेऊन नक्की जायचेच असे ठरवून गेलो तर हाय रे दैवा. पूर्ण झाडावर एकही फुल नाही व थोडी पाने दिसली. हताश व्हायच्या आतच मला आणखी काही झाडे दिसली.
झाडाखाली असा खचाखच सडा पडला होता.
बाजुलाच एक सागाचे झाड असल्याने त्याच्या पानांवर ही फुले भलतीच खुलुन दिसत होती. पळसाची पाने पण बघता आली. साधारण सागाप्रमाणेच पळसाची पाने असतात. पूर्ण पळसाला तिनच पाने असतात की काय असा माझा गैरसमज होता. प्रत्यक्षात एका देठाला ३ पाने असतात.
पळसाचा रंग इतका गर्द असतो की याच्या फुलांपासुन रंग बनवला जातो. अनेक ठिकाणी होळीला याचा नैसर्गीक रंग बनवताना वापर होतो. तसेच याची फुले काही औषधांमधेही वापरली जातात त्यामुळे बाहेरच्या देशात खास औषधांकरता या वृक्षाची लागवड केली जाते.
व्वा ! सहीच
व्वा ! सहीच फोटो
-----------------------------------------
सह्हीच !
मित्रा,
मित्रा, सगळेच फोटो ए वन आहेत !!
पहीला आणि शेवटचा ....क्लास !
केप्या
केप्या मस्त फोटो आणि मस्त माहिती..
-------
स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले
मस्तच फोटो
मस्तच फोटो
फोटो
फोटो छानच!
पण हे वल्द काय प्रकरण आहे??
_________________________
-Impossible is often untried.
सुरेख!
सुरेख! फेब्-मार्च पळसाचा फुलण्याचा काळ. आम्ही लहानपणी बादलीत पाणी भरून पळसाची फुले त्यात टाकायचो आणि 'रंग' बनवायचो... त्याची आठवण झाली.
वा
वा सुन्दर,
आमच्या शाळेच्या पटांगणात पळसचं झाड होत त्याच्या फुलांना आम्हि कोम्बडा म्हणायचो.
प्रत्यक्शातहि खुप छान दिसतात हि फुलं.(एस पी च ग्राउंड महित असेलहि लोकाना, तिथे होति हि झाडे)
शेवटचा
शेवटचा फोटो छान आहे.
वा वा...
वा वा... केपी काका.. सध्या फोटोग्राफीचा मौसम आहे वाटतं..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
चकदमए
चकदमए चस्तम
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||
खरच खुप
खरच खुप छान.:)
मलाही
मलाही शेवटचा फोटो आवडला... मस्त फोटो आणि मस्त माहिती.
फोटो बघुन
फोटो बघुन लहानपणिच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हि लहान असताना पळसाची फुले जमवायचो आणि वहित ठेवायचो. सुकलेली लालभड्क फुले एकदम सुंदर दिसायची.
फोटो पाहिले अन बोटांना फुलांचा हळुवार स्पर्श जाणवला.
Roops..........
" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."
मस्त फोटोज
मस्त फोटोज आणि माहिती सुद्धा छान
पळसाची तिन पाने अशी असतात ते माहित नव्ह्तं.
केपी दोन तिन ठिकाणी सारखी काटेसावरीची आठ्वण काढून दिलीस..फुललेल्या त्या गुलाबी टप्पोर्या फुलांचेही फोटो मिळाले तर टाक ना..
रेश्मी कापूस उडताना मस्तच दिसतात ही झाडं.
फोटो
फोटो माहिती दोन्ही छान .
मस्त फोटो
मस्त फोटो आहेत. फुलांचा सडा खूप सही दिसत आहे. पळसाचे झाड इतके सुंदर असते हे मला माहितच नव्हते. पण यामध्ये पळसाचे पान कोणते? लाल रंगाची सगळी फुले आहेत ना ?
.................................................................
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.....केव्हा तरी पहाटे !
काही
काही दिवसांपूर्वी सिंहगड पायथ्याशी एका कामानिमीत्त गेलो असता >> केप्या, रेव पार्टीला गेला होतास का रे??
फोटो आणी माहिती एकदम झकास... फोटो बघुन पुर्वी सिंहगड पायथ्याशी बसुन चहा पित बस यायची वाट बघायचो ते दिवस आठवले..
यामध्ये
यामध्ये पळसाचे पान कोणते? लाल रंगाची सगळी फुले आहेत ना ?>>>
केशरी आहेत.
तराणा, ४ थ्या फोटोत दिसत आहेत पळसाची पाने. साधारण सागाच्या पानासारखीच असतात. BTW फुले लाल नाहीयेत
डॅफो, या विकांताला शोधतो आता काटेसावर. जिकडे तिकडे फुलली आहे.
कापुस उडायला वेळ आहे हं.
बाकी लोक्स धन्यवाद.
ashwini_k चरख
ashwini_k चरख चलापणम चटोफो चवडलेआ. चमच्याआ चकडेइ चगलातजं चळसप चरेचब चहेतआ
केपी..
केपी.. फोटोतील फुले खुपच मोहक !! मस्तच फोटु आहेत.. एकदम केशरीमय.. माहितीबद्दल धन्यवाद
मला तर
मला तर बाबा सगळेच फोटो आवडले
जे.डी. भुसारे
व्वा!
व्वा! सुंदर फोटो..!
"तळपत्या उन्हात पळस कसा अंगोपांगी फुलतोय!
सुर्याचे रंग घेउन कसं जगायचं हे तर नाही ना सांगतोय?"
झकास सस्ने
झकास
सस्नेह
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
सही
सही चित्रे. मलाही कल्पना नव्हती, पळसाचे झाड इतके सुंदर असते ते!
माहितीही छान.
--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?
कोनता Camera ?
कोनता Camera ?
वाह! सही रे
वाह! सही रे !!
परागकण
पहिला आणि
पहिला आणि शेवटचा फोटो सही आलेत! जोरात आहे कॅमेराव!
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
केपी, मस्त
केपी, मस्त आलेत फोटो
शेवटचा
शेवटचा फोटो खूप आवडला.
धन्यवाद
धन्यवाद लोक्स.
मला माहीत होते पहीला व शेवटचा फोटो सगळ्यांना आवडेल. पण मग झाड कसे बहरलेले असते कळलेच नसते.
कोनता Camera ?>>>
मोरपंखीस, NIkon D40X.
~~~~~~~~~~~~
हे बघा. http://www.maayboli.com/node/6108
~~~~~~~~~~~~
Pages