२ वाट्या सोलून धागा काढून धुतलेली कोलम्बी
१ मोठा चमचा हळद
१ मोठा चमचा तिखट (आवडीनुसार)
२ मोठा चमचे लसूण पेस्ट
मीठ चवीनुसार
१ मोठा चमचा तेल
५-६ पाक्ळ्या लसूण
३-४ चमचे सुके खोबरे भाजून आणि वाटून
२ कान्दे बारीक चिरून
१. कोलम्बीला हळद, तिखट, लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवा. थोडावेळ मॅरिनेट केले तरी चालेल
२. तेल गरम करून त्यात लसूण ठेचून टाका आणि १ मिनीट परता
३. आता त्यात कोलम्बी घालून २-३ मिनीटे परता
४. चिरलेला कान्दा घाला आणि वाटीभर पाणि घालून उकळी आणा
५. वाटलेले सुके खोबरे घालून कोलम्बी शिजेपर्यन्त झाकून मन्द गॅसवर ठेवा.
६. कोलम्बीचे फोडणीचे तयार. गरम भाताबरोबर एकदम HIT
१. ह्याच पद्ध्तीने सरन्गा (पापलेट), सुरमई, रावस यान्चे फोडणीचे करता येते
२. ह्या कृतीत सुके खोबरे न घालता उकळी आल्यावर चिन्चेचा कोळ आणि ओल्या खोबर्याचे वाटण घातले की झाले कालवण तयार.
३. मॅरीनेट मधे कोथिम्बी पण खूप छान लागते.
मस्त. करून बघेन.
मस्त. करून बघेन.
गणेशोत्सवात अशा पाकृ टाकणे
गणेशोत्सवात अशा पाकृ टाकणे म्हणजे आमचा निव्वळ छळ आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही सुके खोबरे न घालता कोकम घालतो आणि ओले खोबरे, लसूण, थोडी कोथीम्बिर आणि हिरवी मिरची असे वाटण घालतो. (आठवणीनेच माझ्या तोंडाला पाणी सुटले)
>>गणेशोत्सवात अशा पाकृ टाकणे
>>गणेशोत्सवात अशा पाकृ टाकणे म्हणजे आमचा निव्वळ छळ आहे >>> अगदी अगदी
फोटो टाकणार असाल तर एवढ्यात टाकू नका प्लीजच.. अनंत चतुर्दशी झाल्यावर टाका ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आज गौरी विसर्जन आणि आमच्या
आज गौरी विसर्जन आणि आमच्या गौरीला फिश लागत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता मी सीकेपी मांसाहारी पाककृती देईन
मी खात नाही, तरीपण आवडले.
मी खात नाही, तरीपण आवडले.
आमच्या गौरीला फिश लागत <<< हा
आमच्या गौरीला फिश लागत <<< हा फंडा मला कधीच कळला नाही... पण तो एक वेगळा विषय आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी सांगु हा फंडा... गौरी
मी सांगु हा फंडा...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गौरी क्षत्रियाची मुलगी. पडली भोळ्या सांभाच्या प्रेमात. तो ब्राम्हण. वर्षभर गौरी मास मच्छी काही खात नाही. गणपतीत माहेरी येते तेव्हा तिला करुन घालतात
म्हणुन आमच्या गौरीला मासे आणि कोंबडी पण लागते
आम्ही पण अमिच्याच पद्धतीने
आम्ही पण अमिच्याच पद्धतीने करतो. तुमची रेसिपीही छानच आहे. सुक्या खोबर्याने एक खमंगपणा येतो नेहमी.
मी कांदापण परतते, कोलंबी
मी कांदापण परतते, कोलंबी घालायच्या आधी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या गौरीला मटण पण लागतं.
दीपा, हा धागा सार्वजनिक कर.