बाप्पांचे उंदीरमामा........

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2011 - 08:45

बाप्पांचे उंदीरमामा.....

बाप्पा आमचे लाडके येणार की उद्याला
उंदीरमामा गडबडीने लागले तयारीला

मामी म्हणे डिवचून "नको तुमचा तोरा
कसली आलीय् तयारी, आता बिळातच घोरा"

"नॅनो ते बेंझ केवढ्या त्या कार्स
कोण आता धरेल उंदरांचा हव्यास ?"

"बाप्पांचे भक्त किती तालेवार
बाप्पा कसले होतात तुमच्यावर स्वार ?"

मामा बसले बिळात रुसुन
बाप्पा थकले शोधून शोधून

मोदकाचे आमिष पुढे करुन
बाप्पा विचारतात समजूत काढून

गोजिरवाणे मामा बसले गाल फुगवून
"काही नको मोदक नी कौतुक वरुन"

"भारी भारी गाड्या आणल्यात म्हणे
आता कशाला माझे लोढणे?"

"अरे, कसल्या भारी गाड्या नी एअरकंडिशन
ट्रॅफिकजाम करतात नी वर पोलूशन"

"तू कसा छोटासा पळतो सुळकन
कुठे ना अडे ना लागे किमती इंधन"

"हिम्मतवान तूच ना पंक्चर होत कदा
गाड्या कसल्या राक्षस, पेट्रोल खाती सदा"

"दूरदृष्टि ठेउन शोधलंय कधीचे
तूच माझे वाहन युगायुगांचे"

"गेली आता नाराजी, बाहेर तरी ये रे
चल, आटप लवकर, वाट बघतात सारे"

उंदीरमामा चालती मिशा फेंदारून
मीच नेणार बाप्पांना सांगती आनंदून......
.....हुर्रेSSSS हुर्या.. गणपतीबाप्पा मोरया........

गुलमोहर: 

छान

मस्त. Happy

गोड Happy