Submitted by विस्मया on 5 July, 2011 - 11:23
केरळातल्या एका मंदिरात दडवलेल्या गुप खजिन्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या काही चर्चा आठवल्या. देशातील मंदिरे, चर्चेस अशा प्रार्थनास्थळांकडे असलेलं आणि वापराविना पडून राहणारं अतिरिक्त धन देशाच्या विकासासाठी वापरता येईल का ?
काळ्या पैशाचा प्रश्न ऐरणीवर आहे. कदाचित त्यात यशही येईल. त्याचबरोबर देशात बेकायदेशीर (हवाला ) मार्गाने येणारा पैसाही महत्वाचा आहे. हा पैसा जप्त होऊ शकतो.
भारतासारख्या गरीब देशात या अतिरिक्त प्रचंड संपत्तीचं नियोजन कसं व्हावं ? धन वापरासाठी, विकासासाठी ताब्यात घेऊन प्रार्थनास्थळांना माफक दराने व्याज देता येईल का ? सरकार किंवा एनजीओ यांच्यामार्फत किंवा लोकपाल प्रमाणेच अर्थमंत्रालयाशी संबंधित असं एखादं पद निर्माण करून या पैशाचा विनियोग व्हावा का ? काय वाटतं ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जमिनीत सापडलेल्या धनाविषयी
जमिनीत सापडलेल्या धनाविषयी कायदे आहेत. विशिष्ट मिटर खोलीपर्य्न्तचे धन मालकाचे असते. त्याच्यापेक्षा खालचे धन सरकारचे. जमिनीच्यावर भीम्तीत सापडलेल्या धनाबाबत माहित नाही.
पुरातन प्राएथना मंदिरांची ठेव
पुरातन प्राएथना मंदिरांची ठेव आणि त्यात गुंतलेल्या भावना वगळता ज्या व्यक्तींची संपत्ती त्यांच्या काळ्या संपत्ती मायदेशी परताव्या. एतकेच पाऊल तूर्त आवश्य प्रक्रिया सुरू करण्यास उपयोगी ठरतील. ऐतिहासिक किंवा धार्मिक भावना दुखविल्या जाऊ नयेत हे योग्य. पण दान देण्यावर सीमा नियंर्तण घातल्यास "पळवाट " रोखता एईल असं वाटत
या मूर्तीचे वजन ३२ किलो असून
या मूर्तीचे वजन ३२ किलो असून शुद्ध सोन्याची आहे. आता, जरी हे सोने सरकार जमा झाले, तरी प्रश्न हा येतो, की या कलाकृतीचे मूल्य सोन्याच्या किमतीत करावे काय? हे म्हणजे वेरूळची लेणी दगडाच्या भावात मोजणे असे होईल.
कलाकृती म्हणून मोजल्यास प्राचीन वस्तू + कला = अतीप्रचण्ड किंमत. पण राष्ट्रीय वारसा : विकता येत नाही.. तर या पैशाचा वापर करायचा कसा? तात्पर्यः हा पैसा वापरात येत नाही>>>>>>>> अनुमोदन
अरेच्च्या! मला वाटले हा
अरेच्च्या! मला वाटले हा प्रश्न ८ जुलैलाच निकालात निघाला.
त्यानंतर स्विस बँकेतील पैशाचा प्रश्नहि सुटला.
आता तर मला वाटते भ्रष्टाचाराचाहि प्रश्न सुटला.
नेहेमीप्रमाणे लोकांनी बोटे दुखेस्तवर बरेच काही काही लिहीले. काही चांगले, काही वाईट, पुढे त्याचे काय होते कळत नाही.
मायबोली - विचारांचे कृष्णविवर!
सगळे लोक कुठल्याहि विषयावर लिहायला मायबोलीवर प्रचंड आकर्षणाने ओढल्या जातात, नि त्यांचे बरे वाईट विचार या कृष्णविवरात जाउन पुनः कुणाला दिसत नाहीत.
@ झक्की मनन आणि विचारमंथन
@ झक्की
मनन आणि विचारमंथन स्वत:चे स्वतःशीच झाले तरी पुरे. कुठेतरी याचा चांगला उपयोग होतच असतो. अन अधूनमधून विरोधी विचार लिहिणार्यांना चिमट्या काढण्यात/ वितंडवाद घालण्यात ही मजाच असते.
अन अरेच्च्या! धाग्याचे शीर्षक बदलेले आहे. उगा हिंदू बंधू आवेशात येउन पोस्टी टाकाया लगले म्हणून ते पेपरातल्या सारखं 'प्रार्थनास्थळ' वगैरे.. असो असो. उगा धार्मिक भावना दुखावल्या जातील
माझेहि तस्सेच मत आहे.
माझेहि तस्सेच मत आहे. म्हणूनच मीहि लिहीत असतो. नाहीतर तसा माझा असल्या कुठल्याच गोष्टींशी संबंध नाही, माहिती नाही, इंटरेस्ट नाही. मला आल्झहायमर रोग येऊ नये म्हणून मेंदूला चालना देण्यासाठी इथे येऊन लिहीतो.
Pages