Submitted by नलिनी on 23 August, 2011 - 04:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
सफरचंद २
जिरे
मोहरी
हळद
मिठ
लाल तिखट
हिंग
तेल
क्रमवार पाककृती:
सफरचंद धुवून कोरडे करुन घ्यायचे.
एका भांड्यात चवीप्रमाणे (अंदाजे पाव चमचा) मिठ घ्यायचे. त्यात सफरचंदाच्या हव्या त्या आकाराच्या फोडी करुन टाकायच्या. भांडे हलवून घ्यायचे. सगळ्या फोडींना मिठ लागले की सफरचंदाचा रंग बदलत नाही.
त्यावर तेलात केलेली, जिरे, मिहरी, हळद, तिखट, हिंगाची फोडणी घालयची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
५ मि. खायला तयार.
अधिक टिपा:
आवडीप्रमाणे फोडणीचे साहित्य बदलू शकता.
सफरचंद कच्चे, आंबट असेल तर चांगलेच. नसेल तर नेहमीचे सफरचंद पण छान लागते.
फ्रिजमध्ये २-४ दिवस टिकायला हवे. माझ्याकडे एका दिवसातच संपते.
माहितीचा स्रोत:
आस्मादिक
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यासाठी हिरवी सफरचंदच लागतील
यासाठी हिरवी सफरचंदच लागतील ना ?
बाकी प्रकरण मस्तच दिसतेय
वर्षाचा प्रश्न माझाही. मस्त
वर्षाचा प्रश्न माझाही. मस्त आहे फोटो. तोंपासु!
यासाठी हिरवी सफरचंदच लागतील
यासाठी हिरवी सफरचंदच लागतील ना ?>>> असले तर उत्तमच. नसले तरी चालते.
नले, छान कृति. पण सव्वा दोन
नले, छान कृति.
पण सव्वा दोन माणसे, किती दिवसात संपवतात ते नाही लिहिलेस.
एका दिवसात संपवतो आम्ही ते
एका दिवसात संपवतो आम्ही ते
नलिनी छान पाकृ मला लाल
नलिनी छान पाकृ मला लाल सफरचंदाचे करावे लागेल.
जागू पण फिरवी सफर्चंदे जास्त
जागू पण फिरवी सफर्चंदे जास्त आंबट असतात त्यामुळे त्यांचच छान लागेल बहुतेक
तसही आप्ल्या कडची लाल सफरचंद बरेचदा रवाळ निघतात
छान ..... आंबट नसेल तर, थोडे
छान ..... आंबट नसेल तर, थोडे लिंबु पिळलेले चालेल बहुदा
व्वा नलिनी . इथे खूप
व्वा नलिनी . इथे खूप सफरचंदं दिसताहेत फ्रिजात . करूनच बघते आता!
व्वा नलिनी . इथे खूप
व्वा नलिनी . इथे खूप सफरचंदं दिसताहेत फ्रिजात . करूनच बघते आता!
हं आणि एक म्हणजे जर घरात
हं आणि एक म्हणजे जर घरात मेथीची पूड असेल तर तीही चिमूटभर फोडणीतच घालायला हरकत नाही.
खमंग लागेल.
नलिनी, हे लोणच आत्ताच केल!
नलिनी, हे लोणच आत्ताच केल! granny smith apple वापरून. अतिशय जबरा रेसिपी. मस्त टेस्ट आली आहे. मी फक्त एक टेबलस्पून किसलेला गूळ घातला. बाकी मानुषीची टीप पण अमलात आणाली.
लोणचं दिसतंयपण मस्त . फार
लोणचं दिसतंयपण मस्त :).
फार पूर्वी एका गुजराथी काकूंकडे खाल्लं होतं. त्यांनी गूळ जरा अंमळ सढळ हस्ते वापरला होता. फोडणीत मेथ्या आणि हिंग जरा जास्त होतं. मस्त आंबट, गोड, किंचीत कडू अशी मस्त चव आली होती.
मस्त लागतं हे लोणचं. मी ह्यात
मस्त लागतं हे लोणचं. मी ह्यात तिखटाऐवजी केप्रचा लोणचे मसाला घालते. फोटो झकास आहे
चांगली वाटतेय, फॉर अ चेंज
चांगली वाटतेय, फॉर अ चेंज करून बघायला हरकत नाहीये.
मिनोतीची पण अशीच रेसिपी इथे आहे.
थोडे लिंबु पिळलेले चालेल
थोडे लिंबु पिळलेले चालेल बहुदा>>> आरती, नक्कीच चालेल.
घरात मेथीची पूड असेल तर तीही चिमूटभर फोडणीतच घालायला हरकत नाही.>> मानुषी, ज्यांना मेथी आवडते त्यांच्यासाठी नक्कीच चालेल. मीपण घालून पहाणार.
एक टेबलस्पून किसलेला गूळ घातला. >>> कल्पू, ज्यांना गूळ आवडतोय त्यांच्यासाठी नक्की चालेल.
सफरचंद जर गोड असेल तर मग गुळाची गरज नाही भासणार.
आडो, लिंकसाठी धन्यवाद.
छान फोटो. मी नेहमीचं कैरीचं
छान फोटो. मी नेहमीचं कैरीचं लोणचं करतो त्याच पद्धतीने( केप्र /बेडेकर) लोणचं मसाला घालून करते. फक्त कैरीच्या फोडींऐवजी हिरव्या सफरचंदाच्या फोडी.
कैरीची तहान हिरव्या सफरचंदांवर
मस्त रेसिपी. आज करून पाहिली.
मस्त रेसिपी. आज करून पाहिली. लिंबाच्या रसाऐवजी मी बुंदीच्या पाकिटासोबत येतो तो आंबटगोड मसाला घातला होता थोडासा भुरभुरून. (चाट मसालाही चालेल बहुतेक!) पुरेसा होता तेवढाच. छान चव आहे ह्या लोणच्याची. तिखटाचा व सफरचंदाच्या गोडीचा एकत्रित स्वाद छान वाटतो.
तोंपासु........स्लर्र्प!
तोंपासु........स्लर्र्प!
मस्त आहे. करून बघणार
मस्त आहे. करून बघणार