"आईच्या गावात","माझी सटकली" तुम्हाला कळल असेल ना मी सिंघम बद्दल बोलते आहे ते मस्त वाटल ना चित्रपट बघून
छान वाटल तो गुंड मार खाताना बघून...अन्याय वर न्यायाचा विजय बघून३ तास छान गेले ना... मस्त सगळ छान ३ तासात सगळे खुश
का हो मनात विचार आला का? कोणीतरी सिंघम पाहिजे आपल्यला मध्ये???
जर आला असेल तर तुम्ही नक्कीच साधारण माणूस aahat COMMON मन,ज्याला शिवाजी जन्माला यावा अस वाटत पण शेजारच्या घरात
माझ्या घरात नको ती ब्याद .... असे आपण सगळे मुर्दाड माणस आहोत लाज वाटायला पाहिजे आपल्याला..
तिथे तो आपला बाप उपोषणं बसतो आणि आपण घरात रगडतो आहे..
एक दिवस ८ ते ९ वाजता Light बंद ठेवायला सांगितली ती पण नको ठेवायला ....Serial चा episode जाईल ना...
अरे आपल्याला काहीतरी लाज वाटायला पाहिजे काहीच नाही करत pakage वाढल नाही म्हणून रडतो ,महागाई वाढली कि शिव्या देतो,त्रागा करतो, बायको वर चिडचिड,नवऱ्याशी भांडण,सासू सासऱ्याचा अपमान बस अश्या मूर्खसारख्या गोष्टी करतो.Frustation,मनोविकार असले रोग बाळगून घेतो.
हे करण्या पेक्षा या अण्णाना support करा.आपण खारीचा वाट तरी उचलुया. At least एका दिवसाचा तरी उपास करा..जेवढी मदत करता येईल तेवढी करा.
साधे नियमापासून सुरवात करा
१) रस्ता हा Zebra Crossing वरूनच ओलांडा
२) प्लास्टिक ची कुठलेही वस्तू फेकायची असेल तर कचरा पेटीत टाका
३) सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान टाळा
४) कचरा मोकळ्या जागेत टाकताना विचार करा
५) रहदारीचे नियम पालन करा
६) आपले सरकारी काम करताना कोणी लाच मागत असेल तर त्याचा Photo किवा Video Clip काढा.
नुसती फालतू, शिव्या, बडबड, चीडचीड करण्या पेक्षा शक्ती चांगल्या ठिकाणी लावा.
मी स्वत: वरचे नियम पाळण्याचा प्रयन्त करते, मनाला खूप छान वाटत.
चला मिळून हे राष्ट्र बनवूया.
"गलत क्या है ये पता होने से फायदा नहीं,अगर गलत को सही कर दो तो कोई बात है "
सिंघम नक्कीच येईल.. एक नायक जरूर मिळेल
आणि कोणी नाही आल तरी आपण आहोतच...
छान विचार आहेत
छान विचार आहेत तुमचे!:)
<<प्लास्टिक ची कुठलेही वस्तू फेकायची असेल तर कचरा पेटीत टाका>>प्लास्टिकचाच नाही तर सर्व प्रकारचा कचरा,कचरा पेटीतच टाकला पाहीजे,आणी ते मी करतेच.
हर्षदा खुपच छान !!! तुझ बरोबर
हर्षदा खुपच छान !!!
तुझ बरोबर आहे ...
तुम्ही हे वरती फक्त
तुम्ही हे वरती फक्त लिहीलयं,की तुम्ही स्वताही ते नियम पाळता,कारण माझ्या मते आपण स्वता: जर हे नियम पाळत असु,तरच आपल्याला दुसर्याला सांगण्याचा अधिकार आहे.:)
साधे नियमापासून सुरवात करा >>
साधे नियमापासून सुरवात करा
>> हे आपण करावे आणि मूलांना शिकवावे, नविन पिढी आपोआपच बर्यापैकी सुधारित वर्तनाची ठरेल
छोटी तै उत्साहाच्या भरात
छोटी तै
उत्साहाच्या भरात तुम्ही तावातावाने नियम पाळायला सांगितलेत खरे..
पण इथे मायबोलीवर लिहिताना.. लिखाण शुद्ध असावे हा साधा नियम तुम्हाला पाळता आला नाही याबाबत खेद वाटतो..
बाकी अण्णा प्रेम वेग्रे चालू द्या
अहो दोन लेख झाले आहेत ते
अहो दोन लेख झाले आहेत ते अॅडमिनला सांगून एक करून घ्या. म्हणजे सारे प्रतिसाद एकाच ठिकाणी येतील.
हर्षदा परब <<मी स्वत: वरचे
हर्षदा परब <<मी स्वत: वरचे नियम पाळण्याचा प्रयन्त करते, मनाला खूप छान वाटत.>> ह्याचा अर्थ मी नियम पाळते.
बागेश्री तुम्ही बोललात ते खरे आहे.
चांगभलं पहिल्यांदाच लिहायचा प्रयत्न केला आहे .
पुढच्या वेळी लिहिताना नक्की काळजी घेईन.
सूचन दिल्याबद्दल धन्यवाद...
महेश <> त्यांना कस सांगायचं
अगदि बरोबर्...मी पण नेहमी
अगदि बरोबर्...मी पण नेहमी असाच वागण्याचा प्रयत्न केलाय .आमच्या गावात सरकारी दवाखान्यात गेले की ते doctor नेहमी १० रु. मागायचे आणि मी नेहमी त्यांना बाहेरचा board दाखवायचे " येथे सर्व उपचार मोफत मिळतील" तेव्हा मी ४थी -५वीत असेल. आजपर्यंत मी एकही सरकारी काम पैसे देउन केले नाही...पैसे मागितले की प्रश्न विचारुन त्यांना भंडाउन सोडणे..
खरच माझी सटकते ओ...
मी पण वरचे नियम पाळते...feels great
<रस्त्यावर थुंकु नका>हा एक
<रस्त्यावर थुंकु नका>हा एक नियम वर अॅड केलात तर आवडेल.:)
अहो असे भरपुर नियम आहेत जे
अहो असे भरपुर नियम आहेत जे आपन पाळले तर क्रांती होउ शकते..जी होत नाही आहे
>>>>उत्साहाच्या भरात तुम्ही
>>>>उत्साहाच्या भरात तुम्ही तावातावाने नियम पाळायला सांगितलेत खरे..
पण इथे मायबोलीवर लिहिताना.. लिखाण शुद्ध असावे हा साधा नियम तुम्हाला पाळता आला नाही याबाबत खेद वाटतो..<<<<
चांगभलं, अतिउत्साहाच्या भरात तुम्ही स्वतः तावातावाने एखाद्या माणसाच्या भावना, त्या मागची कळकळ जाणून न घेता शुद्धलेखनाच्या नियमाचा अस्थानी उल्लेख करुन समोरच्या माणसाच्या भावनांचा, विचारांचा आदर करावयाच्या नियमाचा भंग करीत आहात असे वाटत नाही का?
>>>हे करण्या पेक्षा या अण्णाना support करा.आपण खारीचा वाट तरी उचलुया. At least एका दिवसाचा तरी उपास करा..जेवढी मदत करता येईल तेवढी करा.<<<<
छोटी, अण्णांबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांनी आतापर्यंत समाजासाठी ज्या ज्या लढाया, आंदोलने केली आहेत त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थाचा लवलेशही नव्हता हे खरे आहे. पण तरीही At least एका दिवसाचा तरी उपास करा हे काही पटले नाही.......
आताच्या त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाबाबतही आवश्यक तो आदर बाळगून मला त्यांच्या सद्याच्या आंदोलनाबाबत काही गोष्टी खटकत आहेत, ज्या माझ्यासारख्या असंख्य सर्वसामान्य लोकांच्या मनातील भावना आहेत. अण्णा, अण्णा टीम, अण्णांचे उपोषण, लोकपाल, जनलोकपाल, सरकार, संसद, विरुद्ध पक्ष, स्थायी समिती, कोण बरोबर कोण चूक ......इत्यादि विषयांवर जळी, स्थळी, काष्ठी ......सगळीकडे अविरत चर्चा झडतायत. आपलीच बाजु कशी बरोबर आहे यावर तावातावाने वाद घालतायत. मोठमोठे, अवजड शब्द माझ्यासारख्या जड बुद्धी लोकांच्या डोक्यावरून जातायत. आमचेही मत आम्हांला मांडायचे आहे...... पण सामाजिक घडामोडींबाबत सखोल अभ्यास आणि भरपूर ज्ञान असणार्या विद्वत्तापूर्ण विवेचन कर॑णार्या समोरच्या प्रतिभावंत, बुद्धीवंत लोकांएवढी बुध्दीमत्ता आणि प्रतिभा आमच्यासारख्यांकडे नसल्यामुळे आम्ही आपले फक्त वाचकाची किंवा श्रोत्याची भूमिका बजावत आहोत.
माबोकर बंधू, भगिनींनो, एक सर्वसामान्य नागरीक या नात्याने माझ्या अल्पबुद्धीला एक प्रश्न पडला आहे, कोणी मला समजावून सांगेल का? ......... फक्त चर्चा आणि चर्चा ही अण्णांना अभिप्रेत असलेली भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलना करीताची मदत आहे का? रामलीला मैदानात हजर राहिलेल्या / असणार्या, मेणबत्ती मोर्चात सहभागी झालेल्या, काळ्या फिती लावणार्या किती टक्के लोकांनी घरीदारी, हाऊसिंग सोसायटीत, नोकरीत, धंद्यात (व्यवसायात), जिथे जिथे शक्य असेल तिथे चिरीमिरी घेतली नाही? लाच खाल्ली नाही? भ्रष्टाचार केला नाही? नियमबाह्य वर्तन केले नाही?....... राजेश खन्नाच्या रोटी पिक्चरच्या गाण्यामधिल ' जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो, वह पहला पत्थर मारे' च्या धर्तीवर ज्याने आयुष्यात भाकरी देणार्या नोकरीत, पोटापाण्याच्या व्यवसायात शंभरदा भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा केला असेल, नोकरीतल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल, गरजू लोकांची पैशाकरीता अडवणूक केली असेल, दैनंदिन टेबलवर्ककरीता मिळणार्या नियमित वेतनाव्यतिरिक्त वरकढ कमाई केली असेल, नियमांची पायमल्ली केली असेल असे लोक भ्रष्टाचार विरोधात नारेबाजी कशी करु शकतात? अशांना काय नैतिक अधिकार आहे हे असले चाळे करायचा? चीड येते ह्या ढोंगबाजीची......
छोटी, आत्मस्तुतीचा धोका पत्करुन मला सांगावेसे वाटते आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की, मी सरकारी कार्यालयात तीस वर्षे काम केले ते माझ्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन.....अवती भवती भ्रष्टाचाराच्या चिखलाने लडबडलेली माणसे, अनेक प्रलोभने असतानाही मी कायम माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला! मी करीत असलेल्या नोकरीमुळे मला भाकरी मिळत होती. माझ्या कामासाठी मला सरकार मोबदला देत होतं. कार्यालयातील माझे दैनंदिन कामकाज प्रामाणिकपणे करणे माझे नैतिक कर्तव्य होते. माझे काम माझ्यासाठी पवित्र कार्य होतं. मग अशा या कामाकरीता वेतनाव्यतिरिक्त हरामाचा पैसा का घ्यायचा?? माझ्या या विचारसरणीची सतत खिल्ली उडवली गेली. टिंगल केली गेली. मला अनेक टोपण नावेही ठेवली गेली. अनेक प्रकरणात नाहक गोवण्याचाही प्रयत्न झाला. एव्हढेच नव्हे तर एक दोन प्रकरणात माझी रितसर इन्क्वायरीही झाली. पण मी मात्र शेवटपर्यंत 'त्यांच्या दृष्टीने' बावळट, मूर्खच राहिले. असो....
अरे, बापरे! मूळ लेखापेक्षा माझा प्रतिसाद आणि स्वतःबद्दलचंच पुराण मोठं झालंय. क्षमस्व! पण मंडळी नोकरीत तर हवेच पण इतर ठिकाणीही आपण प्रत्येकाने मग तो सामान्य माणुस असो, राजकारणी असो, गरीब असो श्रीमंत असो, शिक्षित असो, सुशिक्षित असो, मालक असो, नोकर असो, घरी असो दारी असो .....जर आपण आपली कर्तव्ये प्रामणिकपणे पार पाडली तर ती खरी मदत होईल अण्णांच्या आंदोलनाला आणि भ्रष्टाचार निर्मूलनाला, असे आपल्याला वाटत नाही का?
वनराई तुम्हाला जसं लोकांनी
वनराई तुम्हाला जसं लोकांनी नाव ठेवली,तशीच मलाही ठेवतात,आता मी रस्त्यावर कचरा टाकत नाही,तर मलाही "कचरा गोळा करणारी,स्वच्छतेची पुजारी,वेडी अशी बरीच नावं ठेवतात आणी तेही माझ्याचं घरातले.:(
मेन मुद्दा काय आहे,की कोणीतरी चाकोरी बाहेर काहीतरी करायला लागलं(मग भले ते कितीही चांगलं असलं तरी त्याला नावं ठेवायची बर्याच लोकांची पद्धत असते,त्याला आपण काहीही करु शकत नाही,हेच सत्य आहे.)
लिखाण शुद्ध असावे हा साधा
लिखाण शुद्ध असावे हा साधा नियम तुम्हाला पाळता आला नाही याबाबत खेद वाटतो.. >>> चांगंभल मायबोलीवर शुद्धच लिहावे असा नियम नाही. कृपया उगाच नियम लादू नका.
ब्वर्र्र्र
ब्वर्र्र्र
<ब्वर्र्र्र> चांगभल,तुमचं जरा
<ब्वर्र्र्र>
चांगभल,तुमचं जरा अतीचं झालं,पण मला आवडलं.:P
वनराई नमस्कार तुम्ही लिहिलेले
वनराई
नमस्कार
तुम्ही लिहिलेले प्रतिसाद तुमचं खरंच कौतुक करायलाच हवं.
आणि माझा लेख लिहिण्या मगच उद्देश समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
<<<हे करण्यापेक्षा या, अण्णाना support करा.आपण खारीचा वाट तरी उचलुया.
At least एका दिवसाचा तरी उपास करा..जेवढी मदत करता येईल तेवढी करा>>>>
हे लिहिण्यामागे उद्देश हा आहे कि "काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करा" आणि तुम्ही खरंच खूप काही करत आहात
असच करत राहा ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल.
udayone
तुम्ही बरोबर बोललात
हर्षदा परब
नियम खूप खूप खूप चांगला आहे, जर सगळ्यानी पाळला तर किती छान होईल.
शोनु-कुकु
खूप छान
केदार
धन्यवाद
वाह ! तुमचे विचार चांगले आहेत
वाह ! तुमचे विचार चांगले आहेत !

चीडही रास्त आहे !
आपण स्वतः अनेक नियम न पाळता, व्यवस्थेला दोष देणारे आजुबाजुला खुप दिसतात