Submitted by विभाग्रज on 21 August, 2011 - 21:40
...........गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी
आत्याबाईना फुटल्या मिशा आणि फुटली दाढी
गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी...........
दाढी मिश्या लागता वाढू ते पाहण्या आले कडू
रागे भरली आत्या पाठी घेऊन लागली झाडू,
पाठी घेऊन लागली झाडू......................
.............................गम्मत जम्माडी....!
वाढत्या दाढी मिश्या पाहण्या झाली पोरे गोळा
दाढी ओढती मिशी ओढती हळूच मारिती डोळा
हळूच मारिती डोळा..........................
............................गम्मत जम्माडी.....!!
दाढी मिश्या काढण्या ईलाज करिती डॉ.पकलू
दाढी गेली मिशीही गेली आत्या झाली टकलू
आत्या झाली टकलू...........................
गम्मत जम्माडी हो हो जम्मत गम्माडी........!!!
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
विभा दा, तुमचा हाता ची रेंज
विभा दा, तुमचा हाता ची रेंज ज्ब्बरदस्त आहे बर का.
धन्यवाद मुटे
धन्यवाद मुटे साहेब.
धन्यवाद्,अनुज.