वर्षा_म, ह्यांनी केलेल्या कवितेला मी इथे प्रकाशित करतो आहे. त्यांनी माझ्या एका कच्च्या प्रयत्नास खूप सुंदर आधार दिला आणिक ही कविता खूपच सुंदर झाली आहे. तेन्व्हा जुनी कविता काढून ही कविता इथे देत आहे. वर्षां जीं ची पहिलेच क्षमा मागतो कि त्यांच्या पुर्व अनुमती शिवाय हे करत आहे, बरोबरच त्यांचे मना पासून आभार प्रकट करतो. त्या बालकविता सुद्धा इतुक्या सहजतेने लिहू शकता, हे कौतुकास्पदच.
------------------
एक होते बारीक मुषक
हवे त्याला दुध पोषक
पातेल्यात होते डोकावत
दुध होते त्यांना खुणावत
एकदा बुदकन पातेल्यात पडले
तोल कसा गेला हे न कळले
खोल पातेल्यात आली गरारी
हिमतीने मात्र घेतली भरारी
अविरत हलवले चारी पाय
दुधावरची हलली साय
बघता बघता सायीचे लोणी बनले
घट्ट होउन अंगाला चिकटले
एकवटून जोर मारली उडी
टुनकन उडाली लोण्याची वडी
बाहेर पडता केला नाच
वाह रे आमचे मुषकराज!
बालक होउन वाचली ,नाही जमली
बालक होउन वाचली ,नाही जमली काका.
मला कवितेतली गोष्ट आवडली. मी
मला कवितेतली गोष्ट आवडली. मी थोडी फेरफार केली. आगाउपणा वाटल्यास सांगा मी काढते
एक होते बारीक मुषक
हवे त्याला दुध पोषक
पातेल्यात होते डोकावत
दुध होते त्यांना खुणावत
एकदा बुदकन पातेल्यात पडले
तोल कसा गेला हे न कळले
खोल पातेल्यात आली गरारी
हिमतीने मात्र घेतली भरारी
अविरत हलवले चारी पाय
दुधावरची हलली साय
बघता बघता सायीचे लोणी बनले
घट्ट होउन अंगाला चिकटले
एकवटून जोर मारली उडी
टुनकन उडाली लोण्याची वडी
बाहेर पडता केला नाच
वाह रे आमचे मुषकराज!
म्यांव. मुषकराज नावाची माझी
म्यांव. मुषकराज नावाची माझी आवडती रेसिपी वाचुन आले, तर गोडशी कविता वाचायला मिळाली.
निनावची concept चांगली होती, पण वर्षानी त्या कवितेचं मस्त बडबडगीत केलं. थँक्स गं. खुप गोडु झालं आता ते.
वर्षे मस्तच आहे, मला खूप
वर्षे मस्तच आहे, मला खूप आवडलं गं/
वर्षे
वर्षे
छान आहे ! निनाव कविता वर्षीचा
छान आहे ! निनाव कविता
वर्षीचा मूषक फारच छान जमला दाद द्यायलाच हवी
ही बेडकाची गोष्ट आहे ना!फक्त
ही बेडकाची गोष्ट आहे ना!फक्त बेडकाच्या जागी तुम्ही उंदीर लावलाय.:P
वर्षा, निशब्द!! कायापलट. वादच
वर्षा,
निशब्द!! कायापलट. वादच नाही. तुम्ही सर्व तर उत्तम कवि/यित्री आहातच.
मी शाळेत असतांना (उत्तर भारतात) ही गोष्ट सांगितलेली आठविली. म्हणून लिहिण्याचा प्रयत्न केला.
बेडुक असो वा उंदिर - मात्र संदर्भ एकच आहे - 'प्रयत्न अविरत हवेत'.
सर्वांनी कवितेत रस घेतला - त्याबद्दल मनःपासून आभार!
वर्षा, एक नम्र विनंती, ही तुमची कविता तुम्ही स्वतंत्र प्रकाशित कराच.. कारण तुमची इतकि छान कविता अजून वाचली गेली पाहिजे आणिक पुर्ण श्रेय तुम्हाला मिळाले पाहिजे.
आ. निनाव.
निनाव काका आवडली बर
निनाव काका आवडली बर का.वर्षाजी मस्त.
निनावजी धन्यवाद
निनावजी धन्यवाद