Submitted by छाया देसाई on 11 August, 2011 - 03:41
ते नभीचे शून्य मोठा आस नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता
हे रसायन जीवना फेसाळलेले
चषक हे आयुष्य प्यासी प्यास नुसता
गुंतलेल्या ,चहुदिशानी बांधलेल्या
आत्मरामा का तुला वनवास नुसता
भोगती कोणी इथे उपभोगतीही
भावनांचा रम्यसा हो रास नुसता
जगत जावे जो अलिप्तासारखे तो
लेपचंदन हो सुगंधी श्वास नुसता
प्रकटते मिटते स्वये ,''आस्तित्व''छाया
देह ना ती ,पण असे आभास नुसता
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हे रसायन जीवना फेसाळलेले चषक
हे रसायन जीवना फेसाळलेले
चषक हे आयुष्य प्यासी प्यास नुसता..... व्वा !!
छान गझल.
मस्त. मक्ता विशेष.
मस्त. मक्ता विशेष.
हे रसायन, मक्ता छान जमलेत.
हे रसायन, मक्ता छान जमलेत.
छान आहे गझल
छान आहे गझल
मक्ता खूपच खोल!!! आवडली
मक्ता खूपच खोल!!! आवडली
मतला चांगला जमलाय.
मतला चांगला जमलाय.
छान
छान
आवडली.
आवडली.
मतला, रास, श्वास,आभास व्वा.
मतला, रास, श्वास,आभास
व्वा. फार सुंदर.
ते नभीचे शून्य मोठा आस
ते नभीचे शून्य मोठा आस नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता
बोहोत अच्छे