vidyan git

Submitted by गिरिधर मारोतराव... on 8 August, 2011 - 13:51

SCIENCE: Take it easy! Make it easy!!
विज्ञान गीत (SCIENCE SONG)
इंद्र्धनुचा चित्रकार !!
निळ्या निळ्या पटावर सप्तरंगी छटा !!
सांगा पप्पा !चित्रकार असेल किती मोठा ?!?
नाही बाळ,इंद्र्धनुचा चित्रकार मोठा !
तुझ्याहूनही लहानसा तो कितीतरी छोटा !
बागेत फवार्‍याचे जसे उडती थेंब(droplets) पिटूकले !
तसेच इंद्र्धनुचे चित्रकार चिटूकले !
सरळ सरळ सांगा ना ,हरलो म्हणून साफ !
लहान समजून, मारताय ना, काहितरी थाप ?!?!
नाही बाळा थाप, ही किमया सुर्यकिरण-विकरणाची(dispersion)
अन सात रंग(spectrum) वेगळाले करणार्‍या थेंब -लोलकांची(prism)
लोलका(prism)सारखे वागती जेव्हा पिटूकले थेंबं
विकरणांनी (dispersion)तेव्हा अलग होई सात रंगं
थेंबातूनी अपवर्तनांनी(refraction) सुर्य किरने अशी वाकतात जणू
म्हणूनच वर्षा ऋतूतच आकाशी दिसतोय इंद्र्धनू !!
---By---गिरीधर मा्रोतराव गोंधळी
म. वि. प. विज्ञान विहार१९९६ प्रकाशित.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy