Submitted by आरती on 23 February, 2009 - 04:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी बटाटा किस, १/२ वाटी किसलेले खोबरे, १/२ वाटी दाण्याचा कुट, २ टे.स्पुन खसखस, थोडी जायफळपूड (चविला), २ टे. स्पुन साजुक तुप, १ वाटी बारिक केलेला गुळ.
क्रमवार पाककृती:
बटाटा किस तुपात तळुन घ्या, खसखस भाजुन घ्या.
किसलेले खोबरे, दाण्याचा कुट, भाजलेली खसखस, तळलेला किस सगळे एकत्र मिक्सर मधे बारीक करुन घ्या. त्यात जायफळ पुड घाला.
गुळामधे २ चमचे पाणी घालुन मंद गॅसवर पाक करा. वरील मिश्रण पाकात घाला व चांगले मिक्स करा.
हाताला तुप लावुन लाडू वळा.
मस्त खमंग लागतात, महाशिवरात्री निमीत्त आजच करा
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आणि
मस्त आणि वेगळा पदार्थ आहे
नक्की करणार
-----------------------------------
शेवटी साथ नशीबाचीच!
अरे वा,
अरे वा, मस्तच लागत असतील! हे नक्की करुन पाहीन.
मिक्सरमधून काढण्याआधी बटाट्याचा कीस थंड व्हायला हवा ना?
छान सोप्पे
छान सोप्पे लाडु आहेत. मी आले की करशीलच. मला करुन बघायला हरकत नाही पण बटाट्याचा कीस संपला आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आयटे, आता कधी करशील ? संपली शिवरात्र![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शिवरात्र
शिवरात्र कशाला हवीय लाडू करायला?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बर मग
बर मग एकादशीला कर![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शनिवारीच
शनिवारीच करणारे. एकादशी कधी?
बटाटा किस>>
बटाटा किस>> किस कि खिस असतो![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
एकदा मी
एकदा मी आणलेला बटाट्याचा तयार चिवडा मऊ पडला. मग तो ओव्हनमधे भाजून मिक्सरमधून काढला. पण त्याला तूप सुटले, त्यातच पिठीसाखर घालुन लाडु केले.
हि कृति म्हणजे अगदी निगुतिने केलेला प्रकार आहे. चव नक्कीच मस्त असणार.
दोन्ही पण
दोन्ही पण नाही, कीस असतो.
बटाट्याचा
बटाट्याचा कीस थंड व्हायला हवा ना? >>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा घाणा काढे पर्यंत पहिला थंड होतोच. फार वेळ नाही लागत
बटाट्याचा कीस संपला आहे >> अजुन अबरेच शिल्लक आहेत, पाठवु का ?
आरती, "अबरे"
आरती, "अबरे" नवीन शब्द मला.
बाकि अबरे पाठवण्यापेक्षा वाळवणातली कृतिच पाठव त्या मूलीला. !!!
आपला आपणच केला तर कीस फार गोड लागतो.
माहेरुन
माहेरुन आला असेल तर खूपच गोड लागतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माहेरुन
माहेरुन आला असेल तर खूपच गोड लागतो >> दिनेश आता पाठवा तुम्हीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वीट
स्वीट पोटॅटो चा पाठवीन. तो तसाही गोड लागेल.
गोव्याला रताळ्याच्या शेवया मिळतात. त्या तळून वरुन पिठीसाखर घालून खातात. त्या पाठवूया.
दिनेश आणि
दिनेश आणि आरती
तुमचं अबरे वरून जे काही चाललंय त्यावरून एक गंमत आठवली .
आम्ही सगळे जेवत होतो. माझा मुलगा बोलता बोलता टेबलावरच्या एका पदार्थाकडे हात दाखवून म्हणाला , "मॉम...मेरकू वो दो " सहज हिंदीत बोलला. तर माझी पुतणी त्या वेळी ३/४ वर्षाची असेल. ती अगदी ओठ वगैरे पुढे काढून अगदी रुसलेल्या स्वरात मला म्हणाली, " काकू मलाही मेरकू दे ना गं .....तू फक्त दादालाच मेरकू देतेस ना? जा बाई....!"
बाकी आरती लाडू बेस्ट!
माधुरी ...
माधुरी ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)