Submitted by webmaster on 28 July, 2011 - 14:12
बी एम एम २०११ शिकागो : प्रदर्शन Expo कसं वाटलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी एम एम २०११ शिकागो : प्रदर्शन Expo कसं वाटलं?
प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात
प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात आधीच्या अधिवेशनांशी होणे अगदी साहजिक आहे. शिकागोला आलेले प्रदर्शक मात्र या अधिवेशनावर नाराज दिसले. त्यांची तक्रार फारसे कुणी स्टॉलवर फिरकत नव्हते.
मुळात येणारी लोकसंख्या असते ४००० च्या आसपास. त्यातले अर्धे समजा फिरकले तर तो आकडा होतो २००० च्या आसपास. त्यातले विकत किती घेणार? थोडक्यात Foot Traffic हा प्रदर्शकांसाठी खूप महत्वाचा ठरतो.
अधिवेशनाला न येता फक्त प्रदर्शनाला येणे फुकट ठेवले तर ४ हजाराच्या पेक्षा किती तरी जास्त लोक स्टॉलला भेटी देऊ शकतील. जेवणाच्या हॉलमधे जाणे येणे नंतर प्रदर्शनामधून केले होते ते पहिल्या दिवसापासून करायला हवे होते.
मला प्रदर्शनात खरोखर इंटरेस्ट
मला प्रदर्शनात खरोखर इंटरेस्ट नसतो पुस्तके आणि सीडींव्यतिरिक्त. असे बरेच असतील ना? दागिने/कपडे वगैरेमधे अजिबात इंटरेस्ट नसणारे? तसेच हाऊसिंग स्किम्सवाले देखील तिथे होते त्यात किती लोकांना इंटरेस्ट असेल?
पुस्तकांचे, सीडीजचे स्टॉल मोठे हवे होते.
अगदी बरोबर अजय. मला पण असचं
अगदी बरोबर अजय. मला पण असचं वाटतं कि स्टॉल्स आणी प्रदर्शन सगळ्यान करिता मोफत आणी खुलं ठेवावं (म्हण्जे तसं करता येइल कि नाही हे माहीती नाही ) . त्यामुळे अमेरिकन लोकांना भारतीय गोष्टी विकत घ्यायची/ बघायची संधी मिळेल. आपल्या लोकांना पण जर कार्यक्रमाला यायला वेळ नसेल तर निदान पुस्तके वगेरे जाऊन घेता येतील. कारण विकणारे लोकं ते सगळं परत कसे काय घेऊन जाणार?
Foot traffic प्रदर्शकांसाठी
Foot traffic प्रदर्शकांसाठी खरंच महत्त्वाचा आहे. पण बृममंच्या खर्चानंतर किती जणांच्या बजेटमधे आणखी खरेदी परवडते? बर्याचश्या वस्तूंच्या किमती चढ्या होत्या. विक्रेता आणि ग्राहक दोघंही आपल्याला काय परवडते ते बघणारच. बेडेकरांनी सांगितले की त्यांचा कंटेनरभरून माल वेळेवर सोडवता आला नाही, त्यामुळे आणलेले मसाले, लोणची, बेसन लाडू मिक्स अधिवेशनानंतर पटेल व अन्य दुकानात मिळेल.
सर्व स्टॉलना सारखाच दर (१६००
सर्व स्टॉलना सारखाच दर (१६०० डॉलर्स) असल्याने अनेक चांगले उद्योजक येऊ शकत नाहीत. काय विकणार यावर दर ठरवा असे अनेक वेळा सांगून त्याकडे दुर्लक्ष होते.
प्रत्येक मंडळाला एक स्टॉल मोफत द्या आणि त्यांना हवा तसा त्याचा उपयोग करु द्या. त्यांची स्पर्धा ठेवा आणि बक्षिसे द्या अशी सूचना केली होती त्याकडेपण दुर्लक्ष झाले.