Submitted by webmaster on 28 July, 2011 - 00:15
बी एम एम २०११ : भोजन व्यवस्था कशी वाटली?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी एम एम २०११ : भोजन व्यवस्था कशी वाटली?
भोजन छान होतं अस परदेसाई नी
भोजन छान होतं अस परदेसाई नी बी एम एम च्या बा.फ. वर लिहिलय.
पण चार हजार लोकांची ब्रेकफास्ट, लंच आणी डिनर ची व्यवस्था तीन दिवस करायची आणी ते सुध्दा मराठी पदार्थ, हे खरचं अवघड काम आहे. कोणी केटर केलं होत? एकाच ठिकाणा हून मागवलं होतं का वेगवेगळे स्टॉल होते?
वडा पाव, भाकरी पिठलं, थालीपीठ, पुरणाची पोळी असे पदार्थ होते का?
सगळ्यांना एकत्र बसून जेवायची सोय होती का?
खायला चांगल असलं आणी सगळे जण तृप्त असले कि मग बाकी गोष्टींवर टीका जरा कमी होते.
काही मेन्यु - न्ह्याहरी -
काही मेन्यु -
न्ह्याहरी - साबुदाणा खिचडी, कांदेपोहे, मेथी ठेपले-छुंदा. चहा, कॉफी, केळी, संत्री, सफरचंद, वेगवेगळ्या फळांचे रस, सिरिअल्स, बेगल्स, ब्रेड-जॅम
जेवण -
पुरी, फुलके/पोळ्या, वरण-भात, काकडीची कोशींबीर, श्रीखंड, कोथींबीर वडी, ढोकळा, पुरणपोळ्या, साटोर्या, सँडविच ढोकळा, भजी, कढी - खिचडी, कोबीची पचडी, काजुची उसळ, भरले वांगे, उंधीयो, लोणचे, सिताफळ आईसक्रीम, फालुदा, पाणीपुरी, पावभाजी, पापडी चाट, आमरस
बरेच काय काय विसरले आहे असे वाटतेय.
जेवणाची सोय अप्रतीम होती. जेवण कमी पडले नाही. सगळ्यांना पुरुन उरेल येवढी जागा होती बसायला. टेबल लावलेल्या भागांना सिंहगड, प्रतापगड वगैरे नावे दिलेली होती. त्यामुळे आपला ग्रुप नक्की कुठे बसला आहे हे नीट कळत होते. मायबोलीची गटग पन्हाळगडाच्या पायथ्याशी झाली.
जेवण छान होतं ब-याचदा
जेवण छान होतं ब-याचदा प्लेटस गायब असायच्या.... जेवण बघत उभं रहाव लागे ......
@झंप्या, मग पुढ्च्या वेळेस
फार महत्वाचं म्हणजे, लोक १०
फार महत्वाचं म्हणजे, लोक १० मैलावर हॉटेलात उतरलेत तेव्हा त्यांना सकाळची न्याहारी तिथे घ्यावी लागणार हे जाणून सकाळीत Marriot मधे पोहे, खिचडी, पराठे बृमम (किंवा त्यांच्या खाद्यकमिटीने) पोचवायची जबाबदारी घेतली. म्हणजे सकाळीच उठून फक्त न्याहारीसाठी मॅकॉर्मिकला जायला नको.
हे खरोखरच असामान्य होतं.
काही ठिकाणी ८:३० नंतर न्याहारी संपली, पण तरी ती खूप लोकांना त्यांच्या हाटेलात मिळाली हे विशेष...:)
अरे वा हॉटेलमध्ये न्याहारी
अरे वा हॉटेलमध्ये न्याहारी मिळाली का, हे खरच चांगले होते.
मागच्या बी एम एम ला हे नव्हते.
अरे वा हॉटेलमध्ये न्याहारी
अरे वा हॉटेलमध्ये न्याहारी मिळाली का, हे खरच चांगले होते.
मागच्या बी एम एम ला हे नव्हते.>> लगेच पेपरात बातमी देऊन टाक
कोणी केटर केलं होत? एकाच
कोणी केटर केलं होत? एकाच ठिकाणा हून मागवलं होतं का वेगवेगळे स्टॉल होते? >> निराली भोजन राजभोगचे होते.
<<<हे जाणून सकाळीत Marriot
<<<हे जाणून सकाळीत Marriot मधे पोहे, खिचडी, पराठे बृमम (किंवा त्यांच्या खाद्यकमिटीने) पोचवायची जबाबदारी घेतली. म्हणजे सकाळीच उठून फक्त न्याहारीसाठी मॅकॉर्मिकला जायला नको<<<खरचं कौतुकास्पद.
ज्या कोणी ही आयडीया काढली आणी ती अमलात पण आणली त्यांना शाबासकी,:)
हे जाणून सकाळीत Marriot मधे
हे जाणून सकाळीत Marriot मधे पोहे, खिचडी, पराठे बृमम (किंवा त्यांच्या खाद्यकमिटीने) पोचवायची जबाबदारी घेतली. म्हणजे सकाळीच उठून फक्त न्याहारीसाठी मॅकॉर्मिकला जायला नको>>>> खरंच कौतुक!
>> लगेच पेपरात बातमी देऊन
>> लगेच पेपरात बातमी देऊन टाक

हे सर्व वाचून खरंच फार कौतुक वाटलं संयोजकांचं.
अरे वा! खरंच कौतुकास्पद.
अरे वा! खरंच कौतुकास्पद. असाम्या लक्षात ठेव.
फिलीला मी पटापट आवरुन आधी ब्रेकफास्ट्साठी पळायचे.
लगेच पेपरात बातमी देऊन टाक
लगेच पेपरात बातमी देऊन टाक >>> बोस्टनला येतच आहोत आम्ही. तेव्हा बघूच

अतिशय कौतुकास्पद!
अतिशय कौतुकास्पद!
बोस्टनला येतच आहोत आम्ही.
बोस्टनला येतच आहोत आम्ही. तेव्हा बघूच>>हि धमकी आहे का ?
खरंच कौतुकास्पद !
वेळ कसा वाचवायचा ह्यावर जुलै
वेळ कसा वाचवायचा ह्यावर जुलै २००९ मध्ये कधीतरी एका मिटिंगमध्ये ही आयडीया कोणी एकाने काढली पण पाठपुरावा नंदिनी विश्वासराव आणि विवेक मोडकांनी केला. फुड कमिटीच्या हेड होत्या नंदिनी विश्वासराव. त्यांच काम अवघड कारण लोक जेवण चांगले नसले की नावं ठेवतात हा सर्व साधारण अनुभव आहे.
असाम्या बोस्टनला मला
असाम्या बोस्टनला मला नाष्ट्याला कांदाभजी हवीत
यंदा संयोजकांनी भोजन व्यवस्था/ आयोजन सही केलेली दिसतेय. अभिनंदन.
असाम्या बोस्टनला मला
असाम्या बोस्टनला मला नाष्ट्याला कांदाभजी हवीत >> मी 'airlines वाले आजकल जसे आत जाताना कार्ड स्वाइप करून हवे ते पॅक घ्या करतात तशी सिस्टिम ठेवायची शिफारस करणार आहे' EC कडे
jokes apart, केदारला अनुमोदन. जेवण चांगले नसेल तर हमखास नावे ठेवली जातात.
जेवण चांगले नसेल तर हमखास
जेवण चांगले नसेल तर हमखास नावे ठेवली जातात. >>>> हे म्हणजे क्रिकेट बाफवरच्या "If they don't do, what they have to do, then they will loose" टाईपच वाटयत..
जेवण चांगलं नसेल तर नावं ठेवली जाणारच की.. मुद्दाम emphasize का केलय ते मला कळल नाही...
एकंदरीत बीएमएम खूप छान झालं असं दिसतय.. खरतर ह्यावर्षी शिकागोला होतं त्यामुळे यायची खूप इच्छा होती. सुट्टी घेता येणं जमणार नाही हे लक्षात आल्यावर डेली पासेस आहेत का ते चेक केलं पण तेव्हा डेली पासेस नव्हते. नंतर ते उपलब्ध केले गेले आहेत असं अजय आणि केदार कडून कळलं. पण तो पर्यंत फ्लाईटची तिकिटं खूपच महाग झालेली होती. त्यामुळे नाहीच जमलं.
असामी, मला त्यामागचे logistics माहित नाहीत पण तुम्ही डेली पासेस देणार असाल तर ते आधीपासूनच जाहिर करा.
रच्याकने, अटलांटाला बीएमएम झालं होतं तेव्हा काढलेला बाफं आहे का? मला तिथल्या प्रतिक्रिया वाचायची खूप म्हणजे खूपच उत्सुकता आहे..
पण संमेलन कसे वाटले ला १००+
पण संमेलन कसे वाटले ला १००+ आणि भोजनाबद्दल १६ प्रतिक्रिया म्हणजे संमेलनाचे यशच नाही का? नाहीतर मराठी माणूस म्हणजे "कसे झाले लग्न?" ला "श्रीखंड काही खास नव्हते" असे उत्तर असते
मुद्दाम emphasize का केलय ते
मुद्दाम emphasize का केलय ते मला कळल नाही >>. बिएमएम जाऊदे काही वर्षे मराठी मंडळात काम कर म्हणजे असे प्रश्न अजिबात पडणार नाहीत. मग असाम्या काय म्हणतो त्याला अनुमोदन देशील.
भोजनाबद्दल १६ प्रतिक्रिया म्हणजे संमेलनाचे यशच नाही का >>. बघ फारएन्डने कसे योग्य मांडले.
आणि हे जेवणाच्या चवीबद्दल नसतं. जेवण चांगले असले आणि १५-२० मिनिट रांगेत थांबावे लागले तर गहजब होतो. इथे आपल्यासारखे ३००० लोक जेवत आहेत हे कोणी लक्षात घेत नसतं.
वण चांगलं नसेल तर नावं ठेवली
वण चांगलं नसेल तर नावं ठेवली जाणारच की.. मुद्दाम emphasize का केलय ते मला कळल नाही... >>>असं नाही पराग. माझा मराठी मंडळात कामाचा अनुभव म्हणजे कितीही चांगला कार्यक्रम आणलात, कितीही चांगले आयोजन केलेत तरी जेवण चांगले नसेल तर जनता वैतागते. पण हेच जर उलट असेल म्हणजे जेवण चांगले पण कार्यक्रम सो सो तर त्यांची काही तक्रार नसते. 'जेवण चांगलं होतो हो' असंच सांगतात.
वरती मिनोती यांनी दिलेल्या
वरती मिनोती यांनी दिलेल्या लिस्ट मध्ये काही नॉन व्हेज पदार्थ टाकत आहे- कोलंबी बिर्याणी, कोल्हापुरी चिकन आणि खीमा. सगळं जेवण अगदी चविष्ट होतं, अगदी शेवटच्या दिवसाचा व्हेजी बर्गर पण छान होता. फक्त banquet चं जेवण अगदीच बेकार होतं. बहुदा Hyatt Regency वाल्यांनी बनवलं असणार.
मला त्यामागचे logistics माहित
मला त्यामागचे logistics माहित नाहीत पण तुम्ही डेली पासेस देणार असाल <<<< शक्यतो तिन्ही दिवसांचा पास आधी विकला जातो. सगळ्या सीट्स भरल्या नाहीत तरच एक दिवसीय पास विकातात.. सहाजिकच आहे ते.. जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढं आयोजन सोपं जातं.
पराग आहे असा बाफ्.देते शोधून
पराग आहे असा बाफ्.देते शोधून
माझा मराठी मंडळात कामाचा
माझा मराठी मंडळात कामाचा अनुभव म्हणजे कितीही चांगला कार्यक्रम आणलात, कितीही चांगले आयोजन केलेत तरी जेवण चांगले नसेल तर जनता वैतागते. पण हेच जर उलट असेल म्हणजे जेवण चांगले पण कार्यक्रम सो सो तर त्यांची काही तक्रार नसते. 'जेवण चांगलं होतो हो' असंच सांगतात. >>>> हां हे स्पष्ट आहे आता.. मी ते जेवण चांगलं नसलं तर (जेवणाला) नावे ठेवतात.. असं समजलो होतो..
सहाजिकच आहे ते.. जेवढे जास्त पैसे मिळतील तेवढं आयोजन सोपं जातं. >>> हो मान्य. म्हणूनच मला logistics माहित नाही हे स्पष्ट केलं आहे ना..
बिएमएम जाऊदे काही वर्षे मराठी मंडळात काम कर म्हणजे असे प्रश्न अजिबात पडणार नाहीत. मग असाम्या काय म्हणतो त्याला अनुमोदन देशील. >>>>>
अंजलीची पोस्ट वाच.. तिने लिहिलय माझ्या शंकेचं एग्जॅक्ट उत्तर...
अरे जे अंजलीने लिहिले तेच मी
अरे जे अंजलीने लिहिले तेच मी आणि असाम्यापण हेच म्हणत होतो. फक्त ते शब्द तसे नाहीत.
फक्त ते शब्द तसे नाहीत. >>>
फक्त ते शब्द तसे नाहीत. >>> म्हणूनच तर confusion झालं ना.. त्यावर तू जे उत्तर लिहिलसं (बिएमएम जाऊदे काही वर्षे मराठी मंडळात काम कर म्हणजे असे प्रश्न अजिबात पडणार नाहीत.) त्यावरूनही जे अंजली म्हणाली ते पोचलं नाही.. असो.
परतोनी पाहिलं नाही तर बॉस्टनला नक्की उपस्थित राहू..
पराग http://www.maayboli.com/
पराग
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/88030.html?1121257940
हे वाच. आधीच्या बी एम एम चे पण वृत्तांत आहेत.
यावेळी अजून एक आवडलं म्हणजे
यावेळी अजून एक आवडलं म्हणजे भोजनाचा हॉल. सगळी कडून Entry आणि भरपूर Food Stations असल्याने रांगा लागल्या नाहीत.
)
(परत फिलीशी तूलना: तिथल्या हॉलला एक दोन दारं आणि त्यावर पासतपासनीस वगैरे असल्याने मी बहुतेक वेळा ३० मिनीटं रांगेत उभा होतो. (रांगेत मागच्या पुढच्यांच्या ओळखी होतात, पण मला जेवणासाठी रांग असलेली आवडत नाही
अजून एक म्हणजे (बहुतेक) सगळ्यांनाच तिथेच जेवण घेणं Mandatory होतं. (फिलीला जेवण Optional होतं) बाहेर जवळपास काहीच नव्हतं म्हणुन असेल.. पण त्याचा फायदा असा की तुमच्याकडे जेवणाचा पास आहे की नाही हे तपासायची आणि त्यात वेळ घालवायची गरज नव्हती.
(बॉस्टनने पण हे केलं पाहीजे).
सूचना: जेष्ठ नागरिकाना मात्र जेवण वाढण्याची (Serve) व्यवस्था असावी. त्यांना एका हातात ताट आणि दुसर्या हाताने वाढून घेणं ही कसरत जमत नव्हती. शिकागोला भरपूर Food Stations असल्याने घोटाळे झाले नाहीत. पण होऊ शकतात.