१ वाटी बेसन, १ वाटी दही , जीरा, तिखट्,हळद्,मीठ, कोथीबीर , तेल
१ वाटी बेसन मध्ये हळद, मीठ, अर्धा चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, जिर ,थोड्स हीन्ग , घालुन चान्गल मीक्स् करावे मग वरुन २ ते २.५ चमचे तेल व २ ते ३ चमचे पाणी घालुन चागल मळुन कणके सारखा गोळा बनवावा. गोळा कडक होइल थोडा पण तसाच हवा (तिखट मसाला , गरम मसाला तुम्हाला गाठ्या किती तिखट पाहिजे त्या वर आहे )
मग थोद कणिक घेवुन पोळपाटा वर घेवुन त्याचि लाब सुरळि करावी ( मला नीट शब्द आठ्वत नाहि पण कापुस कसा घेवुन वाति वळतो तस ) पण जाड्सर आनि सुरी ने कापुन त्याचे लहान ( फरसाण मध्यल्या गाठया असतात ना ) तसे तुकडे करावे .
नतर एका कढई मध्ये हे तुकडे घेवुन ते तुकडे बुडतील त्या पेक्षा जास्त पाणी घेवुन ते गॅसवर उकडायला ठेवायचं १५ मिनिट तरि लागतात ..
तो पर्यत दहि घुसळुन घ्यावे... आनि ते उकडल्या वर गॅस मद करावि व हे दहि त्यात टाकावे , मीठ टाकावे(जारि त्यात थोड पाणी असल तरी चालेल ) हे मिश्रण फुटता कामा नये ते हलवत रहावे .
बाजुला छोट्या कढई मध्ये तेलामध्ये जिरा हिग , हळद , तिखट मसाला घालुन हि फोडणी वरिल मिश्रणा वर टाकावे वरुन भरपुर कोथीबीर पसरावि ..
गाठ्याची भाजी तयार
दहि आबट नसावे
वेगळी आहे रेसिपी, ट्राय
वेगळी आहे रेसिपी, ट्राय करेन...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान प्रकार आहे. राजस्थानी
छान प्रकार आहे. राजस्थानी गट्टे कि सब्जी सारखा आहे.
मलाही गट्टे की सब्जीचीच आठवण
मलाही गट्टे की सब्जीचीच आठवण आली. ती खुप छान लागते, ही पण लागत असणार.. करुन पाहायला पाहिजे
मस्त रेसिपी आहे. एक प्रश्न,
मस्त रेसिपी आहे.
एक प्रश्न, दहि आबट नसावे म्हणजे?
मला शेंगोळ्यांची आठवण झाली.
मला शेंगोळ्यांची आठवण झाली. छान प्रकार आहे.
@ बेफकिर जी ... दही गोड असावे
@ बेफकिर जी ... दही गोड असावे जुन दहि आबट होत .. मग टेस्ट बदलते
@ दिनेशदा, साधना .. हो हि तशीच आहे ...
चांगली रेसेपी. करून बघण्यात
चांगली रेसेपी.
करून बघण्यात येईल.
( आ वर अनुस्वार - आ नंतर डॉट देऊन n टाईप करा म्हणजे ते आंबट असे दिसेल :))
माझ्या आईने गुजराथी शेजारणी
माझ्या आईने गुजराथी शेजारणी कडून या भाजीचे धडे घेतले होते.... मस्त लागते भाजी.
@ इंद्रधनुष्यहो मला हि आवडते
@ इंद्रधनुष्यहो मला हि आवडते
@अनघा_मीरा : धन्यवाद , नविन च अनुभव आहे मराठी टायपिंग चा म्हणुन ....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/10684 गट्टे की सब्जी..
गट्टे करताना आधी लांब आकार शिजवतात, मग तुकडे करतात ..
जागोमोहनप्यारे : हि मला
जागोमोहनप्यारे : हि मला मैत्रीणी ने शिकवली आहे.. ति मारवाडी च आहे.. म्हणून मी अशी करते... आता तूम्ही दीलेल्या प्रमाणे पण करुन पाहिन... धन्यवाद