पाव किलो गव्हाचे पिठ
पाव किलो तांदळाचे पिठ
गुळ अंदाजे
ओल खोबर
वेलची पुड
जायफळ पुड
चिमुटभर मिठ
खायचा सोडा किंवा पापड खार अर्धा चमचा (ऑप्शनल)
तेल
रात्री गव्हाचे पिठ व तांदळाचे पिठ डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ भिजवुन ठेवावे. साकाळी त्यामध्ये गुळ (पाव किलोपेक्षा जास्तच लागेल. ढवळताना गुळाचा चांगला वास आला पाहीजे)वेलची पुड, जायफळ पुड व ओल खोबर, चिमुटभर मिठ स्पंजी होण्यासाठी हवा असल्यास खायचा सोडा किंवा पापड खार घालाव. हे मिश्रण एकजिव कराव.
आता पुर्वी हे भानवले करण्यासाठी काईल वापरायचे. ह्ल्ली काईल नामशेष झाल्याने आपण नॉनस्टीक तव्यात करु शकतो. हे मिश्रण नॉनस्टीक तव्यावर थोडस तेल लावुन डोश्याप्रमाणे पसरवायच. href="https://picasaweb.google.com/lh/photo/8XCKWYjGbslxZQ1YZ9gbFsMM2PFlhrYpf6...">
मग तव्यावर ताट ठेवुन चुर्रर... आवाज येई पर्यंत वाफवायचे भानवले. (ताटावर साचलेली वाफ तव्यात पडते तेंव्हा चर्ररर आवाज येतो. शिट्टी नाही देत ताट किंवा तवा :हाहा:) आता ताट काढुन १० एक सेकंद थांबायच म्हणजे वाफ जाउन भानवल्यांच्या कडा सुटतात व तो सहज पलटता येतो.
हा बघा पलटला.
पलटलल्यावर २-३ मिनीटे ठेउन त्याची चपाती प्रमाणे घडी घालुन भानवले ठेवावेत.
हे हे झाले तयार.
भानवले व चवळीची भाजी, भानवले व मटण तसेच चहा भानवले अगदी पारंपारीक टेस्टी टेस्टी कॉम्बीनेशन आहे.
गोड असुनही ते मटण व चवळी च्या भाजीबरोबर छान लागतात.
मी सोडा किंवा पापडखार न वापरता केले.
गव्हाचे पिठ थोडे जास्त घेतले तरी चालते.
हा पण आमच्याकडे श्रावणात
हा पण आमच्याकडे श्रावणात होणारा प्रकार. पण आणखी एका तिखट प्रकाराला पण भानोले म्हणतात. खास करुन कोबीचे करतात ते.
हे मी ऐकलय. पण दिनेशदा भानोले
हे मी ऐकलय. पण दिनेशदा भानोले की भानवले ? मी आमच्याकडे भानवले हाच उच्चार ऐकते.
हो दिनेशदा, आमच्याकडेही
हो दिनेशदा, आमच्याकडेही कोबीचे भानोळे बनवतात.
मस्तच! माझ्या आजोबांना आवडतात
मस्तच!
माझ्या आजोबांना आवडतात म्हणुन आई ज्वारीच्या पिठाचे धिरडे करायची. वर केल्याप्रमाणेच पण तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचे पिठ आणि गुळ त्यात न कालवता त्याचे धिरड्यासोबत खायला गुळवणी.
दिसायचे अगदी वरच्या भानोल्यांसारखेच.
जागु मस्तच .. माझा आवडता
जागु मस्तच .. माझा आवडता प्रकार..
गोड धिरडं म्हणतो आम्ही याला...
माझी काकू पोळ्या करून झाल्या की लावायच्या उरलेला पिठात गुळ चुरुन हा प्रकार करून द्यायची... तो साग्रसंगीत नसायचा.. पण मला फार प्रिय होता..
८/९ वर्षापुर्वी काकू गेली, आज पुन्हा या निमित्ताने तिची आठवण जागी झाली.
दक्षिणा नुसत्या गव्हाच्या
दक्षिणा नुसत्या गव्हाच्या पिठाचे वेगळे ग. आम्ही त्याला गोड घावन किंवा मालपुआ म्हणतो. ते लगेच करता येतात. वरचे पिठ रात्रि भिजवुन करायचे असतात.
नलिनी अजुन नविन प्रकार सांगितलास धन्स.
जागु, लई भारी ! गावाकडे
जागु,
लई भारी !
गावाकडे लहानपणी खुपवेळा खायला मिळालयं,जुने लोक करायचे, हे शरीरासाठी नक्कीच चांगल असणार म्हणून (?)
कन्नडमध्ये याला "दाशी"(दासी) म्हणतात
जागु, छान दिसतय,करुन बघायला
जागु,
छान दिसतय,करुन बघायला हरकत नाही पण गुळ घातल्यामुळे सुटेल का नाही जरा शंका वाटतेय गं. चिकट नाही का होत? (जसा गुळपोळी करताना गुळ चिकट्तो तव्याला , तसा. )
जागु खुपच सुदर.. मी नक्कि च
जागु खुपच सुदर.. मी नक्कि च करुन पाहिन.. मला मालपुआ पण कसा करतात सागाल?
मस्त दिसतोय हा प्रकार. ऐकलं
मस्त दिसतोय हा प्रकार. ऐकलं होतं. मटण्-भानवले खायला पुन्हा तुझ्याचकडे यावं लागेल हं.
अनिल धन्स. धनुडी अजिबात नाही
अनिल धन्स.
धनुडी अजिबात नाही चिकटत. नक्की करुन बघ.
दीपा मालपुआ अंड्याचाही करतात. मी साधा करते तो गव्हाच्या पिठ भिजवुन त्यात गुळ घालायचा. गुळ खुळण्यासाठी सोप्पा मार्ग मी मिस्करचा वापरते. सरळ पिठ मिक्सरमध्ये घालते गुळ थोडा चिरुन घेउत त्यात घालते, चिमुटभर मिठ घालते. मग गरजेप्रमाणे पाणी घालुन मिक्सर चालु करते. लगेच तयार मिश्रण. मग बाकि शिजवणे वरील प्रमाणे. झाकण नाही ठेवल तरी चालत.
धन्स जागु .....
धन्स जागु .....
छान वाटातोय प्रकार. मला सांग
छान वाटातोय प्रकार. मला सांग मुलाला सकाळी डब्यात दिला तर थंड चांगला लागेल का? आनी कोरडे काय देता येइल सोबत
अग चालेल ना थंड. कोरडे
अग चालेल ना थंड. कोरडे देण्यापेक्षा ओले दे. अग हा प्रकार तसा कोरडाच असतो. सॉसही चांगला लागेल.
जागु मस्तच दिसतायत भानवले
जागु मस्तच दिसतायत भानवले
माझी आई करायची असेच. पण त्याला आम्ही गोड घावनं म्हणतो. सोबत साजुक तूप आणि अंब्याचं ताज लोणचं
आमच्या आजोळी याला आयते असे
आमच्या आजोळी याला आयते असे म्हणतात. आज्जी खुपदा करायची...
जागु मिक्सरमध्ये पीठ तयार
जागु मिक्सरमध्ये पीठ तयार करण्याची आयडीया सॉलिड आहे एकदम...
तुझ्यासारख्या सुगरणीलाच सुचू शकते.
लाजो, मिनोती, दक्षिणा धन्स.
लाजो, मिनोती, दक्षिणा धन्स.
माझी आई पण करते हे गोड घिरडे.
माझी आई पण करते हे गोड घिरडे.
मस्त वाटतयं. . फक्त हे गोडा
मस्त वाटतयं. . फक्त हे गोडा ऐवजी तिखट असते तर बरे झाले असते. मी नक्की करून बघेन.
हे मालपुवा काय असते? त्याची सविस्तर पा. क्रु. येउ दे.
तराना वरच्या पोस्ट मध्ये
तराना वरच्या पोस्ट मध्ये टाकली आहे मालपुआची पाकृ.
अखी धन्स.
कोबीचे भानोले म्हणून जे काही
कोबीचे भानोले म्हणून जे काही असते ते वरच्या पेक्षा किती तरी वेगळे असते ना ? वरचे बर्यापैकी गोड्या धिरड्यांसारखे दिसतेय.
मी साधा करते तो गव्हाच्या पिठ
मी साधा करते तो गव्हाच्या पिठ भिजवुन त्यात गुळ घालायचा. गुळ खुळण्यासाठी सोप्पा मार्ग मी मिस्करचा वापरते. सरळ पिठ मिक्सरमध्ये घालते गुळ थोडा चिरुन घेउत त्यात घालते, चिमुटभर मिठ घालते. मग गरजेप्रमाणे पाणी घालुन मिक्सर चालु करते. लगेच तयार मिश्रण. मग बाकि शिजवणे वरील प्रमाणे. झाकण नाही ठेवल तरी चालत.>>>>>
मी रात्री गुळ पाण्यात घालुन ठेवला.. आणि गव्हाच्या पीठाबरोबरच थोडंसं डाळीचं पीठ घातलं.. बाकी तु सांगितल्याप्रमाणे केलंय... आई करायची बर्याचदा, आता मी करेन म्हणते धन्यवाद जागु
हो असामी कोबीचे भानवले बरेच
हो असामी कोबीचे भानवले बरेच वेगळे असते. या रविवारी करीन म्हणतोय !
दिनेशदा सोमवारी रेसिपी
दिनेशदा सोमवारी रेसिपी हवी.
चिमुरी मी कधी कधी पाण्यात उकळवुन पण घेते गुळ जास प्रमाणात हवा असेल तर. कारण मला गुळ खुळण हे प्रचंड जिकरीच काम वाटत.
लहान असताना आई हे भानवले करून
लहान असताना आई हे भानवले करून द्यायची व आम्ही ते चहामध्ये बुडवून खायचो. मस्त टेस्ट असते.
Aj bhanvle krayla ghetle pn
Aj bhanvle krayla ghetle pn hotc nahit Kay chukl asel
Plz help
Plz help
भारीच, फोटोत एकदम मस्त
भारीच, फोटोत एकदम मस्त दिसताहेत.
गुळ न घालताही करता येतील का? म्हणजे त्याने दोसे नीट होतील ना?
पिठाच प्रमाण बरोबर होत ना?
पिठाच प्रमाण बरोबर होत ना? तवा चांगला तापला होता ना?
Pages