वेगवेगळी फुले उमलली . . . या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशीच काहि सुंदर फुले आणि मराठी गाणी यांची सांगड घालुन अजुन काहि प्रचि सादर करत आहे.
याही भागात प्रत्येक फुलांची ओळख मराठी गीतातुन करून देणार आहे.
चला तर मग निसर्ग नावाच्या चित्रकाराने काढलेली काहि सुंदर चित्रे मराठी गाणी गुणगुणत पाहुया.
=================================================

प्रचि ०१
तुळस वंदावी वंदावी अवो माऊली,
संताची सावली तुळस वंदावी
तुळस लाविते ऐसे रोप, पळुनी जाती सर्व पाप
तुळसी घालीत ऐसे वटा, विघ्ने जाती बारा वाटा
तुका म्हणतो तुळसीचे छंद आणि गातो तिये पायी गोविंद
(स्वर: शाहिर साबळे)
=================================================
=================================================
प्रचि ०२
आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली
हसते मजला यमुनेचे जळ, कदंब हसतो गाली अवखळ
हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
आली आली सर ही ओली.....
(स्वर: आशा भोसले )
=================================================
=================================================
प्रचि ०३
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो
मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला नकळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो
चित्र काढतो.....
(स्वर: पं. हृदयनाथ मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि ०४
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू?
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि ०५
आज दिसे का चंद्र गुलाबी ?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नी माझी फुलली प्रीती
स्वप्नि तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्न देखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोती
(स्वर: आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे)
=================================================
=================================================
प्रचि ०६
गुलजार गुलछडी नटून मी खडीखडी
नाचते मी घडीघडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणीचुणी उडवी पदरा पदरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि ०७
फुलांचे फुल मी गुलाबाची लाली
मला पहाताच लाजे जास्वंदीची कळी
दवबिंदुचा आत माझा आरसे महाल
त्याला मजले सात
रत्नजडित भूमी
फुलांचे फुल मी......
(स्वर: लता मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि ०८
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी
(स्वर: पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
=================================================
=================================================
प्रचि ०९
चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे येते, सखया नेशील तेथे येते
चैत्रतरुंच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनी सूर गुंजता, तुझे गीत मी गाते
(स्वर: उषा मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि १०
चंद्राविना झुरावी जशी पौर्णिमा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ
झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी
विजनी वसंत येता आल्हाद कोकिळेसी
मधुमालती जशी गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ
(स्वर: पुष्पा पागधरे, सुधीर फडके)
=================================================
=================================================
प्रचि ११
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
(स्वर: मन्ना डे)
=================================================
=================================================
प्रचि १२
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधुनी भिजतो गं चंद्र साजिरा
पीस मयुरी अलगद हे या हृदयातुनी
पहिली प्रीती साद घालती या गाण्यातुनी
निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा
चांदण्यात झुलतो बाई गंध......
(स्वर: अनुराधा पौडवाल)
=================================================
=================================================
प्रचि १३
जाईजुईचा गंध मातीला
हिरव्या झाडांचा, छंद गीताला
पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला
(स्वर: जयश्री शिवराम)
=================================================
=================================================
प्रचि १४
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
गंधीत धुंदीत सायली चमेली लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा पिंपळ पसारा जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
(स्वर: मनिषा जोशी, कल्याणी पांडे)
=================================================
=================================================
प्रचि १५
म्हण भाबडी तू, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
जीवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासामाजी श्वास मिसळुनी
रुळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि १६
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
मन हे शेवंती देऊ भगवंती
पुनरपी संसृती येणे नाही
(स्वर: सुरेश वाडकर)
=================================================
=================================================
प्रचि १७
गssssss साजणी
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,
मान मुरडत, हिरव्या रानी
डाळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी
(स्वर: विष्णु वाघमारे)
=================================================
=================================================
प्रचि १८
शालू हिरवा पाचु नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा
चूलबोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जिव हा झाला
(स्वर: उषा मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि १९
शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी
काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी
(स्वर: सुमन कल्याणपूर)
=================================================
=================================================
प्रत्येक फोटोसोबत ते गाणे
प्रत्येक फोटोसोबत ते गाणे व्वा ..........मस्तच आहे
Pages