Submitted by कुमारी on 16 July, 2011 - 09:18
काळजात बांधते नवीन घर.
खोल खोल आतवर तुझी नजर.
योवनी बरीच तू थरारली ;
जाणत्या वयात थांबला कहर.
'त्या' फुलास आमुचा निरोप द्या;
दूर मी असून राखतो खबर.
रक्तपात..लूटमार.. रोजची;
एक दिवस संपणार हे शहर.
आस तू जिवंत राख नेहमी;
भेदतो तमास तांबडा प्रहर.
गुलमोहर:
शेअर करा
मायबोलीवर स्वागत आपले. तसेच
मायबोलीवर स्वागत आपले.
तसेच तरही उपक्रमातील सहभागाबद्दल धन्यवाद.
पहिले तीनही शेर आवडले. दुसर्या शेरात ''यौवनी'' असा बदल करणे आवश्यक.
पुलेशु.
रक्तपात..लूटमार.. रोजची; एक
रक्तपात..लूटमार.. रोजची;
एक दिवस संपणार हे शहर.>> छान!
धन्यवाद ! मला संगणकाची
धन्यवाद ! मला संगणकाची माहिती अल्प असल्यामुळे या चुका झाल्यात.
दोन ते तीन शब्द मला बदलावे लागले. मूळ गजलेत सांगीतल्याप्रमाणेच आहे.
निरंतर सुचना द्या. मला माझ्या चुका कळतील. मी चांगली गजल लिहण्याचा
प्रयत्न करीन.
रक्तपात..लूटमार.. रोजची; एक
रक्तपात..लूटमार.. रोजची;
एक दिवस संपणार हे शहर.
क्या बात..!!
रक्तपात..लूटमार.. रोजची; एक
रक्तपात..लूटमार.. रोजची;
एक दिवस संपणार हे शहर.>>>
छान!!
योवनी बरीच तू थरारली
योवनी बरीच तू थरारली ;
जाणत्या वयात थांबला कहर.
सानी मिसरा खरंच कहर!!!
ब्येष्ट!
बाकी ठीक!
आनंदयात्रीशी
आनंदयात्रीशी सहमत...
पु.ले.शु.
सुंदर
सुंदर