वेगवेगळी फुले उमलली . . . या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अशीच काहि सुंदर फुले आणि मराठी गाणी यांची सांगड घालुन अजुन काहि प्रचि सादर करत आहे.
याही भागात प्रत्येक फुलांची ओळख मराठी गीतातुन करून देणार आहे.
चला तर मग निसर्ग नावाच्या चित्रकाराने काढलेली काहि सुंदर चित्रे मराठी गाणी गुणगुणत पाहुया.
=================================================
=================================================
प्रचि ०१
तुळस वंदावी वंदावी अवो माऊली,
संताची सावली तुळस वंदावी
तुळस लाविते ऐसे रोप, पळुनी जाती सर्व पाप
तुळसी घालीत ऐसे वटा, विघ्ने जाती बारा वाटा
तुका म्हणतो तुळसीचे छंद आणि गातो तिये पायी गोविंद
(स्वर: शाहिर साबळे)
=================================================
=================================================
प्रचि ०२
आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली
हसते मजला यमुनेचे जळ, कदंब हसतो गाली अवखळ
हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात
आली आली सर ही ओली.....
(स्वर: आशा भोसले )
=================================================
=================================================
प्रचि ०३
मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो
मम स्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला नकळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो
चित्र काढतो.....
(स्वर: पं. हृदयनाथ मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि ०४
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू?
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि ०५
आज दिसे का चंद्र गुलाबी ?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नी माझी फुलली प्रीती
स्वप्नि तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्न देखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोती
(स्वर: आशा भोसले, पं. वसंतराव देशपांडे)
=================================================
=================================================
प्रचि ०६
गुलजार गुलछडी नटून मी खडीखडी
नाचते मी घडीघडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणीचुणी उडवी पदरा पदरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भंवरा
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि ०७
फुलांचे फुल मी गुलाबाची लाली
मला पहाताच लाजे जास्वंदीची कळी
दवबिंदुचा आत माझा आरसे महाल
त्याला मजले सात
रत्नजडित भूमी
फुलांचे फुल मी......
(स्वर: लता मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि ०८
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाउले
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी
(स्वर: पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
=================================================
=================================================
प्रचि ०९
चंपक गोरा कर कोमल हा, करात तुझिया देते
नेशील तेथे येते, सखया नेशील तेथे येते
चैत्रतरुंच्या छायेमधला गोड गारवा प्रेमे कवळू
फुलाफुलांच्या हृदयामधला मधुमासाचा सुगंध उधळू
पवनामधुनी सूर गुंजता, तुझे गीत मी गाते
(स्वर: उषा मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि १०
चंद्राविना झुरावी जशी पौर्णिमा निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ
झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी
विजनी वसंत येता आल्हाद कोकिळेसी
मधुमालती जशी गंधाविना निरर्थ
आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ
(स्वर: पुष्पा पागधरे, सुधीर फडके)
=================================================
=================================================
प्रचि ११
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
(स्वर: मन्ना डे)
=================================================
=================================================
प्रचि १२
चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा
गंधामधुनी भिजतो गं चंद्र साजिरा
पीस मयुरी अलगद हे या हृदयातुनी
पहिली प्रीती साद घालती या गाण्यातुनी
निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा
चांदण्यात झुलतो बाई गंध......
(स्वर: अनुराधा पौडवाल)
=================================================
=================================================
प्रचि १३
जाईजुईचा गंध मातीला
हिरव्या झाडांचा, छंद गीताला
पानांवरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला
(स्वर: जयश्री शिवराम)
=================================================
=================================================
प्रचि १४
पाचूच्या रानात झिम्मड पाऊस उनाड अल्लड वारा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
गंधीत धुंदीत सायली चमेली लाजरी लाजेची पोर
पळस पांगारा पिंपळ पसारा जीवाला लावतो घोर
घंटेचा निनाद घालुनिया साद सांगतो जा पोरी घरा
नारळी पोफळी शिरल्या आभाळी वाळूत चांदणचुरा
(स्वर: मनिषा जोशी, कल्याणी पांडे)
=================================================
=================================================
प्रचि १५
म्हण भाबडी तू, म्हण तू खुळी
म्हण रे सख्या तू मज आपुली
जीवास सदया तुझ्या लगटुनी
श्वासामाजी श्वास मिसळुनी
रुळत रहावा मानेवरुनी
मृदू रेशमी कर कर्दळी
(स्वर: आशा भोसले)
=================================================
=================================================
प्रचि १६
मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा
पुनरपी संसारा येणे नाही
मन हे शेवंती देऊ भगवंती
पुनरपी संसृती येणे नाही
(स्वर: सुरेश वाडकर)
=================================================
=================================================
प्रचि १७
गssssss साजणी
कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,
मान मुरडत, हिरव्या रानी
डाळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी
(स्वर: विष्णु वाघमारे)
=================================================
=================================================
प्रचि १८
शालू हिरवा पाचु नि मरवा वेणी तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा
गोर्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा
चूलबोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जिव हा झाला
(स्वर: उषा मंगेशकर)
=================================================
=================================================
प्रचि १९
शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी
काय बोलले नकळे
तू समजुन घे सगळे
लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी
(स्वर: सुमन कल्याणपूर)
=================================================
=================================================
तृप्त.... तृप्त्.....तृप्त !
तृप्त.... तृप्त्.....तृप्त !
रजनीगंधा, निशिगंध आणि गुलछडी
रजनीगंधा, निशिगंध आणि गुलछडी हि एकाच फुलाची तीन वेगवेगळी नावे आहेत.
प्रचि १८ हे फुल जरी नसले तरी या भागात त्याचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटला.
छान थीम! मधुमालती खास!
छान थीम! मधुमालती खास!
__/\__ मस्त जमलय कदंब
__/\__
मस्त जमलय कदंब पहिल्यांदा बघितला मी
एकदम मस्त. प्रचि आणि
एकदम मस्त. प्रचि आणि त्याबरोबरच्या ओळी....
अ प्र ति म... सगळीच गाणी आणि
अ प्र ति म... सगळीच गाणी आणि सगळेच प्रचि सुंदर!!!
तुझ्या थीम्सच्या आयडियाज मला खुप आवडतात... जियो!!!!
मस्त मस्त मस्त ....
मस्त मस्त मस्त ....
मानसीचा चित्रकार तो तुझे मी
मानसीचा चित्रकार तो
तुझे मी नंतर चित्र काढतो
अप्रतिम फोटो,
मानसीचा चित्रकार तो तुझे मी
मानसीचा चित्रकार तो
तुझे मी नंतर चित्र काढतो
अप्रतिम फोटो,
अनुभूति देणारी पोस्ट !
अनुभूति देणारी पोस्ट ! धन्यवाद.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
खुपच छान !!!!!!!!
खुपच छान !!!!!!!!
सुंदर.....
सुंदर.....:)
एक नंबर...
एक नंबर...
योग्या... एक नंबर.. फारच
योग्या... एक नंबर.. फारच भारी...
जिप्स्या जबरदस्त.. तुझी खैर
जिप्स्या जबरदस्त..
तुझी खैर नाहि आता.. ऑगस्ट मधे बघतो तुझ्याकडे..
सगळे फोटो सुंदर..
अ प्र ति म. खुप आवडले.
अ प्र ति म.
खुप आवडले.
फारच छान. मधुमालती तर
फारच छान. मधुमालती तर मारडाला!
पण जुई मला खुपच आवडली. कारण सांगणे न लगे.
केवळ अवर्णनिय!!!!
केवळ अवर्णनिय!!!!
मस्तच
मस्तच
मस्तच. अशा रिक्षा फिरवत
मस्तच. अशा रिक्षा फिरवत जा(च). नाहितर राहून जाते बघायचे. रच्याकने प्रचि ११ लिली आहेत. कमळाची पाकळी खाली रुंद असते.
संतुष्ट!
संतुष्ट!
योगेश, मस्तच फोटो, आणि
योगेश, मस्तच फोटो, आणि त्यांची गाणी. कस सुचतं रे तुला हे?
सगळेच खास.... विशेषतः १२
सगळेच खास....
विशेषतः १२ नंबरची ती मोगर्याची कळी....... कातिल यार
जिप्सी, नेहमीप्रमाणे एक से एक
जिप्सी,
नेहमीप्रमाणे एक से एक कारागिरी !
प्रचि.नं..३ मध्ये त्या फुलाजवळ "भुंग्या" देखील दिसला, पण तु त्याला गाण्यात घेतलं नाहीस ?
(No subject)
खासच !! डोळे तृप्त झाले
खासच !! डोळे तृप्त झाले
प्रतिसादाबदल धन्यवाद लोक्स
प्रतिसादाबदल धन्यवाद लोक्स
वैभव,
पण जुई मला खुपच आवडली. कारण सांगणे न लगे.>>>>मामी,
धन्यवाद मामी तो फोटो काढु दिल्याबद्द्ल
व्वा!!!!!!
व्वा!!!!!!
अप्रतिम! प्रत्यक्षाहून
अप्रतिम! प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर!
Pages