जन्मभर....(तरही गझल)

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 July, 2011 - 08:17

(मयबोलीवर पहिला प्रयत्न्....चु.भु.दे.घे.)

खोल खोल आतवर तुझी नजर
गुंतले जिच्यात मी निमीषभर

आर्जवे खट्याळ पाहण्यातली
बांधती अजाणता मनात घर

एकदाच ओठ हे दिले तुला
रोम रोम पसरले जहर जहर !

थोपवू नको विजेस वादळा
होय मी उभी जळेन फ़ारतर !

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर

राहते अखेर ओळखायचे
काढतो उणी-दुणीच जन्मभर

वाहतो तुझाच गंध ज्यामधे
सोडले अखेर ते तुझे शहर

-सुप्रिया.

गुलमोहर: 

थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर

राहिले अखेर ओळखायचे
काढता उणी-दुणीच जन्मभर

हे आवडले.
मस्त गझल.

''तरही'' तील सहभागाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

२,४,७ फार आवडले.

तिसर्‍या शेरातील 'हाय!' चपखल वाटला नाही.

पण एकंदरीत फारच छान गझल.

पुलेशु.

थोपवू नको विजेस वादळा
हाय! मी उभी जळेन फ़ारतर>>> हाय! हा शब्द सोडून शेर आवडला

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर>>> मस्तच!!

शुभेच्छा!!

.

नेमकाच प्रश्न टाळलास तू
बोललो जरी बरेच आजवर >>> सुरेख

गावभर बदल छान आहे सुप्रिया... तुम्ही तुमची गजल एडीट करू शकता