Submitted by मदत_समिती on 13 June, 2010 - 23:56
मायबोलीवरील आपले सदस्यत्व ३ महिने वापरले नसता [लॉग-इन केले नाहीतर] आपोआप बंद होते. त्या आधीच सदस्यत्व रद्द करायचे असल्यास मा. अॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.
मायबोलीवरील आपले सदस्यत्व ३ महिने वापरले नसता [लॉग-इन केले नाहीतर] आपोआप बंद होते. त्या आधीच सदस्यत्व रद्द करायचे असल्यास मा. अॅडमिन यांच्याशी संपर्क साधावा.
माझ्या नावाने लिहीलेले माझे
माझ्या नावाने लिहीलेले माझे सगळे लेख मीटवणे शक्य असल्यास कृपया मिटचून टाकावे अशी विनंती आहे.
विनायक.रानडे ते लेख
विनायक.रानडे
ते लेख तुम्ही स्वतःच लेखाच्या संपादन विभागात जाउन अप्रकाशित करू शकता. ते जमत नसल्यास कृपया प्रशासकांशी संपर्क साधावा. धन्यवाद !
माझे सदस्यत्व बंद करता येईल
माझे सदस्यत्व बंद करता येईल का ? मायबोली वर मी प्रशासकांना काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या काही मजकुराची साधी दखलही त्यांनी घेतलेली नाही .. तसंच सध्या सगळेच सदस्य काही ''क्लाउट्स्'' बनवून राहात असतात की काय असे वाटत .. मराठीमधील लेखनासाठी इंटरनेटवर मायबोली इतका सुंदर आणि साधा पर्याय नाही हे जरी खरं असलं तरीही ह्या बूर्झ्वागिरीमधे हे संकेतस्थळ मग्न होत आहे की काय असए वाटत असल्याने ''आता बास'' असेच मला वाटत आहे. माझे कवितांचे पहिले पुस्तक १२ जुलै ला प्रकाशित होत असून त्याच्या प्रकाशनासाठी माझी कवितेची ऊर्मी मनात जपली जाण्यासाठी माझा ब्लॉग आणि मायबोली ही दोन्हीही कारणे आहेत यात शंका नाही ... पण संकुचितपणाने आपली आपली माणसंच फक्त गणितात ठेवायची आणि बाकीची खिजगणातीतही नाही असा जोरोह्ग आपल्या सर्वच प्रसार माध्यमांनी अंगिकारला आहे त्यात मायबोलीही शिरताना पाहून जरा खंत वाटत आहे.
धन्यवाद !
वैद्य जाऊ नका. आपण मला लिंक्स
वैद्य जाऊ नका. आपण मला लिंक्स द्याल का ?
नमस्कार vaiddya, कविता
नमस्कार vaiddya, कविता संग्रहाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. ही माहिती आपण लेख काढून दिली असती तर जास्त मायबोलीकरांपर्यंत पोचली असती असे वाटते. [मायबोलीचे मुखपृष्ठ पाहिलेत तर आपल्याला उदाहरण दिसेल]. सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय सर्वस्वी आपला आहे. त्याबाबत आपण प्रशासकांना कळवलेत तर ते योग्य ती कार्यवाही करतील.
अनिल vaiddya यांचे साहित्य आपल्याला इथे सापडेल.
वैद्य, प्रशासकांशी तुमचं काय
वैद्य, प्रशासकांशी तुमचं काय कम्यूनिकेशन (किंवा मिसकम्यूनिकेशन) झालं मला माहीत नाही, पण तुम्ही त्याचा काही पाठपुरावा केलात का? आपले व्यक्तिगत व्याप सांभाळून मायबोलीची कामं करतात प्रशासक आणि मदत समितीसारखे स्वयंसेवक - कुठल्याही मोबदल्याशिवाय. 'आपली माणसं' वगैरे हिशोब त्यांनी किंवा कोणीही केले असते तर मायबोलीचा इतका विस्तार झाला नसता.
बाकी तुमच्या लिखाणालाही प्रतिसाद/अभिप्राय मिळालेले दिसत आहेत तुमच्या पाऊलखुणांत. कोणी मुद्दाम दुर्लक्ष वगैरे केल्यासारखं काही चित्र दिसलं नाही. सगळंच लेखन सगळ्यांनाच आवडेल असं नाही हे समजण्याइतके तुम्ही समंजस असाल असं लिखाणावरून वाटलं होतं.
जाणार तर जा, पण ही बाकी एकतर्फी मल्लिनाथी कशासाठी?
> मायबोलीवरील आपले सदस्यत्व ३
> मायबोलीवरील आपले सदस्यत्व ३ महिने वापरले नसता [लॉग-इन केले नाहीतर] आपोआप बंद होते.
तीन महिने हा कालावधी जरा कमी आहे असे नाही वाटत?
त्या सदस्यांना त्या आधी संपर्क केल्या जातो का?
>> तीन महिने हा कालावधी जरा
>> तीन महिने हा कालावधी जरा कमी आहे असे नाही वाटत?

मायबोलीचे ज्या प्रकारे व्यसन लागते ते पाहता तीन आठवडेही फार वाटतात मला!
(उगाच गंमत हं आशीष.)
खरच थँकलेस जॉब आहे...
खरच थँकलेस जॉब आहे...
मायबोलीचे ज्या प्रकारे व्यसन
मायबोलीचे ज्या प्रकारे व्यसन लागते ते पाहता तीन आठवडेही फार वाटतात मला!
व्यसन वगैरे नाहीये मला हं!
पण मी जर तीन दिवसात सुद्धा एकदा तरी मायबोलीवर काही तरी अचकट विचकट लिहिले नाही तर माझे हात गळून पडतील किंवा मी आंधळा होईन, अशी भीति वाटते मला.
माझे सदस्यत्व रद्द केले तरी मी चांदोबातल्या वेताळासारखा परत येऊन तुमच्या मानगुटीवर बसेन!! एकच उपाय आहे माझे सदस्यत्व रद्द करण्याचा - १५ दिवस सतत माझा अनुल्लेख, माझे नावहि लिहायचे नाही!
मग मी आपोआप स्वतःहून निघून जाईन.
मजकुराची साधी दखलही त्यांनी
मजकुराची साधी दखलही त्यांनी घेतलेली नाही ..
आश्चर्य आहे. मला तर खुद्द समीर यांनी चक्क घरी फोन करून तासभर माझे बोलणे ऐकून घेतले!!! नि माझ्या सगळ्या अडचणी दूर केल्या. शपथेवर सांगतो, मी त्यांना एकदाहि दारूच काय साधा चहाहि पाजला नाही.
झक्की, तुमच्या बाबतीत
झक्की, तुमच्या बाबतीत अॅडमिनचा अगदी नाईलाजच होत असावा. सांगून, बोलून उपयोग नाही हे इतक्या वर्षात त्यांना कळून चुकलंच असेल.
>> आश्चर्य आहे. मला तर खुद्द
>> आश्चर्य आहे. मला तर खुद्द समीर यांनी चक्क घरी फोन करून तासभर माझे बोलणे ऐकून घेतले!!! नि माझ्या सगळ्या अडचणी दूर केल्या. शपथेवर सांगतो, मी त्यांना एकदाहि दारूच काय साधा चहाहि पाजला नाही.
झक्की, तुम्ही बरीच वर्षं इथे (मायबोलीवर) आहात, अॅड्मिन (समीर/अजय) ना भेटला आहात म्हणून फोन झाला असेल पण मला वाटतंय तुम्ही हे इथे लिहू नका .. ह्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढतील .. आणि प्रत्येक जण अॅड्मिन नी मला फोन केला पाहिजे अशी अपेक्षा धरून बसेल जी अर्थातच योग्य नाही आणि झक्कींनां केला पण आम्हाला नाही (किंवा इथे कंपूबाजी चालते वगैरे) अशा प्रकारच्या गैरसमजांनां खतपाणी घातले जाईल ..
सशल, त्यांनी जे लिहिलंय ते
सशल, त्यांनी जे लिहिलंय ते खरंय असं वाटतंय?
बाकी अपेक्षा, खतपाणी वगैरे बरोबर आहे.
माझा म्हणण्याचा उद्देश
माझा म्हणण्याचा उद्देश एव्हढाच होता की वरील लेखकाला प्रशासकांबद्दल जे गैरसमज आहेत ते खरे नाहीत. मला प्रत्यक्षात न भेटलेले असे जे अनेक प्रशासक, मदत समितीवरील लोक होते, त्यांनी पण मला वेळो वेळी मदत केली आहे.
ज्यांना अशी संकेतस्थळे चालवण्याबद्दल थोडी जरी माहिती असेल, त्यांना मायबोलीवरील प्रशासक, मदत समितीवरील लोक इ. लोकांबद्दल आदर व कौतुकच वाटले पाहिजे. नि:स्वार्थ सेवा म्हणजे काय यावर इथे शेकडो लोक बरेच काही काही लिहीतील, त्यात प्रशासक नसतील. ते करतात, बोलत नाहीत!! खरे तर आता मायबोलीला वर्गणी लावावी!! कारण असे फुकट मिळते त्याची किंमत काही लोकांना कळत नाही!
मला खरंच झक्की मस्करी करत
मला खरंच झक्की मस्करी करत आहेत ते कळलं नाही ..
आणि जिथे मला कळलं नाही (म्हणजे मी इथे बर्यापैकी जुनी असून, झक्कींनां भेटले असून) तिथे बाकीच्य बर्याच जणांनांही कळणार नाही असं वाटतंय ..
मला खरंच झक्की मस्करी करत
मला खरंच झक्की मस्करी करत आहेत ते कळलं नाही ..
कस्चं, कस्चं?! पक्के ओळखून आहेत इथले लोक मला!
कित्येक जण प्रथमच मायबोलीवर येऊन सुद्धा त्यांना कळते मी खरे काय लिहितो नि मस्करी काय? फक्त ते इथे रात्री लिहीले तर तिथे सकाळ असते म्हणून ते उलटे होते नि मस्करीला खरे समजतात, नि खर्याला मस्करी!!
एकदा सर्व प्रशासकांकरता
एकदा सर्व प्रशासकांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सगळ्यांना जुलै फोर्थच्या हार्दिक शुभेच्छा! गॉड ब्लेस अमेरिका! गॉड ब्लेस द फ्री वर्ल्ड!!
खूप खूप टाळ्या ! संपूर्ण
खूप खूप टाळ्या ! संपूर्ण ''मायबोली''ला ! तुम्हा सर्वांच्या लेखनावरून माझं काही चुकत असावं असं मला नक्की वाटत आहे ..
धन्यवाद .. इतके सारे दाखले दिल्याबद्दल .. माझी मल्लिनाथी नक्कीच नव्हती .. तक्रार होती .. अपेक्षा होती ती तुटली म्हणून .. असो .. जे काही असेल .. असो .. मला लिहावंसं वाटणार्या गोष्टींमधे एक ''मायबोली'' होती आजवर हे नक्की .. काही लेखनाला भरभरून प्रतिसादही मिळालेला आहे .. हे ही नक्की .. पण ..
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था ||
अशी काहीशी अवस्था मला मायबोलीबाबत सध्या प्रकर्षाने भासते आहे .. हे ही तितकंच नक्की !!
माझे सदस्यत्व रद्द करावे, ही
माझे सदस्यत्व रद्द करावे, ही विनंती!
सामने बैठा था मेरे और वो मेरा
सामने बैठा था मेरे और वो मेरा न था >>>
प्रदीप, तुला नक्की कशाचं वाईट
प्रदीप, तुला नक्की कशाचं वाईट वाटलं हे मला खरंच कळलं नाही. मायबोलीने, मायबोलीकरांनी नक्की काय करायला हवे होते हे ही कळले नाही. माफ करणे.
मायबोली सोडणे न सोडणे हा निर्णय तुझा पण माबोच्या फार कमी अनुभवावरून तू ठाम मत बनवतोयस असं आपलं मला वाटतं. बघ पटतय का!
मी सदस्यत्व गोठवण्यासंबंधी
मी सदस्यत्व गोठवण्यासंबंधी मा. अॅडमिन यांचेकडे विनंती केलेली आहे. कृपया शक्य होईल तेव्हां कारवाई व्हावी ही नम्र विनंती.
ऍडमिन साहेब, माझे सदस्यत्व,
ऍडमिन साहेब,
माझे सदस्यत्व, माझा लेख, कविता, माझ्या नावाचे सर्व काही बंद करायचे आहे. कृपया ते बंद करा.
पद्म
लॅागआउट न करता ब्राउजर बंद
लॅागआउट न करता ब्राउजर बंद केलेला असेल तर अकाउंट चालूच राहाते!
सदस्यत्व रद्द करू नका. ते
सदस्यत्व रद्द करू नका. ते चुकून झालं होतं.
कृपया मला प्राची गुन्हा हे
कृपया मला प्राची गुन्हा हे अनवधानाने टाइप झाले असल्याने बदलून प्राचीन असे ठेवायचे आहे
तुम्ही स्वतःच तुमच्या
तुम्ही स्वतःच तुमच्या प्रोफाईलमधे जाऊन तुमचे "वापरायचे नाव" बदलू शकता.
असांसदीय असभ्य लिहावे. म्हणजे
असांसदीय असभ्य लिहावे. म्हणजे अॅडमिन आयडी बंद करतात
नमस्कार, माझा आधीच आयडी
नमस्कार, माझा आधीच आयडी अपर्णा. काही कारणाने मी पासवर्ड विसरले आणि जीमेल आयडी सुद्धा पासवर्ड मुळे लॉक झाला आहे. मला माझा अपर्णा. हाच आयडी हवाय कारण तो तीन वर्ष जुना आहे. माझा जुना आयडी मिळाल्यावर हा नवीन आयडी डिलीट केलात तरी चालेल. कारण मी हा आयडी माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी क्रिएट केला आहे. प्लीज मला मदत करा माझा अपर्णा. आयडि मिळवायला. प्लीज... प्लीज.
Pages