दुखः बाजूला ठेवाल ?

Submitted by अनघाहिरे on 29 June, 2011 - 10:21

दुखः काय असते ? दुःखी राहणे काय असते? वारंवार त्याच दुःखात राहून कदाचित आपण समोर आलेल्या आनंदाचा आस्वादही घेऊ शकत नाही . आणि तो आनंद आपल्या पाशी येऊन आपली वाट बघून निघूनही गेलेला असतो ....दुखः हे तिहेरी आहे एक इमॅजिनेशन, दुसरे दृष्टीसामोरील आणि तिसरे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले ...
आता याचे उदाहरण बघायचे झाले तर.. आपल्या लाडक्या व्यक्तीला आपण सांगत असतो कि समोर जाऊ नकोस समोर खड्डा आहे त्या खड्यात तू पडू शकतोस ...आणि त्या खड्यात पडल्यावर तुला फार इजा होतील तुला फार वेदना होतील ...ती व्यक्ती त्या खड्या पर्यंत गेलेली नसते पण आपण तिला होणारे दुखः इमॅजिन करत असतो ...वास्तविक पाहता ती गोष्ट घडलेली नसते पण आपल्याला नुसत्या कल्पनेने दुखः होते... का असे होते जी गोष्ट घड्लेलीही नाही तिच्या संबधी विचार करून आपण काल्पनिक दुःखात का अडकतो ? आपला स्वभाव हा असाच आहे ...विनाकारण कोणत्याही गोष्टीची अती काळजी करण्याची सवय असणार्‍या व्यक्तींना ह्या दुःखाला सामोरे जावे लागते...हे काल्पनिक दुखः मनुष्य स्वतःहून ओढवून घेत असतो ....आणि तसे घडणे हे साहजिकच आहे ते योग्य पण आहे.
दुसरे दुखः दृष्टीसामोरील दुखः ती व्यक्ती आपला सल्ला झिडकारून पुढे जाते... आपले ऐकत नाही म्हणून आपल्याला दुखः होते नंतर ती व्यक्ती आपल्या समोर जर खड्यात पडली तर ते आपल्या दृष्टीसामोरील दुखः ते सहन करणे फार त्रासदायक असते....ह्या दुःखाच्या वेदनाही असह्य असतात
खड्यात पडल्यानंतर त्या व्यक्तीला होणारा त्रास आपण आपल्या डोळ्यांनी बघतो आणि त्या क्षणाला त्या व्यक्तीला होणारा त्रास ,वेदना ह्या आपल्यालाही त्रासदायक होतात कारण ती आपलीच व्यक्ती असते...आणि त्या व्यक्तीला होणारा प्रत्येक त्रास हा आपल्यालापण होत असतो हे प्रत्यक्ष अनुभवलेले दुखः आपल्याला अधिकच दुःखी करत असते.
सर्वात अवघड असते ते प्रत्यक्षात अनुभवायला आलेले दुखः कधी आपण आनंदी असतो कधी आपण दुःखी असतो ...आपण आनंदी असतो तेव्हा हे दुखः नेमके कुठे जाते? कुठे पळून गेलेले असते का? तर नाही ते कुठेच गेलेले नसते. ते फक्त थोडावेळ लपून बसलेले असते.थोडावेळ विश्रांती घ्यायला गेलेले असते जेव्हा दुखः परत येते तेव्हा ते आपल्याला डोंगरा एव्हडे उंच भासते. असं वाटत हे दुखः कधी संपणारच नाही , हे तर एव्हडे मोठे आहे . पण काळ हे सर्व गोष्टींवर चांगले औषध आहे जसजसा काळ ओसरतो तसतसे दुखाची तीव्रताही कमी होते. फक्त तीव्रता कमी होते ..ते परत मनात डोकवायला येतेच .
दुखः येते आणि आपल्याला नेस्तनाबूत करून निघून जाते. दुखाकडे तटस्थपणे बघितले पाहिजे पण काही वेळा नंतरच आपण त्या दुःखाला तटस्थपणे पाहू शकतो.दुखः संपल्यानंतर त्या दुःखाचे विश्लेषण केले पाहिजे..आणि हे आपल्याला जमलेच पाहिजे
एक जोक -------------
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोक कमी हसले ....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि "जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात "
(अनघा हिरे)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि "जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात " >> अगदी १००% खरे.

जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात >>>
अवघड प्रश्न आहे खरा. पण मनाच्या बेलगाम वारूला लगाम घालणे कष्टाने साध्य करावे लागते.

जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात >>>>>>>>>>> खूप पटलं.......... Happy

शेवटच वाक्य एकदम पटल.

मला नेहमी पटणार एक वाक्य म्हणजे आपल्या पेक्षा जास्त दु:ख भोगणार्‍या माणसांचा विचार केला की आपण किती सुखी आहोत हे कळत.

आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि "जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात " >> अगदी १००% खरे. या विचाराशी मी ही सहमत आहे.

जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात ?>>> हा प्रश्नच चुकीचा आहे. जो आनंद वारंवार आनंद देउ शकत नाही तो आनंद वारंवार दु:ख ही देउ शकत नाही.
त्या दुखाची वारंवारता किंवा मापन करायचेच असल्यास त्या आनंदच्या आधारावर करावे लागेल, यावर की आनंद किती आहे...?

तो आनंद जन्माचे सार्थक झाले असल्याचा? की काही दिवसांचा? की काही क्षणांचा? यावर दु:खाची वारंवारता मापली जाईल.

"जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात ">> अजिबात नाही पटले, कोणतीच घटना वा भावना तीच आणि तशीच परत कधीच घडत नाही. आयुष्य सतत बदलते आहे कारण आपण सतत बदलत असतो, किंबहुना तसे बदलते असायला हवे. असे असताना तोच आनंद वा तेच दु:ख परत कधीच होत नाही.

अगदी बरोबर .सवयीने ,सातत्याने पहिल्या अनुभवाची तिव्रता कमी होते .
एकदा असं झालं .एक माणूस देवाला म्हटला ,"देवा अरे कंटाळलो या दुखाला .एक तर दुख नष्ट कर ,किंवा बदलून दे ."देव म्हटला ,"ठिके ,एक काम कर ,आज रात्री गावाबाहेरच्या शिव मंदिरात दुखाच्या अनेक पिशव्या खुंटयांना टांगलेल्या दिसतील .तुला हवी ती ने .तो माणूस देवळात गेला .सगळ्या पिशव्यांकडे त्याने पाहिले .आणि परत घरी आला .त्याच्या हातात असलेली दुखाची पिशवी मात्र तीच होती .स्वताची .देव म्हटला "का रे दुख नाही बदललं ." तो भक्त एवढच म्हटला ,'" देवा दुसरी दुख कशीहेत नि काय हेत ? मला त्यांचा परिचय नाही .ती किती क्लेशकारक होतील माहीत नाही. कदाचित कमी .शकय आहे कदाचित खूप जास्त .त्यापेक्षा माझ जुनं दू;खं काय वाईट आहे ?"
असच असतं ना सुखाचं अन दू;खाचही .

जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात>>>

या शकता'त' मधील 'त' नाशिकचा आहे की काय हा विचार सोडुन देतो.

दु:ख आणि आनंद (सॉरी, दुखः आणि आनंद) यांचे वजन वेगवेगळे आहे. म्हणजे फक्त 'गाल' व 'गागाल' असे नाही तर दु:खाचा मनावर पडणारा प्रभाव व आनंदाचा पडणारा प्रभाव, त्यांच्या 'फ्रेशनेसमधील' फ्रेशनेस वगैरे भिन्न असते असे माझे तरी आपले बुवा एक मत आहे.

दु:खाशिवाय जीवनाला काय अर्थ आहे?

का ही ही अ र्थ ना ही

@ befikir, 100/ sahmat. karan jeevnat nuste sukhch asel tar aayushya milmeelit houn jail, sapak houn jaeel. dukkhamule jeevan anshtah aapalee ruchi tikvun aahe. sukh mansala havech asate he khare asale tari sukhamule manushya aalashi banato, tar dukkh mansala jagnyasathi dhey dete.