१) २ वाट्या मैदा
२) दीड टेबलस्पून बेकिंग पावडर
३) १ वाटी पिठीसाखर
४) १०० ग्रॅम प्लेन चॉकलेट
५) १०० ग्रॅम (अन्सॉल्टेड) बटर
६) व्हॅनिला इसेन्स- १ टेबलस्पून
७) १ वाटी दूध
वाटी- नेहेमीच्या जेवणातली आमटीची वाटी.
मूळ रेसिपीमध्ये सर्व प्रमाण 'ग्रॅम'च्या हिशोबात होते. हवे असेल, तर तेही देईन.
ग्रॅम-टू-वाटी करताना मी मापातही बदल केले आहेत.
१) मैदा आणि बेकिंग पावडर तीनदा चाळून घेणे
२) डबल बॉयलर पद्धत वापरून चॉकलेट वितळवून घेणे
३) चॉकलेट पातळ होईपर्यंत बटर भांड्यात हलक्या हाताने फेटून घेणे.
४) चॉकलेट वितळलं की ते बटरमध्ये मिक्स करणे.
५) पिठीसाखर बटर्-चॉकलेटमध्ये मिक्स करून वितळवून घेणे
६) इसेन्स घालणे
७) मैदा घालून क्रम्ब्ज करणे
८) थोडे थोडे दूध घालून मिश्रण फेटणे.
९) केक पॅन मैदा-तूप लावून तयार करून घेणे
१०) मायक्रोवेव्ह असेल, तर कन्व्हेक्शन मोडवर १८० डिग्रीवर ३० मिनिटे बेक करणे. साध्या ओव्हनमध्ये तेच तापमान.
१) तयार केकवर चॉकलेट सिरप ओतून खावे मी काहीही सजावट केलेली नाहीये. आवडीप्रमाणे आयसिंग वगैरे करू शकता.
२) अनसॉल्टेड बटर नाही मिळाले (भारतात) तर अमूल बटरही चालेल. त्याचा खारेपणा केकमध्ये उतरत नाही. ते नको असेल, तर साजूक तूपही चालेल, पण त्याने चव जरा वेगळी येईल.
३) अंडी नसल्यामुळे केकचे मिश्रण सतत आणि जरा जास्त फेटावे.
४) केक आतून थोडा मॉइस्टच राहू द्यावा. गरम केक आणि त्यावर चॉक सिरप खाणे हा चांगला अनुभव असतो
mi paili. Ata vachate
mi paili. Ata vachate
पूनम, नवशिकी/ढ असल्याने थोडं
पूनम, नवशिकी/ढ असल्याने थोडं डोक्यावरुन गेलय.. विस्कटुन सांगण्याचे करावे.
डबल बॉयलर पद्धत वापरून चॉकलेट वितळवून घेणे
मैदा घालून क्रम्ब्ज करणे
छान रेसेपी. याआधी कधीही
छान रेसेपी. याआधी कधीही चॉकलेट वितळवून केक केला नाहीये. माझा चॉकलेट केक म्हणजे मिश्रणात थोडी कोको पावडर टाकणे.
चिंगे १) डबल बॉयलर म्हणजे
चिंगे
१) डबल बॉयलर म्हणजे एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवणे. त्या भांड्याच्या आत बसेल अशा अजून एका भांड्यात चॉकलेटचा बार ठेवून ते भांडे उकळत्या पाण्यात ठेवणे. बाहेरच्या उकळत्या पाण्यामुळे आतल्या भांड्यातले चॉकलेट वितळते. ह्याला 'डबल बॉयलर' पद्धत म्हणतात.
२) (कसं सांगू? :अओ:) नेहेमीची कणिक भिजवताना हळूहळू पाणी घातले की कणीक हळूहळू एकत्र होत जाते, पाणी सगळीकडे असते, पण घट्ट गोळा व्हायला अजून पाणी लागते. हे पाण्याचे मॉइस्चर सगळीकडे असते, त्या स्टेपला 'क्रम्ब्ज' म्हणतात. 'मनुस्विनी'चा आवडता शब्द
अल्पना, असाही करून बघ. ह्यात चॉकलेटचा स्वाद एकदम मुरतो.
अल्पनाची पोस्ट कॉपी-पेस्ट
अल्पनाची पोस्ट कॉपी-पेस्ट
चॉकलेट वितळवून मी केक कधीच केला नाहीये. हा नक्कीच करणार.
छान वाटतोय केक डबल बॉयलर
छान वाटतोय केक
डबल बॉयलर पद्धतीने चॉकलेट मेल्ट करताना चॉकलेत असलेल्या भांड्याचा तळ खालच्या गरम पाण्याला लागता कमा नये.. थोडक्यात वाफेवर चॉकलेट वितळवायचे.
कुकिंग चॉकलेट मावे मधे पण मेल्ट करता येते.
क्र्म्ब्स म्हणजे साधारण त्याज्या ब्रेडचा चुरा केला तर जसा दिसतो तसे टेक्ष्चर .
पौर्णिमा.. तुझ्या रेसिपीवर मी सल्ले देत्येय... हरकत असेल तर उडवते. नो वरीज.
मस्त दिसतोय. करुन बघणार
मस्त दिसतोय. करुन बघणार नक्की.
क्रंब्ज बद्दल थोडे विस्ताराने
क्रंब्ज बद्दल थोडे विस्ताराने लिहायला हवे. (आपल्याकडच्या कुठल्याच पदार्थात हे केले जात नाही.) तर
बटर चॉकलेटच्या मिश्रणात मैदा घालण्यापेक्षा मैद्यात हे मिश्रण घालणे चांगले. तसे केल्यावर हाताच्या बोटाने थोडे थोडे मिश्रण चोळायचे. बोटाच्या शेवटच्या पेराच्या मागचा भाग वापरायचा नाही.
आपण रवा कितपत बारिक आहे, किंवा कणीक कशी दळलीय हे बघायला जशी अॅक्शन करतो तसेच करायचे. या क्रियेमागचा हेतू म्हणजे मैद्याच्या प्रत्येक कणाभोवती बटरचे आवरण बनून ते एक एकमेकापासून दूर राहतील.
हि सर्व किया झाल्यावर भांडे जरा आपटावे व गोल गोल फिरवावे मग जरा कलते करुन मिश्रण एका बाजूला करावे. असे केल्यावर भांडभर रवा किंवा पावाचा चूरा आहे असे दिसले पाहिजे. बटरची गुठळी किंवा कोरडा मैदा असेल तर वरची बोटांची क्रिया परत करायची. या मिश्रणाला गोळा होत नाही, तर ते मिश्रण रव्याप्रमाणेच इकडून तिकडे घरंगळते.
(लाजो, पौर्णिमा बरोबर ना ?)
चिंगी, मलई बर्फी कशी दिसते?
चिंगी, मलई बर्फी कशी दिसते? रवाळ तरीही ते कण चिकटलेले.. तो 'क्रंब्ज' इफेक्ट. आलं का डोळ्यासमोर?
मंजुडी, नाही गं.. मलाईबर्फी
मंजुडी, नाही गं.. मलाईबर्फी फारच मऊ झाली... बरेड क्रम्ब्ज किंवा दिनेशदा म्हणतायत तसं थोड जाड रव्यासारखं टेक्ष्चर हवं...
काय पण त्या क्रम्ब्ज चे क्रम्ब्ज पाडतोय आपण
एकदम सुंदर, मॉइस्ट आणि
एकदम सुंदर, मॉइस्ट आणि स्पाँजी केक झाला गं पूनम. हे कप सिंडीने आणलेले
थँक्स पूनम! थँक्स सिंडी!
योग्य वेळेला ही रेसिपी
योग्य वेळेला ही रेसिपी दीलीत...thanks... नक्की करेन....
काय मस्त दिसत आहेत हे कपकेक
काय मस्त दिसत आहेत हे कपकेक मन्जू!
आपण सगळं मिश्रण एकाच भांड्यात ओततो, त्या ऐवजी तेच मिश्रण अशा छोट्या कपात घालायचं का? की त्यासाठी प्रमाणात काही कमी-जास्त केलेस? (म्हणजे थोडे अजून पातळ वगैरे?)
मॉस्त.
मॉस्त.
मी काही कमी - जास्त केले नाही
मी काही कमी - जास्त केले नाही गं... तू दिलं आहेस तेच प्रमाण काहीही फेरफार न करता घेतलं. आणि मिश्रण या छोट्या कपांमध्ये ३/४ भरून मावेच्या काचेच्या तबकडीवरच ठेवून कन्व्हेक्शन मोडवर बेक केले.
मायक्रोवेव्हमधून बाहेर तरी
मायक्रोवेव्हमधून बाहेर तरी काढायचे केक्स. कित्ती ती घाई फोटो काढायची?
आज करून बघावा म्हणते.
नेपथ्य, प्रकाशयोजना
नेपथ्य, प्रकाशयोजना मायक्रोवेवातच चांगली मिळाली म्हणून काढून टाकला फोटो
>>दीड टेबलस्पून बेकिंग
>>दीड टेबलस्पून बेकिंग पावडर
हा टेबलस्पून म्हणजे नेहेमीचा मेजरींग स्पून का?
मैदा, साखर आणि दुध याचे एक्झॅक्ट (ग्राम्/मिलि) प्रमाण देशिल का प्लिज?
मंजूडी कपकेक एकदम मस्त
मंजूडी कपकेक एकदम मस्त दिसताहेत.
अदिती/पौर्णिमा
माझ्यामते ते मेजरींग स्पून असतील तर टीस्पून हवय. दीड टेबलस्पून म्हणजे फारच जास्त बेकींग पावडर होईल ना.
अदिती, मी वाट्यांच्या
अदिती, मी वाट्यांच्या प्रमाणाचं मेझरिंग कपमध्ये रूपांतर करते आज संध्याकाळी आणि लिहीते इथे.
हा केक केला तेव्हा माझ्याकडे मेझरिंग स्पून नव्हता. जो चमचा (भारतात) पोहे खाण्यासाठी वापरतात, तो दीड चमचा घेतला होता त्याचेही मेझरिंग स्पूनमध्ये रूपांतर करते आणि कळवते.
हो गं रुनी, मलापण ते फार
हो गं रुनी, मलापण ते फार जास्त वाटले म्हणुनच विचारले.
मी हा केक केला तेव्हा दीड
मी हा केक केला तेव्हा दीड टे.स्पू. बेकिंग पावडर घेऊनच केला. वर फोटो दिलेला आहेच. ह्यात बेकिंग सोडा नाहीये, शिवाय दोन वाट्या मैदा म्हणजे ऑल्मोस्ट दीड कप होतो (नक्की किती ते पूनम लिहीलंच.) त्यामुळे तेवढी बे.पा. आवश्यक आहे असे वाटते.
नेपथ्य, प्रकाशयोजना
नेपथ्य, प्रकाशयोजना मायक्रोवेवातच चांगली मिळाली >>> खरोखर मस्त दिसतायंत ते मफिन्स
पौर्णिमा, छानच आहे रेसिपी... ग्रॅममध्ये सगळे प्रमाण दिल्यास बरे होईल. तसेच हाच केक 'विथ एग्ज' करायचा असल्यास कशी प्रक्रिया असावी, यावरही सल्ला मिळू द्या (दिनेशदा, तुम्ही नक्की सांगू शकाल, सांगाल का? )
'एगलेस चॉकलेट केक 'विथ एग्ज'
'एगलेस चॉकलेट केक 'विथ एग्ज' कसा करणार?
(सानी :दिवा:)
शिवाय दोन वाट्या मैदा म्हणजे ऑल्मोस्ट दीड कप होतो.त्यामुळे तेवढी बे.पा. आवश्यक आहे असे वाटते.>>>> +१
'एगलेस चॉकलेट केक 'विथ एग्ज'
'एगलेस चॉकलेट केक 'विथ एग्ज' कसा करणार? >>> प्राची 'चॉकलेट केक' विथ एग कसा करायचा, हे विचारायचे होते, 'एगलेस चॉकलेट केक ' नाही.
एगलेस केक करतांना तो सॉफ्ट होण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते, काही वेगळे इनग्रेडिएन्ट्स घालावे लागतात, विथ एग करतांना तो प्रश्न नसतो. त्यामुळे अंडं खात असल्यास हाच चॉकलेट केक कसा करायचा, असा मला प्रश्न पडला. मी ही कोको पावडर घालूनच केक बनवते आणि वरुन मेल्टेड चॉकलेटचा लेप लावते. या केकला फक्त चॉकलेटचा थोडासाच फ्लेवर येतो, चॉकलेटचा खरा स्वाद येत नाही.
खुप दिवसांपासून हा असा चॉकलेट केक शिकायचा होताच, आज ही रेसिपी मिळाली. तेंव्हा हाच केक 'विथ एग' कसा करायचा ते कोणाला माहिती असल्यास सांगा मला. नाहीतर ही रेसिपी आहेच...
हा माझ्याकडे असलेला मेझरिंग
हा माझ्याकडे असलेला मेझरिंग ग्लास आणि स्पून्स. ह्यात माझ्याकडचा एक वाटी मैदा म्हणजे बरोब्बर १२५ ग्रॅम बसला.
बेकिंग पावडर- दीड चमचा सर्वात मोठ्या स्पूनमध्ये पाऊण बसली. हा चमचा शीगोशीग भरलेला नाही.
तर ग्रॅम्स मधलं माप हे बसेलः-
मैदा- २५० ग्रॅम.
दूध- २०० मिली.
पिठीसाखर- १२५ ग्रॅम.
चॉकलेट आणि बटर १०० ग्रॅम हे लिहीलेले आहेच.
व्हॅनिला इसेन्स मोजला नाही
ह्या मापाने कोणी केलात, तर सांगा कसा झाला ते. काही कमी-जास्त केलेत तरी सांगा. मी ह्याच मापाने करून वर फोटोही दिलेला आहे. मन्जूडीनेही हेच माप वापरले आहे.
इथे अंडं घालून केलेल्या चॉकलेट केकची रेसिपी आहे- http://www.maayboli.com/node/30572
वॉव्..पौर्णिमा..मस्त दिस्तीये
वॉव्..पौर्णिमा..मस्त दिस्तीये केक.. मला ही घरी केलेली असेल केक तर बिना अंड्याचीही आवडते
धन्यवाद. मी करुन बघेन लवकरच
धन्यवाद. मी करुन बघेन लवकरच
धन्यवाद, पौर्णिमा! लिंक
धन्यवाद, पौर्णिमा! लिंक दिलेल्या रेसिपीतला विथ एग केक कोको पावडर घालून केलेला आहे. तसा केक मी करुन पाहिलेला आहे. होतो छानच, पण मला चॉकलेट घातलेला हवा होता,तरीही धन्स!
पौर्णिमा, मी केक करुन बघितला.
पौर्णिमा, मी केक करुन बघितला. मस्त झाला आहे. कोको पावडर घातलेल्या केकपेक्षा हा चांगला लागतो. छान चॉकोलेटची चव आली.
धन्यवाद.
मला गोड कमी वाटला. पुढच्यावेळी दिडपट साखर घालुन बघेन.
Pages