Submitted by मेधा on 21 June, 2011 - 08:48
लॉनसाठी ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्ट्म स्वतः लावण्याचा किंवा लावून घेण्याचा कोणाला अनुभव आहे का ? किती वेळ लागतो / किती खर्च येतो ? कुठल्या कंपनीचे स्प्रिंकलर्स रेकमेंड कराल ?
मी रेनबर्ड.कॉम इथून प्लॅन मागवून त्याप्रमाणे स्वतः इन्स्टॉलेशन करायचा विचार करत आहे ? कोणाला या कंपनीचा अनुभव आहे का ?
एक शेजारी पण रेनबर्डचा प्लॅन मागवतोय , तो अन आम्ही मिळून ट्रेंचर भाड्याने आणून करायचा विचार आहे. प्लंबिंगचा / वायरिंगचा बारकी कामे करण्याचा अनुभव आहे. आतापर्यंतच्या डू इट युवरसेल्फ कामांना ठरवल्यापेक्षा २ ते पाचपट जास्त वेळ लागल्याची आठवण ताजी(च) आहे . आमच्या डेव्हलपमेंटमधला पत्ता सांगितला की सगळे लोक बाहेरच्या पेक्षा दीड ते दोन पट जास्त पैसे मागतात याचा अनुभव जास्त तीव्र आहे, त्यामुळे स्वतः करायची हौस
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतः लावण्याचा नाही, लावून
स्वतः लावण्याचा नाही, लावून घेण्याचा आहे.
किती वेळ लागेल, खर्च - हे किती झोन्स आणि किती एरिया यावर अवलंबून आहे.
(१ एकर, ९ झोन - २५००. काम एक-दीड दिवसात झाले. हे ७ वर्षापूर्वीचे डील आहे, ते पण ओळखीतून मिळालेल्या माणसाकडून. कंपनीवाले महाग असतात.)
रेनबर्डचा अनुभव नाही.
आमचा बिल्डरनेच बसवलेला
आमचा बिल्डरनेच बसवलेला त्यामुळे खर्चाची कल्पना नाही. फक्त एक सजेशन , स्प्रिक्लर बसवताना ज्याच्याबरोबर Rain Sensor असेल असा बसवा. पाण्याची बचत होते.
रेनबर्ड्पेक्षा हंटर ब्रँडचे
रेनबर्ड्पेक्षा हंटर ब्रँडचे स्प्रिंकलर (हेडस आणि कन्ट्रोलर) जास्त चांगले आहेत असा माझा स्वतःचा अनुभव आहे. रेन सेन्सर अवश्य घ्या.
इन्स्टॉलेशन स्वतः करणे जरा किचकट आहे. वायरिंग, प्लंबिंगची सर्व आयुधे असतील, आवड, घरातील दुरुस्त्या करण्याचा अनुभव आणि भरपूर वेळ असेल तर प्रयत्न करायला काही हरकत नाही.
नाहीतर एखादया हँडीमॅनलापण हे काम देता येइल.
स्प्रिंकलर बसवताना काही
स्प्रिंकलर बसवताना काही केसेसमध्ये बॅकफ्लो प्रिव्हेंशन डिव्हाईस बसवावे लागते. त्यासाठी लायसेन्स असलेली व्यक्तीच करू शकते. बागेत योग्य त्या ठिकाणे ठरवून, रोटेटिंग किंवा स्टॅटिक स्प्रिंकलर वापरून किती एरिआ कव्हर होईल ते बघावे लागेल. त्याप्रमाणे पाईपलाईन टाकण्यासाठी एक फूट ते दिड फूट खोलीचे चरे खणणे, पाईप बसवणे. करावे लागेल. ते करताना, हिवाळ्यात पाईपलाईन फुटणार नाही यासाठी किती खोली हवी ते होम डेपो किंवा काँट्रॅक्टरशी बोलून घ्या. वेळ हा जेवढा लागेल असे वाटते, त्याच्या दुप्पट तरी जातोच, काही वेळेस योग्य ते यंत्र नसते हाताशी, किंवा स्पेअर पार्टसची गरज पडते.
तसेच घरासमोरच्या पदपथापलिकडे पाईप न्यायचे असेल किंवा ड्राईव्हवेच्या एका भागातून दुसर्या भागाकडे, तर खाली खणताना, पाईप, पाणी , इलेक्ट्रिक किंवा टेलेफोनच्या वायरी असे काही येणार नाही ना ते बघावे लागेल. बहुतकरून त्या त्या कंपन्या मदत करतात अशा गोष्टींसाठी.
खणलेला चर बुजवल्यावर त्यावर लावण्यासाठी माती आणि गवताचे बी किंवा गवताच्या पट्ट्या लागतील.
मित्राने, स्प्रिंकलरचे पैसे खूप होतात म्हणून नळाला पाईप लाउन तो पाईप चर खणून जमिनीखालून फिरवला. योग्य त्या ठिकाणी फिरते स्प्रिंकलर बसवले आणि नळाला टायमर जोडला. त्यात १५० वगैरे खर्च आला होता.
मी estimate घेतलेले ते लालूने
मी estimate घेतलेले ते लालूने सांगितले तेव्हढे होते पण अर्थात लालूच्या घरापेक्षा माझे yard लहान आहे. तेंव्हा मी सध्या Ortho चे (दुसरे कुठले वेगळे मिळाले नाहित ज्यांचे spare parts locally available असतील असे) yard watering kits घेतले आणि काहि सोकर पाईप्स, adjustable sprinklers , rotary sprinklers etc करून above the ground बसवून घेतले. मला फक्त एकच पाईप lawn मधे ठेवावा लागला बाकी सगळे घर किंवा डेकच्या कडेने नेता आले. तेव्हढा एक तो mowing च्या आधी हलवावा लागतो. मी रेनबर्ड वर प्लॅन तयार केला होता तसेच सगळे equipements rent करायचे estimates धरून पाव खर्चामधे झाले असते. बॅकफ्लो प्रिव्हेंशन हा त्यातला महागडा प्रकार होता कारण plumber बोलवावा लागला असता. सध्यातरी मला काहि अडचण जाणवत नाहि. सोकर पाईपमूळे झाडे खूश आहेत.
असली कामे अनुभवी माणसाकडून
असली कामे अनुभवी माणसाकडून करून घ्यावी. परवानगी-तपासण्या आवश्यक आहेत का विचारून बघा.मला २००५ साली २५०० फुटाच्या ३ झोन साठी $२००० खर्च आला. २००० साली जुन्या घरी ६ झोनच्या ५००० फुटाच्या साठी $२५०० खर्च आला. रेन सेन्सर चा फार उपयोग मला झाला नाही. सेन्सर बंदच पडते. दिसते तेवढे काम सोपे नसते असा माझा अनुभव.
मी स्वतःच (चार पाच
मी स्वतःच (चार पाच शेजार्यांबरोबर भागीदारीत) बसवली सिस्टीम. चार वीकेंड लागले. थोडं काम प्लंबर करून करून घेतलं.. माझ्या (फोटोतल्या) यार्डाला (मागे पुढे धरून ) $८०० खर्च आला ६ वर्षांपूर्वी..
रेन सेंसर बसवला नाही.
गल्लीत सगळ्यांकडे रेन सेंसर
गल्लीत सगळ्यांकडे रेन सेंसर आहे. येकाचा बी धड काम करत नाही. बदाबदा पावसात स्प्रिंक्लर्स चालू होतात.