Submitted by आयडू on 21 June, 2011 - 00:03
'मराठी सा रे ग म प' झी मराठीवर सोम मंगळ रात्री ९.३० वाजता चालू झाले. नविन सुत्रसंचालक - प्रिया बापट (मी फक्त प्रिया बापट ह्यांचा हसमुख चेहरा पहातो कार्यक्रम ऐकत नाहीये! ह्याची जाणकारांनी कृपया नोंद घ्यावी. ) व अजय, अतुल ह्या नव्या परिक्षकांसह. हा धागा ह्या स्पर्धेतील गाण्यांबद्दल / व कार्यक्रमाशी संबंधित चर्चा करण्यासाठी...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय अतुल आहेत आणि पल्लवी नाही
अजय अतुल आहेत आणि पल्लवी नाही म्हणून बघावसं वाटतय
ऑडिशन्स मधे नेहा वर्माचा आवाज आवडला( ' सुन्या सुन्या मैफीलीत माझ्या' गायली).
प्रसन्नजीत कोसंबी (अभिजीत चा भाउ, मागच्या इंडियन आयडॉल सिझन चा बर्यापैकी पॉप्युलर स्पर्धक) लक्षात राहिले.
पर्व नव्हे गर्व >>>हे 'पत्र
पर्व नव्हे गर्व >>>हे 'पत्र नव्हे मित्र' च्या धर्तीवर आहे कां?
प्रिया बापट ला उगाच साडी
प्रिया बापट ला उगाच साडी नेसुन उभ केल. त्या पेक्शा छान शा ड्रेस मधे छान वाटली असती. असो.
अजय - अतुल कस परिक्श्ण करतात त्याची उत्सुकता आहे.
पत्र नव्हे मित्र कालचा पहिला
पत्र नव्हे मित्र
कालचा पहिला भाग पाहिला. प्रिबा वगळता हे पर्व आवडेल असं वाटतंय.
किर्ती किल्लेदारचा आवाज आवडला. अवधुत आर्याला म्हणायचा त्याप्रमाणे कानाला मुंग्या येतील इतका गोड आहे. सुचेता बर्वे पण आवडली. ओव्हरहाईप्ड व्हायला नको.
अजय-अतुल असल्याने प्रत्येक भागात श्रवणीय मेजवानी असेलच त्यामुळे हे पर्व बघेन
छान होता कार्यक्रम. नवीन
छान होता कार्यक्रम. नवीन आयडियाज कशा काय आहेत ते कळेलच. अजय अतुल गोड गोड कॉमेंटस देत नाहीत त्यामुळं स्पर्धक टेन्शनमधे राहतील कि काय असं वाटलं.
या पर्वात आधीच्याच पर्वांतली
या पर्वात आधीच्याच पर्वांतली गाणी न घेता जरा वेगळी गाणी ऐकायला मिळतील अशी आशा.
अजय-अतुल यांच्या परिक्षणाची पण उत्सुकता आहे.
निवेदिका नवखी आहे हे जाणवते(च).
प्रिया बापट गोड आहे पण पल्लवी
प्रिया बापट गोड आहे पण पल्लवी जोशी अँकर म्हणून छानच होती. उगाच काढलं तिला
प्रिया बापट गोडच आहे. तिचा
प्रिया बापट गोडच आहे.
तिचा तो लडिवाळ आवाज सोडुन बाकी गाणार्यांचे सगळे आवाज सुरवातीला तरी चांगले वाटताहेत. बघुया आता पुढे चॅलेंज मधली गाणी गाताना किती कस लागतो ते.
कालचा एक संवाद,
प्रिया एका स्पर्धिकेला,"गोड दिसतियेस तू"
स्पर्धिका, "प्रिया, तू पण स्वीट दिसतियेस"
प्रिया बापट गोडच आहे.
सांजसंध्या, पल्लवी उत्तम
सांजसंध्या, पल्लवी उत्तम सूत्रसंचालिका आहे यात वादच नाही. तिने याच मंचावर भरपूर आणि उत्तम सूत्रसंचालन केलेही आहे.
पण म्हणून नेहमी तीच पाहिजे हे बरे नाही. जरा व्हरायटी नको का? (तिला?)
नव्या सूत्रसंचालिकेचंही स्वागतच आहे. तिनेही सूत्रसंचालिका म्हणून आपलं स्वतःचं स्थान निर्माण करावं.
गजा, पल्लवीची मराठी भाषा
गजा, पल्लवीची मराठी भाषा वगळता ती उत्तम सूत्रसंचालिका आहे
प्रिबाची मराठी भाषा, उच्चार चांगले आहेत पण आवाजाची फेक, उत्स्फुर्तता यात ती काल खूपच मागे पडली. असो, सुधारेल ती. पहिला भाग भुताचा
आवाजाची फेक, उत्स्फुर्तता यात
आवाजाची फेक, उत्स्फुर्तता यात ती काल खूपच मागे पडली <<< अनुमोदन. म्हणूनच म्हटले निवेदिका नवखी आहे हे जाणवतेच.
पल्लवीपेक्षा प्रिबा म्हणजे
पल्लवीपेक्षा प्रिबा म्हणजे आगीतून फुफाटा! (असं माझं वैम!)
गजा, पल्लवी अशाच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्याच भयाण साड्या आणि भीषण मराठीत ईटीव्हीवर 'गौरव महाराष्ट्राचा'मध्ये करत आहे. तस्मात, तिला आणि प्रेक्षकांना तिकडे व्हरायटी नाही!
कालचा भाग चांगला झाला. अजय-अतुल खरंच चांगल्या कमेन्ट्स देत होते. त्यांनी गायलेलं गाणं आणि सुरुवातीला सर्व स्पर्धकांनी गायलेलं गाणं एकदम मस्त.
गायक ठीकच होते, कालचे तरी. कीर्ती किल्लेदार म्हणजे 'ये जवळी ये जवळी..' गायलेली ना? गाणं नुसतंच गोड. आर्तताच नाही काही असो. आगे आगे देखते है क्या होता है. अजय-अतुलसाठी तरी नक्की बघणार हा कार्यक्रम.
आवाजाची फेक, उत्स्फुर्तता यात
आवाजाची फेक, उत्स्फुर्तता यात ती काल खूपच मागे पडली>>>
बॅक टू बेसिक्सची गरज वाटते.. माइक तोंडाच्या जरा लांब धरणे.. मुख्यत: ब,फ,भ चा उच्चार करताना.
पहिलाच दिवस असल्याने जरा ओव्हर एक्साइटेड वाटली...पण पल्लवीसारखी आपली वेगळी जागा निर्माण करायची कुवत आहे असं वाटतं..
अजय-अतुल बहुधा संगीतातलं शास्त्रोक्त शिक्षण नसल्याने (त्यांच्या क्षमतेबद्दल अजिबात शंका नाही), सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने गाण्याचं विश्लेषण करतायत असं वाटलं.
सुरुवातीला अवधूत-पल्लवी यांची नक्कीच कमतरता जाणवेल, पण नवीन टीमने पण मजा येईल असं वाटतंय.
प्रिबा च्या बाबतीत मित ने
प्रिबा च्या बाबतीत मित ने म्हटलेले (माइक तोंडाच्या जरा लांब धरणे.. मुख्यत: ब,फ,भ चा उच्चार करताना.) मलाही जाणवले. परंतु ती तरी काय करणार? जबडाच हसताना इतका फाकतो तिचा की दाताड लपविण्यासाठी असे करणे भाग आहे तिला.
पल्लवीपेक्षा प्रिबा म्हणजे आगीतून फुफाटा! (असं माझं वैम!) >>> पूनमच्या वैम ला माझ्याकडून मोदक.
"डोंगरमाथ्यावर....." हे गाणं मी काल खूप एंजॉय केलं.
जयदीप कल्याणचा आहे. आम्ही १० च्या क्लास ला एकत्र होतो. माझ्याकडून त्याला खूप शुभेच्छा
काल चा कार्यक्रम
काल चा कार्यक्रम आवडला...........प्रिया काही शी पल्लवी सारखीच बोलत होती.........तशीच संवादफेक आणि तेच संवाद...... संवाद लिहिणारा बहुतेक नाही बदलला.........
अजय - अतुल साखरेत घोळवलेल्या
अजय - अतुल साखरेत घोळवलेल्या प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे ते जे बोलतात ते मनापासुन बोलतात अस वाटत.
.
.
प्रिबा महाबोअर आहे! >'पत्र
प्रिबा महाबोअर आहे!
>'पत्र नव्हे मित्र' >
पर्व आत्ताच सुरु झालं ना, इतक्यातच कसला गर्व म्हणे?
Gaurav maharashtracha
Gaurav maharashtracha madhyehi ata Renuka Shahane Sutrasanchalak aahe. (mi gelya athavadyat pahilelya epi.baddal bolatey) baki, priba baddal Poonamla anumodan
प्रिया बापट काय.. ती प्रिया
प्रिया बापट काय.. ती प्रिया तुपट आहे...
स्पर्धेत धवल चांदवडकर, सावनी रवींद्र घांगुर्डे अशी आधीच हाइप्ड लोकं पण आहेत... आणि हे दोघे तर नक्कीच शेवटच्या दहात येतील...
माझ्यामते अजय अतुल फक्त आत्ता चालू असलेल्या राउंड पुरतेच असतील... नंतर दुसरे कोणीतरी परिक्षक असतील...
काल प्रिबा.. पर्व नव्हे गर्व म्हणाली तेव्हा पहिल्यांदा ते पर्व नवे गर्व असेच ऐकू आले...
प्रिया बापट पल्लवीची नक्कल
प्रिया बापट पल्लवीची नक्कल करत होती.. एकदम डोक्यात गेली. hope हे गर्वपर्व चांगले असेल. ती सावनी रवींद्र स्टेज शो करते ना?
प्रिबा वगळता हे पर्व आवडेल
प्रिबा वगळता हे पर्व आवडेल असं वाटतंय>> अनुमोदन! कालचा भाग थोडसा पाहिला. चांगलं होणार हे पर्व. पल्लवी सूत्रसंचालक चांगलीच आहे. (मराठी कडे दुर्लक्ष केल तर ) विशेषतः लहान मुलांच्या पर्वात मला आवडलं होतं तिचं सूत्रसंचालन.
मराठी कडे दुर्लक्ष केल तर
मराठी कडे दुर्लक्ष केल तर
अनुमोदन.
असल्या कार्यक्रमात, सारखे काय मराठी, मराठी करायचे? समजते आहे ना बोललेले? मग झाले तर.
हे कार्यक्रम करमणूक म्हणून सादर केले जातात. करमणुकीची भाषा अशीच असते. शिवाय जर जास्त हिंदी नि कमी मराठी वापरले तर अमराठी लोकसुद्धा हे कार्यक्रम पाहू लागतील. त्यांनाहि आवडेल.
नि मी म्हणतो, गाणी तरी मराठीच का? हिंदी गाणी, उर्दू गझला म्हंटल्या तर काय बिघडले? उर्दू गझला तर कित्ती छान असतात. मायबोलीवरच पहा ना, 'सुखनवीर बहुत अच्छे' वाचले नाहीत का? खुद्द राज ठाकरे सुद्धा, 'हमने एकहि मारा....' वगैरे हिंदीत सांगतात. मराठीत त्या सारखा एक तरी प्रसिद्ध डायलॉग आहे का? प्रसिद्ध लेखक बेफिकीर, त्यांच्या बक्षीसपात्र, गौरवलेल्या कवितांमधे हिंदी, त्यांच्या लेखाचे शीर्षक हिंदी असा हिंदीचा वापर करतात, तरी त्यांना मराठी साहित्याबद्दल पुरस्कार मिळाल्याचे वाचले नाहीत का?
आशा नि लता यांनी फक्त मराठी गाणीच म्हणायची असे ठरवले असते तर? कितीतरी सुंदर गायनाला आपण मुकलो असतो!!
शेवटी गातात कसे, आवाज कसा आहे, टीव्हीवर पेशगी कशी करतात, वगैरे तर पहायचे ना. भाषा काय, दरवर्षी शब्दकोषात नवीन शब्दांची भर करतातच ना? जरा लोकप्रिय झाले, सर्व जण तसेच बोलायला लागले की आपण ते मराठी शब्दकोषात अॅड करून टाकू! टेन्शन नही लेनेका, क्या?
महाराष्ट्र दिन झाला ना? तेंव्हा केले मराठी मराठी. आता जरा रोजच्या जीवनात या.
झक्की काका, दुर्लक्ष म्हणजे
झक्की काका, दुर्लक्ष म्हणजे मला म्हणायचं होतं की ती सूत्रसंचालिका म्हणून चांगलीच आहे. आता मराठी नीट येत नसल्याने मराठी कार्यक्रमात ती असणं बरोबर नाहीच. तुम्ही तर कुठेतरीच नेलीत पोस्ट
आज ह्या सोमवारचे आणि मागच्या
आज ह्या सोमवारचे आणि मागच्या आठवड्याचे भाग पाहिले..
स्वरूपा बर्वे काय खल्लास गायली !!! बाकी तो पहिला मुलगा पण छान गायला.. "या भवनातील.. " वाला..
प्रिया बापट बरी वाटली पहिल्या भागात तरी.. फक्त ती प्रत्येक शब्दावर फार जोर देऊन देऊन बोलते..
अजय अतूल च्या कमेंट्स चांगल्या आहेत.. एकंदरीत हे पर्व बरं होईल असं वाटतय... !
स्पर्धेत धवल चांदवडकर, सावनी
स्पर्धेत धवल चांदवडकर, सावनी रवींद्र घांगुर्डे अशी आधीच हाइप्ड लोकं पण आहेत...
>>
हो का... हे दोघे आमच्या न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात गायले होते. चांगला आहे त्यांचा आवाज.
सलील कुलकर्णी हा अतिमहाबोर माणूस परिक्षक म्हणून आता नसेल हे वाचून जरा बरे वाटले
झक्की, तुमच्या पोस्ट इथल्या
झक्की, तुमच्या पोस्ट इथल्या विषयाशी संबंधित नसली तरी मला आवडली. खुद्द महाराष्ट्रातही हल्ली मराठीची बोंब आहे.
कालचा भाग पाहीला... प्रिबा
कालचा भाग पाहीला... प्रिबा सोडुन बरा वाटला..
कालचा भाग पण आवडला... वरच्या
कालचा भाग पण आवडला...
वरच्या सगळ्या पोष्टी वाचून एकच म्हणावंसं वाटतं..
काहीही असो प्रिया बापट सुंदर दिसतीये..(ऋयामला झब्बू)
प्रिया कालपण सुंदरच दिसत होती
प्रिया कालपण सुंदरच दिसत होती
अजुनतरी पल्लवीसारखे तिचे साडी पुण्याची आणि ब्लाऊज मुंबईचा हे सुरु झालेले नाहीये हे ही नसे थोडके. आवाजाची फेक खुपच नाटकी वाटते.
मला स्पर्धकांची नावे अजुनतरी नाही ठामपणे सांगता येत पण काल ती 'एकाच या जन्मी जणू' आणि 'खेळ मांडला' वाले चांगलेच गायले. पुढच्या भागात मजा येईल. त्यांच्या नेहमीच्या जॉनरपेक्षा वेगळी गाणी म्हणताना त्यांचा पुन्हा एकदा कस लागेल.
Pages