'तू किसी औरकी जागीर है ओ जाने गझल
लोग तुफान उठायेंगे मेरे साथ ना चल'
डोळ्यांनी पाहावे तर सर्वत्र हिरवाई! पाय टाकावा तर येणार्या वार्यामुळे दमायच्या ऐवजी अधिकच उत्साह! वर बघावे तर 'कुठल्याकुठे आहे अजून कल्याण दरवाजा' ही भावना! खाली बघावे तर 'बाप रे, पार त्या तिथे होतो आपण?' ही भावना! कानांनी ऐकावी तर सुनसान, नीरव परंतु प्रणयी शांतता! गंध घ्यावा तर रानफुलांचा आणि गवताचा! जरा उभ्याउभ्याच झाडाला टेकावे तर खरीखुरी विश्रांती म्हणजे काय याचा अनुभव! पुन्हा चालावे तर निसर्गाच्या जाळ्यात अधिकाधिकच गुरफटावे! ताक प्यावे तर अमृताने झक मारावी! दही खावे तर आईसक्रीमने! भजी खावीत तर आपण प्यासात पकोडा कशाला मागवतो हा विचार भंडावावा! डावीकडे बघावे तर निसर्गश्रीमंत दरी! आणि.... उजवीकडे बघावे तर???
... उजवीकडे बघावे तर मूर्तीमंत लावण्य!
ऋतुंची ऐकली कुजबूज मी लावण्य आल्यावर
मला... कळवायचे नाहीस का तारुण्य आल्यावर?
आकाशातल्या सूर्याच्या आता अजिबात न भाजणार्या झळांची कोमल किरणे होऊन ती निवेदिताच्या गालांना नैसर्गीक चमचम प्रदान करत होती. अचानक अपघाताने निर्माण झालेल्या या नीरव एकांतात तिच्या पापण्यांना स्वतःचे वजन नीटसे पेलत नव्हते. मात्र नजरेच्या कोपर्यातून आपण किती वेळा निरखले जात आहोत हे ती निरखत नक्कीच होती.
घर्मबिंदुंनो अता सोडा ति जागा, विरघळा
भार तुमचा सोसवेना एवढा नाजुक गळा
"बसायचंय का?"
उगाचच पुरुषार्थाचा आव आणून उमेश तिला दर पाच मिनिटांनी विचारत होता. प्रत्येकवेळेस नाही म्हणून ती पुढचे पाऊल उचलत होती. मात्र यावेळेस तिने उत्तरही दिले नाही आणि पाऊलही उचलले नाही.
चक्क बसली ती एका दगडावर!
जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना... हम भी पीछे है तुम्हारे...
ते पाहून मात्र उमेशलाही जाणवले की आपण मारतोय ती शायनिंग मारण्याची आपलीही पात्रता नाहीच आहे, मुकाट बसलेले बरे!
पण नेमका...................... दगड एकच!
फुललेले श्वास, उमललेली मने, विरलेली इतर जगाची जाणीव, आसूसलेला एकांत, बहरलेल्या कामना... आणि...
टप्प!
च्यायला???
फेब्रूवारीत पाऊस??
पुण्यात आता दम नाही राहिला.
दोन नजरा आकाशाकडे आणि झटकन एकमेकांकडे!
"भिजावे लागणार"
'कर्ज फेडावेच लागणार' असे बोलताना होतो तसा चेहरा करून उमेश म्हणाला... आणि...... आकाशात खूप लांबवर केवळ एका क्षणात विजेने लख्ख दर्शन देऊन स्वतःच्याच सौंदर्याने स्वतःच शरमून लुप्त व्हावे तसे निवेदिताचे 'अनायासे' दिल्यासारखे वाटणारे उत्तर...
"मग भिजू की?"
आत्ता तिच्याकडे पाहिले तर हे उत्तर तिनेच दिले किंवा तिलाच द्यायचे होते असे ब्रह्मदेवालाही वाटू नये. पण ऐकू तर आले होते ना? त्याचे काय????
बरसातमे... हमसे मिले तुम सजन.. तुमसे मिले हम... बरसातमे..
पुढच्या सातव्या मिनिटाला नखशिखांत भिजून दोघे निम्या वेगाने वर चढत होते. आता प्रत्यक्ष सिंहगडावर असतानाही सिंहगड दिसत नव्हता इतके ढग!
हे ढग असे अचानक कसे काय येतात? स्वतःलाच तारुण्याची चाहुल लागावी असे? आणि आल्यावर सूर्य कुठे जातो?
डोक्यावरून ओढणी घेऊन थांबणारा पाऊस नाही हे समजल्यावर निवेदिताने ओढणी सरळ गळ्याशी बांधून टाकली. भिजायचंच आहे तर न भिजण्याचा प्रयत्न करून निराश होण्यात काय हशील?
तिच्या एकेक वेड लावणार्या विभ्रमाकडे चोरून बघण्याचा परिणाम भोगावा लागला. राईलकर घसरले.
आपोआप घसरल्यानंतर कुठे त्याला वाटू लागले.. की आधीपासून दोन तीनवेळा मुद्दाम घसरायला हवे होते..
नाहीतर अशी आली असती होय आपला हात धरून उठवायला??
आह!
हुस्नही हुस्न, जलवेही जलवे
जिंदगी कितनी खूबसूरत है
सळसळत्या तारुण्याचा तो मखमली स्पर्श! डोळ्यांमधील जीवघेणी गुंतवणूक करणारी मादकता! चालूच असलेल्या पावसाने कायेलाही येणारा मृद्गंधाच्या तोडीस तोड गंध! ओढणीच्या कोपर्याने कोपरावरचे पुसलेले रक्त! अत्यंत समीप असण्याचे ते जेमतेम दोन तीन क्षण!
मनोमन अवाक झालेला उमेश उठला तेव्हा वाहत्या रक्तची आठवणही त्याला राहिलेली नव्हती. जाणीव झाल्यावर त्याने तेथे रुमालाने पुसले व आधी वरच्या खिशात राहिलेल्या दोन नोटा पटकन पाकिटात घातल्या.
"खूप लागलं?"
आता तुला काय सांगू बाई! भयंकर म्हणजे भयंकरच लागलं!
"लय्याभाळय गडावं.. कुटं चाललाय?"
एका ताकवाल्या म्हातारीने तुफान वेगाने खाली उतरताना दिलेला मोफत सल्ला!
मग पुन्हा नजरानजर!
आणि अक्षरही न बोलता पुढचे पाऊल दोघांनीही उचलणे! म्हातारी गेली उडत!
आधी लगीन कोंडाण्याचं!
सुरक्षितरीत्या पुन्हा कोठे पडता येईल याची तपासणी घेत घेत उमेश एक पाऊल पुढे चालला होता.
"च्च्च्च्च ई.. शी:.. हे बघ एकदा... "
उजवी चप्पल स्वतःचा जीव गमावून आता निवेदिताच्या उजव्या हातात आली होती...
"काय गं हे?? ... चप्पल तुटली की???"
"मग मी काय दाखवतीय??"
"आता??"
"आता काय? आता परतच जावं लागणार??"
"ह्यॅ... माझे शूज घाल की??"
"जोकर दिसेन.. "
"हो पण अनवाणी चालण्यापेक्षा जोकर दिसलेले बरे नाही का??"
"आणि तू काय करणार??"
"जोकर दिसण्यापेक्षा अनवाणी चाललेले बरे नाही का??"
खळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ!
अशा हासतात मुली??
माय गॉड!
सहज एक डोंगर चढून जावा तर काहीही कल्पना नसताना समोर अचानक एकाच अरुंद धारेचा चमचमणारा धबधबा असावा आणि त्याला पाहून आपल्याला आपल्या अस्तित्वाचीच लाज वाटावी.. अशा हासतात मुली??
"तू एक बूट घाल मी एक घालते... "
"आणि काय?? लंगडी घालायची?? "
"इथे कोण बघतंय??"
"अगं पण चालणार कसे?? तूच घाल.. माझे सॉक्स आहेत.. "
"नको उमेश... बोचेल तुला काहीतरी..."
"आणि तुला नाही का बोचणार?? एकवेळ मला बोचलं तर चालेल.. .."
सुन्न झालेली नजरानजर! हे वाक्य?? इतकं सूचक वाक्य?? काय म्हणायचंय याला?? की तुझ्या पायांना जखम झालेली मला बघवणार नाही?? त्यासाठी माझ्या पायांना जखम झाली तरी चालेल?? का असं?
कोणतेही आढेवेढे घेण्याची वेळ राहिलेली नव्हती.. मान खाली घालून निवेदिताने सरळ उमेशचे शूज घातले.. खरच ध्यान दिसू लागली होती.. पण आता तिला स्वतःच्या दिसण्याची काळजीच नव्हती.... कारण मनात गुंजत होतं ते वाक्य.. "एक वेळ मला बोचलं तर चालेल... "... "एकवेळ मला बोचलं तर चालेल"
आपले मन पुढे चालणार्या उमेशच्या पावलांखाली उधळत उधळत मूकपणे नीतू चालत होती... तिला क्षणोक्षणी काळजी हीच होती... त्याला ठेच लागली तर??
पण सिंहगडची ती स्टेप आलीच! अगदी दोन्ही हात धरून एक पाय वर टाकून चढावे लागते ती!
अगदी काही हात हातात धरावा बिरावा नाही लागत म्हणा! पण ज्यांना इच्छा असते ते धरतात!
या दोघांना होती. पण व्यक्त करण्याची हिम्मत नव्हती.
त्यामुळे मागून येणार्या निवेदिताच्या अगदी प्रत्येक हालचालीला निरखत उमेश विचार करत होता की कधी हे वाक्य टाकता येईल..
"धरू का मी?"
आणि ते मनोमन जाणून त्याची मजा करण्यासाठी ती अगदी बेदरकारपणे ते ढगळ शूज घालून आत्मविश्वासाने एक एक पाऊल वर टाकत होती.
उमेशच्या मनात आपोआपच वैतागातून तो विचार आला..
'हिला पाहिले असते तर तानाजी घोरपड घेऊन आलाच नसता... '
पण हा विचार आत्ता मांडणे रसभंग करणारे ठरू शकले असते... काय माहीत.. एखादवेळेस चिडायची.. तिला वाटायचे की तिलाच घोरपड म्हणतोय आपण!
पण निवेदिता चिडेल या कल्पनेने त्याला आत्ताच खरेखुरे हसू मात्र आले अचानक! फस्सकन हासला आणि बावरून तिच्याकडे बघत बसला.
जी भडकली ती! पूर्ण रुसली.
होती त्याच दगडावर पाठ फिरवून बसली. चेहरा पुण्याकडे आणि पाठ गडाकडे! म्हणजे उमेशकडेही!
देखना मुझको जो बरगश्ता तो सौ सौ नाझसे
जब मना लेना तो फिर खुद रूठ जाना याद है
चुपके चुपके रात दिन....
"अगं काय झालं?? मी शूज कसे दिसतायत त्याला नाही हासलो.. कॅमेरा द्यायला तिघे आले होते म्हणून हासलो मी.. "
"मी थांबतीय.. तू वर जाऊन ये.."
"का?"
"इच्छा माझी.. "
"अगं पण झालं काय??"
"बावळट दिसतीय ना मी??"
"छे?? कोण म्हणलं??? "
"इथे किती जणं आहेत काही म्हणायला??"
"अगं पण बावळट नाहीच्चेस तू??"
"आहे की नाही तो प्रश्नच चाललेला नाहीये.. दिसतीय ना पण??"
"नाही गं बाई.. चल आता ऊठ.. "
"सॉरी... जमणार नाही.. "
" एक मिनिट.. झालंय काय मुळात ते सांगशील का??"
"तू हासलास..."
"अगं पण तुला नाही बाई हासलो मी.. "
"मग काय सर्किटसारखी कधीही हासण्याची सवय आहे तुला??"
"अगं मी हासलो ते वेगळ्याच गोष्टीला.. "
"तीच मला ऐकायचीय...."
"माझ्या मनात विचार आला की तू इतका सहज हा गड चढतीयस की तू आधी दिसली असतीस तर तानाजीने घोरपड आणलीच नसती... "
फिस्स्स्स्स्स!
नेहमी सुंदर दिसणारी मुलगी नेहमी सुंदर दिसतेच, पण रुसल्यावर खूपच जास्त... आणि.. रुसवा जाताना आणखीनच..
"चला आता.... "
"वर जाऊन काय करायचंय?? इथून बघ ना किती मस्त दिसतं.. "
'चला आता' म्हणणारा उमेश काही पावले वर गेलेला होता.. त्याचा अॅन्गल आता तिच्याशी काहीसा तिरका झालेला होता..
मूर्ती! एका अद्वितीय सुंदर मूर्तीसारखी दिसत होती ती! स्तब्ध बसलेली.. दोन्ही कोपरं स्वतःच्या गुडघ्यांवर टेकवलेली.. दोन्ही हात स्वतःच्या हनुवटीखाली.. आणि नजर हारवलेली... समोरच्या भुरळ पाडणार्या निसर्गसौंदर्यात!
झटकन पावसापासून कसाबसा वाचवलेला कॅमेरा अर्धवट पाऊस चालू असतानाच काढून उमेशने तिच्या नकळत तिची ती मुद्रा टिपली. कसे कोण जाणे पण पावसात फोटो अत्यंत क्लीअर येतात.
अप्रतीम फोटो आला होता तो!
"अगं चल... दोन मिनिटांवर दरवाजा आहे.. "
खरच भरभर चढत दोघे वर आले.. आणि दरवाजाकडे जाणार तोच..
"ए दादाSSSSSS"
बोंबला!
क्षमाचा ग्रूप इथेच थांबला होता मागच्या बाजूला!
उमेश - काय गं??
ज्योती - क्षमा कुठंय??
उमेश - तिचा क्लास होता..
ज्योती - अँ??.. कसला??
उमेश - स्पेशल काहीतरी..
ज्योती - चक्रमच आहे..
उमेश - ते माझंही केव्हापासूनचं म्हणणं आहे.. पण आमच्याकडे ते कुणाला पटत नाही..
उमेश अत्यंत वैतागलेला होता.. आता हे भेटले म्हणजे सत्यानाश झाला सहलीचा!
ज्योती - पण मग तू कसा काय आलास??
उमेश - मी चढून आलो..
ज्योती - अरे हो पण तू एकटाच कसा आलास ती नाही आणि??
उमेश - ही आहे की.. ती नाही म्हणून काय झालं?
ज्योती - ही कोण?
उमेश - ही नीता..
निवेदिता - निवेदिता.. नीता नाही...
उमेश - आता वाड्यात सगळे नीतु म्हणतात म्हणून नीता म्हणालो...
ज्योती - वाड्यातलीय का?
उमेश - होय..
ज्योती - चला मग..
उमेश - नाही... तुम्ही व्हा पुढे.. आम्ही जरा थांबतोय..
ज्योती - आम्ही तरी कुठे पुढे चाललोयत??
उमेश - म्हणजे??
ज्योती - आम्ही चाललो खाली आता..
उमेश - का??
ज्योती - गड काय बघायचा?? हजार वेळा पाहिलाय..
उमेश - मग इथे काय भजी खायला आलात??
ज्योती - ते तू कोण विचारणारा??
उमेश - कटा की मग आता??
ज्योती - कटतो हो कटतो...
सगळ्यांबरोबर ज्योती दहा पावले चालून पुढे गेली आणि पुन्हा चार पावले मागे चालत आली आणि म्हणाली..
"दादा... हे.. हे माहितीय नं वाड्यात?? .. दोघंच आलायत हे??"
उमेशने भडकून हात उगारला तशी ती खिदळत पळाली आणि पुन्हा ग्रूपला जॉईन झाली..
भडकलेल्या उमेशने अचानक मागे वळून पाहिले तर...
... ये झुके झुके नयन..
ज्योतीच्या कमेंटने जागच्याजागीच खिळली होती निवेदिता..
पुन्हा तिला न सांगता त्याने झर्रकन एक फोटो काढला तशी ती खवळली..
"तुझा नाही... तुझा नाहीSSSSS"
"दाSSSखव आधी मला.. "
"आता कसा दिसेल?? गेला तो.. "
"माझाच काढलायस.."
"अगं नाSSSही बाई.. मागच्या दरीचा काढला.. "
"माझा असला ना?? तर फाडून टाकीन.. "
"अवश्य फाड... निघायचं का आता पुढे??"
"चला.. काय सहल चाललीय.. एकाची चप्पल तुटलीय.. एक फोटो काढतोय.. पाऊस काय पडतोय.. कुणीही काय भेटतंय मधेच.. अरे चल की आता???"
वैतागलेल्या निवेदिताने मागे पाहिले तेव्हा उमेश हासरा चेहरा करून ताठ उभा होता... त्यामुळे तिला ते कळले नाही... पण...
... ती बोलत असतानाच...
... त्याच्या उजव्या पावलाला दगड बोचला होता... रक्ताची धार सुरू झाली होती..
आनंदी आनंद घडे
आनंदी आनंद घडे
छान झाला हा भाग पण.. नविन
छान झाला हा भाग पण..
नविन भागाची वाट पहातेय !
मस्त चालु आहे कथा
मस्त चालु आहे कथा
लवकर लवकर येउ दया पुढचे
लवकर लवकर येउ दया पुढचे भाग.......:)
सुंदर.. मागिल भागात
सुंदर..
मागिल भागात विनंतीवरुन प्रतिसाद दिला नाही म्हणुन हा दोन भागांचा प्रतिसाद समजावा.
मस्त..........
मस्त..........
aata jara lavkar bhaag dya
aata jara lavkar bhaag dya
देखना मुझको जो बरगश्ता तो सौ
देखना मुझको जो बरगश्ता तो सौ सौ नाझसे
जब मना लेना तो फिर खुद रूठ जाना याद है!!!!!
हयाचा अर्थ जरा सान्गाल का काय आहे तो? बरगश्ता म्हणजे काय??
सुहास शिरवळकरांचे शिष्य वाटता
सुहास शिरवळकरांचे शिष्य वाटता तुम्हि अगदी.
मानसी, बरगश्ता म्हणजे
मानसी, बरगश्ता म्हणजे नाराज.
बेफिजी, हळ्व्या आणी तरल प्रेमकथेची सुरवात तर मस्तच आहे. शेवट काहितरी वेगळा नक्किच असणार. पण आपण म्ह्णाल्याप्रमाणे, ह्या कथेचे जास्त भाग आहेत. तर प्रति़क्षेत. किति पण मोठी असलि कथा तरि पण नक्किच आवडेल.
मस्त
मस्त
छान !!
छान !!
तुम्हे याद हो के न याद हो -
तुम्हे याद हो के न याद हो - बेफ़िकीर
भाग 25 ते 31 सापडत नाहीत.
प्लिज मला कुणीतरी लिंक द्या...
प्लिज
प्लिज
प्लिज
प्लिज
प्लिज
वाह... वाह... फार सरल आणि
वाह... वाह... फार सरल आणि मैत्री आहे पण थोडीशी रोमँटिक कडे होत जाणारी फीलिंग... भूतकाळात हरवलं माझं मन... सगळा सिंहगड आम्ही दोघे चढलो होतो ते डोळ्यासमोर आलं... काय सांगू अजून... डोळ्यातल्या पाण्यामुळे अजून लिहू शकत नाही... खूप दिवसांनी नॉस्टॅल्जिक झालं...
तुम्हे याद हो के न याद हो -
तुम्हे याद हो के न याद हो - बेफ़िकीर
भाग 25 ते 31 सापडत नाहीत.
प्लिज मला कुणीतरी लिंक द्या...
प्लिज
प्लिज
प्लिज
प्लिज
प्लिज