१)जर कोलंबी सुकी करायची असेल आणि कोलंबी एकदम ताजी असेल तर तिला न सोलता फक्त शेपटी आणि टोक्याचा थोडा भाग काढुन मधले पाय काढायचे व कोलंबी स्वच्छ धुवुन घ्या.
२) धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण्-मिरची-कोथिंबिरच वाटण चोळा. थोडी मुरवलीत तर अजुन छान.
३) भांड्यात तेल करम करुन लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळा.
४) कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन थोडे परतवा.
५) आता ह्यावर कोलंबी घालुन ती परतवा.
६) नंतर भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी शिजु द्या. मधुन मधुन ढवळा.
७) थोड्या वेळाने झाकण काढून त्यात कैरी/कोकम व मिठ टाका आणि परतवा.
८) परत झाकण ठेउन वाफ येउ द्या. ५ मिनीटांत कोलंबी तयार. कशी दिसतेय ? घाबरु नका लाल रंग दिसतोय तेवढी ती तिखट नाही.
तळलेली कोलंबी
१) कोलंबीची साले काढा किंवा वरील प्रमाणे ठेवा.
२) सोललेल्या कोलंबीला मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावा वेळ असेल तर थोडी मुरु द्या.
३) तवा गरम करुन त्यावर तेल सोडून कोलंबी शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवा.
४) कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणुन गॅस मिडीयम पेक्षा कमी ठेउन चांगली शिजु द्या. ७-८ मिनीटांनी पलटुन गरज वाटल्यास थोड तेल टाकुन परत शिजवुन गॅस बंद करा.
ही लहान मुलांच्या हाताला लागली तर तुमच्या वाट्याला येण्याचे चान्सेस कमी आहेत.
कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील.
कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.
लाल कोलंबी
करपाली मिळाल्या की त्यांची वेगळी रेसिपी टाकेन.
कोलंबीचे कालवणही टेस्टी होते. त्यातही कांदा घालावा लागतो. वाटण ऑप्शनल असते. पुरवढ्यासाठि कालवणात बटाटा, दुधी,लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा टाकतात.
कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजुन बरेच प्रकार कोलंबी पासुन करता येतात.
जर कोलंबी जास्त जाड असेल आणि सोलली असेल तर त्यातील काळा धागाही काढतात. साला सकट कोलंबी जास्त रुचकर लागते. खाताना तिचे साल चावण्यात मजा येते.
कोलंबी जास्त प्रमाणातही खाउ नये बाधण्याची शक्यता असते. पथ्यात कोलंबी वर्ज असते.
कोलंबी साफ (डिवेन) नकरता
कोलंबी साफ (डिवेन) नकरता शिजवली तर बाधत नाहि का? शिवाय सालासकट शिजवलेली खाणं म्हणजे दिव्य. काहि प्रकारात (श्रिंप कॉक्टेल, टेंपुरा) साफ करुन, शिजवुन/तळुन फक्त शेपटी ठेवतात जी खाताना सहज काढता येते. सालासकट शिजवलेले क्रॉफिश पाहिले आहेत... श्रिंप नाहि.
अहाहा. कोलंबीचे सुके काय मस्त
अहाहा. कोलंबीचे सुके काय मस्त दिसतेय. यम्मी.
तिखट जास्त नाही तर ते इतकं लाल का दिसतय?
त्या मुटकळं का करतात?<<<<
राज क्रॉफिश / क्रेफिश खातात
राज क्रॉफिश / क्रेफिश खातात का?
<< शिवाय सालासकट शिजवलेली
<< शिवाय सालासकट शिजवलेली खाणं म्हणजे दिव्य. >> मला वाटतं सालासकट शिजवतात पण खाताना मात्र साल काढतात. वसई-विरार- अर्नाळा भागातही अशाप्रकारे कोलबी शिजवतात व त्यामुळे अधिक चविष्ट लागते. अर्थात, << कोलंबी साफ (डिवेन) नकरता शिजवली तर बाधत नाहि का? >> हा मुद्दा उरतोच.
कोळंबीची रसाची [नारळाच्या ] आमटी हाही कोकणातला आवडता प्रकार. खोबरेल तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा किंचित परतून घ्यायचा, त्यावर साफ केलेली कोळंबी व थोडं खोबरं, थोडे धणे, सुक्या मिरच्या , हळद याचं जाडसं वाटप टाकायचं व नीट परतून घ्यायचं. मग मीठ, चिंचेचा कोळ व नारळाचा रस टाकून मंद आंचेवर, मधून मधून ढवळून, कोळबी शिजवून घ्यायची. ही आमटी [ कालवण] आंबटसर व्हायला हवी व शिजल्यावर कांही वेळ तरी कोळंबीचा स्वाद त्यात उतरण्यासाठी ती तशीच ठेवावी. [ सकाळी करून संध्याकाळी जेवणाच्या वेळी गरम करून ब्येष्ट लागते ] .
कोळंबी साफ करताना फक्त डोक्याकडचा सालासकटचा भाग वेगळा ठेवायचा. स्वच्छ धुवून त्याला हळद, किंचित मीठ, तिखट लावून, पीठात घोळवून तळून काढायचा. कुरकुरीत, चविष्ट भजी तयार !
जागूजी, तुम्हाला मानतोच पण वैसे हम भी कुछ कम नही !
जागू मालवण सुद्धा कोलंबी खूप
जागू मालवण सुद्धा कोलंबी खूप भेटते आहे त्यामुळे तू आता माश्याकडून कोलंबी कडे वळलीस वाटते. पहिला फोटो आहे त्यात खाली जमीन शेणाने सारवलेली दिसते आहे तू गावी काढले आहेस का हे फोटो. मी विचारीन विचारीन म्हणतो तुजा गाव कुठला ग.
कोलंबीची भजी, मसाला कोलंबी,
कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजुन बरेच प्रकार
जागू तू ईतक्या प्रेमानं
जागू तू ईतक्या प्रेमानं बनवलेले सगळे.. प्रेमाची का कधी किंमत करता येते
अग मी प्रेमाची किंमत नाही सांगितली ग कोलंबीची सांगितली. मला माहीत आहे तु पण माझ्यावरच्या प्रेमापोटी काही बारगेनिंग नाही करणार
आदिती
अखी पोतडीत किती अजुन शिल्लक आहेत ते मलाही माहीत नाही पोतडीत मी हात घालतल्यावर जे बाहेर निघते ते तुमच्यासमोर टाकते. पोतडीत मी पाहू शकत नाही त्यामुळे सांगता येत नाही आकडा.
नीलु, अंजू मी इमॅजिन करतेय मायबोलीचे महाभोजन
राज सालासकट कोलंबीतील सालही सहज काढता येते. ते खायचे नसतेच. पण साल ठेवल्याने कोलंबी दम होउन शिजते त्याचा एक वेगळा स्वाद येतो. कोलंबी पुर्ण शिजल्यावर बाधायचा प्रश्नच नाही.
सावली अग माझा मसाला आत्ताच केलाय ना. अजुन त्याचा रंग ताजा आहे म्हणून लाल जास्त दिसतोय.
भाउ आहो तुम्हालाही मानलच. आणि तुम्हाला मी आधिच्या पोस्ट मध्ये मान दिलाय त्याचा आशिर्वादही द्या.
महेश मी उरणला राहते. तो फोटो मुरुडला काढलेला आहे. आम्ही मुरुडला पिकनिकला गेलो होतो तेंव्हा तिथे आम्ही तिथे कोलंबी, पापलेट विकत घेउन एका वाडीत जेवण केले होते.
चातक तरीच म्हटल तुझा बाहुला कसा आला नाही.
नायजेरियात पण प्रॉन्स भरपूर
नायजेरियात पण प्रॉन्स भरपूर मिळतात. तिथे टिनमधे भरण्याचा पण उद्योग चालतो. व्यवस्थित साफ वगैरे करुन टिनमधे भरलेली असते.
फ्रेंच लोक, त्या कोषाचे (कवचाला कोषच म्हणतात ना ?) सूप आवडीने पितात. त्यात क्रिम अन केशर वगैरे घातलेले असते.
कोलंबीची शेती पण आता करतात. कर्जतला बघितली होती. त्यात इतकी कोलंबी होते, कि हाताने पकडता येते. नैसर्गिक शत्रु नसल्यनए भरपुर मोठी होते.
मुंबईला पण पुर्वीचे ड्राइव्ह इन थिएटर होते, त्याच्या मागच्या बाजूला मस्यशेती करतात असे वाचले होते.
कोलंबीला पाठीवर चीर देऊन
कोलंबीला पाठीवर चीर देऊन डीवेन करता येते. बाकी कवच तसेच ठेवायचे. कवचाचा मस्त स्वाद उतरतो कालवणात.
सावली, क्रेफीश मस्त लागतात.
जागु तुझ्या सल्ल्याचा विचार
जागु
तुझ्या सल्ल्याचा विचार करेन जरूर..
जागुतै प्रचि लोड होत
जागुतै प्रचि लोड होत नव्हते....आणि ते लोड झालेच तर बाहुले लोड होत नव्हते....अरेरे.
त्या ८ व्या प्रचितल्या 'भांड्यात बुचकाळा मारुन तोंडात भरावास वाटतोय'
जागु अग कसलं तोंपासु प्रकरण
जागु अग कसलं तोंपासु प्रकरण आहे हे.
माझी आई कोलंबीचं लिपतं, कोलंबीची खिचडी, कोलंबीचं लोणचं अप्रतिम करते.
<< कोलंबीची शेती पण आता
<< कोलंबीची शेती पण आता करतात. >> दिनेशदा, कोकणात आता बर्याच ठीकाणी अशी पद्धतशीर शेती [प्रॉन कल्चर ] करतात, थायलंडसारख्या देशातील तंत्रज्ञानही वापरून.
धन्यवाद जागु. >>राज क्रॉफिश
धन्यवाद जागु.
>>राज क्रॉफिश / क्रेफिश खातात का? <<
हो. पण शेल काढलेले. बीस्क किंवा जंबलाया मध्ये घातलेले. सगळे शेलफिश (क्रॉफिश, लॉबस्टर, क्रॅब) चवीला जवळ्-जवळ सारखेच लागतात.
दिनेशदा, भाऊ आमच्या आसपासच्या
दिनेशदा, भाऊ आमच्या आसपासच्या गांवांमध्येपण कोलंबीची शेती करतात.
स्वाती, दक्षीणा, चातक, मामी, राज
<< भाउ आहो तुम्हालाही मानलच.
<< भाउ आहो तुम्हालाही मानलच. आणि तुम्हाला मी आधिच्या पोस्ट मध्ये मान दिलाय त्याचा आशिर्वादही द्या. >> जागूजी, भरभरून दिला आशिर्वाद... पण फक्त वयाच्या अधिकाराने, या क्षेत्रातील अधिकाराने नाही; इथं तुम्हाला माझाच सलाम !
यालाच 'सोडे' असेही म्हणतात
यालाच 'सोडे' असेही म्हणतात काय्?सातार्याला पाहीलेय..
भाउ धनश्री सोललेल्या
भाउ
धनश्री सोललेल्या कोलंबीला सोडे म्हणतात. ह्या सोललेल्या कोलंब्या सुकवलेल्या बाजारात मिळतात त्यांनाही सोडे म्हणतात.
ओहो.. असे आहे होय...
ओहो.. असे आहे होय...
जागू, मस्त रेसिपी.. फोटो पण
जागू, मस्त रेसिपी.. फोटो पण मस्त. अगदी अशीच सुकी कोलंबी - कांदा वगैरे घालून करून बघावी असे अनेक दिवस डोक्यात होते. आणि तुम्ही रेसिपी टाकलीत. thanks.. आता तर करणारच..
तुमच्या सगळ्याच रेसिपी वाचते.. छानच असतात. सारख्या तुमच्या रेसिपी वाचून वाचून आणि फोटो बघून मासे खावेसे वाटले..
गेल्या वीकेंडलाच पापलेट केली होती..
या वीकेंडला, कोलंबी नक्की झाली..
धन्यवाद.
आणि ते स्पेशली कोकम / कैरी
आणि ते स्पेशली कोकम / कैरी घालून.. अगदी राहवत नाही. उद्याच करते.
मानसी आनंद वाटला तुमची पोस्ट
मानसी आनंद वाटला तुमची पोस्ट वाचुन.
जागूतै, वीकेंड ला कोलंबी
जागूतै, वीकेंड ला कोलंबी बनवली होती. छान झाली होती. सही रेसिपी सांगितलीस. धन्यवाद.
मानसी धन्स.
मानसी धन्स.
वॉव......कोलंबी च्या
वॉव......कोलंबी च्या कालवणातल्या न सोललेल्या कोलंबीच्या डोक्याला दाबल्यावर जे पाणी निघते त्याची चव आठवुन आता लाळ जमा झालीय..पण ऑफिसात असल्याने टपकवु नाही शकत......सोललेल्या पेक्शा अशिच दोन्ही हातांनी सोलत सोलत जेवायची मज्जा औरच...आई सांगते डोक्याजवळच्या भागात अंड असते...काय माहित मला तर कधी दिसलं नाही....:)
तोंपासु.
तोंपासु.
वा..
वा..
Pages