Submitted by supriya19 on 14 July, 2008 - 14:06
मी प्रथमचं माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. २२ तासाचा प्रवास असल्याने खुप टेंन्शन आलयं. क्रुपया काही tips देउ शकाल का? तिला coloring ची आवड फारशी नाहि. पुस्तके नेईन मी. अजुन काही tips?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या
माझ्या लेकाबरोबर भारतातून परतचा प्रवास. कुणीतरी दिलेलं कॅडबरी खाल्लेलं, शिवाय कोक प्याला... (एकटीचा पहिला प्रवास... माझा गाढवपणा. इतर सगळं नीट आहे ना ते बघण्यात महत्वाचं ते राहिलं)
मग जी काय धम्माल केली त्यानं... जवळ जवळ दीड तास त्याला मैदानी खेळ खेळायचे होते.. तिथे वरती. आणि मी त्याला एका जागी बसवण्याच्या खटपटीत.
हाय ऑन कॅफीन आणि शुगर! हा शोध नंतर मला लागला. पण तोपर्यंत ह्या दोन्हींमुळे आधी मला दमवून मग जो झोपला तो आठ तास गुडुप!
आईशप्पथ, काय करू नकोस ते सांगितलं
बरं आठवलं..... ए, एन्जॉय कर गं (बघ काय कर ते पण सांगितलं की नाही?)
धन्यवाद
धन्यवाद दाद. "काय करू नकोस ते सांगितलं"!!
मी पण
मी पण माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. मी त्या दिवशी तिला आधी पूर्ण वेळ daycare मध्ये ठेवणार आहे म्हणजे दमेल आणि झोपेल. दुसरं म्हणजे पुढची जागा मिळाली तर तिला खाली जरा तरी खेळता येईल. पुस्तकं, आवाज न करणारी खेळणी हे तर आहेच.
प्राजक्ता
मी माझ्या
मी माझ्या १९ महीन्या.न्च्या लेकीला घेऊन सि.न्गापूर एअर्लाइन्स ने भारतात जात्येय. तिच्यासाठी इन्फ.नट पोस्ट व्हीनी.न्ग मील रिक्वेस्ट केल आहे. कोणाला कल्प्ना, अनुभव आहे का की काय जेवण देतात? आणि मी सोबत काय काय घेऊन जाऊ? प्लीज लवकर मदत करा...
लाजो सिंगा
लाजो
सिंगापूर एअर लाईन चा अनुभव नाही . पण अमेरिकेतून ब्रिटिश एअर, लुफ्थान्सा ने भारतात अन अमेरिकेत इतर ठिकाणी फिरण्याचा अनुभव आहे. त्यावरून तरी मी म्हणेन की तिच्या जेवणाचे प्रकार शक्यतो सगळे स्वतःच न्यावेत.
पराठे , पोळी , इडल्या, तूप मीठ भात , पीनट बटर सॅन्डविच यातलं काही नेता येईल. पराठे /पोळी चोवीस -छत्तीस तास व्यवस्थित रहातात.
लंच बॅग मधे कूल पॅक ( जेल चा मिळतो तो ) घालून न्यावा. विमानात काही वेळा त्यांच्या फ्रीजमधे आपलं सामान ठेवू देतात . काही वेळा ते जमत नसेल तर बर्फ देतात. प्लॅस्टिक बॅग मधे बर्फ गुंडाळून तो लंच बॅग मधे ठेवता येतो.
चिरिओ, सिरियल बार, पॉप टार्ट, चीझ क्रॅकर्स, पुडिंग चे कप्स, गोल्ड फिश , ओरिओ कूकीज , ज्युस चे एखाद दोन बॉक्स हे सगळं रेफ्रिजरेशन न लागणारं खाणं नेहेमी बरोबर असू द्यावं .
मधे कुठे हॉल्ट असेल तर तिथे दही/ क्रॉसाँ असं घेता येईल. विमानात जर त्यांनी दिलेल्यातलं काही लेकीने खाल्लंच तर तो बोनस समजावा.
प्लॅस्टिक
प्लॅस्टिक बॅग मधे बर्फ गुंडाळून तो लंच बॅग मधे ठेवता येतो >>> किंवा reusable ice packs मिळतात ते आणि त्याची बॅग असे नेता येइल. असे- http://www.buygreen.com/bentosleeve.aspx
गेल्यावर्
गेल्यावर्षी सव्वा वर्षाच्या लेकाला घेऊन जातानाचा प्रवास एकटीने केला होता. त्याचं नेहमीचं खाणं पिणं जवळ ठेवलं होतं. तो दूध जास्त प्यायचा त्यामुळे टेट्रा पॅक्स जवळ ठेवले होते. शक्यतोवर फ्लाईट मधलं नवीन खाणं ट्राय करु नकोस.तिचं पाणी वगैरेही ठेवशीलच जवळ. त्याशिवाय नेहमीची खेळणी,जी फार वजनदार नाहीत्,आवाज करत नाहीत. तीही ठेव जवळ. तिचा शक्य तितका वेळ झोपण्यात जावो ही शुभेच्छा.
लॅपटॉप अन
लॅपटॉप अन मुलांच्या आवडीच्या डीव्हीडी सुद्धा असू द्याव्यात बरोबर. किंवा छोटा डीव्हीडी प्लेयर .. टॉम ऍण्ड जेरी , बेबी आइनस्टाइन, थॉमस, बॉब- वेंडी इत्यादी ..
मी पण
मी पण म्हणेन की डिव्हिडि ने सोबत. खाणे म्हणशील तर त्याना ते विमानात खायला देतात तेच हवे असते तेव्हा थोडे बिस्कीटं सफिशीएंट आहेत. माझा मागच्या वर्षीपासुन ३ वार्या झाल्या त्यात हाच अनुभव आहे. एअर इंडीयाने जात असशील तर ते जे देतात ते २ वर्षांची मुले सहज खावु शकतात. परत ते लहान मुलांसाठी कुकीज, दुध मुब्लक प्रमाणात ठेवतात. शेवटचे सीट असेल तर ज्युस सोबत ठेव. आपल्यापर्यंत येईपर्यंत कधी कधी संपतो आणि मुले नेमके तेच मागतात. आत्ता येताना आणि जाताना माझ्या ३ वर्षाच्या मुलाने बाल गणेशा पाहिला आणि खुश होता.
तुझे फ्लाईट नॉनसस्टॉप असेल तर १३च तास लागतात जायला आणि यायला १६.
छे ग
छे ग प्रिती. कुठे १३ तास? नॉनस्टॉप फ्लाईट असेल(एअर इंडिया-न्यूयॉर्क) तरी १५/१६ तास नक्कीच लागतात. काँटिनेंटललाही तेवढेच.
डीव्हीडी प्लेअर नेण्याची आयडीया चांगली आहे. गेल्या वेळी मुलगा लहान होता माझा पण मुलीला माझ्या आयपॉड वर टिव्ही सिरीज टाकून दि्ल्या होत्या आवडीच्या. तिचा वेळ छान गेला.
हाय शोनू,
हाय शोनू, सिंडी, सायो आणि प्रिती. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
मी कॅनबरा हून सकाळी ७ वाजता निघेन. वाटेत सिडनी आणि सिंगापूर ला अडीच अडीच तास आहेत. मुंबई ला पोहोचे पर्यंत जवळ जवळ २४ तास प्रवास होइल.
मी सोबत इडली, धीरडे अस तिचे आवडते २-४ प्रकार घेणार आहे. चिरीओज, बिस्किट, राइस्/फ्रुट बार, चीज, बेदाणे इ इ पण घेणार आहेच. उकळलेल पाणी आणि ज्युस पण घेईनच. मला जास्त काळजी तिच्या दुधाचीच आहे. तिला मी uht milk ची सवय करत्येय. uht milk चे छोटे कार्टन्स नेता येतात का?
लेकीला ड्रॉईंग ची आवड आहे आणि पुस्तक - चित्र बघायला पण आवडत. त्यामुळे ते सामान पण घेणार आहेच. ipod वर तिच्या आवडीची २-४ कार्टुन्स पण टाकली आहेत. अजुन काही सुचत असेल तर प्लीज सांगा...
परत एकदा थँक्यु...
लाजो, तुला
लाजो,
तुला सगळ्यां जाणकार व्यक्तींनी सल्ला दिलाच आहे , मला काही जास्त अनुभव नाही.पण तरीहि मी ही काही सांगते...
मी भारतातून येताना माझा मुलगा १४ महिन्यांचा होता. तु Gerber Products ,ज्युस घेऊ शकतेस जर तुझी मुलगी खात असेल तर्.कारण ते डिस्पोजेबल असल्याने बरे पडते, तसच त्यात बरेच व्हरायटी ई इळून जाईल तुला.टेट्रा मिल्क घे पण फ्लाइत मध्ये पण मिळेल तुल मिल्क्.चिरमुरे, गोड बडीशेप असही टाइमपास, मुलांना गप्प बसायला घेऊ शकतेस. (माझा मुलगा त्यात २०-३० मिनीटे रमतो).नी बुक्स, कार्टुन फिल्म तर घेणार आहेस च तु.soft toys ची सवय असेल तर एखादं बरोबर टाक्.Kellog's चोकोचिप्स (इकडे नेमके काय मिळत माहित नाही) वगेरे असं काही घेऊ शकतेस...
Don't worry ...एवढा काही त्रास होत नाही..आपल्यांला च tension येते, पण मुलं रमतात...
So Njoy ur Trip...Best Luck
लाजो,
लाजो, मिल्क कार्टन्स(स्नॅक साईझचे) नेता येत नाहीत असं ऐकलं होतं. पण मी हँड बॅगेत तर पूर्ण प्रवासाचा स्टॉक ठेवला होताच आणि चेक ईन बॅगेजमध्येही पूर्ण इंडिया ट्रिपला पुरेल एवढा स्टॉक होता. भारतातही बाहेर जाताना तोच घेऊन जायचे. एकतर घेऊन जायला सोप्पा आणि दूध नासायची भिती नाही. रिकाम्या दुधाच्या बाटल्या घेतल्या बरोबर की झालं.
मी म्हणेन की फ्लाईटमध्ये हे मिळेल नी ते मिळेल ह्यावर फार अवलंबून न जाता आपल्याबरोबर घेऊन जाणं बरं.
छे ग
छे ग प्रिती. कुठे १३ तास? नॉनस्टॉप फ्लाईट असेल(एअर इंडिया-न्यूयॉर्क) तरी १५/१६ तास नक्कीच लागतात>>मी आत्ताच ४आठवड्यांपुर्वी जावुन आले. त्यांनी फ्लाईंग टाईम १३तास ४०मि सांगितला आणि आम्ही ४०मि आधी पोहोचलो.
सांग बरं
सांग बरं कोणती फ्लाईट. पुढच्या वेळी करेन चौकशी.
काँटिनेंट
काँटिनेंटल ने गेले होते गेल्या वर्षी. नेवार्क - मुंबई विमान प्रवास (टेलविंड उत्तम असल्यास) १३ तासात होतो. आमचा झाला.
मुलांनी अज्जीबात पाहीली नसलेली खेळणी, पुस्तकं, मॅजिक पेन वगैरे न्यावेत. नेहमीच्या खेळण्यांपेक्षा जास्त वेळ रमतात नवं बघून.
खाण्यापीण्याचं नेणं हे प्रत्येकाच्या पिल्लाच्या सवयीवर अवलंबून आहे. आवडणार्या आणि नेता येऊ शकाल अश्या गोष्टी जरूर न्याव्यात. जास्त नट्स किंवा ड्राय फ्रुट्स देऊ नयेत. (झोपण्याच्या विचित्र वेळा आणि सुका मेवा हे काँबिनेशन असलं की काही वेळा लहान मुलांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.) पाणी आणि लिक्विड्स भरपूर द्यावीत. त्यामुळे जेटलॅगचा त्रास कमी होतो.
लाजो,
लाजो, मिल्क कार्टन्स(स्नॅक साईझचे) नेता येत नाहीत असं ऐकलं होतं. पण मी हँड बॅगेत तर पूर्ण प्रवासाचा स्टॉक ठेवला होताच आणि चेक ईन बॅगेजमध्येही पूर्ण इंडिया ट्रिपला पुरेल एवढा स्टॉक होता. >>>> आश्चर्य आहे. मला तर पेडिआ लाइटची लहान बाटली पण भांडुन-भांडुन नेता आली
खेळणी, पुस्तकांच्या बाबतीत मृ ला मोदक.
मी डेल्टाने गेले होते गेल्या वर्षी, तेरा की साडे तेरा तास
मी म्हणेन की फ्लाईटमध्ये हे मिळेल नी ते मिळेल ह्यावर फार अवलंबून न जाता आपल्याबरोबर घेऊन जाणं बरं >>> तुला पण मोदक गं
सांग बरं
सांग बरं कोणती फ्लाईट. पुढच्या वेळी करेन चौकशी.>>AI140
मी म्हणेन
मी म्हणेन की फ्लाईटमध्ये हे मिळेल नी ते मिळेल ह्यावर फार अवलंबून न जाता आपल्याबरोबर घेऊन जाणं बरं >>फ्लाईट रात्री असेल तर ८-९ तास झोपण्यात जातात आणि उरलेले ४-५ तास पटकनच निघुन जातात. खुप जास्त सामान नेण्याने बराच त्रास होतो. २ वर्षाची मुले कधी कधी कडेवरच घे म्हणतात आणि ती भली मोठी बॅग आणि मुल घेवुन अवघड होते. आणि मुले जास्त प्रवासात खात नाहीत. मला तर मुंबईला आत्तापर्यं एअर इंडियाने नेहमीच अनुभव आहे, कुठेतरी लांब विमान थांबवतात आणि बसने एअरपोर्टवर सोडतात, अश्या वेळी खुप हाल होतात. म्हणुन एकाच पुलमॅन सॅक बरी पडते आणि गळ्यात अडकवुन एक छोटी पर्स ज्यात पासपोर्ट आणि तिकीटे ठेवता येतील, जेणे करुन मुल कडेवर असले तरी सहज काढता येतील.
सुप्रिया,
सुप्रिया, आणखीन एक गोष्ट. इथून जाताना गेटवर स्ट्रोलर द्यावा लागता पण तिथे पोचल्यावर तो गेटवर्च मिळत नाही. बॅगेज क्लेममध्ये ताब्यात येतो.जपानमध्ये फ्लाईटमधून बाहेर येताना दारातच स्ट्रोलर हातात यायचा. तेव्हा हातात सामान घेताना मुलीला कडेवर घेऊन्,हातात सामान घेऊन बॅगेज घ्यायचंय ही गोष्टही लक्षात ठेव.
प्रीती,
प्रीती, तिचा प्रवास रात्रीचा नाहीये तर सकाळी सात वाजता सुरु होणार आहे. तसेच दोन थांबे आहेत मधे. रात्रीचा प्रवास असेल तर तु म्हणतेस ते बरोबर.
सायो, मी हेच टायपणार होते आत्ता
मधल्या थांब्यांवर स्ट्रोलर गेटवर मिळतो. फक्त भारतात पोचल्यावर तो बॅगेज क्लेम मधे येतो. जर अंब्रेला स्ट्रोलर असेल तर तो आपल्यासोबत राहु देतात.
ब्रिटिश
ब्रिटिश एअर एकदम भंगार स्ट्रोलरच्या बाबतीत. विमानाच्या गेटपाशी घेतात अन मारे हसून हसून सांगतात ' अगदी इथ्थेच अस्साच परत मिळेल' . पण मधल्या स्टॉपवर तर देत नाहीतच, शेवटच्या एअरपोर्टवर सुद्धा बॅगेज क्लेम पाशी मिळतो.
बर्लिन-लंडन- फिली ; फिली -लंडन- फ्रँकफर्ट; लिस्बन-लंडन्-फिली ; फिली-लंडन्-मुंबै अन परत अशा अनेक प्रवासात हाच अनुभव. इतरांकडूनही हेच ऐकलंय. लंडनमधे बाळं घेऊन सामानाचं ओझं वागवत टर्मिनल बदलणे म्हणजे काय दिव्य आहे ते ज्यांनी केलंय त्यांनाच माहीत.
लुफ्थांसा,एअर फ्रांस पुष्कळ बर्या. अमेरिकेत फिरताना मात्र खरोखर गेटपाशी मिळतो स्ट्रोलर! ओर्लँडोच्या एअरपोर्टवर तर प्रत्येक फ्लाइटबरोबर अर्धा डझन तरी स्ट्रोलर असतात पण व्यवस्थित गेटपाशीच परत मिळतात.
काल आमच्या
काल आमच्या बॅगा भरत होते तेंव्हा लक्षात आलेल्या अजून काही गोष्टी.
लाजो कदाचित पोचली पण असेल भारतात पण इतरांना मदत होईल म्हणून
१. मुलांचे एक जोड कपडे, एक जोड नाइट सूट अवश्य बरोबर ठेवावे. प्रवासात बरेचदा अंगावर काही सांडतं, उलटी होते. छोटा एखादा बॉडी स्प्रे बरोबर ठेवावा. मोठ्यांकरता ही एखादा टीशर्ट, शर्ट जास्तीचा ठेवावा.
२. विमान टेक ऑफ करताना अन उतरताना कानात दडे बसतात. अशावेळी काहीतरी चावत राहिल्याने त्रास कमी होतो. अगदी लहान बाळांना पॅसिफायर देता येतो अन थोड्या मोठ्या मुलांना चिंगम देउ शकतो. पण दीडएक वर्षाच्या आसपासच्या मुलांना चिंगम चघळायला पण जमत नाही. या वयाच्या मुलांना गम्मी बेअर्स किंवा इतर गम्मी स्नॅक्स देऊ शकता. हे प्रकार चावत -चघळत राहिल्याने कानात दडे बसत नाहीत किंवा कमी बसतात.
प्रवासात अनंत अडचणी येऊ शकतात . ' यह भी दिन जायेगा' या मंत्राचा जप करत रहावा
शोनू, कधी
शोनू, कधी जाते आहेस?
>>>यह भी दिन जायेगा' या मंत्राचा जप करत रहावा
किंवा उद्या सकाळी आईच्या हातंच आयतं खायचं आहे ह्याची स्वप्न बघावीत म्हणजे प्रवासाचे तास लवकर संपतील. मी न केलेल्या खरेदीची स्वप्नं बघते. तास ढकलायचं बळ येतं.
सख्यांनो
सख्यांनो खूप खूप धन्स. खूप मदत होत्येय तुमच्या सुचनांची आणि आयडीयाजची. जरा टेंन्शन कमी झालय. मी अजून इथेच आहे. शुक्रवारी निघत्येय. सिंगापूर एअर्लाइन्स ला फोन करून स्ट्रोलर बद्दल विचारलय. अंब्रेला स्ट्रोलर ते मधल्या प्रत्येक स्टॉप वर देतात. खायला फ्रुट सॅलड, चिकन, कूक्ड व्हेजीज अस देतात.
<<१. मुलांचे एक जोड कपडे, एक जोड नाइट सूट अवश्य बरोबर ठेवावे. प्रवासात बरेचदा अंगावर काही सांडतं, उलटी होते. छोटा एखादा बॉडी स्प्रे बरोबर ठेवावा. मोठ्यांकरता ही एखादा टीशर्ट, शर्ट जास्तीचा ठेवावा.>> हो मी ठेवल्येत एक्स्ट्रा कपडे. लहानपणी आईचे बघुन सवयच झाली आहे. आधी एकट्याने प्रवास करायचे तेव्हा सुदधा ठेवायचे मी एक सेट वरच्या हँडबॅगेत. आणि सोबत एखादा पातळ पंचा पण असतो.
<<विमान टेक ऑफ करताना अन उतरताना कानात दडे बसतात. अशावेळी काहीतरी चावत राहिल्याने त्रास कमी होतो.>> लॉलीपॉप सुद्धा चलतो म्हणतात. मी लहान मुलांच्या एका साईटवर वाचल की विमानात जे ज्युस प्यायला डिस्पोजेबल कप्स देतात ते कानावर ठेवायचे त्यामुळे दडे कमी बसतात. प्रयोग करून बघायला हरकत नाही...लेक शांत बसली तर ठीक नाहीतर कानावर कप ठेवले की तिला वाटायच खेळच खेलत्येय...
<<यह भी दिन जायेगा' या मंत्राचा जप करत रहावा
किंवा उद्या सकाळी आईच्या हातंच आयतं खायचं आहे ह्याची स्वप्न बघावीत म्हणजे प्रवासाचे तास लवकर संपतील. मी न केलेल्या खरेदीची स्वप्नं बघते. तास ढकलायचं बळ येतं. >> अगदी अगदी...
मुंबई विमानतळावर हल्ली सिक्युरीटी खूप टाईट आहे म्हणे. माझा भाचा २ आठवड्यापूर्वी पोचला, त्याना टारमॅक वरच उतरवले आणि बस ने तळावर पोचवले. लोक इतकी घाई गडबड करतात की लहान मुले, म्हातारे यांचे हाल होतात म्हणे. तिकडे सामान घ्यायला बेल्टजवळ पण धक्का बुक्की करतात.... दुसर्याच कुठल्या तरी एक्झीट ने बाहेर काढले... बघू अता आम्हाला कुठे पाठवतायत???
अरे वा! मी
अरे वा! मी ह्याच चिन्तेत होते पण तुम्हा सगळ्यान्ची मदत वाचुन हायसे वाटले..तनिष्का, माझी लेक, प्रथमच भारतात जाणार आहे तेव्हा 'travel immunization' पण करणार आहे.
लाजो, तुमचा अनुभव जरूर कळवा..'DOs and DON'Ts' उपयोगी येतील.
नमस्कार
नमस्कार सज्जन हो..
मी भारत वारी करून परत आले. नेहमी प्रमाणे मस्तच झाली ट्रीप. लहान लेक होती त्यामुळे थोडी उंडारायची रिस्ट्रीक्शन्स होती पण तरी जमेल तेव्हडी मजा करून आले. आईच्या, ताईच्या हातच भरपूर खाऊन आले. लेकीनेही ऐश केली. लकीली तिला विमानाचा काहीही त्रास झाला नाही. भरपूर झोपा काढल्यान. घरी सुद्धा खाण्-पीण, गाईच दूध (वारणा) सूट झाल.
मी जाताना इथुन long life milk चे २२५ml चे कार्टन्स घेऊन गेले होते प्रवासात देण्यासाठी. कुठेही काहीही अडचण न येता नेता आले आणि भारतातून येताना सुद्धा आणता आले. खरतर Australian customs भयंकर strict आहेत दूग्धजन्य पदार्थ, खाण्या-पीण्याच सामान या बाबतीत, पण baby food म्हंटल्यावर काहीही त्रास दिला नाही. सिंगापूर एअरलाईन्स आणि विमानतळावर पण security मधे काहीही अडवल नाही. त्यामुळे देवाच्या क्रुपेने सगळा प्रवास निर्विघ्न पार पडला.
एव्हढ मात्र करायच की जे काय घेऊन जाताय किंवा येताय ते डिक्लेअर करायच. औषध वगैरे असेल तर त्याची आपल्या डॉक्टर कडून certificates घ्यायची की ही प्रिस्क्रिप्शन मेडिसीन्स आहेत म्हाणून. लहान मुलांच्या लिक्विड्सना १०० मिली च रिस्ट्रक्शन नसत (cabin baggage) पण म्हणून २ लिटरची बाटली न्यायची नाही. जेव्हढ आवश्यक आहे तेव्हढच न्या. पण पाणी मात्र भरपूर ठेवा. मी १ बाटली पाणी आणि दुसरी बाटली बर्फ करून नेली/आणली होती. पूर्ण प्रवासात पूरली. खाण्याच्या ताज्या पदार्थाच्या बॅगेत जेल पॅक्स ठेवले होते.
अगदी लहान मुलांचे खाणे मात्र विमानात जवळ ठेवा. जे इन्फंट मील म्हणून देतात ते माझ्या लेकीने अजिबात उष्टवले नाहीन. नुसत्या उकडलेल्या मॅश्ड भाज्या/चिकन... पण मुंबई-सिंगापूर प्रवासात नूडल्स होत्या त्या मात्र 'गिळल्यान'... मी इथुन जाताना मिनी इडल्या, गोडाचा शीरा करून घेतला होता. आणि परत येताना गोड शीरा, पराठे आणि पोळीचे लाडू करून घेतले होते.
मुलांचे कपडे - १-२ सेट, एखादा टॉवेल, फेस वाईप्स/वेट वाईप्स, स्वतःचा एक एक्स्ट्रा शर्ट्/ड्रेस, परफ्युम्/डिओडरंट जरूर जवळ ठेवा. हमखास लागतोच....
तुमच्या सगळ्यांच्या मदतीचा आणि सजेशन्सचा खूप फायदा झाला.
आता भारतात सगळ्या वस्तू मिळतात आणि चांगल्या quality च्या, ज्या आपल्याला इथे मिळतात त्याच तिथेही मिळतात. avent च्या बाटल्या, जॉन्सन्सची क्रिम्स, वाइप्स, huggies nappies, अगदी सगळ सगळ मिळत. mothercare सारख्या दुकानात किंवा सुपरमार्केट्स मधे मिळतच पण काही गोष्टी अगदी घरा जवळच्या केमिस्ट कडे सुद्धा मिळतात. तेव्हा इथुन फार सामान घेऊन जायच्या भानगडीत पडू नका. अगदी ज्या जरूरीच्या वस्तू जसे इकडची औषध जी मुलांच्या सवयीची आहेत, १-२ खाउची पाकिट, तिकडे एखाद दिवस चेंज म्हणून द्यायला घेऊन जा. बाकी पास्ता आणि त्याचे असंख्य प्रकार, पास्ता सॉस, ज्युस, सिरीअल्स हे तर सहज मिळत. आणि खर तर भारतात गेल्यावर मुल आपल घरच जेवण, पक्वान्न अगदी एंजॉय करतात. माझ्या २० महिन्यांच्या लेकीने, भोगीली भाकरी आणि लोणी आवडीने खल्लेन. पूरण पोळी, लाडू हे तर काय मटामट जायचे. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की आपण उगाच फार काळजी करतो. मुल मस्त ऍडजेस्ट होतात.
खरा प्रॉब्लेम तिथुन परत आल्यावरच होतो. ६-७ आठवडे लाड, मजा, आई-बाबां बरोबर रहायची, झोपायची सवय झाल्यावर इथे डे केअर मधे जायला, स्वतःच्या खोलीत, स्वतःच्या कॉटमधे झोपायला बोंबाबोंब.... होपफुली गाडी येइल लवकर रूळावर.
परत एकदा सगळ्याना धन्यवाद...
किती
किती छान्,लाजो...
मायदेशी जाउन आलात तुम्ही....
सही...ह्म्म्,भारतात ही सग़ळे मिळतं आता....:)
मी दोन
मी दोन मुलिन्बरोबर भारतात (बेन्ग्लोर ) ला ब्रितिश ने एकटी जाणार आहे .माझी एक मुलगी ६ आणि एक मुलगी ११/२ वर्शाचि आहे .परत मुम्बै वरुन एकटी येणार आहे फिनिक्ष ला .लन्ड्नला ८ तास हॉल्ट आहे .मला खुप टेन्शन आले आहे.कोणाला ब्रिटीश चा अनुभव आहे का ?स्त्रोलरचे् कसे करु प्लिज टिप्स आणि सुचना सान्गा..
धन्यवाद
राखी
मी १ १/२
मी १ १/२ वर्षाच्या मुलीला घेऊन पुढच्या आठवड्यात भारतात जाते आहे. मी SFO-Hongkong United airlines आणि Hongkong-Mumbai Jet Airways असा प्रवास करणार आहे. कोणाला युनायटेड आणि जेटच्या विमानाचा अनुभव आहे का? service आणि staff कसा आहे?
तसेच तिकडे जायच्याआधी मुलीला तिच्या रेगुलर शॉट्सव्यतिरिक्त काही शॉट्स वगैरे द्यावे लागतील का? मी तिकडे फक्त १ महिना राहणार आहे तर भारतात कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला हवी ज्याने तिकडे ती आजारी पडणार नाही.
विमानात दुध किंवा पेडियाशुअर नेता येते का?
खुपसारे प्रश्ण विचारते आहे पण लहान मुलीला घेऊन एकटीच जाते आहे त्यामुळे टेंशन आले आहे.
थॅंक्स इन एडव्हांस.
Pages