१)जर कोलंबी सुकी करायची असेल आणि कोलंबी एकदम ताजी असेल तर तिला न सोलता फक्त शेपटी आणि टोक्याचा थोडा भाग काढुन मधले पाय काढायचे व कोलंबी स्वच्छ धुवुन घ्या.
२) धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण्-मिरची-कोथिंबिरच वाटण चोळा. थोडी मुरवलीत तर अजुन छान.
३) भांड्यात तेल करम करुन लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळा.
४) कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन थोडे परतवा.
५) आता ह्यावर कोलंबी घालुन ती परतवा.
६) नंतर भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी शिजु द्या. मधुन मधुन ढवळा.
७) थोड्या वेळाने झाकण काढून त्यात कैरी/कोकम व मिठ टाका आणि परतवा.
८) परत झाकण ठेउन वाफ येउ द्या. ५ मिनीटांत कोलंबी तयार. कशी दिसतेय ? घाबरु नका लाल रंग दिसतोय तेवढी ती तिखट नाही.
तळलेली कोलंबी
१) कोलंबीची साले काढा किंवा वरील प्रमाणे ठेवा.
२) सोललेल्या कोलंबीला मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावा वेळ असेल तर थोडी मुरु द्या.
३) तवा गरम करुन त्यावर तेल सोडून कोलंबी शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवा.
४) कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणुन गॅस मिडीयम पेक्षा कमी ठेउन चांगली शिजु द्या. ७-८ मिनीटांनी पलटुन गरज वाटल्यास थोड तेल टाकुन परत शिजवुन गॅस बंद करा.
ही लहान मुलांच्या हाताला लागली तर तुमच्या वाट्याला येण्याचे चान्सेस कमी आहेत.
कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील.
कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.
लाल कोलंबी
करपाली मिळाल्या की त्यांची वेगळी रेसिपी टाकेन.
कोलंबीचे कालवणही टेस्टी होते. त्यातही कांदा घालावा लागतो. वाटण ऑप्शनल असते. पुरवढ्यासाठि कालवणात बटाटा, दुधी,लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा टाकतात.
कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजुन बरेच प्रकार कोलंबी पासुन करता येतात.
जर कोलंबी जास्त जाड असेल आणि सोलली असेल तर त्यातील काळा धागाही काढतात. साला सकट कोलंबी जास्त रुचकर लागते. खाताना तिचे साल चावण्यात मजा येते.
कोलंबी जास्त प्रमाणातही खाउ नये बाधण्याची शक्यता असते. पथ्यात कोलंबी वर्ज असते.
कोलंबी शिजताना पाहुन वाटलेच
कोलंबी शिजताना पाहुन वाटलेच की साले काढलेली नाहीत म्हणुन. अगं पण खाताना तोंडात नाही का येणार साले?
अगदी तोंपासु
अगदी तोंपासु
डोळे निवले जागुले
डोळे निवले जागुले
त्या मुटकळं का करतात?
त्या मुटकळं का करतात?
तों पा सु. मस्त दिसते आहे....
तों पा सु. मस्त दिसते आहे....
काहीतरी ओळखीचे दिसले
काहीतरी ओळखीचे दिसले
कोलंबीची खिचडी अप्रतिम लागते. (सीकेपी लोकाची).
या विकांताला करणारे
या विकांताला करणारे पहिल्यांदा कोळंबी ट्राय... हा प्रकारच पहाते करुन
दक्षीच्या घराकडे जाताना एक दुकान आहे तिथे परवाच चोकशी केली.. त्या बाई साफ करुन देतात म्हणे
साधना अग सोलायची साल खाताना
साधना अग सोलायची साल खाताना आणि चुखायचीपण.
चिमुरी, बागुलबुवा, हर्षदा, नंदिनी धन्स.
अश्विनी अग त्या म्हणतायत जा मी नाही शिजणार आणि रागावल्यात.
त्या मुटकळं का करतात?<<<<
त्या मुटकळं का करतात?<<<<
सगळ्यांच्या आवडत्या कोलंबीचा
सगळ्यांच्या आवडत्या कोलंबीचा नंबर उशीरा लागला.
अनेक देशांत सालासकटच कोलंबी खातात. खुपदा नुसती उकडून.
खास शाकाहारी लोकांसाठी - पडवळाच्या चकत्या करुन अश्याच तळतात. आणि अगदी अश्याच लागतात.
( जागू पडवळ खाणार नाही आणि आपण कोलंबी खाणार नाही, त्यामूळे या वाक्याला कुणी चॅलेंज करणारच नाही )
जागु, त्या कांद्याच्या रेसिपी
जागु, त्या कांद्याच्या रेसिपी मधल्या पदार्थाचा रंग काळपट का दिस्तोय? कांद्याचा रंग तर लालभडक आहे.
आणि टिपिकल कालवणाची विथ कांदा रेसिपी देना... खोब्र सुक? की ओलं? भाजुन की न भाजता?
जागू पडवळ खाणार नाही आणि आपण
जागू पडवळ खाणार नाही आणि आपण कोलंबी खाणार नाही, त्यामूळे या वाक्याला कुणी चॅलेंज करणारच नाही>>>>>>>>>
दिनेशदा मग आपण कोलंबीत पडवळ
दिनेशदा मग आपण कोलंबीत पडवळ टाकु म्हणजे दोन्ही खाता येईल फक्त मांसाहारींना.
आशु तेल आणि मसाला एकत्र आल्याने तो तसा कलर झालाय.
कालवण करण्यासाठी ओल खोबर, लसुण, आल, हिरवी मिरची, कोथिंबीर हे वाटण करायच.
कांदा चिरुन घ्यायचा. थोडा लसुण ठेचुन घ्यायचा.
भांड्यात वरील प्रमाणे लसुण कांदा शिजला की त्यात हिंग, हळद, मसाला घालायचा. जरा ठवळून त्यात कोलंबी घालून वाट्ण आणि थोडे पाणी घालायचे. जर बटाटे, शेंगा वगैरे हव्या असतील तर त्या पण घालायच्या. साधारण बटाटा शिजला की कोलंबी शिजते. शिजल्यावर त्यात चिंचेचा कोळ, मिठ घालायचे आणि उकळवुन गॅस बंद करायचा.
दिनेश जागुले, फोटो नं ७ मधला
दिनेश
जागुले, फोटो नं ७ मधला दुसरा फोटो अप्रतिम आलाय. क्षणभर वाटलंच चाखून पहावं की काय
मी भर पावसाळ्यात एकदा पांढर्या कोळंबिचा ढिग मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर पाहिला होता, तो ही पहिल्यांदाच.. प्रचंड घाबरले होते मी... आणि हे मासे असून खातात ही माहीती कळल्यावर तर हालत खराब झालेली माझी...
असो, तुझ्या मत्स्यबाफवर हजेरी लावली, दिवस पदरी पडला..
कोलंबीत वांगं टाकल्यास खूप
कोलंबीत वांगं टाकल्यास खूप छान चव येते. अर्थात कोलंबीचा रस्सा केल्यास.
कोलंबी फॅन क्लब काढता येईल
कोलंबी फॅन क्लब काढता येईल इतक्या कोलंबिच्या रेसिपी आहेत
मी सुखं वाटण घालुन पण करते. स्वर्ग
मंगळवारी असं काही पाहु नये.
कोणी तरी खिचडी लिहा ना...सीकेपींची
जागूजी, "मत्स्यविशारद" पदवी
जागूजी, "मत्स्यविशारद" पदवी बहाल तुम्हाला !
जागू, टोपलीभर कोलंबी बघूनच
जागू, टोपलीभर कोलंबी बघूनच मस्त वाटलं.
माझ्या आईच्या आणि नणंदेच्या हातची कोलंबीची खिचडी .......नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं.
भाउ पायलागु. धन्स. स्वाती
भाउ पायलागु. धन्स.
स्वाती
दक्षिणा तु जर मासे खायला
दक्षिणा तु जर मासे खायला सुरुवात करणार असशील ना तर पहिली कोलंबीच खा. कारण ह्यात अजिबात काटा नसतो आणि चवही चांगली असते.
शायर, निकिता तुमच्याशी सहमत.
यम्मी यम्मी जागु!! जियो जियो,
यम्मी यम्मी जागु!! जियो जियो, मंगळवार सार्थकी लावलास.
मला ती कोलंबीची टोपली
मला ती कोलंबीची टोपली पायजेलssssssssssssssssssss
नीलु १००० रु देशील तर घे.
नीलु १००० रु देशील तर घे. त्याच्याखाली परवडणार नाही. बाकीचे गिर्हाईक खोळंबलेत.
१०००>>> असं काय करता ताई..
१०००>>> असं काय करता ताई.. भवानीच्या टायमाला कायतरी कमी करा की वो ताई नायतर त्यापेक्षा वरचे पातेलच घेते फ्री मध्ये हा का ना का
ते तर २००० ला.
ते तर २००० ला.
जागू, नीलू>>>>
जागू, नीलू>>>>:खोखो:
कोळन्बी माझा एकमेव अवाडता
कोळन्बी माझा एकमेव अवाडता फिश. तोन्डाला पाणी सुटला.
अजून किती मासे आहेत ग तुझ्या
अजून किती मासे आहेत ग तुझ्या पोतडी मधे?
जागू तू ईतक्या प्रेमानं
जागू तू ईतक्या प्रेमानं बनवलेले सगळे.. प्रेमाची का कधी किंमत करता येते
>>अजून किती मासे आहेत ग तुझ्या पोतडी मधे?>> जागू सगळे मासे संपले म्हण्जे त्यांच्या रेशिप्या संपल्या की तमाम माबो मत्स्य्प्रेमींसाठी एक महाभोजन घाल. पाहिजे तर तिकिट बिकिट पण ठेव.. बघ तुला पुण्य लाभेल.
कोलंबीचे सुके.... तळलेली
कोलंबीचे सुके.... तळलेली कोलंबी तों.पा.सु.
मी कोलंबीचे सुके कोकम घालुन आणि कालवण कैरी घालुन करते..
<<<< जागू सगळे मासे संपले म्हण्जे त्यांच्या रेशिप्या संपल्या की तमाम माबो मत्स्य्प्रेमींसाठी एक महाभोजन घाल. पाहिजे तर तिकिट बिकिट पण ठेव..>>> अगदी अगदी...
Pages