यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.
पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको
महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.
ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.
अशा सर्वतोपरी परिपूर्ण खेळाने
अशा सर्वतोपरी परिपूर्ण खेळाने 'आता' मॅचेस् जिंकता येत नसतील तर
>> सशल, शांत हो. जोकोला परवाच हरवले आहे त्याने.
पराग, अरे त्यालाच फॅन असणे असं म्हणतात. असं काय करतोस? अपेक्षेप्रमाणे २००च्या वर पोष्टी झाल्या. आता विम्बल्डनचा धागा काढ. पुढचे वादविवाद तिकडे करूयात...
>> सशल, शांत हो. जोकोला परवाच
>> सशल, शांत हो. जोकोला परवाच हरवले आहे त्याने.
हो पण मी भविष्यातल्या खेळांकरता चीअर करतेय नाडाल आणि ज्योको ला ..
खरंतर मलाही फेडरर चा खेळ बघायला आवडतो आणि त्याच्यासारखा खेळ कोणाचाच नाही असं मीच दोन पानं आधी लिहीलं आहे .. पण हे 'फेडरर एके फेडरर' कंपू वाले लोक मला शांत बसू देत नाहीत ..
गो नादाल! गो ज्योको! :p
अरे त्यालाच फॅन असणे असं
अरे त्यालाच फॅन असणे असं म्हणतात. >>>> हो रे सँट्या.. पण असामा म्हणाला तसं हे सगळं "सर्वोत्कृष्ट" वरून सुरु आहे..
हो हो.. गो सशल !!
पुढचे वादविवाद तिकडे करूयात... >>>>>
चालेल..
तो पर्यंत मुकुंदला ब्रेक फास्ट अॅट विंबल्डन पुढे सरकवण्यासाठी लापि वाजवाव्यात का??
<<पण 'फेडररच्या वेळी तोडीचे
<<पण 'फेडररच्या वेळी तोडीचे खेळाडू नव्हते' हे सर्वाधिक भंपक विधान आहे. असे विधान करणे हे पूर्वीपासून खेळ न पाहण्याचे आणि एकंदरीत खेळाविषयी अज्ञानी असण्याचे लक्षण आहे>>
मी बोर्ग -मॅकेन्रो पासून टेनिस बघतोय. आगासी, रॉडिक, ह्युइट, साफिन यातल्या कोणत्या खेळाडूंनी कोणतीही स्पर्धा सुरू होताना तेच फेव्हरिट, नक्की जिंकतील असा विश्वास दिला. आगासी माझा सगळ्यात आवडता खेळाडू , पण त्याच्याइतका मानसिक ताण दुसर्या कोणी दिला नसेल. (आनंदही दिला अधून मधून). जोको २०११ शिवाय कोणत्या खेळाडूने सातत्याने स्लॅम स्पर्धांच्या फायनल्स गाठल्यात?
आता ही वैयक्तिक टिपण्णी आलीच आहे तर काहीही झाले तरी फेडरर हरत राहिला तरी तोच ग्रेट आणि राफा फेडररला हरवून जिंकत राहिला तरी बोअर, असं म्हणत राहणं आडमुठेपणा आहे, असे मी म्हणतो. चारही ग्रँड स्लॅम जिंकला तरी तो हे फ्रेंच ओपन आहे, क्ले कोर्ट वर आहे म्हणून इथे तो जिंकला असे म्हणणे कशाचे लक्षण आहे?
राफाचे कौतुक यासाठीच की आधी फक्त केल कोर्टचा राजा असणार्या या खेळाडूने इतर सरफेसेसवर आपला खेळ प्रचंड सुधारत प्रभुत्व मिळवले.
आता राग आलाच (फेडरर पूजकांना) आहे, तर आणखी एक : फेडररचे विधान : मी (फेडरर) आणि नादाल संपले असे म्हणणार्यांना या फ्रेंच ओपनने उत्तर दिले म्हणे.
राफा संपले असे कोण कोणास केव्हा म्हणाले? इतकी असुरक्षित भावना सार्वकालिक चँपला, की आपल्या नावेत उगाच दुसर्याला ओढायचे?
चिल लोकहो.. आता विंबल्डनची
चिल लोकहो..
आता विंबल्डनची वाट पाहूया...
मुकूंद.. लापि नंबर २ : दरम्यान ब्रेकफास्ट @ विंबल्डन लिहीणार का ?
मयेकरपण जरा रागावून पोस्टले
मयेकरपण जरा रागावून पोस्टले म्हणजे ह्या बाफने विक्रमच केला म्हणायचा
एरवी इतक्या वादग्रस्त बाफंवर पोस्टूनसुद्धा मयेकरांना चिडलेले बघितले नव्हते.. चला, आता विंबल्डनवर वाद घालू.. पुढल्या वर्षी फेडी पुन्हा हारेल रोलँगॅरोवर तेव्हा परत येउ इथे 
एक मिनिट, फेडी फ्रेन्च ओपन
एक मिनिट, फेडी फ्रेन्च ओपन जिंकलेला आहे लोक्स! तेव्हा राफा सेमि मध्येच हरला होता (म्हणून असेल).
चमनला अनुमोदन आहे (खेळाचा आस्वाद घ्या- ते). मस्त पोस्ट. फेडरर sheer mastery साठी तर नदाल never say die spirit साठी आवडतो. आणि (हे महत्त्वाचं नसलं तरी) नदाल नेहेमीच ऑपोनन्टचा आदर करतो, म्हणूनही आवडतो.
आदमा, आम्हाला वाटलं होतं, की नदालने कप घेतलेला पाहून लगेच विम्बल्डन- २०११ असा बाफ आलाही असेल. अजून नाही काढलास? शो ना हो!
Pages