बारात राहाणारे मायबोलीकर गटग करण्यात नेहेमी उत्साही असतात या परंपरेला जागून बाराचाच एक भाग असलेल्या जर्सी सिटीत रहाणार्या माबोकरांनी गुपचुप एक गटग ठरवून ते झटपट साजरे केले हे कळवताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे!
खरे तर या गटगचा महावृत्तांत लिहिण्याचे आम्ही मनावर घेतले होते, परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे पदार्थांचे प्रचि आणि थोडंसंच वर्णन यावर हा वृत्तांत आम्ही आवरता घेत आहोत.
तर, मायबोली सभासद असलेल्या, जर्सी सिटीत रहाणार्या महिला वर्गाचं एक चिमुकलं गटग काही महिन्यांपूर्वी पार पडलं तेव्हाच या गटगची आखणी करायचा बेत पक्का झाला. त्यानुसार, काल रोजी हे गटग करायचे नक्की झाले. सध्या काही काळासाठी येथे आलेले जीएस हेही गटगमधे येऊ शकतात हे समजले आणि वर्षा यांच्या घरी सर्वांनी भेटायचे ठरले.
श्री व सौ महेश-वर्षा आणि त्यांचा मुलगा ओंकार, श्री व सौ अमित-anjali_12 आणि त्यांची मुलगी आभा, श्री जीएस, श्री व सौ. माणूस-बाईमाणूस(सागर-सोनाली) आणि श्री व सौ विश्राम-प्रज्ञा९ असे सगळे जमल्यावर ओळख करून घ्यायचा छोटासा कार्यक्रम पार पडला.
थोड्याफार गप्पा झाल्यावर महिला वर्ग स्वयंपाकघरात जाऊन पदार्थ गरम करण्याच्या तयारीत गुंतला. १५-२० मिनिटे झाल्यावर सर्व खाद्यपदार्थ मेजावर मांडून झाले आणि सर्वांनी त्याचा आस्वाद घेत, गप्पा मारत आपला आनंद व्यक्त केला.
मायबोलीवरचे आवडते बाफ, प्रतिक्रिया, काहीकाही आयडींबद्दल चर्चा, १८ तारखेचे बारा गटग, भारतातले राजकारण, भ्रष्टाचार, नाटक-चित्रपट, नोकरी-व्यवसाय, मुंबई-पुण्यातले कोचिंग क्लासेस, जर्सी सिटीतली खादाडी, जवळपासची भटकायची ठिकाणं इत्यादी अनेक विषयांवर उद्बोधक चर्चा झाली.
रात्रीचे १०:३० झाल्यावर आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या, उरलेल्या पदार्थांचे वाटप केले आणि आपापल्या घरी निघालो.
इतकं छान गटग आखल्याबद्दल वर्षा आणि महेश यांचे आभार काल ओंकारसुद्धा आमच्या गटगमधे पूर्णपणे सामील झाला होता. नुकताच तो बोलायला शिकल्यामुळे त्याच्याही अखंड गप्पा चालू होत्या. मागच्या वेळी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा जरा बुजत असलेला तोच हा ओंकार का असा प्रश्न पडावा इतका छान बोलत होता तो. आणि आभासुद्धा सगळ्या मावशी-काकांना भेटल्यावर खेळात मग्न होती. मी तिला उचलून घेतल्यावर गोड हसून ओळख दाखवली तिने. ती स्वभावाने जरा शांत आहे (आईवर गेली नसावीच )
तर असा भेटीचा सोहळा मस्त पार पडला. पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
हे फोटो..
१. सोनालीने केलेले स्टार्टर - पनीर टिक्का
२. मेन कोर्स - पावभाजी (प्रज्ञा) आणि शाही पनीर बिर्याणी (अंजली_१२)
३. डेझर्ट - जीएस यांनी आणलेले केक्स आणि वर्षाने घरी केलेला ब्राऊनी केक
एकदम टेम्प्टिंग पनीर, भरपूर अमूल बटर घातलेली पावभाजी आणि वरून बटर चोपडून ओव्हनमधे खमंग भाजलेले पाव, प्रत्येक थरात साजूक तूप घातलेली पनीर बिर्याणी, बघताक्षणी खाऊन टाकावेत असे वाटणारे केक्स आणि वर्षाने केलेला अप्रतिम ब्राऊनी केक.....
मझा आ गया! अशी गटगे उत्तरोत्तर होत राहोत!
(वरच्या वृत्तांतातून निसटलेलं लिहायची जबाबदारी कालच्या उपस्थितांपैकी कुणीही घ्यावी. )
धन्यवाद.
बारा प्रथेला जागून खादाडीचे
बारा प्रथेला जागून खादाडीचे फोटो आले हे उत्तम.
पण बारातच जर्सी सिटीचा उपकंपू केल्याबद्दल निषेध
व्वा! दिल खुश झालं हा मनू
व्वा! दिल खुश झालं हा मनू पाहून
जर्सी सिटीचा उपकंपू>>> तिथंही होता का?
खादाडी झक्कास. हे सगळे लोक
खादाडी झक्कास.
हे सगळे लोक बारात असतात? मग नेहमीच्या जीटीजीला हजेरी लावयला हवी यांनी. यातल्या फक्त माणूस-बाईमाणूस यांनी भेटलेय. जीएस तुमचा पायगुण चांगला आहे.
ते शेवटच्या फोटोत
ते शेवटच्या फोटोत बिर्याणीच्या खाली काय दिसतंय? बटर(च की काय पुन्हा)?!
कोर्टासमोर सादर झालेल्या पुराव्यांवरून याला ए.वे.ए.ठि. म्हणता येणार नाही कारण :
१. खरे ए.वे.ए.ठि होण्याआधी त्याचा बाफ निघावा लागतो.
त्या बाफवर 'तळ्यात मळ्यात' स्वरुपाच्या पोस्ट्स, पब्लिक आणि प्रायवेट ट्रान्स्पोर्ट सर्विसेसची चर्चा, मेनू निश्चिती, अन्य बाफकरांच्या शुभेच्छा आणि टोमणे - इतकं सगळं व्हावं लागतं. इथे तसं काही झालेलं दिसत नाही.
२. वृत्तांतात हा कार्यक्रम नक्की कधी आणि कुठे झाला याचा उल्लेख नाही. कुठल्यातरी रात्री साडेदहाला संपला एवढाच आहे. हा पुरावा अर्धवट आणि म्हणून संशयास्पद आहे.
३. वृत्तांताचा शेवट डोटपा नाही. त्या अर्थी लोक भेटलेच नसावेत किंवा भेटलेले लोक माबोकर नसावेत असा संशय यायला जागा आहे.
४. हा वृत्तांत वाचून कुठल्याही गावच्या बाफवर अनाहूत डोकवायचा मोह होत नाही.
५. वृत्तांत 'आपली मायबोली' ऐवजी 'प्रकाशचित्रे' विभागात आहे.
अलीकडच्या काळात न झालेल्या ए.वे.ए.ठिं.चे फसवे आणि दिशाभूल करणारे वृत्तांत लिहायची नवीन पद्धत मायबोलीवर रूढ होऊ पहात असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आले आहे. कोर्ट त्याचा तीव्र निषेध करत आहे.
त्या बिर्याणीच्या खाली बटरच
त्या बिर्याणीच्या खाली बटरच आहे, पावभाजीवर वरून(सुद्धा) घालायला!
आता तुम्हीच सुचवा नाव. मी बै हा पहिलाच वृ लिहिलाय.
वा,वा. मस्तच
वा,वा. मस्तच
प्रज्ञा, झटपट लिहिलास की गं
प्रज्ञा, झटपट लिहिलास की गं वृत्तांत!! आपले पण फोटो काढायला पाहिजे होते नाही का गं ?
खरंच मजा आली. अमितला गटग हा शब्द फार आवडलाय
वृत्तांताचा शेवट डोटपा नाही.>>>>> म्हणजे काय गं स्वाती?
मी तिला उचलून घेतल्यावर गोड हसून ओळख दाखवली तिने. ती स्वभावाने जरा शांत आहे (आईवर गेली नसावीच )>>>>>>>>> नाहीच गेली बाई माझ्यावर !! नाहीतर बडबडीने डोकं भंडावून नसतं का सोडलं
सर्वप्रथम हे छुपं गटग
सर्वप्रथम हे छुपं गटग केल्याबद्दल "हार्दीक" निषेध.
फोटो तोंपासू आहेत. पण हे पदार्थ आम्हाला चाखायला मिळाले नाहीत म्हणून परत एकदा हा. नि.
बारातच जर्सी सिटीचा उपकंपू केल्याबद्दल >> तिसरा आणि दणकेबाज निषेध.
अंजलीच्या घराच्या आसपासच झालं
अंजलीच्या घराच्या आसपासच झालं न हे गटग? नाहीतर परत तिकीटांवर जादा खर्च.
वा वा. छान पदार्थ. मला
वा वा. छान पदार्थ. मला वाटलेलच एक पॅरलल न्युजर्सी कंपु तयार होत आहे म्हणुन.
एकाही खर्या, आणि रुळलेल्या
एकाही खर्या, आणि रुळलेल्या बाराकराला किंवा बाहेरून येऊन सदैव बाराबाफवर पडिक असलेल्या मंडळीला न घेता ए वे ए ठि या नावाचा प्रताधिकार न लक्षात घेता वापरल्याबद्दल आणि इतर बर्याच कारणांनी निषेध. निदान पावभाजी करूनही न बोलावल्याबद्दल जरा तीव्र निषेध..
यापुढे कोणत्याही कंपूने बारात ए वे ए ठि केल्यास किमान मी, भाई, झक्की, बुवा, बाई, MT, अगर लालू, रूनि, मॄ. अंजली, सायो, मेधा, फचिन यापैकी किमान तिनांची उपस्थिती आवश्यक समजावी...
(या यादीत इतर मान्यवर रुसल्यावर त्यांची नांवे नाईलाजास्तव घातली जातील)
(यास विनोद समजू नये)
निषेधाची सर्व कारणे लक्षात
निषेधाची सर्व कारणे लक्षात ठेवली जातील आणि पुढील वेळी योग्य ती अंमलबजावणी केली जाईल याची खात्री बाळगावी.
देसाई ,बारातल्या महत्वाच्या
देसाई ,बारातल्या महत्वाच्या दोन शहरांपैकी एकात ( फिली अन मनहॅटन ) रहाणार्या लोकांचा अनुल्लेख केल्याबद्दल तुमचा पण निषेध
स्वातीच्या सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन !
मेधा
मेधा
देसाई, वरील यादीत मेधा आणि
देसाई, वरील यादीत मेधा आणि माझं नाव नाहीये. ह्या वर्षीच्या कल्लोळाला बाराचं प्रतिनिधित्व करूनही आम्हाला अशी वागणूक दिलीत त्याबद्दल निषेध.
पन्ना, तेवढं ते "हार्दीक"
पन्ना, तेवढं ते "हार्दीक" लिहायचं राहिलं.
हो हो निषेध (कशाचा पण?
हो हो निषेध (कशाचा पण? :फिदी:)
मनहॅटन मधे कोण रहातं?
आर्च, आता इतक्या सगळ्या
आर्च, आता इतक्या सगळ्या निषेधांनंतर हार्दीक कसलं 'हृदयतोडफोड निषेध' लिहावं लागेल
देसाई, MT अगर लालू हा काय
देसाई, MT अगर लालू हा काय प्रकार आहे? त्या दोघींतर्फे निषेध!
अंजली_१२, डोटपा म्हणजे डोळ्यांत टच्कन पाणी आणणारा.
(ही कोर्टाला न आवडणारी आणखी एक फ्याशन! प्रज्ञा९ काय.. अंजली१२ काय! चांगल्या नावांचे तीन तेरा वाजवायचे उग्गाच! :P)
फचिन, मेधा यांचा अधिकार मान्य
फचिन, मेधा यांचा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे. पन्ना तुमचे नांव विचाराधीन आहे...
यापुढे यादीत नांव हवे असल्यास अर्ज करून आपण बाराकर असल्याचा आणि त्याप्रमाणे गेले कित्येक वर्ष बाराबाफ चालवल्याचा पुरावा सादर करायचा आहे... पुराव्याचे सर्टीफिकेट बाईंचा कोर्टात मिळेल..
हुकूमावरून..
आर्च - ह्या बाई का बुवा माहित नसल्याने त्यांचे नांव यादीत घालता येत नाही.
बाई, ते MT अगर लालू नसून 'आतले (म्हणजे बारात वास्तव्याला असणारे) अगर बाहेरचे (म्हणजे बारात वास्तव्य नसले तरी बाफवर पडिक असणारे) असे आहे.. तसेच वाचावे...
>> आतले अगर बाहेरचे बरं बरं.
>> आतले अगर बाहेरचे
बरं बरं. सदोष वाक्यरचनेबद्दल वॉर्निंग देऊन तुमची निर्दोष मुक्तता करणेत येत आहे.
निषेधाची सर्व कारणे लक्षात
निषेधाची सर्व कारणे लक्षात ठेवली जातील आणि पुढील वेळी योग्य ती अंमलबजावणी केली जाईल याची खात्री बाळगावी. >>>>>> हेच म्हणायचे आहे मलाही
स्वाती, अगं माबोवर बहुतेक इतक्या अंजल्या आहेत की नावाचे तीनतेरा वाजवावेच लागले
anjali_12 , नाव एकदम पर्फेक्ट
anjali_12 , नाव एकदम पर्फेक्ट आहे. 'बारातली अंजली'
अंजली१२ तू अँजली आयडी घेवून
अंजली१२ तू अँजली आयडी घेवून बघ, कोणाचे नाहीये
पन्ना ... भारीच
पन्ना ... भारीच
अँजली ......नाऽऽऽऽऽऽऽऽऽ
अँजली ......नाऽऽऽऽऽऽऽऽऽ
बारातली अंजली म्हणून अंबा
बारातली अंजली म्हणून अंबा किंवा अंबाबाई !
किंवा अँजलीन्ना (पन्नाचं सजेशन म्हणून 'न्ना' पन्नातला :फिदी:)
अंजली, अगं काल आपण सगळ्यांची
अंजली, अगं काल आपण सगळ्यांची आठवण काढली होती ते नाही का लिहायचं तू... जरा डोटपा टाईप झाला वृ असता या बाबतीत तरी...
आम्ही बारातल्या सगळ्यांची (म्हणजे मायबोलीवरच्या) आठवण काढली होती १८ तारखेचं बोलताना... (ही सारवसारव नाही याची क्रिप्या नोंद घ्यावी)
अंजली भर घाल गं काही आठवलं तर.
प्रज्ञा, नक्की कोणत्या
प्रज्ञा, नक्की कोणत्या अंजलीला म्हणते आहेस? जरा नीट नावं घेऊन सांग की.. जसं डिजेचं 'अंबा' किंवा 'अंबाबाई', पन्नानं सांगितलेलं 'बाराची अंजली'. मला काही सांगायचं असल्यास 'अंजली' असं
अंजली_१२
अंबा किंवा अंबाबाई किंवा
अंबा किंवा अंबाबाई किंवा अँजलीन्ना >>
Pages