जाम/जांब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 June, 2011 - 06:09

जाम, आवळे, चिंचा, करवंद दिसली की लहानपण अगदी डोळ्यासमोर उभ राहत. आमच्या घरी जाम च झाड नव्हत. बाजुच्या वाडीत जामची २-३ झाडं होती. मी नेहमी त्या वाडीत खेळायला जायचे. आणि जामच्या सिझनमध्ये जाम मिळतील म्हणून हटकुन जायचे. सकाळी लवकर गेलो तर भरपुर जाम मिळायचे. दुपार पर्यंत बाकीची मुले घेउन जायची मग एखाद दुसरा जाम मिळायचा. त्यात पक्षाने खाल्लेलाही असायचा किंवा पडून फुटल्यामुळे एक बाजु निकामी झालेली असायची. मग असा जामही जेवढा खाण्यायोग्य असेल तेवढा खायचा ही मजाच काही और होती.

झाडावरचे जाम उतरवले की शेजारी १५-२० जाम तरी घरी पाठवुन द्यायचे. तेही सोडायचे नाहीत. पण घरातल्या जामाची वाटणी व्हायची आणि झाडाखालचा जाम जो आपल्या हातात येइल तो आपला. मग काही दिवसांनी आमच्या घरी जामच झाड लावल. लाल जाम म्हणून झाड आणल. ३-४ वर्षांत त्याला फळ यायला लागली. तोपर्यंत मोठी झाल्याने शेजारी खेळायला जाणही बंद झाल होत. हे जाम बुटके आणि गुलाबी निघाले. पण चविला मात्र गोड. माझ लग्न झाल्यावर माझ्या सासर्‍यांनी कलमे आणुन लावली जामची गेली दोन वर्षे एक झाड चांदण्यांसारख फळाला येत. एक लांबट जातीच आहे. त्यालाही फळे धरु लागली आहेत. ह्यावर्षी मनसोक्त आनंद लुटला जामचा. जाममध्ये भरपुर पाणी असत. एक माहेरी आहे तसच आहे टोकाला गुलाबी रंगाचं. आता हा मी कॅमेर्‍याने केलेला जामचा पाठपुरावा.

प्रचि १ जामच्या कळ्या
jam6.JPG

प्रची २ जामची फुले
jam4.JPG

प्रचि ३ फुले गळुन धरलेली फळे
jam3.JPG

प्रचि ४ छोटे जाम
jam1.JPG

प्रचि ५
jam9.JPG

प्रचि ६ मोठे झालेले जाम
jam2.JPG

प्रचि ७ गुलाबी टोकाचे कच्चे जाम
jam5.JPG

प्रचि ८ गुलाबी टोकाचे तयार जाम
jam10.JPG

प्रचि ९ तयार गुलबट जाम
jam11.JPG

प्रचि १० लाल जाम हा माझ्या काकांकडे आहे.
jam8.JPG

प्रचि ११ लाल जाम जवळून
jam7.JPG

प्रचि १२ लांबट जाम हा पण गोड लागतो.
Jam.JPG

प्रचि १३ मुरुडला मिळालेले हे मोठ्या आकाराचे जाम पण हे थोडे आंबट लागले.
jam.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू, मस्त प्रची. लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी आमच्या पण घराजवळ प्रची.४,५,६ चे झाड होते. रात्री कांडेचोर (रान मांजरासारखा एक प्राणी) येऊन खाऊन जायचे. पण झाड नदीत होते. आणि आम्ही उंचावर रहायला होतो. त्यामुळे आम्हाला हाताने काढूनही जाम खाता यायचे.

जामचे सगळे प्रकार आहे कि ! ते शेवटचे श्री शांतादुर्गेच्या देवळाबाहेरही मिळतात पण ते तितके गोड लागत नाहित.

अर्रे वा! माझं भारी आवडतं फळ! अगदी तोंडावर चव आली आठवणीने! Happy
पण मी ते गुलबट आणि लाल नाही पाहिलेले कधी. पांढरेच पाहिलेत.
फुलंही मस्त दिसतायत.

जागू, छानच आहेत फोटो. उन्हाळ्यात तहान भागते ह्या फळांनी.

जागूताई, तुम्ही अगदी लाडक्या सूनबाई दिसताय. सासरेबुवा तुमच्या झाडाच्या आवडी अगदी बर्‍याचदा पुरवतात असं दिसतय. Happy

गार्गि,अरुंधती, आशे, दिनेशदा, स्वाती, जिप्सि धन्स.

दक्षीणा विचार पण नाही करवत जामच्या रेसिपीचा हे असेच खुप छान लागतात.

इनमिन हे झाड नर्सरीत मिळेल. पाणि लहान असताना १ दोन दिवसा आड घातल तरी चालेल मोठ झाल्यावर नाही जास्त लागत.

आर्च माझे सासरे ३ वर्षांपुर्वी वारले. त्यांनाही झाडांची हौस होती. त्यांनी आमच्याइथे फळझाड लावली मी फुलझाड.

यो, आता पुढच्या वर्शी कारण आता १-२नच झाडावर उरले असतील. आता जांभळे आहेत.

परवा पाहीले.. मला कळलं च नाही काय आहे हे..
२०० रु किलो मिळत आहेत :प

जागु तै एक्स्पोर्ट करता का?

२०० रु. किलो बापरे !

आमच्याइथे १० रु. वाटा मिळतो. वाट्यात ५-६ असतात.