फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Uhoh , Sad Sad

....हो हो..पन्ना,पराग... बघत होतो मॅच.. पण एन बी सी वर लाइव्ह होती की नव्हती हे माहीत नव्हते म्हणुन मायबोलिवर मॅच चालु असताना आलो नाही...उगाच आधीच तुमच्याकडुन स्कोर कळायला नको ! बट..व्हॉट अ मॅच!

अरे रडु नका रे... काय मस्त मॅच झाली...

फेडरर मस्तच खेळला..पण राफाचा डिफेन्स काय जबरदस्त आहे! खर म्हण़जे पहिल्या तिनही सेट्समधे फेडररला जिंकायचा चांस होता...ही व्हेरि वेल कुड हॅव वन धिस मॅच इन ३ स्ट्रेट सेट्स!

राफा-फेडरर फायनल व्हावी ही माझी इच्छा पुर्ण झाली...व नेहमीप्रमाणे याही वेळेला मॅच जबरी झाली..अजुन एक फ्रेंच ओपनचा रविवार सार्थकी लागला...:)

आता २००८ ची विंबल्डन फायनल दाखवत आहेत...

मॅच एकूणात ठिकठिकाच झाली.. दोघही पूर्णवेळ चांगले खेळत नव्हते. कधी राफा चांगला खेळला कधी फेडरर. फेडररची सर्व्हिस सुरुवातीला तुफ्फान पडत होती. नंतर काय झालं काय माहित ! राफाने त्याचे नेहेमीचे क्रॉस कोर्ट फटके चांगले मारले. राफाचं कोर्ट कव्हरेज सुरुवातीला कमी पडतय की काय असं वाटत होतं. पण तळपायाला बांधलेला कुशनिंगला लेयर सैल केल्यावर तो नेहमीसारखा इकडून तिकडे पळत होता जोरात ! यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये ड्रॉप शॉट्सचा सढळ हाताने वापर झाला.. ! नेहमीसारख्या चालूच रहाणार्‍या रॅलीज तुलनेत कमी दिसल्या. फायनल पेक्षा फेडरर आणि जोको ची मॅच जास्त चुरशीची झाली असं मला वाटलं. फेडररचा त्या मॅचमधला खेळ पहाता तो फायनल जिंकतो की काय अशी शंका एकदा येऊन गेली !!!! पण नशिब तसं काही झालं नाही...

नदालचा तो टॉपस्पिन करून बॅकहॅन्ड्ला मारलेला त्याला झेपत नाही. आणि मग नदाल तेचतेच शॉट खेळून पॉइन्ट्स मिळवत राहतो. >>>>> सँटी, अरे ते प्रोफेशनल टेनीस प्लेयर आहेत. पॉईंट्स मिळवत रहाणे, मग ते कसे का मिळेना, (आणि त्यातून मॅच जिंकणं) हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. आता समोरच्या सर्व्हिस रीटर्न करता येत नाही तरी फेडरर जोरजोरात सर्व्ह टाकतच रहातो आणि पॉईंट मिळवतो असं म्हंटलं तर चालेल का? Happy

आता राफा क्विन्स क्लब टुर्नामेंटला जाणार म्हणे इथून डायरेक्ट..

रच्याकने.. टिव्ही वरच्या कव्हरेजमध्ये नेटच्या लेवलच्या कॅमेरा व्हूनी किती वात आणला आज !!! त्यातून पलिकडे बॉल कुठे पडतो दिसत नाही धड.. तरीही अनेकदा तसं दाखवत होते.. :रागः

आजचा (खास करुन पहिल्या ४५ मिनिटाचा) खेळ पाहिला तर फेडीला सर्वोत्कृष्ट का म्हणतात ते कळले असेल. राफासारख्याची वाट लागली होती.. Happy
असाच खेळणार असेल तर विम्बल्डन बघायला मजा येणार.

पग्या तुझ्या शेवटच्या वाक्याला जोरदार अनुमोदन!! मूर्ख आहेत एनबीसी वाले. टेनिस चॅनेलवर नसतो हा प्रकार कधी.

आजचा (खास करुन पहिल्या ४५ मिनिटाचा) खेळ पाहिला तर फेडीला सर्वोत्कृष्ट का म्हणतात ते कळले असेल. राफासारख्याची वाट लागली होती
>>>>>
सर्वोत्कृष्ट खेळाडू जिंकायला हवा ना? की केवळ ४५ मिनिटं चांगलं खेळला तर सर्वोत्कृष्ट म्हणायचं?

परागला अनुमोदन.. दोघंही बर्‍याच चुका करत होते. फेडीची सुरुवात पाहता जिंकेल असे वाटले पण एकदमच ढेपाळला. ह्या स्पर्धेत त्याचं असे अनेकदा झालं असं नाही का वाटत? अगदी जोकोविरुद्धसुद्धा तो तिसर्‍या सेटमध्ये एकदम सैल झाला होता.

फेडीला सर्वोत्कृष्ट का म्हणतात >>>> कोण म्हणतं ? Proud

आजचा (खास करुन पहिल्या ४५ मिनिटाचा) खेळ पाहिला तर फेडीला सर्वोत्कृष्ट का म्हणतात ते कळले असेल. >>>>>>> आजच्या (खास करून पहिल्या ४५ मिनिटांच्या) खेळावरून फेडररला कोणी "सर्वोत्कृष्ट" म्हणणार असेल तर त्यांना पुढील बडबडीसाठी शुभेच्छा.. Proud !!!

टण्या आणि पराग ला अनुमोदन!

ती एक कमेंटेटर होती तीने चांगला मुद्दा उपस्थीत केला .. फेडरर जर ग्रेटेस्ट एव्हर आहे आणि फेडरर-राफा मॅचेस मध्ये मात्र दुपटीहून जास्ती वेळा राफाच जिंकला आहे तसंच राफा चार वर्षांनीं लहान आहे अजून फेडरर पेक्षा तर तो इतक्यात काही थांबणार नाही टेनीस खेळायचा म्हणजे ते ग्रँड स्लॅम टायटल्स वगैरे रेकॉर्ड साठी अजून बराच वेळ आहे राफाकडे .. तर अशा सर्व गोष्टी बघितल्या तर फेडरर ला ग्रेटेस्ट एव्हर कसं म्हणता येईल?

(सर्व्हिस, खेळातलं सौंदर्य (एफर्टलेसली शॉट्स मारणे इ.) ह्यात फेडरर सरस वाटतो हे मान्य आहे .. तसंच न कण्हता (grunting) खेळणार्‍या पिढीतला तो शेवटचाच बहुतेक .. हाणा त्या सेलेस ला या निमित्ताने! :p)

टण्या आणि सशलचे ठीक आहे. Proud पग्याकडून ही अपेक्षा नव्हती.

>>आजच्या (खास करून पहिल्या ४५ मिनिटांच्या) खेळावरून फेडररला कोणी "सर्वोत्कृष्ट" म्हणणार असेल
तेवढ्यावरुन कोण म्हणतंय? तसा तो खेळू शकतो म्हणून. Proud धागा कशाचा, कोर्ट कोणाचं, फेव्हरिट कोण होतं... या गोष्टी सांगाव्या लागतात? संप्रासने तर... जाऊदे Wink

ते २३ सलग ग्रँड स्लॅम सेमीजचे काय? Proud तेच सर्वात महत्त्वाचे रेकॉर्ड आहे. सर्वोत्कृष्ट म्हणायचं तर कन्सिस्टन्सी हा मुद्दा असलाच पाहिजे.
बसा मोजत! Proud

आताचे बोला ..

भूतकाळाविषयी बोलून काय मिळणार?

अन्कॅनी, (वरच्या मी लिहीलेल्या पण) एका कमेंटेटर ने मांडलेल्या मुद्द्याचं काय?

पराग जोरदार अनुमोदन.

लोकहो भूतकाळात जगणे सोडून द्या आता. वर्तमानात या. भविष्याकडे बघा.
ते २३ का काय सेमीफायनलचे रेकॉर्ड केले तेव्हा त्याच्या तोडीचे खेळाडू आसपास नव्हते. आता टक्कर द्यायला रथी महारथी आलेत तेव्हाची कामगिरी काय म्हणतेय?

क्ले कोर्टवर आपला सर्वोत्कृष्ट खेळ करूनही फेडररला राफाला हरवणे जमलेले नाही.
कित्येक पॉइंटससाठी फेडरर जिंकलाच असे वाटत असताना राफाने अफलातून वाट काढून पॉइंट्स घेतले.

काल मला पहिल्यांदाच फेडररसाठी वाईट वाटले, नाही सामना हरला नाही म्हणून, पहिला सेट त्याला जिंकता आला नाही यासाठी.

फेडरर एकाच स्पर्धेत राफा आणि जोकोला हरवण्याची शक्यता खूप कमी आहे असे मी(च) नाही तर काल एक कॉमेंट्रेटर म्हणाला.

मनःसामर्थ्यात राफा आणि जोको फेडररपेक्षा सरस आहेत. फेडररसमोर खेळताना सर्वसामान्य (म्हणजे टॉप ३ सोडून) खेळाडूंवर जसे त्याचे गारुड होते, तसेच राफासमोर फेडररला होते.

आजचा (खास करुन पहिल्या ४५ मिनिटाचा) खेळ पाहिला तर फेडीला सर्वोत्कृष्ट का म्हणतात ते कळले असेल. >>>>> २३ सेमी फायनल, जिंकलेल्या स्पर्धा वगैरे वगैरे सगळं ठिके..
पण ते सगळं असण्याचा, आजचा खेळ (खास करून पहिल्या ४५ मिनिटाचा) आणि फेडरर सर्वोत्कृष्ट म्हणण्याचा एकमेकांशी संबंध काय ? पहिल्या ४५ मिनीटांत किंवा एकूण मॅचभरही फेडरर चांगला खेळला म्हणून आजचा खेळ बघून त्याचा २३ सेमिफायनल्सचा, कन्सिस्टंसीचा वगैरे इतिहास आठवला म्हणून त्याला सर्वोत्कृष्ट म्हणावे असं काही आहे म्हणायचं आहे की काय ??? देवा !! शुभेच्छा ! Proud

फेडररचा आजचा खेळ त्याचा सर्वोत्कृष्ट वगैरे अजिबात वाटला नाही मला तरी..

अजून ५ पोस्ट्स टाका म्हणजे आधी कमी टिआरपी असलेल्या हा धागा आत्तापर्यंतच्या ग्रँडस्लँमच्या धाग्यांमध्ये सर्वाधिक पोस्ट पडून अव्वल क्रमांकावर येईल.. Happy

जोको हारला म्हणुन कोपभवन गाठले होते. राफा जिंकला म्हणुन परत आले.
भरतजी, पराग Happy अनुमोदन.

फेडररचा आजचा खेळ त्याचा सर्वोत्कृष्ट वगैरे अजिबात वाटला नाही मला तरी.. <<< नक्किच.
बॅकहॅन्ड् नाही पेलत त्याला. सर्वोत्कृष्ट कसा काय??

ते २३ का काय सेमीफायनलचे रेकॉर्ड केले तेव्हा त्याच्या तोडीचे खेळाडू आसपास नव्हते. आता टक्कर द्यायला रथी महारथी आलेत तेव्हाची कामगिरी काय म्हणतेय?>>मागे मी हाच मुद्दा मांडला होता तेंव्हाही असेच तुटून पडले होते. जोवर राफ्याला हरवत French Open नाहि तोवर "Greatest Ever" बाजूला ठेवायला हवे. पण तरिही सर्वांगीण परीपूर्ण खेळ ह्याबाबत दुमत नसावे. कालची मॅच बघायला मजा आली नाहि Sad

पराग, ते प्रोफेशनल टेनिस खेळाडू आहेत हा मुद्दा मान्य आहे. नदालचा खेळ त्यामुळे एकसुरी वाटतो एवढ्यासाठी ते लिहिले होते. नदाल एवढ्यावेळा फ्रेन्च ओपन जिंकला आहे, पण तरी पब्लिक काल फेडररला का जास्त चिअर करत होतं काय माहीत?

टेनिस इतके प्रिय असूनसुद्धा नदालच्या मॅचेस बुडल्या तरी काही वाटत नाही. 'काय त्यात, जिंकेल तो' असे त्याच्या कुठल्याही मॅचबद्दल वाटते. जोको, फेडरर यांच्या मॅचेसबद्दल तसे वाटत नाही. कारण त्यांचे फटके, त्यामधली ग्रेस, सहजता, पदलालित्य हे सर्व पहावेसे वाटते.

एवढी वर्षे टेनिस पाहिल्यावर मलाही फेडरर हा सर्वोत्कृष्ट खेळाडू वाटतो. पूर्वी सॅम्प्रास वाटायचा. पण 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' हे बर्‍यापैकी वैयक्तिक आहे. कोणाला हा आवडेल तर कोणाला तो. पण 'फेडररच्या वेळी तोडीचे खेळाडू नव्हते' हे सर्वाधिक भंपक विधान आहे. असे विधान करणे हे पूर्वीपासून खेळ न पाहण्याचे आणि एकंदरीत खेळाविषयी अज्ञानी असण्याचे लक्षण आहे.

ही माझी २०० वी पोस्ट.. आणि अश्या रितीने हा बाफ पोस्ट संख्येच्या दृष्टीने आत्तापर्यंतचा "सर्वोत्कृष्ट" बाफ झालेला आहे.. Proud

फेडररच्या वेळी तोडीचे खेळाडू नव्हते >>>> हे मलाही नाही पटले. राफा २००५ पासून फ्रेंच ओपन मध्ये जिंकतो आहे. ते ही फेडररलाच हरवून. जोको २००७ पासून आहे. शिवाय आधी रॉडीक, सॅफीन, हेवीट हे बर्‍यापैकी चांगले खेळायचे.... एव्हडच काय अगासीही त्याच्याशी फायनल खेळलेला आहे... त्यामुळे तोडीचे खेळाडू नव्हते फेडररच्या बाबतीत पटत नाही... (स्टेफी ग्राफच्या बाबतीत पटते मात्र.. Wink )

असाम्या मला एकूणाबद्दल काही म्हणायचे नाही.. पण कालचा खेळ आणि सर्वोत्कृष्ट का आहे हे कळणे ह्याचा संबंध पटला नाही अजिबात..

सशल.. तू मांडलेला कमेंटेटरचा मुद्दा मी पण ऐकला होता.. मला पण तो एकदम बरोबर वाटला... रॉय इमरसन किंवा सँप्रसकडे नंबर्स असताना त्यांनाही लोक तसच म्हणायचे.. शेवटी प्रत्येक खेळाडू खेळत असताता तो ऑल टाईम ग्रेट वगैरे वाटतो त्या त्या पिढीला.. कोण आवडतं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं.. सर्वोत्कृष्ट किंवा ऑल टाईम ग्रेट वगैरे ठरवत बसू नये उगाच.. Happy

पण 'फेडररच्या वेळी तोडीचे खेळाडू नव्हते' हे सर्वाधिक भंपक विधान आहे. असे विधान करणे हे पूर्वीपासून खेळ न पाहण्याचे आणि एकंदरीत खेळाविषयी अज्ञानी असण्याचे लक्षण आहे.>>कसले catch 22 विधान आहे हे ह्याचा विचार केला आहेस का कधी ? Happy

पग्या तुझ्या शेवटच्या वाक्याला अनुमोदन.

असामी, मुद्दामच तसे लिहिले. मी खरंतर मयेकरांची पोस्ट वाचली आणि तसे लिहिले, कारण ते नेहमी तेचतेच लिहितात. तुझी पोस्ट नंतर वाचली. Happy

परागने लिहिले आहे वर ते खेळाडू तर आहेतच. त्यात अजून भर म्हणजे फिलिपॉसिस, सोडर्लिंग, मरे, बर्डिच हे सुद्धा आहेत. बरेच सगळे अलीकडचेच आहेत. साफिन, हेविट, रॉडिक हे त्या त्या वेळचे रॅन्क १ (किंवा टॉप ५) होते. २००१ विम्बल्डनमध्ये सॅम्प्रासलाही हरवले आहे. पूर्वीपासून एखादा टेनिस पाहत असेल तर हे सगळे खरोखर चांगले खेळाडू होते एवढे तरी नक्की माहिती असते. आता अजून कोण रथी खेळाडू हवेत?

एवढे सगळे आहे म्हणून मला ते विधान पटत नाही.

बॅकहॅन्ड् नाही पेलत त्याला. सर्वोत्कृष्ट कसा काय?? >>> वन-हँडेड-बॅकहँड जो खेळणे बोथ-हँडेड्-बॅकहँड पेक्षा जास्त अवघड आहे आणि तो खेळल्याने मिळणारा फायदा फक्त सर्व्ह-ह्वॉली खेळणार्‍या खेळाडूलाच मिळू शकतो. (फेडीचे अफलातून ड्रॉप शॉट्स बघितले असतील, नदालने अश्या किती ड्रॉप्ससाठी प्रयत्न केला आठवून पहा). एवढ्या मास्टरीने हा वन-हँडेड-बॅकहँड खेळणारा फेडी हा सध्यातरी एकमेवच (आणि बहूतेक शेवटचाच) आहे. (नवीन पिढी सर्रास हा फटका पूर्ण आयुष्यभर ऑप्शनला टाकते).
त्याचा हाच बॅकहँड ग्रास्-कोर्टवर केवढा किलिंग असतो हेच विंबल्डनमध्ये आवर्जून बघा. असो.

गुलिक्सनने सँप्रसचा बोथ-हँडेड्-बॅकहँड वन-हँडेड-बॅकहँडमध्ये बदलवण्यासाठी किती मेहनत घेतली ह्याची महिती मोठी रंजक आहे.

नदालचं कोर्ट कवरेज (कालच्या मॅचमध्ये फेडीच्या कोर्ट कव्हरेज मध्येही त्यांच्यातल्या मागच्या मॅचेसपेक्षा प्रचंड सुधारणा होती, म्हणून तो खूप चांगला खेळत होता असं मला तरी वाटतं) आणि तो जे फटके खेळतो त्यातली कंसिस्टन्सी आणि पर्फेक्टनेस हे ह्या दोन्हींची टक्केवारी काढली तर ती १००% जवळ जाईल.

पॉवरफुल टॉपस्पिन असलेला फोरहँड आणि बोथ-हँडेड्-बॅकहँड + कोर्ट कव्हरेज ह्यांचं अफलातून काँबिनेशन त्याचा यूसपी (बहूतेक एवढाच) आहे. (फचिन ज्याला त्याच्या खेळातला एकसुरीपणा म्हणाला तो हाच). ह्या प्रकारे खेळणारे आजपर्यंतचे सर्वात यशस्वी बेसलाईनर्स (बोर्ग, विलँडर, आगासी, नदाल) ज्यांना त्यांच्या ह्या खेळाचा क्ले सारख्या तुलनेने स्लो सरफेसवर नेहमीच अपरर्हॅड मिळतो.

ह्याऊलट सँप्रस, एडबर्ग, मॅकेन्रो वगैरे जास्त करून सर्व्ह-ह्वॉली खेळणं पसंत करतात आणि त्यांची ही स्ट्रॅटेजी विंबल्डन मध्ये तुलनेने फास्ट असलेल्या ग्रास सरफेसवर हमखास त्यांना अपरहँड मिळवून देते.
बहूत करून चांगले सर्व्ह-ह्वॉलीयर्स ह्याची खूप सर्विसही चांगली आणि फास्ट असते.

आता फेडीला बघितलं तर तो (एकटाच आणि फॉर्म असल्यास आगासीही ) ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीस अगदी व्यवस्थित खेळतो अगदी कुठल्याही सरफेसवर. (ऑल्-कोर्ट्-प्लेयर).
जरी त्याचा स्वतःचा ओढा सर्व्ह-ह्वॉली करण्यातकडेच जास्त असतो तरी त्याच्या शॉट्समध्ये वैविध्य आहे. तो आवर्जून वेगवेगळे शॉट्स प्रयत्नपूर्वक खेळतो आणि यशस्वीही होतो.

कालच्या मॅचमध्ये फेडीने सर्व्ह-ह्वॉलीकरून हा पॉईंट आता मिळवलाच असे वाटत असतांना नदालचं अविश्वसनीय कोर्टकव्हरेज आणि फोरहॅंडची फटक्यातल्या कन्सिस्टंसीमुळे ते पॉईंटस फेडीवरच बुमरँगसारखी उलटले.

ह्याचा अर्थ राफा म्हणजे मास्टर आणि फेडी म्हणजे 'जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ नन' असाही घेतील काही राफा फॅन्स Wink

ह्या दोन प्रकारच्या खेळामुळेच यशस्वी टेनीसपटूंमध्ये भारंभार इतर स्लॅम्स जिंकलेले पण रोगॅसवर झगडणारे आणि त्याच्या बरोबर उलट असे गट पडले आहेत.

थोडक्यात स्पिन बॉलींग लीलया खेळणारे पण फास्ट बॉलर्ससमोर झगडणारे आणि फास्ट बॉलींग लीलया खेळणारे पण स्पिन बॉलर्ससमोर झगडणारे बॅट्समन आणि ह्यात जर पीच स्पीन किंवा बाऊंसला सपोर्ट करणारे असेल तर त्यांचा खेळ अजूनच खुलतो किंवा बिघडतो असे काहीतरी.

पण जसे आपण म्हणतो की सचिन दोन्ही प्रकारच्या गोलंदाजी कुठल्याही पीचवर अगदी लीलया खेळतो आणि तेही फटक्यांमधले वैविध्य राखून तेच मला फेडीबद्दल म्हणावेसे वाटते. (केदार ग्रेट माईंड्स थिंक.... Happy )

एकवेळ कोण जिंकतंय आणि कोण हारतंय हा विचार बाजूला ठेऊन फक्त खेळाची तुलना करायची ह्या दृष्टीकोनातून मॅच बघा.

पण जसे आपण म्हणतो की सचिन दोन्ही प्रकारच्या गोलंदाजी कुठल्याही पीचवर अगदी लीलया खेळतो आणि तेही फटक्यांमधले वैविध्य राखून तेच मला फेडीबद्दल म्हणावेसे वाटते >>>

अरे पण फेडररचे बलस्थान असलेल्या विंबल्डनमध्ये राफाने त्याला हरवले आहे. पण फेडररने राफाला रोलँगॅरोवर एकदापण हरवलं नाहिये.

>>> एकवेळ कोण जिंकतंय आणि हारतंय हा विचार बाजूला ठेऊन फक्त खेळाची तुलना करायची ह्या दृष्टीकोनातून मॅच बघा. >>> म्हणजे काय करायचं? व्यावसायिक खेळाचा प्रमुख हेतू नियमात राहून सामना जिंकणे हाच असतो ना? कोण जिंकतय हारतय हे बाजूला ठेवून बघायचं म्हणजे तीन तासाच्या मैफिलीत गवयाचा सूर दहा वेळा सटकला ते ठेवा बाजूला पण एक जागा काय महान घेतली ते बघा असं म्हणण्यासारखय..

अरे पण फेडररचे बलस्थान असलेल्या विंबल्डनमध्ये राफाने त्याला हरवले आहे. पण फेडररने राफाला रोलँगॅरोवर एकदापण हरवलं नाहिये. >> टण्या रोलँगॅरोबाबत तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण रोलँगॅरो, विंबल्डन हेच आपण क्ले आणि ग्रास असं म्हंटलं तर फेडी राफाविरुद्ध क्लेवरही हॅम्बर्ग मास्टर्स, माद्रिद ओपनमध्ये वगैरे फायनल्स जिंकलाय रे!

मुळ मुद्दा ज्याविषयी मी वरती लिहिले आहे तो आहे शैलीचा आणि परिपूर्ण खेळाचा.

>>> एकवेळ कोण जिंकतंय आणि हारतंय हा विचार बाजूला ठेऊन फक्त खेळाची तुलना करायची ह्या दृष्टीकोनातून मॅच बघा. >>> म्हणजे काय करायचं? व्यावसायिक खेळाचा प्रमुख हेतू नियमात राहून सामना जिंकणे हाच असतो ना? कोण जिंकतय हारतय हे बाजूला ठेवून बघायचं म्हणजे तीन तासाच्या मैफिलीत गवयाचा सूर दहा वेळा सटकला ते ठेवा बाजूला पण एक जागा काय महान घेतली ते बघा असं म्हणण्यासारखय.. >>>>> हे हे हे! हे उदाहरण काहीच्याकाहीच आहे मात्र.
फेडी ती मॅच अगदी ६-०, ६-१, ६-० अशी हरलाय का? तसं असेल तरच तुझं वरचं उदाहरण लागू पडेल.
की जो एक गेम जिंकलाय ना त्या दुसर्‍या सेट्मध्ये त्यामधला त्याचा खेळ बघा बाकी मॅच जाऊदेत.

दोघांच्या खेळामधली तुलना चालली होती म्हणून मी म्हणालो की मॅचचा निकाल बाजूला ठेऊन खेळ बघा.
केवळ उदाहरणादाखलच बोलायचं झालं तर मी म्हणेन की रोज्-रोज एकच राग गाऊन मैफिलीत वाहवा मिळ्वणं महत्वाचं की सगळे राग यथोचित पेश करून संगीत जगवणं महत्वाचं

एकवेळ कोण जिंकतंय आणि कोण हारतंय हा विचार बाजूला ठेऊन फक्त खेळाची तुलना करायची ह्या दृष्टीकोनातून मॅच बघा.>> हे अजिबात पटत नाहि. ह्याबाबत टण्याला अनुमोदन.

थोडक्यात स्पिन बॉलींग लीलया खेळणारे पण फास्ट बॉलर्ससमोर झगडणारे आणि फास्ट बॉलींग लीलया खेळणारे पण स्पिन बॉलर्ससमोर झगडणारे बॅट्समन आणि ह्यात जर पीच स्पीन किंवा बाऊंसला सपोर्ट करणारे असेल तर त्यांचा खेळ अजूनच खुलतो किंवा बिघडतो असे काहीतरी. पण जसे आपण म्हणतो की सचिन दोन्ही प्रकारच्या गोलंदाजी कुठल्याही पीचवर अगदी लीलया खेळतो आणि तेही फटक्यांमधले वैविध्य राखून तेच मला फेडीबद्दल म्हणावेसे वाटते. >> फटक्यांबाबत प्रश्नच नाहिये, फेडी परीपूर्ण खेळाडू आहे ह्याबाबतही दुमत नसावे. प्रश्न आहे तो "Greatest Ever" ह्या किताबाचा. जोवर क्ले कोर्टावरचे सर्वोच्च पारितोषिक तिथल्या सर्वोच्च खेळाडूला हरवून हातात पडत नाहित तोवर प्रश्नचिन्ह राहणारच. ते साहजिकच नाहि का ? ते नसेतो कुठे तरी काहितरी कमी पडतेय हे उघड आहे.

"आमचा फेडरर बघा कसला भारी आहे.. त्याला हे येतं.. ते येतं.. हेहे पण येत.. आणि तेते सुध्दा येतं !! नाहितर राफा त्याला फक्त हे आणि तेच येतं.."
"हो हो फेडरर चांगलाच आहे... पण काल आणि याआधी ४ वेळा फक्त हे आणि ते येऊनही राफा जिंकला की फेडरर विरुध्द इथे.. आणि दोनदा शेजारी (त्यात एकदा फेडरर विरुध्द) .. एकदा त्या तिथे.. आणि एकदा पलिकडेही (ते ही फेडरर विरुध्द) "
"काल किंवा इतक्यांदा राफा जिंकला म्हणून काय झालं ? शैली पहा.. बोर आहे.. राफा नैच आवडत आम्हांला... हरला तरी फेडररच सर्वोत्कृष्ट!!"

Uhoh

इथल्या 'फेडरर एके फेडरर' प्रेमी लोकांनीं झोपेचे सोंग घेतले आहे .. त्यांनां "झोपेतून" जागं करणं कठिण!

>> मुळ मुद्दा ज्याविषयी मी वरती लिहिले आहे तो आहे शैलीचा आणि परिपूर्ण खेळाचा.

अशा सर्वतोपरी परिपूर्ण खेळाने 'आता' मॅचेस् जिंकता येत नसतील तर त्या परीपूर्ण खेळाचा काय उपयोग! जेव्हा जिंकल्या तेव्हा जिंकल्या पण आता रात गई बात गई ..

गो नाडाल! गो ज्योको!

Pages