यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.
पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको
महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.
ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.
घालूनपाडून नाही काही, ऊलट मी
घालूनपाडून नाही काही, ऊलट मी तर केवढ्या विश्वासाने म्हणालो की तो नेहमीसारखी पुढची ऑसी ओपन(च) जिंकेल.
जाऊद्याहो! आमच्या घोड्याचं आता वय होत चाललं आहे. जिंकू द्या त्याला थोडं. बिचारा किती दिवस तरी टिकणार आहे असा? मग तो गेला की सगळेच कप तुम्ही घेऊन टाका. खेळायचीही गरज नाही.
ए चमन, तू का एव्हढा ज्योको ला
ए चमन, तू का एव्हढा ज्योको ला घालून पाडून बोलतोस? >>
फेडी म्हणजे तेंडल्यासारखा आहे. निंदा वा वंदा तो जिंकणार. नादाल मला आवडतो, आज सकाळी तो जिंकावा म्हणून मी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना केली पण तरी फायनल मध्ये जिंकणार फेडीच !
सशल मला फेडी, नदाल, ज्योको
सशल
मला फेडी, नदाल, ज्योको सगळेच आवडतात. पण जेव्हा मॅच चालू होते तेव्हा मी नकळत फेडीला पाठींबा द्यायला, चिअर करायला सुरू करते.
आजच्या मॅच (फेडी आणि जोको) मधला दुसरा सेट हा की सेट होता. जोको बहुदा पहिला सेट कसा हातातून निसटला / घालवला हा विचार करत असणार आणि फेडीने हलकेच दुसर्या सेटवर पकड मिळवली.
जर का दुसरा सेट जोकोला मिळाला असता तर जोकोला मॅच जिंकायचे फेडीपेक्षा जास्त चान्सेस होते .
काल राफाने आणि जोकोने
काल राफाने आणि जोकोने आपापल्या बाजूने आलेले चुकीचे लाइन कॉल बदलून दिले. याला म्हणतात खिलाडूवृत्ती. नाहीतर काही काही खेळाडू रिव्ह्यु सिस्टममधला रिप्ले आपल्या मनासारखा दिसला नाही, की ही मशिन बंद करा म्हणून थयथयाट करतात. दिसेलच विंबल्डनात.
काही काही खेळाडू >>>> म्हणजे
काही काही खेळाडू >>>> म्हणजे नक्की कोण ?
हो हो सचिन आता फेडी फायनल
हो हो सचिन आता फेडी फायनल जिंकणार.
काल #@##& केबलवाल्यामुळे फेडी- जोको मॅच हुकली.
राफा- मरे बरी होती.
महिलांची फायनल बघत नाहीये
महिलांची फायनल बघत नाहीये का?
ली ने पहिला सेट घेतला आहे. फोरहँड मस्त बसतोय तिचा.
फायनल बघतय की नाही कोणी ? ना
फायनल बघतय की नाही कोणी ? ना ली ने पहिला सेट जिंकला.......
स्किवोनी ताईंना लय सापडत नाहीये अजूनही.. फार बाहेर मारतायत !
http://www.business-standard.
http://www.business-standard.com/india/news/willkingclay-be-dethroned/43...
या लेखात क्ले कोर्ट्स वरच्या खेळाबद्दल छान लिहिलेय.
http://www.indianexpress.com/news/a-step-away-from-borg/794069/0
राफा आणि बोर्ग यांच्या कामगिरीची तुलना.
शियावोनीला काही विशेष जमत
शियावोनीला काही विशेष जमत नाहिये.. किती त्या अनफोर्स्ड एरर्स...
जिंकली ली !!! पहिली चायनीज
जिंकली ली !!!
पहिली चायनीज महिला ग्रँडस्लॅम चॅंपियन.. !!
काल राफाने आणि जोकोने
काल राफाने आणि जोकोने आपापल्या बाजूने आलेले चुकीचे लाइन कॉल बदलून दिले. याला म्हणतात खिलाडूवृत्ती
>>
जाऊ द्य हो मयेकर. एवढं काय त्यात. मॅचच्या वेळचे निर्णय पटले नाहीत तर सगळेच प्रतिक्रिया व्यक्त करतात. काल जोकोविचला सुद्धा अंपायरने (बहुतेक) पटकन सर्व्हिस करत नाही म्हणून काहीतरी सुनावले. त्या पॉइन्टनंतर जोकोविच अंपायरला जाऊन काहीतरी सुनावून आला.
तुम्ही काल एवढ्या मोठ्या दोन मॅचेस पाहिल्यात आणि त्याविषयी काहीही न लिहिता उगीचच फाल्तु काहीतरी टिप्पणी केलीत! कमाल आहे.
महिलांच्या फायनलचा शेवटचा सेट पाहिला. ना ली चांगलं खेळली खरंच.
काल जोकोविच - फेडरर मॅच पूर्ण पहायला मिळाली नाही म्हणून आज क्षणचित्रं पाहिली. जोकोविचने इतका पॉवरफुल खेळ करून सुद्धा तो हरला ह्याचं मला आश्चर्य वाटलं. शेवटी शेवटी फेडरर बहुतेक करून डिफेन्स मोडमध्ये होता असे वाटले.
मुकुंद, अडम, फचिन, चमन,
मुकुंद, अडम, फचिन, चमन, सुमंगल, मनीष, मयेकर.. ऊठा.... दर्जेदार टेनिसचा आनंद लुटायला सज्ज व्हा.
उठलो उठलो.. चहा घेऊन, कुक्या
उठलो उठलो.. चहा घेऊन, कुक्या खाऊन मॅच पहायला सज्ज आहे !!!!!
राफा................ राफा.................... !!!!!!!!!!!
जिंकून जिंकून जिंकणार कोण ? राफा शिवाय आहेच कोण ??????
एक दो एक दो.. फेडी को फेक दो !!!!!!!!!!!!!!!!!!!
राफाSSSSS................
राफाSSSSS................ राSSSSफा.................... !!!!!!!!!!!
हे हे मॅकॅन्रो काय सही
हे हे मॅकॅन्रो काय सही बोलला.... जिओ जिओ
उठलोय.. उठलोय... एक दो एक
उठलोय.. उठलोय...
एक दो एक दो.. फेडी को फेक दो !! >>
न खेळलेलं लाल कोर्ट का सुंदर दिसतंय.. लई भारी..
फेडरर काय नेत्रसुखद सर्व्हिस
फेडरर काय नेत्रसुखद सर्व्हिस करतो खरंच. मस्त वाटते पहायला.
.
.
छ्या!! सेट पॉईंट घालवला आणि
छ्या!! सेट पॉईंट घालवला आणि आता...
एकदम पलटला राव पहिला सेट.
एकदम पलटला राव पहिला सेट. नदाल चांगलं खेळला पण खरंच. काहीकाही पॉईन्ट्स अशक्य होते..
सेट पॉईंट वाया घालवून फेडीने
सेट पॉईंट वाया घालवून फेडीने चूक केलीये..
सेट मिळ्वणं तर लांबच पण गेम
सेट मिळ्वणं तर लांबच पण गेम जिंकणं आणि स्वतःची सर्विस राखणंही अवघड झालंय फेडीला.... तीन सेटरच होणार बहूतेक ही.
रेन डिलेमध्ये बोर्गची एखादि
रेन डिलेमध्ये बोर्गची एखादि मॅच दाखवली तर मजा येइल...
पाऊस आला. २-० झाला सेट स्कोर
पाऊस आला. २-० झाला सेट स्कोर तर फेडरर ३ सेटमध्येच हरेल.
मलातर सर्व्हिस, फोरहॅन्ड, बॅकहॅन्ड, नेटजवळचा खेळ, शॉटसमधली व्हरायटी, सगळ्यामध्ये फेडरर अक्षरशः सरस वाटतो. पण नदालचा तो टॉपस्पिन करून बॅकहॅन्ड्ला मारलेला त्याला झेपत नाही. आणि मग नदाल तेचतेच शॉट खेळून पॉइन्ट्स मिळवत राहतो. चिडचिड होते. :|
पण मला फेडररचा खेळ बघताना जितकी मजा येते तितकी नदालचा बघताना येत नाही. फारच एकसुरी खेळतो तो.
चमन, हं! :रागः पराग ला पूर्ण
चमन, हं! :रागः
पराग ला पूर्ण पाठींबा!
अन्कॅनी दिसत नाही .. :p
तिसराही टायब्रेक ला जाणार
तिसराही टायब्रेक ला जाणार बहुतेक!
नाडाल ग्रँड स्लॅम मधल्या १०१ मॅचेस् मध्ये २-० ची लीड असताना हरलेला नाही!!!!
येस्स्स ! ( कट्टर फेडी फॅन
येस्स्स ! ( कट्टर फेडी फॅन . )
येस्स! (नाडाल ने ही मॅच
येस्स! (नाडाल ने ही मॅच जिंकावी असं वाटणारी टेनीस फॅन. :p)
काही हरकत नाही. २०१२ ला
काही हरकत नाही. २०१२ ला जिंकेलच फेडी. आणि ऑलिंपिक्स गोल्डपण.
Pages