फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला तो जोको दुसर्‍याचं ते ... असंच ना<<
हो खरेच चमन, नाही आले लक्षात.

हारल्या नंतर कसला आत्मविश्वास. पुर्वी तो क्वॉटर फायनल ला हरला तेव्हा म्हणाला 'lot of people die to get into quarter final, .........'. मला भावार्थ आठवतोय 'काय झालं मी हारलो तर, क्वॉर्टर पर्यंत पोहोचलोय ना'. म्हणुन मला वाटले कि त्याला ग ची बाधा आहे.

आणि झाली तरी ती त्याला होऊ नये तर मग आणि कुणाला व्हावी. <<
खरंतर कुणालाही होउ नये, नहीतर 'गर्वाचे घर खाली' होतेच. जोको ला झाली तर तोदेखिल मला नाही आवडणार.

आपला तो जोको >>> Lol
झाली तरी ती त्याला होऊ नये तर मग आणि कुणाला व्हावी >>> हे नाही पटलं.. पण दात विचकावलेले असल्याने सिरियस नसावं.. Happy

राफाने दुसरा सेट पण जिंकला.. !
पण एकूणात कशी चाललीये मॅच ते कळत नाहीये नुसता स्कोर बघून..

अरे सुमंगलताई तुम्ही फार गांभीर्याने घेतलं का ते? मी ते मजेने लिहिले होते. स्माईलीपण आहेत तश्या. Happy

खरंतर कोर्टाबाहेरच्या गोष्टी आ़जिबात गांभीर्याने घेऊ नये. हा एक वैयक्तिक खेळ असल्याने त्यांचं तेव्हाचं वागणं बोलणं हे बरचसं त्यांच्या कोचींग, सध्याची मानसिक स्थिती, समोरच्या खेळाडूबद्दलच्या भावना, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अश्या बर्‍याच गोष्टीतून येतं. जोवर एखाद्याचा खेळ चांगला आहे तोवर तो आपल्या स्वतःबद्दल काहीही बोलला तरी फार फरक पडत नाही.

मॅच चांगलीच टफ चालू आहे.. स्कोर लाईन जरी सरळ दिसत असली तरी राफाला बर्‍यापैकी झगडायला लागले आहे.... दुसर्‍या सेट मध्ये राफानी ५ ब्रेक तर मरेनी ३ ब्रेक घेतले.. आणि रॅलीज पण जोरात चालू आहेत.. एकूणात मॅच जोरात चालू आहे.. पण सरळ तीन सेट मध्ये निकाल लागणार असेच दिसते आहे..

फेडरर ला 'ग' ची बाधा?????

निषेध! :p

पण नेमकी फेडरर ची मॅच ज्योको बरोबर .. ये बहुत नाइंसाफी है!

ट्रॉफी तिघांत वाटून द्या! :p

भारी झाला पहिला सेट. फेडररने नेहमीप्रमाणे भारी सर्व्हिस केली.
ही मॅच बुडवणे शक्य नव्हते. म्हणून मी लंचटाईमला घरी आलो. तेवढाच पहिला सेट पहायला मिळाला. Happy

सही रे!! मी पण लंचटाईममध्येच घरी आलो.
मागच्या यू एस ओपनचं फ्रस्ट्रेशन (ऑस्ट्रेलियन आपण मनावर घेत नाही Happy ) अजून निघालं नाहीये. आज जरा म्हणजे जरा जास्तीच आशा वाटतेय.

किंवा नको >> नको. फेडेक्स जिंकणार आहे. Happy

हणून मी लंचटाईमला घरी आलो. तेवढाच पहिला सेट पहायला मिळाला >> मी घरीच. आजच्या दोन्ही मॅचेस पाहत आहे. पण अजुनही मजा काही येत नाही.

काय तुंबळ युध्द चालू आहे !!!!!! जोकोच्या फूटवर्कला काय झालय.. काहितरी गंडतय... टिपीकल फ्रेंच ओपन रॅलीज सुरु आहेत.... कोपरा टू कोपरा.. ! पहिल्या सेटमध्ये जोकोने दोन सेट पॉईंट घालवले. फेडरर सर्व्हचा जोरावर बरेच पॉईंट मिळवतो आहे...
सुमंगलताई, देव पाण्यात ठेवा... !!

प्रेशर आलं असणार त्याच्यावर ..

फेडरर ला सॅम्प्रस बरोबरीचा टाय मोडायचाय ना कुठल्या तरी रेकॉर्ड साठी म्हणून तो जीव तोडून खेळत असावा आणि ज्योको ला "एकही मॅच हरला नाहीये २०११ मध्ये" वगैरे सारखं ऐकवून लोकांनीं प्रेशर आणलं बहुतेक .. स्वतः फेडरर पण म्हणाला होता, ज्योको मायक्रोस्कोपखाली आहे सध्या ..

Pages