सर्प ...

Submitted by सेनापती... on 31 May, 2011 - 05:47

पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे..

१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...

२. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.

३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना :
रच्याकने ... तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... Happy

४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?

५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.

६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.

७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.

८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)

9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!

१०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!

११. पिवळा नाग...

१२. मण्यार (Indian Commom cret) -

१३. पिवळी धामण - बिन विषारी.

तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???

गुलमोहर: 

१०नंचा फोटो पाहून फाटली की हो.....

>>>>>जल्ला मी काय करणार?? तोच करेल काय करायचंय ते... अनुमोदन..

सुसाट धावत सुटेल अजुन काय करणार, फारतर तुमचे नाव सांगुन बघेन एकदा, ऐकले तर ठिकच आहे. Happy

पक्क्या सह्हीच रे Happy
फणा काढलेला नागाचा फोटु भारीच Happy
रच्याकने, प्रचि ५ मधल्या फोटोत (डावीकडुन पहिला) स्वप्निल आहे का?

तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??? >> जल्ला उड्या मारणार आणि काय Proud

तो नाग नि मण्यार नेहमीच टेंशन आणतो...जंगलातून फिरताना.. Proud बाकी साप दिसायला सुंदर असतात.. पण लांबूनच छान वाटतात.. Lol

जबरा फोटो Happy

रच्याकने मी एकदाच साप गळ्याभोवती गुंडाळून घेतलेला फोटो काढण्या पुरता, त्या एका फोटोवर बरीच वर्ष भाव खाऊन घेतला Proud

यो, नाग, मन्यार नि फुरसो तर हांच. घोनसाचो फुसकारो ऐकलाहांस... आपल्यांव मागसून फुसकारो येतां!!
विषारी व बिनविषारी साप एक दृष्टीक्षेपात कसा ओळखायचा?
साप आडवा आल्यावर ***ला आम्ही पाय लावून आणि साप शेपटाचे टोक लावून विरुद्ध दिशांना 'सू' साट होतो. ट्रेक्सना अशा भेटी झाल्या आहेत. यापेक्षा सोप्पा उपाय कुणाकडे असल्यास आम्ही आणि साप दोघेही ऋणी राहू...!!!!

सुंदर फोटो.
रच्याकने, पाचव्या फोटोत स्वप्नील पवार आणि युवराज गुर्जर दिसताहेत. परत कधी गेलास तर सांग मला. येईन मीपण.. Happy

स्मितहास्य ...

होय.. स्वप्नील आणि युवराज होते... पुन्हा बहुदा कधीतरी पावसाळ्यात जाणे होईलच.. कळले तर कळवतो... Happy

सॉलिड आहे हे Happy

साप आडवा गेला तर -

गेल्यावर्षी गोविद्यापीठम, कर्जत येथे गेले असताना व तिथे झाडांखालचा पालापाचोळा हिरकुटाच्या झाडूने वाकून झाडत होते. तेवढ्यात वरच्या फांदीवरुन काहीतरी डोक्याला चाटून जाऊन पायाशी खाली पडलं. आधी वाटलं वाळकी फांदी पडली कीकाय. मग बघितलं तर वरुन काळा व खालच्या बाजूने फिकट असलेला साप पावलांपाशी पडला होता. तो पण बघुतेक धसक्याने घाबरला असावा. मी मस्तपैकी निरिक्षण करत उभी राहिले काही सेकंद. तेवढ्यात आठवलं की आपल्याला इथून बाजूला व्हायला हवं. मग पटकन तुळशींच्या लांबट वाफ्यांवरुन उडी मारुन पलिकडे गेले (सापापासून साधारण ४ फुटांवर) आणि इथे ना साप आई, इथे ना साप आहे असं करत राहिले. सिक्युरिटी येऊन बघेपर्यंत साप गुल. कसं काय कुणास ठाऊक पण घाबरलेच नाही. नशिब माझ्या झाडूचा फटकारा झाडता झाडता अचानक वरुन पडलेल्या सापाला लागला नाही. लागला असता तर कदाचित माझ्यावर चालून आला असता.
आता जेव्हा जेव्हा तिकडे जाते तेव्हा मधून मधून वरच्या झाडाच्या फांद्यांकडे लक्ष ठेवते. रातराणी, चाफा यांच्या जवळ फिरकत नाही. गुलमोहराच्या शेंगा लटकलेल्या दिसल्या तरी त्यातली एखादी हलत नाहिये ना बघते. असो...

अफलातून !
पूर्वी चंद्रपूरच्या जंगलात कांही दिवस भटकायचा योग आला होता. " भाऊ, तुम्ही काय कोकणातले !तुम्हाला कसलं आलंय सापांच भय !! ", या सहकार्‍यांच्या बोलण्यामुळे उसन अवसान आणता आणता माझ्या नाकी नऊ आले होते ! शेवटी, "अरे, पण इथल्या सापाना मालवणी येत नाही ना " असले पुळचट विनोद करून मी वेळ मारून न्यायचो. सर्पमित्राना जाम मानतो मी ! चंद्रपूरचे नाग मात्र काळसर रंगाचे असत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे मोठ्या प्रमाणावर फुरसे आढळतात, मुंबैची हाफकीन लसी बनवायला लागणारे विष तेथुनच आणते. असे म्हटले जाते की तेथिल किल्ला परिसरात एखादा दगड हलवीला तर त्याचे दर्शन होवु शकते.. त्यामुळे किल्ला परिसरात भटकताना एक अनामिक भिती दाटुन राहते.. Happy

<< देवगड येथे मोठ्या प्रमाणावर फुरसे आढळतात >> जगप्रसिद्ध देवगड हापूस पण त्याच कातळावरचा ! बहुतेक, जमिनीतलं विष फुरसं शोषून घेतं म्हणून आंबा निखळ गोड होतो !! Wink

मी कोकणात फोंडाघाटला दीड वर्ष सरकारी दवाखान्यात होतो. तिथे फुरसे चावलेले बरेच रुग्ण यायचे. येताना साप घेऊन पण यायचे. फुरसे अगदी लहान असते, अर्धा ते एखादा फूट, त्यापेक्षा जरा लहानच. त्याचे विष भिनले की नाक, तोंड, लघवी सगलीकडून रक्तस्त्राव व्हायला लागतो. पण सर्पदंशावरचे औषध अगदी प्रभावी काम करते. बहुतेक सगळेच रुग्ण बचावतात. फुरसे म्हणजे व्हायपर

Pages