पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे..
१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...
२. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.
३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना :
रच्याकने ... तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा...
४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?
५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.
६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.
७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.
८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)
9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!
१०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!
११. पिवळा नाग...
१२. मण्यार (Indian Commom cret) -
१३. पिवळी धामण - बिन विषारी.
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???
सौंदर्य टिपलेय अगदी. मी एका
सौंदर्य टिपलेय अगदी. मी एका प्रदर्शनात बंगाली पिवळा नाग बघितला होता. त्याच्या फण्यावर "दहाचा आकडा" नव्हता तर चक्क गोलाकार बांगडी होती.
बाप्रे... फोटो बघता बघताच मी
बाप्रे... फोटो बघता बघताच मी खुर्चीवर पाय घेउन बसले. कसले धाडशी फोटो आहेत!!!! तो १०नंचा फोटो खतरनाक!!
बापरे..
बापरे..
फोटो पाहुन अंगावर काटा आला..
फोटो पाहुन अंगावर काटा आला.. प्रत्यक्षात काय गत होइल
हातात घेणार्यांना _/\_
आर्या बापरे खरचं भयानक
आर्या
बापरे खरचं भयानक आहे... पभ तुम्ही आहे का? ह्या फोटोत...
वा! मस्त फोटो आहेत. माझ्या
वा! मस्त फोटो आहेत. माझ्या माहितीत देशातली एकमेव सर्टिफाईड सर्पमैत्रीण आहे. तिचे अनुभव छानच होते...
स्मिता... नाही. तो मी
स्मिता... नाही. तो मी नव्हेच..
मी विषारी साप हाताळत नाही. मला अजूनतरी तसे प्रशिक्षण नाही..
११ नंबरच्या इतकाच मोठा सर्प
११ नंबरच्या इतकाच मोठा सर्प आमच्या परीसरात फिरत असतो. मागच्या वर्शी आमच्या शेजारच्या घरातुन एक नाग सर्पमित्राने पकडून नेलेला.
खतरनाकच!
खतरनाकच!
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाहीये???
अॅग्रीकल्चर कॉलेजच्या आमच्या
अॅग्रीकल्चर कॉलेजच्या आमच्या कॉलनीत साप खुप निघायचे. घरात साप शिरला की आधी मलाच दर्शन द्यायचा. पुष्कळदा आई वडील बाहेर गेले की तेव्हाच साप दिसायचा मग माझी पळापळ. भावंडांना किचन ओट्यावर बसवुन देणे इ. कामं माझीच.
माळी ट्रेनिंग सेंटरजवळ आमचे क्वार्टर्स होते. ऑफीस नि क्वार्टर्स यांच्यामधे पेरुची, काजुची बाग व मधेच एक कोरडा पडलेला ओढा. एकदा भर दुपारी बाहेर ओढ्याकडे सगळे लोक धाव घेतायत बघुन आम्ही गेलो तर नाग- नागिणीचा प्रणय सुरु होता. दोघंही डोक्यापर्यंत(आपल्या) उंचावर उड्या मारुन एकमेकांना गुंडाळुन खाली पडत ...पुन्हा वर उड्या घेत. शहारा येतो ते आठवलं की!!
बरं दोन्ही बाजुंनी इतक्या लोकांचा आवाज तरी हे दोघं बेखबर. सापाला ऐकु येत नाही .. पण दिसत ना?
बोबडी वळेल.
बोबडी वळेल.
आर्या...सापाला स्पष्ट दिसत
आर्या...सापाला स्पष्ट दिसत नाही...
आता माझे सापांबद्दलचे अनुभव एक एक करून इथे देतो...
मला सर्प मित्रांचा नंबर असला
मला सर्प मित्रांचा नंबर असला तर द्या ना. मुंबई साठी.
बाप्रे... अंगावर शहारा आला
बाप्रे... अंगावर शहारा आला नुसते फोटो बघुन....
रोहन मस्तच .. तुम्हाला कधी
रोहन मस्तच ..
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??? >> अरे काय ....त्याच्याशी थोड्या गप्पा मारायच्या अन नंतर त्याला सांगायचे बाबा तु तुझ्या वाटेने जा ... मी माझ्या वाटेने जातो .. हाकानाका
साप आडवा जात असताना स्वतःच
साप आडवा जात असताना स्वतःच घाबरुन पळत असतो. म्हणुन आपण तो जाताना बघायचा.
सुपर्ब. बत्तीस शिराळ्याची
सुपर्ब. बत्तीस शिराळ्याची नागपंचमी आठवली.
मस्त रे भटक्या..
मस्त रे भटक्या..
मस्तच...
मस्तच...
लय झ्याक पभ. सर्पमित्र
लय झ्याक पभ. सर्पमित्र कोण्कोण होते त्यांची नाव आणि नंबर्स टाक बर. वेळेला उपयोगी येतील. ६ नंबरच्या फोटोत लाल शर्टात मित्र दिसतोय माझा.
बादवे साप आडवाच येतो सहसा. त्यात घाबरण्यासारख काय नै. उभा राहिला तर जरुर घाबरा. पाय किंवा काठी आपटली की निघून जातो बिचारा.
पक्या, सहिच रे.. >>उभा
पक्या, सहिच रे..
>>उभा राहिला तर जरुर घाबरा.
लय झ्याक पभ. सर्पमित्र
लय झ्याक पभ. सर्पमित्र कोण्कोण होते त्यांची नाव आणि नंबर्स टाक बर. वेळेला उपयोगी येतील. >>>
असेच म्हणतो
खतरा हायती समदेच फटू, त्यो दातांचा तं लै डेंजर !
तुम्हाला कधी साप आडवा आला तर
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???
जल्ला मी काय करणार?? तोच करेल काय करायचंय ते...!!!
फोटू लय भारी!!!
भारी फोटो रे...चार नंबरचा
भारी फोटो रे...चार नंबरचा फोटो मण्यारही असू शकतो किंवा वूल्फ स्नेक देखील...दोघे थोडेफार सारखेच दिसतात. तो फोटो फोकस नीट झाला नाहीये त्यामुळे कळत नाहीये.
रच्याकने, पाचव्या फोटोत स्वप्नील पवार दिसतोय...भाई स्नेक रिलीज करायला फॉर्मल्समध्ये आले होते का...
तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल???
आधी तो विषारी-बिनविषारी असल्याची खात्री करून घेईन. बिनविषारी असेल तर त्याला पकडून फोटो काढीन नायतर नुसतेच (न पकडता) फोटो काढायचा प्रयत्न करेन आणि नंतर मायबोलीवर टाकेन...
डेंजर फोटू... मी कधीही साप
डेंजर फोटू...
मी कधीही साप हाताळू शकणार नाही... या जन्मात तरी नाहीच
मला साप आडवा आला तर मी तर तिथल्या तिथे गोठून उभी राहीन
>>>>>जल्ला मी काय करणार?? तोच
>>>>>जल्ला मी काय करणार?? तोच करेल काय करायचंय ते...!!!
ओ यात्री, असं म्हणायला तो काय वाघ आहे का?
अरे हो.. स्वप्नील आला होता पण
अरे हो.. स्वप्नील आला होता पण तेंव्हा माझी आणि त्याची ओळख नव्हती. तो बहुदा फोटो काढायला आला असावा..
आमची ओळख नंतर कधीतरी झाली आणि आम्हाला दोघांनाही साक्षात्कार झाला की आम्ही लहानपणापासून जवळच्याच सोसायटीमध्ये राहतो..
फणा काढलेला नाग कित्ती सुंदर
फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!>>>>
हो ना फारच सुंदर!!
इतका की माझ्या सारख्या लोकांना लगेच भूतदया हा कसा महत्वाचा सद् गुण आहे वगैरे आठवायला लागते.
(No subject)
Pages