उत्तराखंड कॉलिंग — झील के उसपार "नैनिताल"

Submitted by जिप्सी on 22 May, 2011 - 08:59

भाग १:
देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)
http://www.maayboli.com/node/25900
===============================================
===============================================
नैनिताल – उत्तरांचल राज्यातील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. चारही बाजुंनी उंचच उंच डोंगर आणि घनदाट झाडीने वेढलेले एक नितांत सुंदर ठिकाण. या त्याच्या सौंदर्यात भर घालतात ते नितळ पाण्याचे सरोवरे अर्थात "ताल" आणि म्हणुनच या ठिकाणाला "सरोवर नगरी" असेही म्हणतात. यातील प्रत्येक सरोवराची एक कहाणी आहे. पाचूच्या हिरव्या कोंदणात वसलेले हि सरोवरे म्हणजे नैनितालचा दागिनाच. उगीचच नाही स्थानिक लोक म्हणतात कि, "तालों में ताल नैनीताल बाकी सब तलैया".

खरंतर निसर्ग आपल्याला दोन प्रकारे भेटतो एक म्हणजे स्वत:च्या उन्मुक्त आणि खर्‍या अवस्थेत आणि दुसरे म्हणजे साचेबद्ध, आखीव रेखीव सौंदर्यखुणाच्या स्वरूपात. नैनितालला आपल्याला भेटणारा निसर्ग हा पहिल्या प्रकारातला. जरी आज येथे पर्यटकांची गर्दी असली तरी इथला निसर्ग आपल्याला उन्मुक्तपणेच भेटतो. निसर्गाचा समतोल आज जरी आपल्या कर्मामुळे बिघडत चालला तरी तो स्वत: मात्र बेईमान होत नाही. नैनितालचा निसर्गही त्याला अपवाद नाही. इथे तुम्ही "मानव" म्हणुन आलात म्हणून तो देताना कुठेही डावं उजवं करत नाही. इथुन दूरचे डोंगरही साजिरे दिसतात आणि जवळचेही. Happy

उत्तरांचल भटकंतीत मला अतिशय आवडलेले हे ठिकाण. योगायोग असा कि, माझी पहिली मोठी भटकंती (३ महिने) हि "फिनलंड"ची आणि त्यानंतर "उत्तरांचल"ची (१२ दिवस) आणि यातील पहिले ठिकाण म्हणजे "फिनलंड" "सरोवरांचा प्रदेश" (लाखाहुन जास्त सरोवरे असल्याने) आणि नैनिताल "सरोवरांची नगरी" म्हणुन ओळखले जाते. दोन्ही भटकंतीत मला सरोवरांच्या सान्निध्यात मनसोक्त राहता/भटकता आले. अर्थात दोन्ही ठिकाणी मनाला लाभणारे समाधान हे एकच होते. नैनितालच्या सरोवराकाठी फिरताना कित्येकदा मला फिनलंडलाच फिरल्याचा भास होत होता.

या नैनितालची पौराणिक कथा अशी कि, दक्ष राजाने योजलेल्या यज्ञात त्याने पार्वती आणि तिचा पती शंकराला आमंत्रण दिले नाही. पार्वती हटकुन यज्ञ समारंभात गेली असता दक्ष राजाने केलेला आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन तीने यज्ञकुंडात उडी घेतली. जेंव्हा भगवान शंकराला समजले कि पार्वती सती झाली तेंव्हा त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी क्रोधीत होऊन सतीचे जळते शरीर घेऊन आकाशभ्रमणास सुरुवात केली. यावेळेस सतीच्या शरीराचे भाग ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी शक्तीपीठे निर्माण झाली. जिथे सतीचे डोळे (नयन) पडले तेथे नैनादेवी (नंदा देवी) चे स्थान निर्माण झाले. सतीच्या डोळ्यांतील वाहणार्‍या अश्रुं येथे सरोवरात रूपांतरीत झाले. नैनादेवीचे अश्रु म्हणजे नैनीताल. या तलावाचा आकारही डोळ्याच असल्याचे स्थानिक लोक सांगतात.

चला तर मग याच "सरोवर नगरी"ला आज भेट देऊया.
===============================================
===============================================
नानकमत्ता साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेतल्यावर आम्ही किच्छा-हलद्वानी मार्गे नैनितालला निघालो. खटिमा ते नैनिताल अंतर साधारण ११३ किमी आहे. मुंबई-पुण्याहुन यायचे झाले तर दिल्लीला यावे आणि तेथुन दिल्ली-काठगोदाम रेल्वेने "काठगोदाम" या नैनितालच्या पायथ्याशी वसलेल्या गावी यावे. काठगोदाम किंवा हलद्वानी येथुन नैनितालला जाण्याकरीता उत्तराखंड परिवहना किंवा K.M.O.Uच्या भरपूर बसेस उपलब्ध आहेत. तसं दिल्ल्लीहुन (वसंत विहार बस स्थानक) थेट नैनितालला किंवा हलद्वानीला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत, पण हा प्रवास थोडा त्रासदायक वाटतो. (दिल्ली ते नैनिताल रोडवेज अंतर साधारण ३१७ किमी आहे).

दिल्लीहुन काठगोदामला जाणार्‍या रेल्वे.
१. दिल्लीहुन (आनंदविहार टर्मिनस ते काठगोदाम) "ANVT KGM AC एक्स्प्रेस" हि गाडी (गाडी नंबर 14012) सकाळी सहा वाजता निघते आणि काठगोदामला १२ वाजेपर्यंत पोहचते.

२. "उत्तरांचल संपर्क एक्स्प्रेस (15035)" हि गाडी संध्याकाळी ४ वाजता निघते आणि रात्री १०:४० पर्यंत काठगोदामला पोहचते.

३. "राणीखेत एक्स्प्रेस (15013)" हि गाडी रात्री दहा वाजता दिल्लीहुन निघते आणि सकाळी ५:२० पर्यंत काठगोदामला पोहचते.
(वरील माहिती IRCTC वरून साभार)

आम्ही मात्र रोडवेजने हलद्वानीला पोहचलो आणि तेथुन नैनितालला जाणारी बस पकडली. हलद्वानी/काठगोदाम हि नैनितालच्या पायथ्याची गावे, पण जराही थंडपणा जाणवला नाही. :-)शरीरातुन घामाच्या धारा वाहत होत्या. नैनितालला रोडवेजने दोन मार्गे जाता येते एक म्हणजे "जोईलकोट" आणि दुसरा म्हणजे "भवाली" मार्गे. यातील पहिला मार्ग जवळचा आहे. आमची बस त्याच मार्गे चालली. हलद्वानी ते नैनिताल हे अंतर अंदाजे ३५-४० किमी आहे. साधारण विसएक किमी गाडी गेल्यावर मात्र थंड हवेने नैनिताल जवळ येत असल्याचे सुचवले. तास-दिडतासात
आम्ही नैनितालला पोहचलो. खरं तर खटिमाला भरपूर गरम होत असल्याने आम्ही जॅकेट, गरम कपडे (खास नैनितालसाठी घेतलेले) घरीच ठेवले. विचार केला उन्हाळा असल्याने नैनितालला जास्त काही थंडी नसणार. .....आणि हाच आमचा विचार किती चुकीचा होता हे बसमधुन उतरल्याक्षणीच जाणवले. Happy आम्ही सहाहीजण थंडीने अक्षरश: कुडकुडत होतो. विश्वास बसत नव्हता कि मे
महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात, भर दुपारी तीन-साडेतीनच्या वेळेत, इतक्या थंडीत आम्ही कुडकुडत आहोत. Happy गाडीतुन उतरल्यावर लगेचच आम्ही चहाच्या दुकानात गेलो, तिथेच आम्हाला
खाण्याचा स्थानिक प्रकार "मोमो" दिसला. Happy मग काय गरमागरम चहा आणि मोमोजमुळे थोडीफार थंडी पळाली.:-) "मे महिन्यातील कडाक्याच्या थंडीने" शुद्धीवर येताच समोरच नितळ
पाण्याचा"तल्ली ताल" दिसला. माझी नैनि"ताल"ची ती पहिली भेट आणि पाहताक्षणी या ठिकाणाच्या प्रेमात मी पडलो. :-). इतक्यात पावसाचे ढग जमु लागले आणि टपोरे थेंब पडु लागले. आमची
अवस्था मात्र, "अरे काय चाल्लंय काय??, ऐन मे महिन्यात कडक थंडी काय नि आत्ता हा पाऊस" नक्की कुठल्या दुनियेत आहोत??" अशी झाली होती. पावसाच्या त्या हलक्यासरींनी वातावरणातील गारठा अजुन वाढला, मात्र वातावरण नितळ झाले होते.

आमच्या एका मित्राची ओळख असल्याने आम्ही "युथ हॉस्टेल" मध्ये दोन रूम बूक केल्या होत्या. तल्लीतालपासुन युथ हॉस्टेल साधारण २ किमी असल्याने आम्हाला न्यायला दोन कार येणार होत्या. त्याची वाट पहात आम्ही तेथेच थांबलो. तिथे सगळे जॅकेट, शॉल, स्वेटर आणि गरम कपडे घालुन फिरत होते आणि आम्ही सहाजण टिशर्ट आणि शॉर्ट्सवर (थंडीने कुडकुडत :-)). थोड्यावेळात
गाड्या आल्या आणि आम्ही युथ हॉस्टेलकडे निघालो. नैनितालच्या गर्दीपासुन थोडे लांब आणि निवांत ठिकाणी असलेले हे हॉस्टेल खरंच खुप छान, स्वच्छ आणि स्वस्त होते. Happy येथे आम्हाला तीन बेडच्या दोन रूम्स ६०० रूपयात मिळाल्या. येथे प्रकर्षाने जाणवले असे कि कुठल्याही रूममध्ये पंखे नाही किंबहुना सिलिंगला पंखे अडकवण्याचे हूकही नाही. Happy अर्थात त्याची गरजच नाही,
नॅचरल एसी चालु होता ना Wink हा एसी थोडा वाढवायचा असेल तर रूमची एक खिडकी उघडा. फुल्लऑन एसी सुरू. :-). रूम खरोखर स्वच्छ आणि सुंदर होत्या. तेथेच खाली कँटिनमध्ये जेवणाची
सोयही आहे. फ्रेश होऊन संध्याकाळी मार्केटमध्ये फिरायला गेलो. यावेळी मात्र २ किमी पायीच जायचे ठरवले. खरंतर येथे पायी पायी भटकणेहि एक वेगळाच आनंद देऊन जातो. मस्त भटकुन,
गरमागरम चनाचाट, पकोडी खाऊन रात्री दहाच्या सुमारास परत रूमवर आलो. जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती, जेवून मस्तपैकी गप्पा मारत सगळे झोपेच्या स्वाधीन झालो.

दुसर्‍या दिवशी फिरण्यासाठी आम्ही दोन गाड्या बूक केल्या होत्या (रूपये १५००/- प्रत्येकी, यात नैनितालचे सगळे पॉईंट, भीमताल, नौकुचियाताल, भवाली, हनुमानगढी आणि शेवटी राणीखेतला
सोडणार होते शिवाय प्रत्येक गाडीत एक गाईडही होता). या सीझनमध्ये येथे भटकंती करण्याचा फायदा असा कि येथे दिवस लवकर उजाडतो (सकाली ५ वाजताच सूर्यदेव ड्युटीवर हजर :-)),
साधारण सहा वाजता ऊन पडते. दिवस मोठा असल्याने भटकंतीला भरपूर वेळ मिळतो. Happy आम्हीही नाश्ता करून (आलु पराठा आणि दही रायता) करून नैनिताल भटकंतीला निघालो.

चला, मी आता खुप बोललो आता पुढे जे काहि बोलतील ते माझे फोटोच. Happy

===============================================
===============================================

तल्ली ताल
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३
तल्लीतालहुन दिसणारे नंदादेवीचे मंदिर
प्रचि ४
युथ हॉस्टेल
प्रचि ५
नैनितालची एक रम्य संध्याकाळ
प्रचि ६

प्रचि ७
एक प्रसन्न सकाळ
प्रचि ८
सकाळचा नाश्ता
(आलु पराठा आणि दही रायता. रायत्यामध्ये मोहरी वाटुन टाकली होती. हा रायता इकडचा स्थानिक प्रकार होता. चव मात्र एकदम फंडू :-))
प्रचि ९
नैनिताल
प्रचि १०
रोप वे
प्रचि ११
आंब्याच्या आकाराचा नैनी लेक
प्रचि १२
रोपवे मधुन दिसणारे नैनी लेक
प्रचि १३

प्रचि १४
नैनी लेक
प्रचि १५

प्रचि १६
नैनीलेकमध्ये नैकाविहार
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९
नैनादेवीचे मंदिर
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
नैनी/चायना पीकवरून दिसणारे दृष्य.
वातावरण नीटसे नसल्याने फोटो क्लियर नाही आलेत.
प्रचि २६
सुकलेली नदी Sad
प्रचि २७

प्रचि २८

===============================================
खूर्पा ताल.
नैनितालहुन जीम कॉर्बेट पार्कला जाताना वाटेत (नैनितालहुन ६ किमी अंतरावर) खूर्पा ताल आणि सरीता ताल आहे. जास्त खोल असल्याने खूर्पातालमध्ये बोटिंग होत नाही अशी माहिती गाईडने दिली.
===============================================
प्रचि २९
सरीता ताल
प्रचि ३०
नैनितालहुन जीम कॉर्बेट पार्कला जाणारा रस्ता
प्रचि ३१
वाटेवरची दाट झाडी
प्रचि ३२
फळांची टोकरी (मलबेरी, स्ट्रॉबेरी, स्थानिक फळ - काफल)
आपल्या इथे जसे उन्हाळ्यात डोंगरची काळी मैना विकायला येतात तसेच इथे हे स्थानिक फळ "काफल" विकायला येतात. आंबटगोड चवीची हि फळे मस्तच लागतात. Happy
प्रचि ३३
रासबेरी
प्रचि ३४
नैनितालमधील फुले
प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८
नैनितालमधील वास्तु
क्रिकेट अ‍ॅकेडमी बिल्डिंग
प्रचि ३९

मस्जिद
प्रचि ४०

चर्च
प्रचि ४१
उत्तराखंड परिवहन बस
प्रचि ४२
(नैनितालचे सगळे फोटो एकाच भागात देण्याऐवजी दोन भागात प्रदर्शित करत आहे, तेंव्हा पुढिल भागात: भीमताल, नौकुचियाताल, सातताल आणि हनुमानगढी :-))
===============================================
===============================================

गुलमोहर: 

सुं द र!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

वा.. चला आमची पण टूर निघाली.... खूर्पा तालचा फोटो मस्त आलाय...

खोल असल्याने बोटिंग होत नाही मग तिथे डायव्हिंग सुरू करा म्हणाव... Lol
नैनीताल म्हणजे नयना ताल असे होते का आधी? ते देवीचे मंदिर पण नयना मंदिर आहे...

ते प्रचि १४ मध्ये पाण्यात बुडबुडे कसले येत आहेत??? पाण्यात एरेटर्स (ऑक्सिजन वाढण्यासाठी) बसवलेले आहेत का? आणि युथ होस्टेल मस्तच आहे रे... तिथला संपर्क क्रमांक घेतलास का ?

बाकी प्रचि ९ बद्दल निषेध... Lol

व्वा... एक सुंदर सफर...
फुलांचे फोटोज् खुप आवडले...
आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

मस्त.. Happy
कौसानीला नाही गेलास का? तिथून सुर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी कांचनगंगा शिखरावरचे रंग फार सुरेख दिसतात. तुला फोटो काढायला मजा आली असती खूप...

वा.. चला आमची पण टूर निघाली. >> अगदी.... मस्तच सफर घडवत आहेस.. माहिती दिलीस ते उत्तम केलेस.. आता नैनीतालला जायचे तर ह्या धाग्याला बुकमार्क करुन ठेवावेच लागेल Happy

अंजली, मानुषी, रोहन, अरूंधतीजी, चंदन, गजानन, पराग, यो, रोमा प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! Happy

खोल असल्याने बोटिंग होत नाही मग तिथे डायव्हिंग सुरू करा म्हणाव... >>>>>रोहन, Happy

युथ होस्टेल मस्तच आहे रे... तिथला संपर्क क्रमांक घेतलास का ?>>>>>माझ्याकडे नाही, पण मित्राकडे नक्की असणार नंबर.

फुलांचे, नैनी तलावाचे आणि रानमेव्याचे फोटो सर्वात जास्त आवडले!!>>>>>धन्स अरूंधतीजी, Happy तुमचा नैनितालचा काकडणारा अनुभव वाचुन गेलो होतो. Happy

कौसानीला नाही गेलास का?>>>>>पराग जाऊन आलो कौसानीला, कौसानीचे प्रचि अजुन दोन भागानंतर येईल. Happy

तिथून सुर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी कांचनगंगा शिखरावरचे रंग फार सुरेख दिसतात.>>>>अगदी अगदी. Happy

यो, रोमा Happy

मस्त सफर घडवलीस. आणि यावेळेस शब्द आखडते घेतले नाहीस ते आणखी छान . (प्रचि १२ )त्या तालचे क्षितिजाजवळचे जे टोक दिसते त्याच्यापुढे काय आहे ? म्हणज धबधबा वगैरे आहे का ?

त्या हवेत मोहरी खाणे चांगले. अंगात उष्णता येते. काफल ही मस्तच.

उगाच नावे ठेवायची म्हणून नाही रे पण या तालच्या काठच्या इमारती निसर्गाशी फटकून डिझाईन केल्यात असे नाही वाटत ? मला अशी काही ठिकाणे आठवताहेत, जिथली घरे / हॉटेल्स त्या निसर्गाचाच एक भाग वाटतात. यूथ हॉस्टेल आणि मस्जिद मात्र मस्तच आहेत.

(माझ्या नैरोबीच्या घरी पण फॅन / एसी / फॅनचा हुक / रेग्यूलेटर काहीच नाही रे. )

टिल्लु, दिनेशदा, शैलजा, नादखुळा प्रतिसादाबद्दल धन्स Happy

(प्रचि १२ )त्या तालचे क्षितिजाजवळचे जे टोक दिसते त्याच्यापुढे काय आहे ? म्हणज धबधबा वगैरे आहे का ?>>>>>>नाही दिनेशदा, तेथे धबधबा नाही. प्रचि २ हे प्रचि १२ च्या तलावाचे शेवटचे टोक आहे. Happy प्रचि १२ रोपवे मधुन घेतला आहे.

काफल ही मस्तच.>>>>त्याची चवही मस्त आंबटगोड होती. आत बोराएव्हढ्या बिया होत्या.

उगाच नावे ठेवायची म्हणून नाही रे पण या तालच्या काठच्या इमारती निसर्गाशी फटकून डिझाईन केल्यात असे नाही वाटत ? मला अशी काही ठिकाणे आठवताहेत, जिथली घरे / हॉटेल्स त्या निसर्गाचाच एक भाग वाटतात.>>>>>अनुमोदन. Happy

(माझ्या नैरोबीच्या घरी पण फॅन / एसी / फॅनचा हुक / रेग्यूलेटर काहीच नाही रे. )>>>>नॅचरल एसी. Happy

जबरी...खल्लास फोटो....विशेषत प्रचि ६ आणि त्यानंतरची सकाळ...
आणि सगळ्या तलावांचे फोटो तर लाजवाब....
तोडलंस रे मित्रा...अप्रतिम सफर घडवतो आहेस

Pages

Back to top