फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पराग.. मस्तच केलस हा धागा उघडुन..

तु म्हणतोस ते बरोबर आहे.. नादाल,फेडरर,जाको हे तिघे (व अँडी मरे) नक्कीच संभाव्य विजेते आहेत. ७०-८० मधे बोर्ग्,लेंड्ल व विलँडर या टॉप प्लेयर्सनी इथे निर्विवाद वर्चस्व गाजवल्यावर ९० चे दशक व २००० ची पहीली ५ वर्षे(नदाल यायच्या आधी) अशी १५ एक वर्षे ही स्पर्धा त्यावेळच्या जगातल्या टॉप प्लेयर्सना जिंकता येत नव्हती( उदा. बेकर्,एडबर्ग,सँप्रास्,फेडरर वगैरे) व ब्रुगेरा, क्युरेटन वगैरेनी इथे आपले नाव कमवले. पण आता गेल्या ५-६ वर्षात इथे रोलँड गॅरसवर फेडरर-नादाल यांच्यात झालेल्या अप्रतिम फायनल्समुळे परत एकदा जगातल्या टॉप प्लेयर्समधली झुंज फ्रेंच ओपनमधे बघण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे.

आशा आहे की यंदाही राफा-फेडी आपली निराशा करणार नाहीत पण जोकोचा या वर्षीचा आतापर्यंतचा रेकॉर्ड तोंडात बोटे घालण्यासारखाच आहे.. नादालला या वर्षी चार फायनल्स मधे हरवुन.. (तेही दोन वेळा क्ले कोर्टवर!) त्याने कमालच केली आहे.. त्यामुळे फ्रेंच ओपनमधे त्याच्या आशा नक्कीच उंचावल्या असतील.. पण तो जोपर्यंत ग्रँड स्लॅम मधे असे सातत्य दाखवत नाही तोपर्यंत मी नादालकडेच यंदाही फ्रेंच ओपनसाठी फेव्हरेट म्हणुन बघीन..

महिलांमधे लॉटरीच आहे.. कोण जिंकेल याचा काहीच भरवसा नाही.. ख्रिस एव्हर्ट,स्टेफी ग्राफ,अरांचा सँकेज व मॉनिका सेलेस असताना फ्रेंच ओपन, विंबल्डन व यु एस ओपन फायनल्स विकेंडचे दोन्ही दिवस मी टिव्हीला खिळलेला असायचो.. सध्या फक्त रविवार सकाळचीच वाट बघत असतो... Sad

सालाबादप्रमाणे फ्रेंच ओपन,विंबल्डन व यु एस ओपन ची आतुरतेने वाट बघणारा एक टेनीसप्रेमी....

मुकुंद

मी वाटच पहात होते ह्या धाग्याची. पराग काय थाप मारतोस. म्हणे फ्रेन्च ओपन १५ पासुन आहे. मी सतत शोधत होते टिव्हीवर. मला जोकोला अजिंक्य बघायचे आहे. ( तथास्तु!) Happy Happy

महिलांमधे लॉटरीच आहे..>> मुकुंदराव, बोर्ग आणि नादालचा कालखंड सोडला तर फ्रेंच ओपनला पुरुषांमधे पण लॉटरीच असायची. त्या अमेरिकन चिनी माणसाने फ्रेंच ओपन जिंकल्यावर फ्रेंच-टेनिस म्हणजे स्किलपेक्षा स्टॅमिनाचा गेम आहे असे वाटायला लागले होते. नादालने विम्बल्डन जिंके पर्यंत मला तो फक्त स्टॅमिना वालाच खेळाडू वाटायचा. येणी वे. आपला घोडा फेडरर.

थँक्स पराग Happy

ह्या मौसमातला अजिंक्य जोको , राफाचा 'नेव्हर गिव्ह अप' अ‍ॅटीट्यूड आणि नजाकती फेडी .. टेनिसप्रेमींसाठी मस्त ट्रीट आहे ही!!

मुकुंद, >>सालाबादप्रमाणे फ्रेंच ओपन,विंबल्डन व यु एस ओपन ची आतुरतेने वाट बघणारा/री एक टेनीसप्रेमी....>> +१ Happy

>>>पराग काय थाप मारतोस. म्हणे फ्रेन्च ओपन १५ पासुन आहे>>> सुमंगल, तो तुम्हाला कल्लोळापासून दूर ठेवण्यासाठी तसं म्हणाला असावा अशी मला दाट शंका आहे Proud Light 1

अमेरिकन चिनी माणसाने>> विक्रम, मायकेल चँग त्याचं नाव.

यंदा पुरुष एकेरीत मज्जा येणार आहे पण महिलांमध्ये कोणीही जिंकू शकेल.. त्यातल्या त्यात किम आणि मारिया ह्यांच्यातच चुरस जास्त असेल पण स्पर्धेचा इतिहास बघता कधीही काहीही घडू शकते..

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच>>त्याने डाएट बदलले नि त्याचा खेळ सुधारला असे ESPN sports वर सांगत होते Happy

अरे वा ! एव्हडे पोस्ट आले का ह्या धाग्यावर .. मला वाटलं सगळे विसरले यंदा फ्रेंच ओपन. Happy

असाम्या हे वाच.
http://online.wsj.com/article/SB1000142405274870350910457632762423859481...

आणि वेळ असल्यास हे पण..
http://online.wsj.com/article/SB1000142405274870350910457633154233887987...

सुमंगल, पन्ना.. Proud

सालाबादप्रमाणे फ्रेंच ओपन,विंबल्डन व यु एस ओपन ची आतुरतेने वाट बघणारा एक टेनीसप्रेमी....>>> मुकुंद.. मै भी मै भी ! Happy

धागा काढला बरे झाले. टेनिसचा धागा म्हणजे १५ दिवस मजा असते. Happy

माझा पाठिंबा जोकोला. फेडरर आता जोको किंवा नदाल पैकी कोणालाही क्ले वर तरी हरवू शकेल असं वाटत नाही.

>>माझा पाठिंबा जोकोला. फेडरर आता जोको किंवा नदाल पैकी कोणालाही क्ले वर तरी हरवू शकेल असं वाटत नाही.

माझाही पाठिंबा जोकोला :).

>>पराग
लिन्क साठी धन्यवाद.

तुम्ही जोकोला पाठिंबा दिलात तरी राफा काय कमी नाही बर्का ! आखीर फ्रेंच ओपन का सवाल है भैय्या / बेहेना.. !
"हम चोडेगा नही जी.. " मोडात असेल तो.. Happy

जोको जिंकला तरी मजाच येईल अर्थात Happy फेडरर (किंवा मरे) नको म्हणजे झालं.. Wink

माझा पाठिंबा जोकोला.
कारण फेडररला इतकी वर्षं पाठिंबा देऊन तो हरत आलाय! सो यावेळेस जोकोला देईन,(मगतरी फेडरर जिंकतो का बघुया).. पण नदाल मात्र हरावा!!

पण नदाल मात्र हरावा!!

>> बस्के, असं का म्हणतेस? नादाल ने काय घोडं मारलंय तुझं किंवा कोणाचं?

शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स. >> मजा येईल बघायला जर दोघीही आपल्या potential ला खेळल्या तर ... mainly sharapova

नादाल ने काय घोडं मारलंय तुझं किंवा कोणाचं?
>>
सशल, तू टेनिसची खरी फॅन नाहीयेस, म्हणून असा प्रश्न विचारत आहेस. स्पर्धा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आपलाच खेळाडू सगळ्यात भारी असं म्हणायचं आणि बाकीच्यांना नावं ठेवायची. मग शेवटच्या दिवशी जो फायनल जिंकतो, तो त्यादिवसापुरता भारी. मग दुसर्‍या दिवसापासून पुन्हा आपला खेळाडू भारी... Proud

"हम चोडेगा नही जी.. " मोडात असेल तो..
>>
हो, विशेषत: जर त्या जिंकलेल्या स्पर्धा ग्रॅन्ड्स्लॅम नसतील तर तीनच सेटच्या असतात. त्या स्पर्धांना फार महत्व देता येत नाही.

मरेचा फायनलपर्यंत ड्राफ्ट दरवेळी सोपाच असतो. आणि फायनलला अचानक त्याला दणका बसतो.. Proud

खरी फॅन म्हणजे काय? मला ज्योको, नादाल (नाड्डाल्) आणि फेडरर तिघेही आवडतात .. एका ठराविक मर्यादेपुढे तंत्र फारसं कळत नाही .. म्हणून तिघांनांही पाठींबा .. (पण हल्ली ज्योको नविन हार्ट थ्रॉब मग सगळ्यांत जास्त पाठिंबा त्याला .. ;))

नेहमीप्रमाणे धक्का तंत्रानीच सुरुवात झालीये फ्रेंच ओपनला... सिलिच पहिल्याच फेरीत बाहेर... जोको सहज पुढच्या फेरीत...

मिर्झा बाईंनी पहिली फेरी सहज दोन सेट मध्ये पार पाडलेली आहे.. पुढची फेरी नेहमी प्रमाणेच अल्ला के हवाले..

गेला (वरचा झेंडाधारक) Proud

राफाची पहिलीच मॅच ५ सेटर ! पण पहिल्याच राऊंडला तो इजनर (/आइजनर) कसा काय आला? त्याचं रँकींग बरं होतं की गेल्यावर्षी तरी !
बाकी शारापोव्हा, वोझनियाकी, जोको सहज पुढच्या फेरीत गेले.

राफाची मॅच = सोने तापवावे तो आणखी झळाळून उठतं.
कॉमेंट्री करणारे राफाच्या खिलाडूवृत्तीचे किती कौतुक करत होते नाही. हरला तर तो सरळ समोरचा खेळाडू चांगला खेळला अशी पावती देतो. उगाच भलत्यासलत्या सबबी सांगत नाही.

मिर्झाबाई फ्रेंच ओपनमध्ये पहिल्यांदाच दुसर्‍या फेरीत पोचल्यात.
डबल्समध्येही पोचल्या दुसर्‍या फेरीत.

जॉन इस्नर गेल्यासाली विंबल्डनमधली चार दिवस चाललेली मॅच जिंकला होता.

इव्हानोविच बाहेर...

देवबर्मन पण हारला.. अपेक्षितच होतं... त्याच्या समोरचा टकल्या जबरी खेळतो.. पण बिचारा पुढे ढेपाळतो...

आज कोणाची वर्णी लागते ते बघायचं..

Pages