कुणाला नेती पॉट्चा (Neti Pot) अनुभव आहे का

Submitted by माणूस on 16 May, 2011 - 12:53

गेल्या वर्षापासुन मला परागकणांचा त्रास (pollen allergy) व्हायला लागलाय. त्यावर मला एकाने नेती पॉट वापर असे सांगीतले. कोणाला ह्याचा अनुभव आहे का

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षकात 'नेती' शब्द नीट लिहा.
(हा त्रासावरचा उपाय नाही. सूचना आहे. :P)

बरीच OTC औषधे असतात त्यासाठी. क्लॅरिटन, झर्टेक इ.इ.

माझ्याकडे हे आहे -
http://www.cvs.com/CVSApp/catalog/shop_product_detail.jsp?skuId=407054&p...

मागे याबद्दल मिनोतीने लिहिले होते. मी त्यावर सूचना आहेत त्याप्रमाणे करते. कोणाचे मार्गदर्शन इ. घेतले नाही.
याचा फायदा होतो पण मी त्याबरोबर Allegra घेते.

मला न्यु जर्सीत असताना पोलन अ‍ॅलर्जीज बराच त्रास होत होता श्वसन आणि डोळ्यातुन पाणी वाहणे इ.चा
त्यावर Claritin-D Non dowsy 24 hours आणि डोळ्यांसाठी Visine-Allergy drops वापरले होते.
(पण हे नियमीत नव्हते घेतले.. बराच त्रास व्हायला लागला किंवा नाक चोंदायला सुरुवात झाली किंवा डोळे चुरचुरायला लागले तरच घेतले)

बाहेरुन घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे (बर्‍याच वेळा गाडीवर परागकणाचा थर बसलेला असतो..दरवाजा वगैरे उघडताना ते हाताला लागुन नंतर डोळ्यात/नाकात जाउन त्रास होउ शकतो).

अ‍ॅलर्जी साधारण कधी सुरु होते हे लक्षात घेऊन त्याआधीच एखादा आठवडा औषध घ्यायला सुरुवात करावी. आणि जोवर त्रास होतो तोवर रोज घ्यावे . एकदा त्रास सुरु झाला की औषधाचा कमी उपयोग होतो. Allegra आता OTC मिळते. दुसर्‍याला चालते ते तुम्हाला चालेलच असे नाही. मला क्लॅरिटिन चालत नाही. शॉट्सही असतात, पण ते वर्षभर रोज(की आठ्वड्यातून कितीतरी दिवस) घ्यावे लागतात. त्यानंतर त्रास कमी होतो.

रात्री नेती करावी, आंघोळ करुन झोपावे.

मी अ‍ॅलीग्रा आणि झरटेक अल्टरनेट घेते. चार महिने यातून सुटका नाही एवढे मला कळुन चुकले आहे. Sad
जर का अशक्त आणि ढेपाळल्यासारखे वाटत असेल तर तो ही त्या अ‍ॅलर्जीजचाच पार्ट आहे. असे माझ्या डॉकने सांगितले. मला मागच्यावर्षी अ‍ॅलीग्रा प्रिस्क्राईब केले होते. यावर्षी ते OTC आहे. डोळ्यात घालण्यासाठी ड्रॉप्स दिले आहेत पण नाव लक्षात नाही.
शक्यतो अ‍ॅलर्जी स्पेशालिस्ट कडे गेलेल चांगल.

मला nasonex आणि claritin दोन्ही लागतात. व्यायाम नीट चालू असला तर त्रास कमी होतो.

नेती पॉट वापरणे फार कठिण नाहीये पण ते आधी शिकून घ्यावे...पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जसे एका नाकपूडीला पाण्याने भरलेले भांडे लावले तर मान तिरकी वाकवावी जेणेकरून पाणी एका नाकपूडीत जाइल आणि दुसर्‍या नाकपूडीतून बाहेर येइल आणि तेव्हा तोंडही थोडेसे उघडे ठेवावे. जलनेती झाल्यानंतर कपालभाति करणे आवश्यक आहे नाहीतर ते पाणी नाकात राहून सर्दी होण्याचा संभव जास्त असतो...
ही अगदीच बेसिक माहीती आहे, ठाण्यात असताना एक योग-शिबीरात असताना शिकवले होते.

मनी

नेती उपयोगी ठरू शकेल. पण एक काळजी घ्या, की सवय नसल्यामुळे सुरुवातीला १-२ वेळा नाकात झिणझिण्या येऊ शकतात. मला झालं होतं असं. पण १-२ दिवसांत जमेल.

जाताजाता...
नेती रोज नियमितपणे केल्यास सर्दी वगैरेबरोबर चष्म्याचा नंबर कमी व्हायला उपयोगी ठरते असं मला योगासनं शिकवलेल्या काकू म्हणाल्या होत्या. क्लासमधल्या एका मुलीला तसा अनुभवही आला. तिची सर्दी कमी झालीच, पण चष्म्याचा नंबरही थोडा कमी झाला. अगदीच जास्त नंबर असेल तर कदाचित फार फरक नसेल पडत, पण मग तो नंबर निदान फार लवकर वाढत तरी नाही असं म्हणतात.

मी अंबिका योग कुटीर मधे नेती शिकले होते आणि बर्‍याच वेळा करायचे. तुम्हीही कोणाकडुन तरी शिकुन घेतलीत तर जास्त बरं होईल असं वाटतं. भारतात सर्दी व्हायची त्यावर हा चांगला उपाय होता.
अ‍ॅलर्जीवर - मागच्या एक दोन वर्षापासुन मला अ‍ॅलर्जीचा अचानक त्रास व्हायला लागला. त्रास वाढल्यावर मी नेती केली तेव्हा नाक पुर्णच चोंदले आणि मी पुन्हा केली नाही. कदाचित त्रास कमी असताना रोज सकाळी नेती केल्यास फायदा होत असेल.
मला मंजिरीने अजुन एक उपाय सांगितला तो म्हणजे गायीचे साजुक तुप नाकात टाकणे. यावर्षी हा उपाय अधुन मधुन करतेय. याने अजुन पर्यंत तरी अ‍ॅलर्जीचा त्रास झालेला नाही. एकदा सर्दी होईलशी वाटले पण तुप टाकल्यावर दुसर्‍या दिवशी एकदम बरि होते. मी अगदी ज्या Japanese Cedar ची जास्त अ‍ॅलर्जी आहे त्या जंगलातही जाऊन आलेय यावर्षी, अजुन तरी त्रास झाला नाही.

मला पण गेल्या २ वर्षांपासून अ‍ॅलर्जीचा खुप त्रास व्हायला लागला. म्हणुन एका मित्राने सांगितल्यावरून नेती करायला शिकले. सायनसचा प्रचंड त्रास असला तरी नवर्‍याने अनंतवेळा सांगूनही न बधलेली मी अ‍ॅलर्जीपूढे नमले आणि नेती करायला लागले. तो नेती अंबिका योग कुटीरमधेच शिकला आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून शिकून आता करते. गाईचे तूप नाकात घाल म्हणून तो बराच मागे लागलाय पण माझ्याने ते करणे होत नाही Happy

माझ्याकडे देशातला एक नेती पॉट होता तो देशात विसरले म्हणून मग हा घेतलाय -
http://www.cvs.com/CVSApp/catalog/shop_product_detail.jsp?filterBy=&skuI...

मला फायदा झाला म्हणुन मग लालू आणि अजुन एका मैत्रिणीला सांगितले होते गेल्यावर्षी.

मी अ‍ॅलर्जीसाठी कोणतेही औषध घेत नाही फक्त नेतीवर भागवते. थोडा त्रास होतो पण सहन करते.
लोकल मध रोज १ टीस्पून किंवा लोकल बीपोलन खावे असे मला कोणीतरी सांगितले आहे पण मी तो प्रयोग केला नाहीये त्यामुळे त्याबद्दल जास्त सांगू शकणार नाही.

जलनेती मी पण केली आहे... त्यासाठी विशिष्ट आकाराचे भांडे मिळते.. पहिल्या प्रयत्नात पाणि एका नाकपुडीतून घातल्यावर दुसर्‍यातून बाहेर पडण्या ऐवजी ठसका-नुसकी होते... पण चलता है... जलनेती शक्यतो देखरेखीखाली करणं बरं. कारण त्यासाठी एका विशिष्ट पोझ मध्ये (पायांवर अर्धवट बसावं वगैरे लागतं) शिवाय मानेची पोझिशन ही विशिष्ट असावी लागते जेणेकरून एका नाकपुडीत घातलेले पाणी दुसर्‍यातून व्यवस्थित बाहेर येईल. हे पाणि शक्यतो थोडं कोमट घेतात. (माझ्या माहितीनुसार.)

कोमट पाण्यात किंचित मीठ घालुन जलनेती करावी. आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा. नंतर लगेच कपालभाती करा. शुभेच्छा! Happy

जलनेती शक्यतो सकाळच्याच वेळी करावी. पाणी अगदी कोमट व किंचित मीठ घालून खारट केलेले असावे. नाकाच्या आतली त्वचा अत्यंत नाजूक असते. एकदम गरम अथवा गार पाण्याने इजा होण्याचा संभव आहे. नीट जमेपर्यंत मार्गदर्शनाशिवाय करु नका कृपया.

मी जीथे योग शिकलो त्यांची वेबसाईट आहे. अर्थातच सर्वांनी सांगितल्या प्रमाणे हे सर्व तज्ञांच्या मार्गदर्शनाने करावे.

http://www.yogapoint.com/info/jalneti.htm

लालुजी, नाकात मीठयुक्त पाणी सोडताना जर ते घशातुन पोटात गेले आणि नुकतेच काही खाणे झाले असेल तर उलटी होण्याचा संभव आहे.

नेती ही शुध्दीक्रिया आहे. शुध्दीक्रियांची रचना ही हळु हळु रोग बरा करणे नसुन वेगाने धुतल्या सारखा बरा करणे अशी आहे.

रात्रीच्या झोपे नंतर नैसर्गीक रित्या दोष वाढलेले असतात. अश्यावेळी ही प्रक्रिया प्रभावी ठरते.

माणुसजी,

आपल्या देशात कुणी आयुर्वेदीक तज्ञ असल्यास शरीरात कफ वाढला आहे का याचे निदान करुन घ्यावे. सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर उठुन न बसता वैद्यांना नाडीपरिक्षा करावयास सांगावी. हे सर्व अवघड आहे पण पर्याय नाही. या नाडी परीक्षेत जर कफाधिक्य आढ्ळले तर मला कळवावे. एक हुकमी औषध मी सुचवीन. आपले कोलस्टर जास्त असल्यास हेच औषध उपयोगी आहे.

लालू, रात्री वातदोषाचा प्रभाव अधिक असतो. सकाळी कफ, दुपारी पित्त व रात्री वात अशी आपली दिनचर्या असते. हे शरीरांतर्गत तसेच बाह्य वातावरणालाही लागू आहे. जलनेति ही कफावर परिणामकारक शुध्दिक्रिया आहे. त्यामुळे तिचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठी सकाळीच करावी. रात्री करु नये.

एकदा जमायला लागले की घरातला आंघोळीचा मग वापरूनही करता येऊ शकते. म्हणजे तसे मी करतो.! पाणी जरा कोमट असावे आणि चिमूट्भर मीठ टाकावे. स्थिर जागी बसून मान जरा तिरकी करून एका नाकपुडीतून हळूहळू पाणी सोडावे. सुरवातीला लगेच बाहेर येणार नाही. तेव्हा मानेची जरा हलवून योग्य पोजिशन मिळाली की पाणी दुसर्‍या नाकपुडीतून बाहेर येऊ लागते.

मीठ जास्त झाले किंवा पाणी जास्त गरम असले की नाकात झिणझिण्या बसू शकतात. या थीट मेन्दूपर्यन्त बसतात. पण सरावाने मीठाचे आणि कोमटपणाचे प्रमाण जमून जाते.

हे सगळे झाल्यावर उभे राहून कमरेत वाकून डोके जमीनीकडे झुकवावे आणि हलवावे याने नाकपुडीत राहीलेले पाणी निघून जाते. जरा वेगाने श्वास सोडला की नाक साफ़ होते.

हे सगळे मी याच पद्धतिने करतो.

(सुरवातीला मी नाळाच्या गार पाण्याने आणि फ़ुल्ल फ़ोर्सने केले होते. त्यामुळे जलनेती कसे करू नये याचा उत्तम अनुभव गाठीशी आहे Happy )

नितीनचंद्रजी, आशूडी धन्यवाद. आता सकाळी करत जाईन.

मी वर दिलेल्या लिंकवरच्या पॉटबरोबर द्रावण तयार करण्यासाठी तयार पॅकेट्स येतात. २४०ml पाण्यात एक संपूर्ण पॅकेट घालायचे. त्यामुळे प्रमाण चुकत नाही.

नेती करून झाल्यावर ओणवं उभं राहून अर्ध-कपालभातीची (एक नाकपुडी बंद करून) २५ आवर्तने करावीत. म्हणजे नाकातले सर्व पाणी निघून जाते. पाण्याचा एखादा थेंब जरी सायनस मध्ये राहिला तरी डोके प्रचंड दुखते आणि नेती करायचा उत्साह मावळतो. सायनस पूर्ण साफ होईपर्यंत ही पाणी उरायची शक्यता अधिक असते.

मला सध्या अ‍ॅलर्जीचा/ सायनस कन्जेशनचा फार त्रास होत आहे. नेती करायला जमेल असे वाटत नाही. फार्मसीतून loratadine १०एम्जी गोळ्या आणल्या होत्या पूर्वी क्लॅरिटीन १० एम्जी घेतले आहे.. पण त्याने काही बरा फरक वाटत नाहीये म्हणून बाकीचे बघितले तर १०एम्जी(क्लॅरिटीन,झर्टेक) पासून, बेनाड्रिल २५ एम्जी.. ते १८० एम्जी(अ‍ॅलिग्रा, कॉस्कोचे अ‍ॅलिग्रा सारखे औशध) पर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. १० एम्जी वरून १८० एम्जी मोठी उडी वाटते आहे. अण अ‍ॅलिग्रा बद्दल चांगले रिव्ह्युज ऐकले आहेत.. घ्यावे का?

Get neti pot designed by Ambica yog kutir. Its good. I have heard that if you do neti regularly it will help u in improving ur eyesight and also cleans all 'nadis' connected to nose and ear.

बस्के, मला पण अचानक मधे १ वर्ष अ‍ॅलर्जीचा त्रास झाला होता. नेतीची प्रोसेस वाचुन/ऐकुन जेवढी अवघड वाटते तेव्हढी नाही आहे. राइट एड, सीव्हीएस मधे नेती पॉट मिळतात ते खूप इझी आहेत वापरायला. नक्की ट्राय कर. मला नेतीचा फायदा झाला होता. मधुन मधुन क्लॅरिटीन पण घेत होते. तसंच ह्यूमिडीफायर, एअर प्युरिफायरचाही उपयोग होतो. अ‍ॅलर्जी जशी मिस्टीरियसली आली तशीच गेलीही Happy

Neti shd be done in daytime as if u do it after sunset it will give u cough. And initially it should be done with lukewarm water. Later on u may use tap water of room temperature.

थँक्स पारू. बघते सीव्हीएसमध्ये. मला समहाऊ नेती प्रकार फार भितीदायक वाटत आला आहे.
मला अ‍ॅलर्जीज गेले ४-५ वर्ष होतातच. सध्या जास्त त्रास होतोय. नाक बंद होणे फार वाढले आहे. Sad झोप लागत नाही त्याच्यामुळे. शिवाय शिंकांची गाडी..

मला ही (पोलन किंवा तत्सम) अ‍ॅलर्जी असावी. सपासप शिंका सुरु होतात. २ बेनेड्रील (OTC) च्या गोळ्या १ किंवा २ डोस घेतले की थांबतात. शिंका आल्या की सपाटून भूकपण लागते, मग सारखं खातो, सो वायटात चांगलं Wink
हे नेती म्हणजे एका नाकातून पाणी घेऊन दुसरीकडून काढायचं ते का? बापरे असलं काही करणार नाही.

अमितव, आता जलनेती करणं अगदी लहान मुलांना करता ही सोयिस्कर झालं आहे..
हे बघ, आम्ही नुक्तंच मागवलं अमेझॉन वरून २५ $ ला.. नासोप्युअर ब्रँड चं

हे सुरु केल्या पासून नील च्या सकाळी उठल्या उठल्या येणार्‍या पाचपन्नास शिंका, रात्री ब्लॉक होणारं नाक सर्व सर्व त्रास दूर झालाय.. पूर्ण रात्रभर आता त्याला मोकळा श्वास घेता येतो.. इट्स वेरी ईझी टू यूज

बरोबर एक२५,३० पाऊचेस मिळालेत बफर्ड सॉल्ट चे.. पण ते संपल्यावर नॉर्मल सॉल्ट च वापरणार आहोत आम्ही

बस्के.. त्रास सहन नको करत बसूस.. खरंच नासाप्युअर च्या साईट वर जाऊन बघ.. अगदी ३ वर्षा ची मुलं ही आरामात करू शकतात हे पॉट वापरून..

अमितव, आता जलनेती करणं अगदी लहान मुलांना करता ही सोयिस्कर झालं आहे.. >> ओके, टेकिंग इट अ‍ॅज ए कॉम्प्लिमेंट Proud इतका त्रास नाही होत मला अजून तरी. पण लक्षात ठेवीन.

बस्के, फ्लोनेस ट्राय केलंस का? अ‍ॅलिग्राबद्दल मी पण चांगले रिव्ह्युज वाचले होते पण दिवसभर अधून-मधून डिझि वाटतं. अगदी कळेल नकळेल असं. फ्लोनेसनं मात्र तसा काही त्रास झाला नाही. नेजल स्प्रे आहे त्यामुळे दिवसा पण घ्यायला सेफ. हे गेल्यावर्षीपर्यंत प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन होतं, आता OTC आहे.

डॉ. ला विचारूनच ट्राय करशीलच Happy

ज्यांना Allergy चा त्रास होतो त्यांनी रोज एक चमचा Local Honey घेऊन पाहिलं आहे का? मला आणि माझ्या Office मधल्यांना फायदा झाला आहे. मला तर आता अजिबात त्रास होत नाही Allergy चा.

बस्के, www.neilmed.com ही वेब साइट बघ. मी गेले ४ वर्ष वापरतीय. हा एक सोपा नेती पॉटच आहे. हल्ली हे कॉस्टकोमधे पण मिळतं. टॅप वॉटर वापरु नको. प्युरिफाइड वॉटर किंवा सेलिन सोल्युशन वापरायचं. मी घरी R. O. system आहे त्याचं पाणी वापरते. किंचित मीठ घालून किंचित गरम करायचं. खूप उपयोग होतो.

तसंच, विंटर मधे घरात हीटींगमुळे हवा खूप कोरडी होऊन जाते. तेव्हा ह्युमीडीफायरचा पण खूप उपयोग होतो.

फ्लोनेस, इतर नेसल स्प्रे पण चांगले आहेत.

थोड्क्यात नाकाचा आतला भाग ओलसर राहिलाकी त्रास कमी होतो असं लक्षात आलं आहे.

थँक्स शुगोल.. Happy
ते नील्मेड बघितले मी कॉस्कोत. घेऊन येईन ह्यापैकी काहीतरी.
सध्या अ‍ॅलर्जीचा त्रास(नाका डोळ्यातून पाणी, सपासप शिंका)जाऊन प्रॉपर आजारी पडले आहे. ताप येऊन गेला. आता प्रचंड कोरडा खोक्ला आहे. Sad

नियमित नेती केल्यास, नाकपुड्या कोरड्या पडतात.
तेव्हा नेती नंतर कपालभाती झाल्यावर दोन्ही नाकपुड्यात २-३ थेंब कोमट तूप (किंचित कोमट, द्रव करण्यास), घालावे.

पृथ्वीकर, हो! मी पण नेती केल्यानंतर आणि रात्री तूपाचे थेंब टाकते. ( वर लिहायचे राहून गेले.)

योगशिबीरात आमच्याकडुन २ शनिवारी जलनेति आणि वमन करुन घेतले होते.
नेतिचे पॉट प्रत्येक शिबिरार्थीला सेपरेट दिले होते. आधी आम्ही फार घाबरत होतो. साधं आंघोळ करतांना कधी नाकात पाणी गेले तर किती अस्वस्थ होते.... नाकाला झीनझिन्या येतील का, मधेच श्वास अडकला तर चक्कर येऊन पडू काय अशा मनात नाना शंका! ट्रेनर धीर देत होते.
सकाळी थोडीफार योगासने करून (काही न खाता पिता) मोकळ्या जागी नेले. अगदी कोमट पाण्यात थोडेसे मीठ घातलेले पाणी नेती पॉटमध्ये भरून घेतले. कंबरेत थोडे पुढे झुकून ४५ अंशात मान कलवून आणि एका नाकपुडीमध्ये पॉटचे टोक घातले. तोंडाने श्वास सुरू होता. काहीही अडथळे न येता अगदी सहजतेने करता आले. नाकात झिणझीण्या आल्या नाही की श्वास अडकला नाही.
या प्रयोगानंतर खूप छान वाटलं. संपूर्ण श्वसनमार्ग मोकळा झाला.