Submitted by विशाल कुलकर्णी on 16 May, 2011 - 02:21
जंगलातल्या गावी एकदा
रवीवारची भरली शाळा
हिरमुसलेली पिल्ले बघूनी
बाई म्हणाल्या...खुप खेळा !
वाराकाका गातो गाणी
कोरस देती झाडे-वेली
पाऊसदादा ठेका धरतो
नाच करतसे खारुटली...
ससुल्यादादा सराव करतो
फेर्या मारीतो डोंगरावरी
कासवभाऊ खुदकन हसले
माझाच पहिला नंबर तरी...
फुलपाखरे इवली इवली
बागडती आनंदे फुलांवरी
सुट्टी-बिट्टी नकोच मजला
मधमाशीताई व्यस्त भारी ...
कामात गुंतले गाढवदादा
बाई वाटती बिस्कीट पुडे
चुकार कोल्हा आळशी कुठला
डोळा त्याचा बस खाऊकडे...
हत्तीदादा खुतून बसले ...
एवढेसे मज कसे पुरावे?
दिला तुला जर सगळा खाऊ
इतरांना मग काय उरावे?
नेहमीप्रमाणे उशीरा आले
मनीमाऊ आणि वाघभाऊ
रुसून बसले कळले जेव्हा
संपून गेला सगळा खाऊ...
चला मुलांनो शाळा सुटली
सांगत-सांगत संध्या आली
पुन्हा भेटूया उद्यास म्हणूनी
दमलेली पिल्ले घरी पळाली...
विशाल...
गुलमोहर:
शेअर करा
चला मुलांनो शाळा
चला मुलांनो शाळा सुटली
सांगत-सांगत संध्या आली
पुन्हा भेटूया उद्यास म्हणूनी
दमलेली पिल्ले घरी पळाली... >> ही संध्या कोणय हं..? ती काय करत होती जंगलात?
व्ही. शांतारामांची नक्कीच
व्ही. शांतारामांची नक्कीच नव्हती..........
क्युट ही संध्या आणि हरवलेलं
क्युट
ही संध्या आणि हरवलेलं मोरपिस भेटल्या तर??????
सुचवून बघतो....... मात्र
सुचवून बघतो.......
मात्र येणार्या भुकंपासाठी मला जबाबदार ठरवायचं नाही
छान
छान
.
.
"हत्तीदादा खुतून बसले ..." तो
"हत्तीदादा खुतून बसले ..."
तो खुतुन शब्द खटकतोय.. बाकी मस्तच.. आजच लेकीला वाचुन दाखवतो
विश्ल्या बरी आहे
विश्ल्या बरी आहे कविता...

मेरे को इतनी खास नही लगी...
सॉरीच मोठ्ठंच्या मोठ्ठं
धन्यवाद मंडळी ! दक्षे, तुला
धन्यवाद मंडळी !
दक्षे, तुला छोटंसंच धन्यवाद
छान आहे कविता रच्याकने, तुला
छान आहे कविता
रच्याकने, तुला रविवारी कामानिमित्त कंपनीत जावे लागले का?
संध्या भेटणार असेल तर माझी
संध्या भेटणार असेल तर माझी रवीवारीही शाळेत जायची तयारी आहे !!
पिल्लांना ऐकवायला मस्ताय.
पिल्लांना ऐकवायला मस्ताय.
पंत, काय हो, इतकी वाईट
पंत, काय हो, इतकी वाईट परिस्थिती आली तुमच्यावर...
'संध्या'साठी (वाकड्या मानेच्या) रवीवारी हापिसात जायला तयार झालात
गोड आहे. थुन्दर आहे.
गोड आहे. थुन्दर आहे.
छ्या : विशल्या , अरे ती एकच
छ्या : विशल्या , अरे ती एकच संध्या आहे काय ???
जरा नीट वाचत जा माबो ...किमान स्वतःच्या कवितेवर आलेले प्रतिसाद तरी
ए रविवारला कुणी शाळेत जात
ए रविवारला कुणी शाळेत जात कां? वेडाचय...
किती धसका घेतलाहेस रे सत्त्या
किती धसका घेतलाहेस रे सत्त्या शाळेचा ?