मायबोलीचा सदस्य शोधायचा असेल तर कसे शोधावे? सदस्यांची लिस्ट आहे का?

Submitted by मदत_समिती on 26 July, 2009 - 10:28

"मायबोलीकरांची सूची" [निळ्या वर्तुळात दाखवलेला] हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात [लाल वर्तुळात दाखवलेला] आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.

>>>> "मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे
हा दुवा नेमका कुठे आहे? सापडतच नाही, चकवा बसल्याप्रमाणे फिरुनफिरुन एकाच पानावर येतोय मदतपुस्तिकेच्या Sad

लालू, तू पण जाऊन फिरून ये बर...... अग ते सगळ येतोय!एक भलीमोठी यादी अन मग पुन्हा याच पानावर येतोय!

मी मायबोलीची नवी सदस्य आहे_क्रुपया मला विवेक शरच्चन्द्र pande हा मायबोली चा सदस्य आहे का? हे kunee सान्गेल का?
-मीनु

हर्शदा परब,
तुम्ही 'मदतपुस्तिका' ह्या टॅबवर क्लिक केल्यावर त्याखाली येणार्‍या पट्टीत 'मायबोलीकरांची सूची' आणि 'आम्ही कोण?' असे दोन टॅब दिसतील पहा.

लोकहो! ही पहा सूची

http://www.maayboli.com/maaybolikar

अशी लिंक दिली तर काम सोपे होते....

मदतपुस्तिकेवर क्लिक केल्यावर नवीन लेखन टॅबच्याच खाली ही मायबोलीकरांची सूची असलेली लिंक दिसते.

-----"मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील......

कुठे आहे दुवा? मला सापडला नाही मदतपुस्तिकेत. त्यापेक्षा "मायलीकरांची सूची" हे जिथे लिहलं आहे वरच्या वाक्यात तिथेच नाही का दुवा करता येणार, सोपं पडेल शोधणार्‍यांना.

"मायबोलीकरांची सूची" हा दुवा फक्त आपण "येण्याची नोंद"(Log In) केलं असेल तरच दिसतो नाहीतर फक्त 'आम्ही कोण?' हाच टॅब दिसतो.

मला आजच जयवी ह्यांची कविता असलेला bookmark मिळाला आहे.
मला त्यांच्या विपुत अभिप्राय कळवायचाय म्हणून मी इथे मदत समितीवर येऊन सदस्य कसे शोधायचे ते बघितले. वरचे सगळे वाचून 'मायबोलीकरांची सूची' ह्या tab वर जाऊनही बघितले. पण त्यांचे नाव शोधता येत नाहीये.. Sad कोणी मदत करेल का? धन्यवाद.

नुसतं 'जयवी' टाईप केल्यावरच ऑप्शन दिसतो. पण 'जयवी' एवढंच लिहून 'apply' क्लिक केलं तर सापडत नाही. अगदी बरोबर पूर्ण आयडी लिहिला तरंच तसं सापडतं.

पृथ्वीचे संरक्षण
आव्हान हे जनतेचे जनतेच्या हितासाठी
आम्ही झुंज देतोय मानव हितासाठी
चला सहाह्य करूया वाचवण्या पर्यावरण
करूया वृक्षारोपण करण्या पृथ्वीचे संरक्षण
चला प्रयत्न करू मुक्या जनावरांसाठी
नष्ट होत असलेल्या प्रजाती वाचवण्यासाठी
आहे त्यांचेही अस्तित्व उरावे दाखवण्यासाठी
न दिसावे वाघ,सिह चित्रांत, उरावे पाहण्यासाठी
माणूस म्हणूनी माणसाने माणुसकी जपावे
श्वास मिळतोय विनामूल्य निदान त्यासाठी तरी खपावे
पाणी,हवा सुद्धा माणसानेच दूषित केलं
प्रदूषित चित्र हे मानवामुळेच दृष्टीस आलं
वृक्ष, वल्ली,वनचरे आपलीच सोयरी
राखा समतोल पर्यावरणाचा नका ओलांडू पायरी
माणूस प्राणी बुद्धिजीवी थोडा विचार करावा
थांबवण्या प्रदूषण वाचवण्या सृष्टी प्रयत्न जरूर करावा
पर्यावरण संवर्धनात युवकांचा वाटा असावा
येणाऱ्या पिढीसाठी ऑक्सिजनचा साठा असावा
सिमेंटचे जंगल नसावे,मातीचा वास असावा
म्हणुनी प्रत्येकाने पर्यावरण संरक्षनाचा ध्यास कसावा
-हितेश श्रूंगारे