Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 May, 2011 - 05:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करा मग ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या. आता त्यावर चिरलेला कांदा घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला आणि घालुन ठवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. मिठाबरोबर कोकम किंवा कैरी आणि कोथिंबीरही घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.
ही बघा तयार झालेली सुकी करंदी.
वाढणी/प्रमाण:
आवडीवर आहे.
अधिक टिपा:
उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम
करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात.
आळुवडीतही करंदी घालतात.
करंदी पुलावही चांगला होतो.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललिता, करंदी/कोलंबी वगैरेचे
ललिता, करंदी/कोलंबी वगैरेचे भाव हे साईजवर ठरतात. जेवढा आकार मोठा तेवढा भाव जास्त! बिर्याणी वगैरे करताना भाताच्या प्रमाणात कोलंबी घालायची तर लहान आकाराची कोलंबी/ करंदी घेणेच बरे पडते. मी इथे कोलंबीची खिचडी करताना ७०-९०/ पाऊंडवाली श्रींप वापरते. ग्रील करायला मात्र परवडेल त्या प्रमाणे २१-३० ते ११ ते १५ या रेंजमधली कोलंबी वापरते.
व्वा सोप्पी आहे पाकृ. पण फोटो
व्वा सोप्पी आहे पाकृ.
पण फोटो घाईत काढला आहेस जागुतै.
रच्याकने 'आय लव कोळंबी'.
हीची मोठी बहीण.
जागु शेवटचा फोटो खासच , आत्ता
जागु शेवटचा फोटो खासच , आत्ता आणून करून खावीशी वाटते .
लले नाही ग प्रॉन्स बिरयाणीत
लले नाही ग प्रॉन्स बिरयाणीत कोलंबीच असते.
स्नेहा श्रीम्प नाव माहीत नाही ग मला.
मिरा सुक्या करंदीला सुकट म्हणतो आम्ही. सुकटीचा रस्सा, सुके, चटणी सगळेच चविष्ट लागते.
अगो मग असे असेल तर जेंव्हा बाजारात जाशिल तेंव्हा ज्या कोळणीकडे गर्दि असेल तिच्याकडे जायचे.
आणि नेहमी तिच्याचकडे जायचे म्हणजे ती आपल्याला ओळखायला लागते.
माझी तर ह्ल्ली फजीतीच होते. मी गेले की सगळ्या कोळणी हाका मारत बसतात मला आणि एकीकडे गेले की मग बाकीच्या रागावतात.
स्वाती, मामी, अखि,श्री
हॉटेलमधल्या बिर्याणीमध्ये
हॉटेलमधल्या बिर्याणीमध्ये कोलंबीच वापरतात कारण करंदीचा आकार आळुन खुप लहान होतो.
चातक हो, जेवणावरुन उठुन काढला विसरले म्हणुन.
नुतन
जागु.. तोंपासु ही पण रेसिपी..
जागु.. तोंपासु ही पण रेसिपी..
यम्म्मी तोंडाला पाणि सुटले..
यम्म्मी तोंडाला पाणि सुटले..
ही फक्त खास माझ्यासाठीच घरी येते आणि सोलायचे कष्ट पण मलाच..
पण खाल्ल्ल्यावर कष्टाचे सार्थक..
थोडावेळ पाण्यात घालुन ठेवली तर लवकर सोलली जाते.. (स्वानुभव).
मी गेले की सगळ्या कोळणी हाका
मी गेले की सगळ्या कोळणी हाका मारत बसतात मला आणि एकीकडे गेले की मग बाकीच्या रागावतात.
कोळणींसाठी नंबर सिस्टिम चालु कर आता. आणि त्यांना सांग वृ. मायबोलीवर टाकणार, मासा फेमस होणार, जास्त विकला जाणार तेव्हा जरा डिस्काऊंट वगैरे द्यायचे मनावर घ्या. हवेतर सोबत कोळणीचाही फोटू काढ आणि टाकत जा इथे.
थोडावेळ पाण्यात घालुन ठेवली
थोडावेळ पाण्यात घालुन ठेवली तर लवकर सोलली जाते. > फ्रीजमधिल थंडगार पाण्यात थोडावेळ घालुन ठेवायची, मग सालं लवकर निघतात (हा ही स्वानुभव
)
हो, जागू कोळणीचा पण फोटो हवाच
हो, जागू कोळणीचा पण फोटो हवाच !
तूमच्याकडे माखल्या मिळतात का ? उरणच्याच किनार्यावरुन त्यांच्या पाठी मी आणल्या होत्या. आमच्या घरी लव्ह बर्डस पक्षी होते. ते आवडीने खातात या पाठी.
त्यालाच माणकं पण म्हणतात का ?
साधना जर त्यांचे फोटो काढले
साधना जर त्यांचे फोटो काढले तर त्या माझा फोटो काढ माझा फोटो काढ म्हणुन भांडतील.
भ्रमर
दिनेशदा पुढची पाकृ आता माखलीची. माखली मध्ये सर्या माखुल आणि मणेर माखुल असे दोन प्रकार असतात.
साधना जर त्यांचे फोटो काढले
साधना जर त्यांचे फोटो काढले तर त्या माझा फोटो काढ माझा फोटो काढ म्हणुन भांडतील.
अगं मग बरंच ना. आधीच सांगायचे '५०% डिस्काऊंट देणारणीचा फोटो घेणेत येईल'
आणि मग त्या वाचलेल्या पैशांचेही मासे घे आणि आमचे सगळ्यांचे पत्ते.. व्हीपीपी ने पाठव. पोस्टमनने वाटेतल्या वाटेत उडवले नाहीत तर आम्हाला मिळतील.
तुमची इथली इतकी रसभरीत चर्चा
तुमची इथली इतकी रसभरीत चर्चा ऐकून.. आपण मासे न खाऊन कोणत्या तरी परमोच्च आनंदाला मुकतोय की काय असं वाटायला लागलंय..
दक्षिणा, आता तू कितीकाळ
दक्षिणा, आता तू कितीकाळ शाकाहारी राहशील अशी शंका येतेय मला !
सिंहगडावर ताईने चिकनचा रस्सा चाखला होता, असे आठवतेय मला.
आपण मासे न खाऊन कोणत्या तरी
आपण मासे न खाऊन कोणत्या तरी परमोच्च आनंदाला मुकतोय की काय असं वाटायला लागलंय..
तु खरेच एका परमोच्च आनंदाला मुकतेयस गं... फक्त एकदा तरी जागुच्या हातचे तळलेले मासे खाऊन बघ..
माझ्या हाताबिताला काही चव आहे
माझ्या हाताबिताला काही चव आहे की नाही माहीत नाही पण माश्याला चव असते. तरीपण दक्षे तु फक्त बोल तु खाणार आहेस तुला लग्गेच पेश करते.
दक्षिणा, मासे नाही खाल्लेत तर
दक्षिणा, मासे नाही खाल्लेत तर जन्म फुकट आहे असे समजायचे. (ते आहे ना, वोह भी क्या जवानी.. तसेच हे)
हायला! तुम्हा लोकांना जरा बोट
हायला! तुम्हा लोकांना जरा बोट काय दिलं तुम्ही हात पकडून खांद्यावर
बसलात राव माझ्या..
खांद्यावर बसलेत कुठे?? थेट
खांद्यावर बसलेत कुठे?? थेट तोंडापर्यंत पोचुन मासे भरवताहेत तुला...
अगं आपण एखादी चांगली गोष्ट खाल्ली तर आपल्या प्रिय माणसांनीही ती खावी असे वाटतेच ना.....
आता रोज रोज इथे येवून मासे
आता रोज रोज इथे येवून मासे बघताय मग चोरी कशाला ती खाण्याची..
आपला आवडीचा पदार्थ दुसर्याला खायचा प्रेमाचा आग्रह करताना आम्ही डोक्यावर सुद्धा बसतो कधी कधी.
दक्षे
दक्षे
चातक हो, जेवणावरुन उठुन काढला
चातक हो, जेवणावरुन उठुन काढला विसरले म्हणुन. >> अरेरे, जागुताई काळजी घेत जा गं तुझ्या मुळे दोन नाही चार घास जास्त जातात माझे.
चातका वजन वाढल असेल म्हणजे
चातका वजन वाढल असेल म्हणजे तुझं.
जागू एक सुचना आहे तुला, फोटो
जागू एक सुचना आहे तुला, फोटो नीट काढत जा जरा... करंदीच्या तयार डिश चे फोटो, लोणच्याचे बरेच फोटो धुरकट आलेत.
दक्षे करंदीचा फोटो कसा मी
दक्षे करंदीचा फोटो कसा मी घाईत काढला आहे ते लिहिलच आहे वर. आणि लोणच्याचा फोटो बरणीमुळे धुरकट आला असेल ग. पण मला जितक शक्य होइल तितकी काळजी मी घेईन चांगला फोटो काढण्याची. धन्स सुचनेबद्दल.
दक्षिणा, लोणच्याचं एक ठिकाय,
दक्षिणा, लोणच्याचं एक ठिकाय, पण करंदी तशीही तू खाणार नाहीयेस. मग फोटो धुरकट आला काय न स्पष्ट आला काय?
जागू, तू ग्रेट आहेस ग बाई. मत्स्याहारावर पुस्तकच लिही बरं आता...
जागू तू मालवणी आहेस का आणि
जागू तू मालवणी आहेस का आणि आठवड्यात किती दिवस मासे खातेस तू नवीन नवीन काही ना काही पदार्थ दाखवतेस पण कधी तरी मेजवानी ठेव सार्वजनिक............................मायाबोलीकारासाठी ....................
कोणी कोळंबी व करंदी मधला फरक
कोणी कोळंबी व करंदी मधला फरक सांगाल का? shrimp म्हणजे यातले कोण?
मधुरीमा अग हे मासे पुर्ण
मधुरीमा अग हे मासे पुर्ण होण्याची वाट पाहते मग पुस्तक काढणार आहे.
महेश मी मालवणी नाही. आठवड्यातले ३ दिवस आमचे माश्यांचे असतात. हे मासे मी ज्यादिवशी करते त्याच दिवशी नाही टाकत १-२ आठवड्यांत टाकते. त्यामुळे रेसिपीज माझ्याकडे साठतात.
अवधुत कोलंबी मोठी आणि जाड सालीची असते तर करंदीचे साल प्लास्टीक पिशवीसारखे पातळ असते. करंदी ही पांढरी-गुलबट असते.
अवधुत - जागुने कोलंबीचा
अवधुत -
जागुने कोलंबीचा जीवनक्रम आधीच्या एका पोस्टीत लिहिला होता -
*पहिला कोलीम किंवा रेफा ह्यात अगदी बारिक बारिक नुकतीच जन्मलेली पिल्ले वाटा पाहिल्यार कोलंबीचा आकारही ह्या पिल्लांना दिसत नाही. हा सुका करतात कांद्यावर भाकरीबरोबर एकदम टेस्टी लागतो.
ह्यातील सुका प्रकार म्हणजे कोलिमाच्या वड्या. ह्याच्या पापडाच्या आकाराच्या वड्या करुन सुकवतात ह्या वड्या भाजुन भाकरीबरोबर खातात.
* नंतर जवळा म्हणजे जरा कोलंबीचा आकार दिसायला लागलेली कोलंबीची पिल्ले. साधना म्हणते त्या प्रमाणे ह्यात कधी कधी प्लास्टीक येते आढळून ते काधून टाकायचे.
ह्याचा सुकवलेला प्रकार म्हणजे सुका जवला हा बर्याच जणांना माहीत असेल.
* नंतर येते करंदी किंवा अंबाड थोडी गुटगुटीत बाळ झालेली कोलंबी.
हिच सुकवल्यावर सुकी करंदी किंवा सुकी आंबाड होते.
*नंतर येते कोलंबी ही तर सगळ्यांना माहीत आहे.
हिचा सुकवलेला प्रकार म्हणजे कोलंबीचे सुके सोडे हे खुप महाग असतात.
* ह्यानंतर करपाली चांगल्या जाड्या जुड्या फुगलेल्या काळ्या कोलंब्या
हे सुकवले की कोलंबीचे मोठे सोडे तयार होतात.
कोलंबी नी श्रीम्प वेगळी. विकिपिडिया पहा, तिथे दोघांमधले वेगळेपण लिहिलेय. मी श्रिम्प खाल्ली नाही कधी, नाहीतर चवीतले वेगळेपण लिहिले असते. पण मला वाटते चव साधारण सारखीच असावी दोघांतली.
Pages