पाऊण किलो मटण, मीठ चवीपुरते, व्हिनेगर, मालवणी मसाला (मी मालवणी आहे हा मसाला घरीच बनवला आहे ), आल लसून पेस्ट, कांदा, कढीपत्ता, सुख खोबर.
१) मटण साफ करून धुवून घ्यायचं नंतर त्याला दही, आल लसून पेस्ट, मालवणी मसाला (नसेल तर तुमच्याकडे असेल तो वापरावा ), व्हिनेगर, मीठ लाऊन अर्धा तास ठेऊन द्यायचं. नंतर कांदा, सुख खोबर भाजून वाटण कराव.
२) पातेल्यात किवा कुकर मटण शिजवण्यासाठी उपयोग करावा. प्रथम कांदा आणि कडीपत्ता याची फोडणी करावी मग ते मटण फोडणीत घालून ते परतावे नंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफ आल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं कांद्या खोबऱ्याच वाटण घालाव. त्यानंतर आपल्याला जाड किवा पातळ हव तेवढ पाणी ओताव.
३) वरील कृती झाल्यावर त्यात पुन्हा मीठ टाकावे. कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्या कराव्यात. अशा तर्हेने झाल झटापट मटण तयार.
माझा हा पहिलाच प्रयत्न आहे इथे पाककृती टाकण्याचा तरी यात कोणालाही अधिक माहित हवी असल्यास नक्की विचार मी नक्की तुमची मदत करीन. या पाककृती मध्ये तुम्हाला काही आजून टाकाव वाटत असेल तर नक्की सांगा.
पाककृती मध्ये प्रती कशा
पाककृती मध्ये प्रती कशा टाकायच्या ते माहित नसल्यामुळे इथे प्रती टाकत आहे.
१)मटन धुवून साफ करून घ्यावे.
२)मसाला लावून १ तास ठेवावा.
३) तयार झालेले झटपट मालवणी मटण.
४) त्या दिवशी आमच्या घरी अशी मेजवानी होती त्याचीच ताटातील हि झलक.
अरे वा! पदार्थ छान जमवलाय की
अरे वा! पदार्थ छान जमवलाय की तुम्ही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण मी खात नाही
असो..
आईशप्पत, लाळच गळली फोटो
आईशप्पत, लाळच गळली फोटो पाहुन.
तोंपासु
तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षे महेश छान झालय मटण. वास
दक्षे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
महेश छान झालय मटण. वास आला इथपर्यंत.
मी पण आमच्या पद्धतीच मटण कुकरमध्येच करते. १० मिनिटांत तयार होत.
पहिला प्रयत्न इथे पोस्टायचा
पहिला प्रयत्न इथे पोस्टायचा ना. करायचा पहिला नक्कीच नाही ! चांगले जमले असावे.
एकदम मस्त. महेश, मालवणी
एकदम मस्त.
महेश, मालवणी मसाल्याची पण रेसेपी टाका.
छान आहे रेसिपी. मीही मालवणीच
छान आहे रेसिपी. मीही मालवणीच
काही वर्षांपुर्वी आमच्याही घरात अशाच पद्धतीने मटण केले जायचे, फक्त वाटप मटण शिजल्यावर घातले जात असे. आता घरी कोणी मटण खात नाही. रेड मिट टाळायचे वगैरे संकल्पना डोक्यात घुसल्यात
मला आवडते मटण पण मला खोबरे घालुन केलेले अजिबात आवडत नाही (लहानपणापासुन तेच खाल्ल्याचा परिणाम). मला मटन रोगनजोश हा प्रकार आवडतो. कधी माझ्यासाठी पाव किलोभर आणले तर रोगनजोश करुन खाते.
वरती सांगितल्या प्रमाणे वाटप टाकत असतानाच किती माणस आहेत त्यावरून पाणी टाकाव.
हे अगदी टिपीकल मालवणी. गावी कोंबडीचे जेवण असते तेव्हा बघायचे. एकच घरची कोंबडी, मांसाचे अगदी बारीक तुकडे करायचे. आणि जेवायला किती माणसे आहेत त्या अंदाजाने नारळ फोडून घालायचे. जेवताना एखाद-दुसरा मांसाचा तुकडा वाटीत मिळाला की बस्स..... पण त्या रश्श्याला मात्र अप्रतिम चव असते.
हां..मस्त रंग आलाय .. महेश,
हां..मस्त रंग आलाय ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
महेश, मालवणी मसाल्याची पण रेसेपी टाका.- - लगेच टाका
पल्लवी - ही बघ मसाल्याची
पल्लवी - ही बघ मसाल्याची रेसिपी
http://www.maayboli.com/node/4210
महेशने घरीच बनवुन ठेवलाय म्हटले तो हा मसाला. आता सिजन आहे हा मसाला बनवायचा, पण मिरच्या खुपच महागल्यात या वर्षी.
हा बाजारात विकतही मिळत असावा, मी कधी आणला नाही. आणायचा असेल तर बेडेकरांचा मालवणी मसाला मिळतो तो घे विकत. बाकीचे सगळे फालतु आहेत. नुसते नाव मालवणी.
मटण मलाही आवडते... पण कधीतरीच
मटण मलाही आवडते... पण कधीतरीच खाऊ शकते हेवी असल्यामुळे... महेश रेसिपी झटपट सोप्पी व एकदम तोंपासू!!!
साधना, मलाही खोबर्याचं नाही आवडत मटण्/चिकन नेहमी... वेगळं ट्राय करण्यासाठी मटन रोगनजोश ची रेसिपी टाक ना प्लीज!!!
पाउण किलो.. एकट्याने खाल्ला??
पाउण किलो.. एकट्याने खाल्ला??![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
टाकते गं.. आधी आणायला हवे.
टाकते गं.. आधी आणायला हवे. सोबत फोटो नसतील तर काय मजा???
अगदी बरोब्बर!!! मला तर
अगदी बरोब्बर!!!
मला तर आत्ताच आठवून आठवून तोंडाला पाणी सुटलंय! स्लर्प स्लर्प!!! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना, चांगली आहे रेसेपी. पण
साधना, चांगली आहे रेसेपी.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण पहिल्यांदा विकत घेतलेलाच बरा
अजून कशात हा मसाला वापरता येइल?
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास लागतात... खरं का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तुम्हाला हवा तर हा मसाला मी
तुम्हाला हवा तर हा मसाला मी हि तुम्हाला देऊ शकतो कारण आम्ही हा मसाला घरी बनवतो आणि बाहेर विकतो काही भोजनालयात देखील जातो. काही वयक्तिक लोक आमच्याकडून वार्षिक बनवून घेतात.
यंदा मिरची खूप खूप महाग झाली आहे.
जागू सगळ्यात जास्त मला
जागू सगळ्यात जास्त मला तुज्याकडून टिपणी हवी होती कारण तू जे काही काही नवीन नवीन पदार्थ तिथे टाकतेस म्हणूनच मी हा प्रयत्न केला.
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास लागतात... खरं का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>> मी ऐकलय.. किमान ३६ तास लागतात.. म्हणून लोक एक दिवसाआड मांसाहार करतात.. बुध - शुक्र - रवी.. काही लोक सोमवारी सुद्धा खातात...
मी कधी-कधी खातो ही माहिती विचारू नये..
रंग मस्त दिसतोय बनवलेल्या
रंग मस्त दिसतोय बनवलेल्या रश्श्याचा.
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास लागतात
मला तरी हे खरे वाटत नाही. मांसाहारविरोधक लोक नेहमी मांसाहार पचायला कसा जड आहे व.व. सांगताना मांस आपल्या पचनसंस्थेत दीर्घकाळ पडुन राहते व्.व. बोलतात. आपल्या आतड्याची अन्न पचवायची आणि न पचणारे घटक बाहेर फेकुन द्यायची हजारो वर्षे व्यवस्थित चाललेली स्वतःची अशी सिस्टिम आहे. अन्न एकदा आत गेले की ज्या क्रमाने त्याच्यावर प्रोसेस होत जाते ती वेज्-नॉन्वेज दोघांवरही सारखीच होणार. जे पदार्थ पचायला जड आहेत ते पदार्थ पोट काय असेम्ब्लीलाईनवरुन वेगळे काढुन ठेवणार, सावकाशीने पचवायला??? मटण पचायला कदाचित जड असु शकेलही, पण म्हणुन आपले पोट त्याला पचेपर्यंत म्हणजे २४-४८ तास पोटात पडुन राहायला देत असेल असे मला वाटत नाही. आदल्या दिवशी दुपारी जेवून दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर निसर्ग साफसफाईचे काम करण्याची प्रबळ इच्छा तुमच्या मनात आपोआप निर्माण करतोच.
माणुस हा मुळ शाकाहारीच आहे असाही जो प्रचार केला जातो तो मला पटत नाही. मुळ शाकाहारीच असता तर आदीम अवस्थेत असताना त्याला मांस खायची बुद्धी झाली नसती. तेव्हा हॅमबर्गरच्या जाहीराती नव्हत्या त्याला मांसाहाराकडे खेचायला. जसे काही प्राणी, बेडुक वगैरे उभयचरी असतात, तसा माणुस मिश्राहारी आहे. त्याची पचनसंस्था शाकाहार आणि मांसाहार दोन्ही पचवायला समर्थ अशीच बनवलेली आहे.
फोटॉ पाहून तोंडाला पाणी
फोटॉ पाहून तोंडाला पाणी सुटले..
हिरवा खर्डा ठेवला ताटलीत की एकदम ब्येस मेनू!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला प्रयत्न इथे पोस्टायचा
पहिला प्रयत्न इथे पोस्टायचा ना. करायचा पहिला नक्कीच नाही ! चांगले जमले असावे.
चांगलेच जमलेय.. प्रचि क्रमांक तिन साक्षी आहे मटण झक्कास जमलेय त्याचा.
माणुस हा मुळ शाकाहारीच आहे
माणुस हा मुळ शाकाहारीच आहे असाही जो प्रचार केला जातो तो मला पटत नाही. मुळ शाकाहारीच असता तर आदीम अवस्थेत असताना त्याला मांस खायची बुद्धी झाली नसती. तेव्हा हॅमबर्गरच्या जाहीराती नव्हत्या त्याला मांसाहाराकडे खेचायला. जसे काही प्राणी, बेडुक वगैरे उभयचरी असतात, तसा माणुस मिश्राहारी आहे. त्याची पचनसंस्था शाकाहार आणि मांसाहार दोन्ही पचवायला समर्थ अशीच बनवलेली आहे.
>>> ह्या संदर्भात एक लेख गेल्या शुक्रवारच्या लोकप्रभामध्ये आला आहे... वाचावा असा..
दक्षे.. आता तू मांसाहाराबद्दल
दक्षे.. आता तू मांसाहाराबद्दल बराच अभ्यास कर्तेयस ... पाहून बरं वाटलं..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माश्या वरून आता चक्क मटनाबद्दलही प्रश्नबिश्न विचारू लागलीयेस्..ऐसीही तरक्की करो
@ महेश.. तुला मसाला ऑर्डर करायचा असेल तर तोकसा करायचा?? मुंबईत होम डिलिवरी करू शकशील??? सविस्तर कळव.
मी अबुधाबीत असताना तिथल्या
मी अबुधाबीत असताना तिथल्या एका श्रीलंकन शेजारणीने मटणाची रेसिपी शिकवली होती.
मटण साफ करून धुवून वर सांगितल्याप्रमाणे मेरिनेट करावं. ओल्या खोबर्याचे छोटे पातळ काप करावेत. हल्ली कोकोनट मिल्क )नारळाचं दूध) बाजारात मिळतो. मी त्याचा वापर केला होता.
कांदे उभे पातळ चिरावेत, त्यात टोमॅटोही असावा.
आलं लसूण पेस्ट, मोहरी, हिंग, जिरे, हळद अशी साधी फोडणी करावी. त्यात कांदा परतून टोमॅटोही चांगला परतून )जिरवून) घ्यावा. त्यात मिरचीपावडर घालावी, मीठ घालावं. खोबर्याचे काप घालावेत. त्यावर मट्ण घालावं आणि झाकण लावून, त्यावर जड काही ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावं. मधून मधून हलवत राहावं. मटणाला अंगचं पाणी सुटतं. त्याच पाण्यात ते शिजवावं. वरून नारळाचं दूध घालावं. पण हे मटण सुकं होतं आणि शिजायला सुमारे दोन तास लागतात.
दक्षिणा मला तर वाटत की आता तू
दक्षिणा मला तर वाटत की आता तू पुढच्या वेळी टेस्टच करुन बघशील.
महेश माझ्यापेक्षा इथे कितीतरी छान छान रेसिपी टाकणारे आहेत. तरी धन्स.
महेश खत्तरनाक बनवलयं मटण
महेश खत्तरनाक बनवलयं मटण !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे किती लाळ गाळताय अशाने लाळेर बांधावं लागेल तुमच्या गळ्यात.
दक्षे काही विशेष नाही ग ह्यात , भज्यासारखं लागतं तु खा बिनधास्त
दक्षे काही विशेष नाही ग ह्यात
दक्षे काही विशेष नाही ग ह्यात , भज्यासारखं लागतं तु खा बिनधास्त >> पण वरचे कढी भज्यासारखे दिसतय
दक्षे केले की मला बोलव ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
फोटो मात्र जबरीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाउण किलो.. एकट्याने खाल्ला??
पाउण किलो.. एकट्याने खाल्ला?? >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रंग लै भारी
Pages